जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –168/2011 तक्रार दाखल तारीख –02/11/2011
भानदास पि.दगडू भवर
वय 42 वर्षे धंदा शेती तक्रारदार
रा.आष्टा (हरिनारायण) ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
1. शाखाधिकारी,
स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा आष्टा (हरिनारायण) ता.आष्टी जि.बीड .सामनेवाला
2. शाखाधिकारी
दि न्यु इंडिया अँश्युरन्स कंपनी लि.
अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड, बीड ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.अरविंद काळे
सामनेवाले क्र.1 तर्फे :- अँड.एस.टी.देशपांडे
सामनेवाले क्र.2 तर्फे ः- अँड.एस.एल.वाघमारे
नि-1 वरील आदेश
(दि.13.12.2011)
तक्रारदार व सामनेवाला क्र.1 व 2 यांचेत दि.07.12.2011 रोजी तडजोड झाली. त्यानुसार त्यांनी तडजोडपत्र दाखल करुन सदरचे प्रकरण निकाली काढावे असा अर्ज दाखल केला. आज दि.13.12.2011 रोजी तक्रारदार त्यांचे वकील श्री.काळे, सामनेवाला क्र.1 चे प्रतिनिधी व त्यांचे वकील श्री.देशपांडे व सामनेवाला क्र.2 चे वकिल श्री.वाघमारे हे हजर आहेत. दि.07.12.2011 रोजीच्या तडजोडपत्राप्रमाणे तडजोड झाली असल्याने सदरचे प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली आहे.
आदेश
1. तडजोड पत्राप्रमाणे प्रकरण निकाली.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड