Maharashtra

Nagpur

CC/845/2015

SHRI. MILIND G. BALIRAM KHOBRAGADE - Complainant(s)

Versus

STATE BANK OF INDIA GENERAL INSURANCE, THR.(MAHARASHTRA BRANCH) MANAGER, DIRECTOR - Opp.Party(s)

Adv. Suresh G. Shukla

16 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/845/2015
( Date of Filing : 31 Dec 2015 )
 
1. SHRI. MILIND G. BALIRAM KHOBRAGADE
R/O. HUDKO COLONY, QUTR NO. B-14/98, JARIPATKA, BEHIND SAI MANDIR, NAGPUR.
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. STATE BANK OF INDIA GENERAL INSURANCE, THR.(MAHARASHTRA BRANCH) MANAGER, DIRECTOR
THAPAR ENCLAVE, 3RD FLOOR, 148, MAHARAJBAG ROAD, RAMDASPETH NAGPUR-10/ NATRAJ, 101,201,301, ANDHERI-KURLA ROAD, MUMBAI (EAST)-400039
Mumbai
Maharashtra
2. M/S. SAPRA TRANSPORT PVT.LTD., THR. OWNER, ANIL SAPRA
OFF. AT NEAR KHARE CHAMBERS, GOKULPETH, NAGPUR-440010
Nagpur
Maharashtra
3. INDUSLND BANK, MANAGER
BRANCH CIVIL LINE, NEAR GPO SQUR., NAGPUR-440010
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Adv. Suresh G. Shukla, Advocate
For the Opp. Party: ADV. SACHIN JAISWAL, Advocate
 ADV. VIKAS J. DHARKAR, Advocate
Dated : 16 Jan 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

                     

  1.         तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून माहे ऑक्‍टोंबर 2014 मध्‍ये एल.पी.टी.मॉडेल नं. 2518, चा ट्रक क्रं. MH-34 AB-4959 हा  रुपये 14,00,000/- मध्‍ये खरेदी केला. याकरिता तक्रारकर्त्‍याने एकूण खरेदी किंमतीच्‍या रुपये 14 लाख पैकी विरुध्‍द पक्ष 2 ला रुपये 4 लाख नगदी दिले व उर्वरित रक्‍कम रुपये 10 लाख विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडून कर्ज घेऊन अदा केले. विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडून कर्ज घेते वेळी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून विमा पॉलिसी तसेच नविन पॉलिसी तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे हस्‍तांतरण करण्‍याबाबतचे दस्‍तऐवज दिले. संपूर्ण दस्‍तऐवजाची पडताळणी केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 3 यांनी तक्रारकर्त्‍याला कर्ज मंजूर केले व त्‍याबाबतचे पत्र दि. 14.01.2014 ला पाठविले. त्‍यानंतर सदरचे वाहन क्रं.  MH-34 AB-4959 हे तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे हस्‍तांतरण करण्‍यात आले. 

 

  1.        तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने सदरचा ट्रक हा स्‍वतःच्‍या उदरनिर्वाहाकरिता खरेदी केला होता. दि. 18.04.2015 ला तक्रारकर्त्‍याचे वाहन हे दुबे ले-आऊट विठ्ठल रुखमिनी नागपूर येथील साईटवर कामावर होते व दि. 19.04.2015 ला जेव्‍हा ट्रक चालक श्री. विष्‍णु नरवडे यांनी ज्‍या ठिकाणी वाहन उभे ठेवले होते त्‍या ठिकाणी गेला असता त्‍याला वाहन आढळून आले नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने वाहनाचा शोध घेतल्‍यानंतर ही त्‍याला वाहन आढळून आले नाही. म्‍हणून तक्रारकर्ता सदरचा ट्रक चोरीला गेल्‍याबाबतची  तक्रार दाखल करण्‍याकरिता गिट्टीखदान पोलिस स्‍टेशन येथे गेला असता तेथील अधिका-यांनी आधि वाहनाचा 3-4 दिवस शोध घ्‍या व नंतरच रिपोर्ट नोंदवा असे सूचविले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने 3-4 दिवस वाहनाचा शोध घेतला. परंतु वाहनाचा शोध न लागल्‍यामुळे दि. 24.04.2015 ला गिट्टीखदान पोलिस स्‍टेशनला ट्रक दि. 18 व 19.04.2015 च्‍या दरम्‍यान  चोरीला गेल्‍याची तक्रार भा.द.वि. च्‍या कलम 379 गुन्‍हया खाली  एफ.आय.आर. 9/21015 तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीवरुन नोंदविली. त्‍यानंतर गिट्टीखदान येथील पोलिसांनी सदरच्‍या ट्रकचा शोध घेतला, सदरच्‍या  ट्रकचा शोध घेऊन ही शोध न लागल्‍याबाबतचे तसे पत्र तक्रारकर्त्‍याला दिले. शेवटी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांना सदरचा ट्रक चोरीला गेल्‍याची माहिती दिली.  तक्रारकर्त्‍याने दि. 27.04.2015 ला ट्रक चोरी गेल्‍याबाबतची माहिती विरुध्‍द पक्ष 3 ला दिली व त्‍यासोबत एफ.आय.आर.ची प्रत, पंचनामा, फिटनेस सर्टिफिकेट, इन्‍श्‍युरन्‍स, पी.यु.सी., आर.स.बुक इत्‍यादी दस्‍तऐवजाच्‍या प्रति पाठविल्‍या. तसेच वाहन चोरी गेल्‍याबाबतची माहिती परिवहन कार्यालयाला दिली.

