जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, भंडारा.
तक्रार दाखल दिनांकः 04/09/2015
आदेश पारित दिनांकः 15/11/2016
तक्रार क्रमांक. : 60/2015
तक्रारकर्ती : 1. श्री दिनदयाल तुलाराम भरणे (मृतक)
अ. श्रीमती येणु बे. दिनदयाल भरणे
वय – 55 वर्षे, धंदा – घरकाम
रा.विवेकानंद कॉलनी,आंबेडवार्ड वार्ड जि.भंडारा
ब. सौ.संध्या संजय ढोमणे
वय – 39 वर्षे, धंदा – घरकाम
रा.बेला ता.जि.भंडारा
क. सौ.स्वाती सुरेश खरवडे
वय – 37 वर्षे, धंदा – घरकाम
रा.शहापुर ता.जि.भंडारा
ड. सौ.निर्मला अविनाश बेहरे
वय – 33 वर्षे, धंदा – घरकाम
रा.तिरोडा ता.तिरोडा जि.गोंदिया
इ. सौ.मंगला रविंद्र बेहरे
वय – 35 वर्षे, धंदा – घरकाम
रा.वडसा ता.देसाईगंज जि.गडचिरोली
फ. योगेश दिनदयाल भरणे
वय – 31 वर्षे, धंदा – व्यवसाय
रा.विवेकानंद कॉलनी,आंबेडवार्ड वार्ड जि.भंडारा
ग. राजेश दिनदयाल भरणे
वय – 27 वर्षे, धंदा – नौकरी
रा.नागपुर ता. जि.गडचिरोली
2. श्री बळीराम मुकूंदा सेलोकर
वय – 66 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त रा. फुले वार्ड, पेट्रोलपं(ठाणा)जि. भंडारा.
3. श्रीरामभाऊ वकटूजी सोरते
वय – 65 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त
4. श्री नत्थु मारोती कुरझेकर
वय – 64 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त रा. फुले वार्ड, पेट्रोलपं(ठाणा)जि. भंडारा.
अर्जदार क्र.1,3 व 4 रा.विवेकानंद कॉलनी,
आंबेडकर वार्ड-2 पेट्रोलपंप(ठाणा) ता.जि.भंडारा
5. श्रीमती भागिरथा हरिचंद डोरले (मृतक)
अ. रामप्रसाद हरिचंद डोरले
वय – 44 वर्षे, धंदा – शेती
ब. युवराज हरिचंद डोरले
वय – 35 वर्षे, धंदा – शेती
दोन्ही रा.शहापुर ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : 1) शाखा प्रबंधक
भारतीय स्टेट बँक,शाखा जवाहरनगर
ता.जि.भंडारा
तक्रारकर्त्यातर्फे : अॅड.एम.जी.हरडे
वि.प. : एकतर्फी
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. हेमंतकुमार पटेरिया, सदस्य यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक - 15 नोव्हेम्बर 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
- . तक्रारकर्ते आयुध निर्माणी भंडारा(जवाहरनगर) येथे कार्यरत होते व ते सेवानिवृत्त झाले. तक्रारकर्ते यांचे बचत खाते क्रमांक खालीलप्रमाणे आहे.
-
| | बचत खाते क्रमांक |
01 | दिनदयाल तुकाराम भरणे | -
|
02 | बळीराम मुकूंदा सेलोकर | -
|
-
| रामभाऊ वकटूजी सोरते | -
|
-
| नत्थु मारोती कुरझेकर | -
|
-
| श्रीमती भागीरथा हरिचंद्र डोरले | -
|
रक्षा लेखा प्रधान नियंत्रक, पेंशन कार्यालय, अलाहाबाद यांनी प्रत्येक तक्रारदाराचे निश्चित वैदयकिय भत्ता (Fixed medical Allowance) मंजुर केले आहे. या संदर्भात विरुध्द पक्ष यांना प्रत्येक तक्रारदाराचे मंजुर केलेले देय असलेले निश्चित वैदयकिय भत्ता तक्रारदाराला देण्याचे साठी कळविले आहे. सदर निश्चित वैदयकिय भत्ता विरुध्द पक्ष यांचे कडे जमा आहे.
