जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 342/2008. प्रकरण दाखल तारीख - 18/10/2008 प्रकरण निकाल तारीख -20/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. डॉ.चंद्रशेखर दत्ताञय वायकोस 61/234, शांतिसदन, सहयाद्री नगर, नांदेड. अर्जदार विरुध्द. मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, गैरअर्जदार डॉक्टर्स लेन शाखा, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.जे.एस.पांडे. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार स्टेट बँक यांच्या सेवेतील अनूचित प्रकारा बद्यल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून गृह कर्ज म्हणून रु.11,70,000/- घेतले होते. त्यांचा एकही हप्ता त्यांनी चूकवला नाही, परंतु फेब्रूवारी,2008 मध्ये रु.18,000/- एवढी व्याजाची रक्कम थकीत आहे म्हणून सांगितले त्यांनी दि.29.02.2008 रोजी रक्कम भरली. नंतर अर्जदाराने खाते तपासल्यानंतर त्यांचे लक्षात आले की, व्याज जास्त लावल्या गेले आहे. त्यांनी गैरअर्जदार यांना सांगून व्याज दर तपासण्याची विनंती केली परंतु प्रत्येक वेळी गैरअर्जदार हे काही ना काही कारण सांगून टाळत गेले. यानंतर दि.16.06.2008 रोजी गैरअर्जदार यांचे उपमहाव्यवस्थापक यांचेकडे तक्रार केली. त्यांनी बँकेस कारवाई करण्याचे सांगितल्यावर थातूरमाथूर कारवाई करुन दि.27.06.2008 रोजी रु.14,920/- अर्जदाराचे खात्यावर जमा केले. यानंतर दि.19.06.2008 रोजी ही रक्कम चूक आहे असे म्हटल्यावर परत रु.5129/- जमा केले. यात मिरर अकॉऊंट तयार केलेले आहे. यात गैरअर्जदार म्हणतात की, रु.2332/- एवढेच चूकीचे व्याज होते. अर्जदार यांचेकडून रु.33,308/- नियमबाहय वसुल केले व फिक्स व्याजाचा दर असताना फलोटींग व्याजाचा दर लावला. त्यामूळे नियमबाहय म्हणून घेतलेली रक्कम वापस करावी व नूकसान भरपाई म्हणून बॅकेने पूढील पाच महिन्याचे व्याज आकारु नये व रु.50,000/- नूकसान भरपाई म्हणून दयावेत म्हणून हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. रु.11,70,000/- गृह कर्जापोटी दिले व त्यावर फलोंटीग व्याजाचा दर लावला हे त्यांना मान्य आहे. व्याजाचा दर हा त्यावेळेस रु.8.50 टक्के होता व तो आर.बी.आय. च्या निर्देशानुसार कमी जास्त होत असतो. व्याज दर वाढल्यानंतर जास्त व्याज लावले. अर्जदाराने स्वतःहून त्यांचे खाती रु.18,200/- एवढी रक्कम दि.29.02.2008 रोजी भरली. नियमित कर्जाचे हप्ते भरणा-यांना व्याज दरात सवलत दयावी अशी सूचना आहे यावरुन अर्जदाराचे व्याज कमी करुन दिले. यानंतर गैरअर्जदाराने 2 ते 3 वेळेस व्याज कमी करुन दिले, जवळपास रु.33,308/- अर्जदाराचे खात्यावर जमा केले व अर्जदाराने स्वतःहून दि.10.09.2008 रोजी गैरअर्जदारास लेखी पञ देऊन त्यांची काही तक्रार राहीली नाही असे लिहून दिले. अर्जदार मागतात ते रु.50,000/- किंवा पाच हप्ते माफ करा हे म्हणणे बेकायदेशीर आहे. अर्जदाराने दिलेल्या दि.05.05.2008 च्या अर्जानुसार एक्स.बी. प्रमाणे जर गैरअर्जदाराने 25 टक्के व्याज जास्त लावल्यास बँकेने ते व्याजासह त्यांना परत केलेले आहेत. अर्जदाराची तक्रार दूर झालेली आहे. अर्जदाराचा अर्ज हा बेकायदेशीर व नियमबाहय असल्याकारणाने खारीज करण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे, तसेच गैरअर्जदार यांनी सूध्दा पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकार अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदारानी कर्ज घेतल्याबददल ते मंजूर पञ, करारनामा, शेडयूल, दाखल केलेल्या कागदपञावरुन गैरअर्जदार यांना हे सर्व मान्य आहे. पञ व्यवहार जास्त व्याज आकारल्या बददलचा व तक्रार अर्ज या प्रकरणात दाखल आहे. तसेच अर्जदार यांचे अकॉऊंटस स्टेटमेंट हे ही दाखल आहे. आपल्या लेखी म्हणण्यात गैरअर्जदार यांनी व्याजाची दर आकारणी चूकीची आहे हे मान्य केले आहे व ते ही चूक अर्जदाराने त्यांचे निदर्शनास आणून दिलेली आहे ती दूरुस्त करण्यास गैरअर्जदारांनी तब्बल सहा महिने लावले. एवढेच नव्हे तर अर्जदाराची तक्रार उपमहाव्यवस्थापक याचेकडे जाईपर्यत त्यांनी घाई केलेली नाही. जेव्हा उपमहाव्यवस्थापक यांचेंकडहून कारवाई करण्याचे सांगितल्यावरच त्यांनी कारवाई केली. हे प्रकरण चालू असताना अर्जदाराची तक्रार जो वाद होता तो गैरअर्जदार यांनी संपूष्टात आणला आहे व जास्तीची घेतलेली रक्कम रु.33,308/- त्यांचे खात्यात जमा ही केलेली आहे. दि.19.02.2008 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारांच्या नांवे एक पञ लिहून त्यात अर्जदार यांनी दि.10.09.2008 रोजी त्यांची काही तक्रार शिल्लक राहीलेली नाही असे लिहून दिलेले आहे. त्यामूळे त्यांनी त्यांचे आभार मानले आहे. यांचा अर्थ असा होतो की, गैरअर्जदार यांचेकडून व्याज आकारण्यामध्ये चूक झाली आहे. परंतु ती लवकर मान्य न करता त्यांनी ती चूक दूरुस्त करण्यास खूप वेळ घेतला त्यामूळे अर्जदार यांना सारखे बँकेत चकरा माराव्या लागल्या व त्या बददल त्यांना मानसिक ञास होणे हे साहजिकच आहे. अर्जदार यांनी आपले खाते जर तपासले नसते व गैरअर्जदार यांचेवर पूर्ण विश्वास ठेवला असता तर निश्चितच त्यांचे नूकसान झाले असते, ते जागरुक असल्यामूळे त्यांची जास्तीची घेतलेली रक्कम गैरअर्जदार यांना वापस करावी लागली. आता रक्कमे बददल कोणताही वाद नाही. फक्त अर्जदार यांना झालेल्या मानसिक ञासाबददल व दावा खर्चाबददल एवढेच काय ते तक्रार शिल्लक राहते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकार याद्वारे सिध्दच केलेला आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना झालेल्या मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु,2,000/- मंजूर करण्यात येतात. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जे.यु.पारवेकर लघूलेखक. |