नि. १२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१३२/२०११
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ०९/०५/२०११
तक्रार दाखल तारीख : ११/०५/२०११
निकाल तारीख : २९/१२/२०११
-------------------------------------------
शालन धोंडीराम पाटील
व.व. – सज्ञान, धंदा – घरकाम
रा.सावंतपूर वसाहत, जाधव मळा,
ता.पलूस जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
स्टेट बॅंक ऑफ इंडिया एम्प्लॉईज
श्री गणेश को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.
सांगली द्वारा स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सांगली .....जाबदार
तक्रारदारú तर्फेò: +ìb÷.व्ही.पी.रावळ
जाबदार : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा.अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने दामदुप्पट ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार स्टेट बॅंक ऑफ इंडिया एम्प्लॉईज श्री गणेश को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘सोसायटी’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम दामदुप्पट अंतर्गत गुंतविली होती. तक्रारदार यांच्या दामदुप्पट ठेवीची रक्कम मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.२ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.४ अन्वये एकूण ३ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणी जाबदार यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
३. तक्रारदारांनी त्यांची रक्कम जाबदार पतसंस्थेमध्ये गुंतविल्याबाबतच्या मंचातून प्रमाणीत केलेल्या ठेवपावत्यांच्या प्रती नि.९ च्या यादीने दाखल केल्या आहेत. सदर पावत्यांवर कोणतेही व्याज मिळाले नसल्याचे निवेदन तक्रारदारांनी नि.१० वर दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्ज हाच युक्तिवाद समजणेत यावा अशी पुरशिस नि.११ वर दाखल केली आहे.
४. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज व दाखल केलेल्या ठेवपावत्या यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये तक्रारदार यांचे पती कै. धोंडीराम निवृत्ती पाटील यांनी जाबदार संस्थेमध्ये काही रक्कम गुंतविली होती असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या ठेवपावत्यांचे अवलोकन केले असता ठेवपावतीवर धोंडीराम निवृत्ती पाटील यांचे नावापुढे मयत असे नमूद करुन शालन धोंडीराम पाटील व सविता शिवाजी पवार यांची नावे नमूद आहेत. सदर पावतीवर नमूद असलेल्या सविता शिवाजी पवार यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी सामील पक्षकार केलेले नाही. सविता शिवाजी पवार या कोण आहेत ? त्यांचे तक्रारदार यांचेशी नाते काय ? याबाबत कोणताही ऊहापोह तक्रारअर्जामध्ये केला नाही. ठेवपावतीवर तक्रारदार यांचे सोबतच सविता शिवाजी पवार यांचेही नाव नमूद असल्याने सदर सविता शिवाजी पवार यांना याकामी सामील केले नसल्याने प्रस्तुतचा तक्रारअर्ज मंजूर होणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. सबब, तक्रारदार यांना आवश्यक त्या पक्षकारांना सामील करुन योग्य त्या कायदेशीर मुदतीत पुन्हा नव्याने तक्रारअर्ज दाखल करण्याची मुभा ठेवून प्रस्तुतचा तक्रारअर्ज काढून टाकणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत झाले आहे.
वरील सर्व विवेचनावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
सांगली
दिनांकò: २९/१२/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.