रक्षा लेखा प्रधान नियंत्रक पेंशन कार्यालयाच्या अटी व शर्ती अनुसार विरुध्द पक्ष यांनी प्रत्येक अर्जदाराला खालीलप्रमाणे निश्चित वैदयकिय भत्ता देणे आहे.
अ) रक्षा लेखा प्रधान नियंत्रक पेंशन कार्यालय, अलाहाबादच्या मंजुरीच्या तारखेपासून ऑक्टोबर 2014 पर्यंत निश्चित भत्ता रुपये 300/- प्रतिमहा प्रमाणे.
ब) नोव्हेंबर 2014 ला निश्चित वैदयकिय भत्ता प्रतिमाह रुपये 380/- प्रमाणे
क) डिसेंबर 2014 ते पुढे निश्चित भत्ता प्रतिमाह रुपये 500/- प्रमाणे
तक्रारकर्ते विरुध्द पक्ष यांना वेळोवेळी भेटून मंजुर केलेले निश्चित वैदयकिय भत्ता देण्याकरीता विनंती केली आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी आश्वासन देऊन सुध्दा मंजुर केलेले निश्चित वैदयकिय भत्ता तक्रारकर्त्यांना दिले नाही आणि सदर प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणुन तक्रारकर्त्यांनी दिनांक 31/3/2015 रोजी विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविली. परंतु विरुध्द पक्ष यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही व नोटीसचे उत्तरही दिले नाही. म्हणुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांच्या मागणीची पुर्तता न केल्याने सदर तक्रार दाखल केली असून त्यात खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
-
| | देय असलेला निश्चित वैदयकिय भत्ता |
01 | दिनदयाल तुकाराम भरणे | -
|
02 | बळीराम मुकूंदा सेलोकर | -
|
-
| रामभाऊ वकटूजी सोरते | -
|
-
| नत्थु मारोती कुरझेकर | -
|
-
| श्रीमती भागीरथा हरिचंद डोरले | -
|
व यापुढे दरमहा रुपये 500/- प्रमाणे निश्चित वैदयकिय भत्ता देण्यास आदेश व्हावे व तक्रारकर्ते क्र.1 ते 5 यांस झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- विरुध्द पक्ष यांनी दयावे.
तक्रारकर्ते यांनी तक्रारीच्या पृष्ट्यर्थ भारतीय स्टेट बँकेच्या पासबुकची प्रत, प्रत्येक तक्रारदाराला मंजुर झालेली निश्चित वैदयकिय भत्त्याची प्रत, सचिव ऑल इंडिया सेन्ट्रल गव्हर्नमेंट पेंन्शनर्स असोसिएशन, मुख्यालय पुणे यांचे पत्र, वकिलामार्फत विरुध्द पक्ष यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत व त्याची पोच इ.दस्ताऐवज दाखल केले आहेत.
2. तक्रारकर्त्यांची तक्रार मंचाने दिनांक 4/9/2015 रोजी दाखल करुन घेतल्यानंतर विरुध्द पक्ष यांना दिनांक 22/0922015 रोजी मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आल्या. सदर प्रकरणात विरुध्द पक्षाला दिनांक 29/9/2015 रोजी नोटिसची बजावणी झाली. परंतु ते दिनांक 5/1/2016 पर्यंत हजर झाले नाहीत म्हणून मंचाने दिनांक 5/1/2016 रोजी विरुध्द पक्षा विरुध्द प्रकरण चालविण्याचा आदेश पारित केला. सदर आदेश रद्द करावा म्हणुन विरुध्द पक्षाने दिनांक 5/4/2016 रोजी अर्ज दिला.
तक्रारकर्त्यांनी सदर अर्जाच्या स्विकृतीस तीव्र विरोध दर्शविला. त्याचे म्हणणे असे आहे की विरुध्द पक्ष हेतुपरस्पर गैरहजर राहिले आणि मुदतीच्या आंत हजर न होण्याचे तसेच लेखी जबाब दाखल न करण्याचे कोणतेही समर्थनीय कारण दिले नाही म्हणून सदर अर्ज नामंजुर करण्यात यावा अशी विनंती मंचासमोर केली.
ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदी प्रमाणे मंचाला स्वतःचा आदेश पुनर्विचार करुन तो रद्द करण्याचा अधिकार नाही. तसेच नोटिस मिळाल्यापासून 45 दिवसानंतर लेखी जबाबासाठी अवधी मंजुर करण्याचा अधिकार देखील नाही. म्हणुन मंचाला स्वतःच्या आदेशाचा पुर्नविचार करुन तो रद्द करण्याचा अधिकार नसल्यामुळे विरुध्द पक्षाविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा निर्णय दिनांक 12/7/2016 रोजी मंचाने घेऊन तसा आदेश पारित केला.
3. तक्रारकर्त्यांचा तक्रार अर्ज, तक्रारकर्त्यांनी तक्रारी सोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि तक्रारकर्त्यांनी सादर केलेला लेखी युक्तीवाद यावरुन तक्रारीच्या निर्मीतीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) | वि.प.ने सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला आहे काय ? | - | होय. |
2) | तक्रारकर्ते मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? | - | होय. |
3) | अंतीम आदेश काय ? | - | तक्रार अंशतः मंजुर. |
कारणमिमांसा
- मुद्दा क्र.1 व 2 बाबत – तक्रारकर्ते आयुध निर्माणी भंडारा (जवाहरनगर) येथे कार्यरत होते व ते वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झाले. तक्रारकर्ते यांचे विपच्या स्टेट बँक ऑफ इंडिया येथे बचत खाते होते. तक्रारकर्त्यांनी सादर केलेल्या पासबुक नुसार त्यांचे खाते क्रमांक खालीलप्रमाणे आहे.
-
| | बचत खाते क्रमांक |
01 | दिनदयाल तुकाराम भरणे | -
|
02 | बळीराम मुकूंदा सेलोकर | -
|
-
| रामभाऊ वकटूजी सोरते | -
|
-
| नत्थु मारोती कुरझेकर | -
|
-
| श्रीमती भागीरथा हरिचंद्र डोरले | -
|
तक्रारकर्त्यांनी सादर केलेल्या प्रत्येक तक्रारकर्ता यांचे रक्षा लेखा प्रधान नियंत्रक, पेंशन कार्यालय, अलाहाबाद यांनी निश्चित वैदयकिय भत्ता मंजुर केल्याचे पत्र खालीलप्रमाणे आहे.
-
| | मंजुर केलेले पत्र |
01 | दिनदयाल तुकाराम भरणे | No/AT/PSB/III/Bhandara/12 Dt.5/11/2012 |
02 | बळीराम मुकूंदा सेलोकर | No/AT/PSB/III/Bhandara/13 Dt.13/02/2013 |
-
| रामभाऊ वकटूजी सोरते | No/AT/PSB/III/Bhandara/13 Dt.23/04/2013 |
-
| नत्थु मारोती कुरझेकर | No/AT/PSB/III/Bhandara/13 Dt.20/11/2013 |
-
| श्रीमती भागीरथा हरिचंद्र डोरले | No/AT/PSB/III/Bhandara/13 Dt.29/11/2013 |
उपरोक्त मंजुर केलेले निश्चित वैदयकिय भत्त्याचे आदेश विरुध्द पक्ष यांना Address करण्यात आलेले आहेत. त्यांत पुर्वी वैदयकिय भत्त्याचा पर्याय न स्विकारणा-यांना तो स्विकारण्याच्या तारखेपासून दरमहा 300/- रुपये वैदयकिय भत्ता देण्याबाबत खालील प्रमाणे तरतुद आहे.
In case pensioner is not in recipt of FMA earlier, rurther going to opt FMA. There Fixed Medical Allowance is payable as applicable from the date of next month of the date of option exercised be the pensioner if eligible as per provision of Govt. orders and no arrears will be paid for earlier, period, if otherwise in orer. Please regulate the payment accordingly after obtaining necessary option/under taking from the pensioners. Where the pensioner was in recipt of FMA @ Rs.100/-p.m. wef 01/12/97 or thereafter further enhanced amount of FMA Rs.300/-p.m. is payable wer 01/09/2008.
यावरुन स्पष्ट होते की तक्रारकर्ते वरील क्र.1 ते 5 च्या आदेशाच्या तारखेपासून निश्चित वैदयकिय भत्ता रुपये 300/-PM मिळण्याकरीता पात्र आहेत.
तसेच ऑफिस मेमोरन्डम No. 4/25/2008/P & PW(D) Government of India Ministry of Personnel Public Grievances & Pensions (Department of Pension and Pensioners Welfare) New Delhi Dt 14th November 2014 Para 2 reads as “ The demand for further enhancement of FMA has been under consideration of the Government for some time past. Sanction of the President is hereby conveyed or enhancement of the amount of Fixed Medical Allowance from Rs.300/- to Rs.500/-PM. The other conditions for grant of Fixed Medical Allowance shall continue to be as contained in the Department OM No 45/57197/P & PM(C) Dt.19/12/97, 24/08/98, 30/12/98, and 18/8/99.
Para 3 read as these order shall take effect from date of issue of this OM (Office Memorandum).
उपरोक्त ऑफिस मेमोरन्डम नुसार तक्रारकर्ता दिनांक 14/11/2014 पासून दरमहा रुपये 500/- प्रमाणे निश्चित वैदयकिय भत्ता मिळण्याकरीता पात्र आहेत.
यावरुन स्पष्ट होते की आर्डिनन्स फॅक्ट्रीचे सेवानिवृत्त कर्मचारी तक्रारकर्ते दिनांक 01/09/2008 पासून रुपये 300/- दरमहा दिनांक 14/11/2014 पासून रुपये 500/- दरमहा प्रमाणे निश्चित वैदयकिय भत्ता मिळण्यास पात्र आहेत.
परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना उपरोक्त देय असलेली निश्चित वैदयकिय भत्ता न दिल्याने मुद्दा क्र.1 व 2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
वरील निष्कर्षाप्रमाणे विरुध्द पक्ष यांचे कडून सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब घडला असल्याने तक्रारकर्ते मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत येत आहे.
- आ दे श -
- तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील
तक्रार वि.प. विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी प्रत्येक तक्रारकर्त्यास देय असलेले निश्चित भत्ता खालील प्रमाणे मंजुरी पत्राच्या तारखेपासून दरमहा रुपये 300/- व दिनांक 14/11/2014 पासून दरमहा रुपये 500/- दयावे.
-
| | मंजुर केलेले पत्र |
01 | दिनदयाल तुकाराम भरणे | No/AT/PSB/III/Bhandara/12 Dt.5/11/2012 |
02 | बळीराम मुकूंदा सेलोकर | No/AT/PSB/III/Bhandara/13 Dt.13/02/2013 |
-
| रामभाऊ वकटूजी सोरते | No/AT/PSB/III/Bhandara/13 Dt.23/04/2013 |
-
| नत्थु मारोती कुरझेकर | No/AT/PSB/III/Bhandara/13 Dt.20/11/2013 |
-
| श्रीमती भागीरथा हरिचंद्र डोरले | No/AT/PSB/III/Bhandara/13 Dt.29/11/2013 |
- . विरुध्द पक्ष यांनी प्रत्येक तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक
त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 2,000/-(दहा हजार) दयावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांना सामायिकरित्या तक्रारीच्या खर्चापोटी
रुपये 3,000/-(तीन हजार) दयावे.
5. वि.प.ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावी.
6. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
7. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.