3.            तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याचे वाहन क्रं. MH-34 AB-4959 खरेदी केले, त्‍यावेळेस सदर वाहनाचा विमा विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे दि. 03.06.2014 ते 02.06.2015 या कालावधीकरिता विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍या नावाने विमाकृत होता. विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्‍याला वाहन क्रं. MH-34 AB-4959 याचा विमा रुपये 15,27,000/- पॉलिसी क्रं. 0000000000301865-2 दिनांक 03.06.2014 ते 02.06.2015 या कालावधीकरिता विमाकृत असल्‍याचे सांगितले होते. अशा त-हेने MH-34 AB-4959 हे वाहन विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे सुरक्षित विमाकृत होते.

 

4.          तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून सदर वाहन खरेदी केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 2 यांनी विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याशी पत्र व्‍यवहार (इलेक्‍ट्रोनिक प्रोसेस) करुन वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे  हस्‍तांतरण करण्‍याबाबत कळविले. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी संपूर्ण दस्‍तऐवज ज्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे विमा पॉलिसीसह दस्‍तऐवज विरुध्‍द पक्ष 1 ला पुरविले.  तक्रारकर्त्‍याचे वाहन ज्‍यावेळी चोरीला गेले त्‍यावेळी सदर वाहनाचा विमा विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे रुपये 15,27,300/- एवढया मुल्‍याकरिता विमाकृत होता व ती विमा पॉलिसी विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांच्‍या ताब्‍यात आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 1 कडून विमा रक्‍कम रुपये 15,27,300/- मिळण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडून वाहन खरेदीपोटी घेतलेले कर्ज रक्‍कम रुपये 10 लाख विरुध्‍द पक्ष 1 यांनी त्‍याला देय असलेली विमा रक्‍कम विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे जमा करावी. तसेच तक्रारकर्त्‍याने दि. 18.04.2015 पर्यंत विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे एकूण रक्‍कम रुपये 42,000/- जमा केलेली आहे.  तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 3 यांनी दि. 03.09.2015 ला नोटीस पाठवून वाहन खरेदीपोटी घेतलेल्‍या कर्जाची रक्‍कम रुपये 12,93,000/- जमा करण्‍याबाबत कळविले. त्‍या अनुषंगाने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 3 ला नोटीसचे उत्‍तर ही  पाठविले.

 

5           तकारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडून विमा उतरविला आहे व सदरचे वाहन हे विमा पॉलिसी कालावधीत चोरीला गेलेले असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 हे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 3 कडून वाहन खरेदीपोटी घेतलेले कर्ज रक्‍कम रुपये 10 लाख व्‍याजासह भरण्‍यास जबाबदार आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांना यासंबंधात बराच पत्र व्‍यवहार केला व विनंती केली तसेच नोटीस ही बजाविली. परंतु विरुध्‍द पक्षाने कुठलीही दखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

 

6.            तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्ष 1 यांना निर्देश द्यावे की, त्‍यांनी विरुध्‍द पक्ष 3 यांनी दिलेल्‍या कर्जाची रक्‍कम  रुपये 10 लाख व्‍याजासहीत त्‍यांच्‍या खात्‍यात जमा करावी व शिल्‍लक रक्‍कम तक्रारकर्त्‍याला देण्‍यात यावी. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी  विमाकृत केलेली रक्‍कम  रुपये 15,27,300/- व त्‍यावर 15 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत तक्रारकर्त्‍याला देण्‍यात यावे. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश व्‍हावा.

 

7.            विरुध्‍द पक्ष 1 ने आपला लेखी जबाब नि.क्रं. 17 वर दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याची विमा मागणी दि. 13.12.2015 चे पत्रान्‍वये नाकारण्‍यात आली आहे व सदरच्‍या पत्रामध्‍ये विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटी नमूद आहेत. विरुध्‍द पक्ष 1 ने विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍या नांवे त्‍यांचे वाहन विमा पॉलिसी क्रं. 0000000000301865-2 अन्‍वये दि. 03.06.2014 ते 02.06.2015 या कालावधीकरिता विमाकृत केले होते. वाहनाची चोरी होण्‍यापुर्वी सदर वाहनाच्‍या विक्रीबाबत विरुध्‍द पक्ष क्रं. 2 किंवा तक्रारकर्ता यांनी कोणताही पत्रव्‍यवहार विरुध्‍द पक्ष 1 शी केलेला नाही. तक्रारकर्त्‍याने पाठविलेल्‍या नोटीसला दि. 11.12.2015 अन्‍वये उत्‍तर पाठविलेले आहे.

 

8.            विरुध्‍द पक्ष 1 ने पुढे नमूद केले की, नांवात बदली करणा-याने वाहन नांवावर बदली झाल्‍याच्‍या तारखेपासून 14 दिवसाच्‍या आंत लेखी स्‍वरुपात विमा कंपनीला वाहनाचे नोंदणीसह, वाहनाच्‍या बदलीच्‍या तारखेसह पूर्वीचे वाहन मालकाचे नांव, विमा पॉलिसी क्रं., विमा तारीख कळवावयास पाहिजे. जेणे करुन विमा कंपनीला त्‍याच्‍या रेकॉर्डमध्‍ये आवश्‍यक बदल करणे शक्‍य होईल आणि विमा पॉलिसी प्रमाणपत्र निर्गमित करता येईल.

              मोटर वाहन कायदा 157-2 हा खालीलप्रमाणे नमूद आहे.

       The transferee shall apply within fourteen days from the date of transfer in the prescribed form to the insurer for making necessary changes in regard to the fact of transfer in the certificate of insurance and the policy described in the certificate in his favour and the insurer shall make the necessary changes in the certificate and the policy of insurance in regard to the transfer of insurance.

               transfer of package policy – Transfer of Package Policy in the name of the transferee can be done only on getting acceptable evidence of sale and a fresh proposal form duly filled and signed. The old certificate on insurance for the vehicle, is required to be surrendered and a fee of Rs.50/- is to be collected for issue of fresh certificate in the name of transferee. If for any reason, the old certificate of Insurance cannot be surrendered, a proper declaration to that effect is to be taken from the transferee before a new certificate of insurance is issued.

 

9.           विरुध्‍द पक्ष 1 ने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 कडून वाहन विकत घेतले आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी सदर वाहन तक्रारकर्त्‍याला विकल्‍याबाबतचा पत्रव्‍यवहार आणि विमा पॉलिसी बदल करण्‍याबाबतचा पत्रव्‍यवहार केलेला नाही व त्‍याबाबतचे  कोणतेही दस्‍तऐवज विरुध्‍द पक्ष 1 प्राप्‍त झालेले नाही. वाहन चोरीच्‍या वेळी कोणताही करार तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍यामध्‍ये अस्तित्‍वात नव्‍हता. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 हा कोणतीही नुकसान भरण्‍यास देण्‍यास जबाबदार नाही. विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍यामुळे सदरची तक्रार मंचासमक्ष चालण्‍या योग्‍य नसून तक्रार दाखल करण्‍याचे कारण उद्भवलेले नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

 

10.           उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता व उभय पक्षांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नोंदविली.

 

        अ.क्रं.      मुद्दे                                      उत्‍तर

  1.                     तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?           होय
  2.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?   होय

 3. काय आदेश ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे

                              कारणमिमांसा

 

11.    मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत-  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून माहे ऑक्‍टोंबर 2014 मध्‍ये एल.पी.टी.मॉडेल नं. 2518, चा ट्रक क्रं. MH-34 AB-4959 हा रुपये 14,00,000/- मध्‍ये खरेदी केला होता व त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने एकूण खरेदी किंमतीच्‍या रुपये 14 लाख पैकी रुपये 4 लाख विरुध्‍द पक्ष 2 ला नगदी दिले व उर्वरित रक्‍कम रुपये 10 लाख विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडून कर्ज घेऊन विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ला धनादेशा द्वारे दि. 19.01.2015 ला अदा केले. सदर ट्रक दि. 29.01.2015 ला तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे करण्‍यात आला. नियमित कार्य पध्‍दतीप्रमाणे विरुध्‍द पक्ष 2 यांनी विरुध्‍द पक्ष 1 ला दि. 29.01.2015 ला ई-मेल द्वारे विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍या नांवे असलेली विमा पॉलिसी तक्रारकर्ता श्री. मिलिंद बळीराम खोब्रागडे यांच्‍या नांवे स्‍थानांतरीत ( नांवे बदली) करण्‍याबाबत सांगितले.  तसेच त्‍यासोबत ट्रकचे आवश्‍यक दस्‍तऐवज नोंदणी प्रमाणपत्र, विमा पॉलिसी व इतर दस्‍तऐवज सादर केले. तक्रारकर्त्‍याच्‍या वापरात असलेले वाहन दि. 18.04.2015 ला दुबे ले-आऊट विठ्ठल रुख्‍मिनीनगर येथे साईटवर कामावर असतांना तक्रारकर्त्‍याचा ट्रक चालक (ड्रायव्‍हर) श्री. विष्‍णु नरवाडे याने ज्‍या ठिकाणी वाहन उभे ठेवले होते त्‍या ठिकाणी गेले असता तिथे वाहन आढळून आले नाही. तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या वाहनाचा शोध घेतला वाहनाचा शोध न लागल्‍यामुळे वाहन चोरीला गेल्‍याबाबतची तक्रार नोंदविण्‍यास गिट्टीखदान पोलिस स्‍टेशनला गेला असता तेथील पोलिस अधिका-यांनी तक्रार घेण्‍यास नकार दिला व वाहनाचा पुनःश्‍च 3-4 दिवस शोध घेण्‍यास सांगितले. परंतु वाहनाचा शोध न लागल्‍यामुळे दि. 24.04.2015 ला गिट्टीखदान पोलिस स्‍टेशनला ट्रक दि. 18 व 19.04.2015 च्‍या दरम्‍यान चोरीला गेल्‍याची तक्रार भा.द.वि. च्‍या कलम 379 गुन्‍हया खाली एफ.आय.आर. 9/15 द्वारे नोंदविली. त्‍यानंतर गिट्टीखदान येथील पोलिसांनी सदरच्‍या ट्रकचा शोध घेतला, सदरच्‍या ट्रकचा शोध घेऊन ही शोध न लागल्‍याबाबतचे तसे पत्र तक्रारकर्त्‍याला दिले. शेवटी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांना सदरचा ट्रक चोरीला गेल्‍याची माहिती दिली.  तक्रारकर्त्‍याने दि. 27.04.2015 ला ट्रक चोरी गेल्‍याबाबतची माहिती विरुध्‍द पक्ष 3 ला दिली व त्‍यासोबत एफ.आय.आर.ची प्रत, पंचनामा, फिटनेस सर्टिफिकेट, इन्‍श्‍युरन्‍स, पी.यु.सी., आर.सी.बुक इत्‍यादी दस्‍तऐवजाच्‍या प्रति पाठविल्‍या. तसेच वाहन चोरी गेल्‍याबाबतची माहिती परिवहन अधिका-याला दिली.

12      विरुध्‍द पक्ष 1 ने वाहन चोरीला गेल्‍याची माहिती मिळाल्‍याच्‍या अनुषंगाने मे. pear heads consultants Gorewada Ring Road Nagpur 13 यांची तपासणीकरता नेमणूक केली व त्‍यांनी आपल्‍या तपासणी अहवालात खालीलप्रमाणे ऑबजर्व्‍हेशन दिलेले आहेत.

(d)   Your client has received a colour photo copy of the  insurance policy which states that the insured is your client, Mr. Milind Khobragade, however there is a discrepancy in the policy print date which is printed on 30.01.15 @ 12:01 hrs. Whereas as per the mail communication transfer request as sent only on 29.01.15 @18.34 hrs. The transfer in insurance has effected within 3 workings hours of the insurer’s office.

13.      मे. spear heads consultants यांनी दिलेल्‍या तपासणी अहवालाप्रमाणे पॉलिसी मधील नमूद तारखेमध्‍ये तफावत आहे जी दि. 30.01.2015 ला 12.01. वा. नमूद करण्‍यात आली आहे व ई-मेल द्वारे  दि. 29.01.2015 ला 18.34 वा. विमा नांवा मध्‍ये बदल करण्‍याबाबतचे पत्र व्‍यवहार करण्‍यात आला. विमा पॉलिसी मधील नांवात बदल विमा कार्यालयाच्‍या कामकाजाच्‍या 3 तासांमध्‍ये करण्‍यात आला.

14.         spear heads consultants यांनी दिलेल्‍या तपासणी अहवालाशी हे मंच सहमत नसून मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 157 Transfer of Certificate of Insurance या मथळयाखाली खालीलप्रमाणे नमूद आहे.  Where a person in whose favour the certificate of insurance has been issued in accordance with the provisions of this chapter transfers to another person the ownership of the motor vehicle in respect of which such insurance was taken together with the policy of insurance relating thereto, the certificate of insurance and the policy described in the certificate shall be deemed to have been transferred in favour of the person to whom the motor vehicle is transferred with effect from the date of its transfer.

Explanation : For the removal of doubts, it is hereby declared

  that such deemed transfer shall include transfer of  

  rights and liabilities of the said certificate of  

  insurance and policy of insurance.

      (2)   The transferee shall apply within fourteen days from

      the date of transfer in the prescribed form to the insurer for making necessary changes in regard to the fact of transfer in the certificate of insurance and the policy describe in the certificate in his favour and the insurer shall make the necessary changes in the certificate and the policy of insurance in regard to the transfer of insurance. 

 

15         तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून दि. 19.01.2015 ला वाहन विकत घेतल्‍यावर परिवहन अधिका-याकडून सदरचे वाहन दि. 29.01.2015 ला तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे स्‍थानांतरित करण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष 2 यांनी नियमित कार्यपध्‍दतीप्रमाणे दि. 29.01.2015 ला विरुध्‍द पक्ष क्रं. 1 एस.बी.आय. लाईफ इन्‍श्‍युरन्‍स कंपनी यांना विमा तक्रारकर्ता श्री. मिलिंद बळीराम खोब्रागडे यांच्‍या नांवे बदली करण्‍याबाबत कळविले व त्‍या अनुषंगाने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांच्‍याशी (इलेक्‍ट्रोनिक्‍स प्रोसेस) पत्र व्‍यवहार करुन वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे बदली करण्‍याबाबत कळविले आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी संपूर्ण दस्‍तऐवज विमा पॉलिसीसह विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ला सोपविले. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 157 नुसार विरुध्‍द पक्ष 2 यांनी दि. 29.01.2015 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांना विमा पॉलिसी तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे बदली करण्‍याबाबत विहित मुदतीत कळविलेले आहे. तक्रारकर्त्‍याचे वाहन विमा पॉलिसीच्‍या कालावधीत म्‍हणजेच दि. 03.06.2014 ते 02.06.2015 या कालावधीत चोरीला गेल्‍यामुळे तक्रारकर्ता विमा दावा मिळण्‍यास पात्र आहे.  तक्रारकर्त्‍याचा विमा दावा विमा कालावधीत असतांना ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे  मंचाचे स्‍पष्‍ट होते.

              सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                              अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 15,27,300/- व त्‍यावर विमा दावा नाकारल्‍याच्‍या तारखेपासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम प्राप्‍त होईपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.
  3. विरुध्‍द पक्ष 1 ने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष 1 ने करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी.  
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.