Maharashtra

Nagpur

EA/10/212

Smt. Manju Ashok Shrivas - Complainant(s)

Versus

State Bank of India Through Branch Manager - Opp.Party(s)

Adv. Sanjay P. Chintakuntalwar

15 Jul 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Execution Application No. EA/10/212
1. Smt. Manju Ashok ShrivasShiv Mandir, Jai Hind Nagar, Sadikabad Colony, Mankapur, Nagpur ...........Appellant(s)

Versus.
1. State Bank of India Through Branch ManagerChhaoni, Katol Road, Nagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :

Dated : 15 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

तक्रारकर्तीचे वकील हजर, गैरअर्जदार गैरहजर. यात तक्रारकर्तीने विलंब माफीचा अर्ज दाखल केला आहे. तक्रारकर्तीचे थोडक्‍यात असे निवेदन आहे की, तिचे पती दि.03.03.2008 रोजी मरण पावले. त्‍यांचे गैरअर्जदार बँकेत खाते होते व त्‍या खात्‍यामधील तक्रारकर्तीच्‍या पतीचे एटीएम कार्ड बंद करण्‍यांस सांगितले होते, व तसे केल्‍यानंतर रु.1,65,000/- एवढी रक्‍कम काढण्‍यांत आली हे तक्रारकर्तीचे पतीला कळल्‍यानंतर त्‍यांनी पोलिस स्‍टेशनला तक्रार केली होती. पतीच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याचे पत्‍नीला मानसिक धक्‍का बसला, ती आपला उदरनिर्वाह चालविण्‍याकरता दुसरा कुठलाही पर्याय नसल्‍यामुळे ती आपल्‍या बहिणीकडे मुलांना घेऊन राहू लागली. तक्रारीत लागलेली संपूर्ण कागदपत्रे तिच्‍या पतीने कुठे ठेवले याचा तिला अंदाज नव्‍हता. 3 वर्षांनंतर तक्रारकर्तीने आपल्‍या मुळ घरात राहण्‍यांस सुरवात केली तेव्‍हा घराची साफ-सफाई करीता असतांना तक्रारीत दाखल केलेली कागदपत्रे व बँकेचे पासबुक दि.07.09.2010 रोजी मिळाले त्‍यानंतर ही तक्रार मंचात दाखल केलेली आहे आणि त्‍यामुळे या तक्रारीस 1 वर्षाचा विलंब झालेला आहे. गैरअर्जदारांना नोटीस दिल्‍यानंतर त्‍यांनी आपले उत्‍तर दाखल केले मात्र विलंब माफीचे अर्जास उत्‍तर दिले नाही व कोणत्‍याही प्रकारे तक्रारकर्तीच्‍या विधानांना खोडून काढले नाही. तक्रारकर्तीने नमुद केलेली परिस्थिती लक्षात घेता, तिला अनेक ठिकाणी कामास जावे लागले व अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सदर परिस्थितीचा विचार करता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

आदेश

1.  तक्रारकर्तीचा विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्‍यांत येतो.

2. तक्रारकर्तीची तक्रार नोंदवुन घ्‍यावी आणि गैरअर्जदारांना नोटीस काढावी.


[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT