मे.अति.सांगली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,सांगली यांचेसमोर.
---------------------------------------------------------------------------------
मा.सौ. सविता भोसले, अध्यक्ष.
मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
----------------------------------------------------------------------------------------------
तक्रार अर्ज क्र.- 128/2010
तक्रार दाखल दिनांक –17/6/2010.
तक्रार निकाल दिनांक – 23/01/2014
निकाल कालावधी – 43 महिने
1. श्री.भिमराव दत्तू निकम,
2. सौ.छायादेवी भिमराव निकम,
3. श्री.प्रशांत भिमराव निकम,
4. श्री.प्रदीप भिमराव निकम,
सर्व रा. द्वारा एस.बी.भोसले, प्लॉट नं.6,
मंगलमूर्ती कॉलनी, सांगली. .....तक्रारदार
विरुध्द
1. स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज गणेश को.ऑ.क्रेडिट सोसा.
द्वारा स्टेट बँक ऑफ इंडिया, गणपती मंदिराजवळ, सांगली.
2. श्री.यु.वाय. देशमुख,
रा. स्टेट बँक ऑफ इंडिया, सांगली शाखा.
3. श्री.जे.एम.फार्णे,
रा. स्टेट बँक ऑफ इंडिया, सांगली शाखा.
दिनानाथ चौक, सांगली.
4. श्री.पी.एम.घाटे,
रा.चंदन वंदन अपार्टमेंट, माळी टॉकीजजवळ, संगली.
5. श्री.एच.डी. पाटील,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, इस्लामपूर शाखा.
6. श्री.एस.एच. पेठकर,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा इस्लामपूर.
7. श्री.ए.ए.जमादार,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा मिरज.
8. श्री. ए.जी.घाडगे,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा सांगली.
9. श्री.आर.व्ही.पाटील,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा तासगांव.
10. श्री.डी.आर.लाकुळे,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा जत.
11. श्री.आर.बी.वाघमोडे,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा इस्लामपूर.
12. श्री.ए.एम.जावीर,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा विटा.
13. सौ.एस.एम.फाटक,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा शिरोळ.
14. सौ.व्ही.एस.कदम,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा शिरोळ.
15. श्री.एस.एस.कोळी,
रा.स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा तासगांव. .... जाबदार.
तक्रारदार तर्फे – अॅड सुधीर कुलकर्णी.
जाबदार – एकतर्फा.
न्यायनिर्णय
(मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यांनी न्यायनिर्णय पारीत केला)
1. प्रस्तुत तक्रारअर्ज तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 प्रमाणे जाबदारांविरुध्द दाखल केला आहे. तक्रारअर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे-
तक्रारदार क्र.1 ते 4 हे सर्वजण मंगलमूर्ती कॉलनी सांगली येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. यांनी जाबदार संस्थेत दामदुप्पट ठेव योजनेअंतर्गत तक्रारदार क्र.1 ते 4 यांचे नावावर पुढीलप्रमाणे मुदत ठेव ठेवलेली होती व आहे-
अ.क्र. | ठेवीदाराचे नांव | ठेवपावती खाते क्र. | ठेवीची रक्कम रु. | ठेवीची तारीख | ठेव मुदत संपलेची तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु. |
1 | श्री.भिमराव दत्तू निकम | 5/112 | 50,000/- | 20-2-04 | 20-2-10 | 1,00,000/- |
2. | सौ.छायादेवी भिमराव निकम | 5/112 | 40,000/- | 20-2-04 | 20-2-10 | 80,000/- |
3. | श्री.प्रशांत भिमराव निकम | 5/112 | 50,000/- | 20-2-04 | 20-2-10 | 1,00,000/- |
4. | श्री.प्रदीप भिमराव निकम | 5/112 | 50,000/- | 20-2-14 | 20-2-04 | 1,00,000/- |
2. प्रस्तुत वर नमूद ठेवपावत्यांची मुदत संपल्यानंतर तक्रारदारांनी सर्व जाबदारांना भेटून ठेवीची रक्कम व्याजासह परत देणेसाठी विनंती केली परंतु जाबदारांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही तसेच सदर ठेवपावत्यांची व्याजासह रक्कम तक्रारदारांना अदा केली नाही, त्यामुळे तक्रारदारास खूप मानसिक व शारिरीक त्रास सोसावा लागला व लागत आहे, तसेच जाबदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेमध्ये कमतरता/त्रुटी केली आहे, त्यामुळे तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज मंचात दाखल केला आहे.
3. सदर कामी तक्रारदारांनी जाबदारांकडून रक्कम रु.3,80,000/- (रु.तीन लाख ऐंशी हजार मात्र)वसूल होऊन मिळावेत, तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी जाबदारांकडून रु.10,000/- तसेच तक्रारअर्जाचे खचार्पोटी रु.2,000/- वसूल होऊन मिळावेत अशी विनंती प्रस्तुत कामी तक्रारदारांनी केली आहे.
4. तक्रारदारांनी प्रस्तुत कामी नि.3 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे जाबदार संस्थेच्या संचालक मंडळाची जिल्हाउपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांनी दिलेली संचालक मंडळाची यादी, नि.5/2 ते नि.5/5 कडे तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी जाबदार संस्थेत गुंतवलेल्या रकमांच्या ठेवपावत्या झेरॉक्स, नि.10 कडे सर्व जाबदारांना तक्रारदारांनी पाठवलेल्या तक्रारअर्जाच्या नोटीसच्या रजि.पोस्टाच्या पावत्या, नि.15 कडे सर्व जाबदारांना नोटीस पाठवलेबाबत तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.17 ते नि.21 कडे सर्टिफाईड केलेल्या ठेवपावत्या , नि.24 कडे सर्व जाबदारांना रजि.ए.डी.ने तक्रारअर्जाची नोटीस पाठवली असून ग्राहक संरक्षण कायदा कलम 28-ए प्रमाणे सर्व जाबदाराना जाबदार 1 ते 15 यांना तक्रारअर्जाच्या नोटीसा मिळाल्या आहेत म्हणून या प्रतिज्ञापत्राद्वारे तक्रारदार ही बाब जाहीर करतो. प्रस्तुत प्रतिज्ञापत्रानुसार सर्व जाबदाराविरुध्द नि.1 व 2 वर एकतर्फा आदेश पारित केला आहे. नि.25 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.26 कडे तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने मंचात दाखल केली आहेत.
5. सदर कामी जाबदार 1 ते 15 हे मंचात हजर राहिलेले नाहीत किंवा त्यांनी त्यांचे म्हणणे/कैफियत याकामी दाखल केलेली नाही, तसेच तक्रारदाराचे तक्रारअजातील कोणतेही कथन जाबदाराने खोडून काढलेले नाही किंवा अमान्य केलेले नाही, तसेच जाबदारांनी कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही.
6. वरील सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता प्रस्तुत तकारअर्जाचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्यांचा विचार केला.
मुद्दा उत्तर
1 तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व
सेवा देणार आहेत काय? होय.
2. तक्रारदारांना द्याव्या लागणा-या सेवेत जाबदाराने
कमतरता/त्रुटी केली आहे काय? होय.
3. ठेवपावत्यांची व्याजासह रक्कम मिळण्यास
तक्रारदार पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खालील आदेशात नमूद केलेप्रमाणे.
विवेचन मुद्दा क्र.1 ते 4 –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो कारण तक्रारदाराने जाबदार संस्थेत वर नमूद वर्णनाच्या ठेवपावत्यानुसार दामदुप्पट योजनेत रक्कम ठेवली होती ही बाब नि.17 ते 21 कडे दाखल केलेल्या व्हेरिफाईड पावत्यांवरुन सिध्द होत आहे. तसेच प्रस्तुत ठेवपावत्यांची मुदत संपल्यानंतर तक्रारदारांनी सर्व जाबदारांचे सदर ठेवीच्या रकमेची व्याजासह मागणी केली असता जाबदारांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही व रक्कम तक्रारदारांना अदा केली नाही व रक्कम परत करणेबाबत कोणतीही तजवीज केलेली नाही म्हणजेच तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेमध्ये जाबदाराने कमतरता किंवा त्रुटी केल्याचे तक्रारदाराने नि.25 कडे दाखल पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व नि.3 कडील प्रतिज्ञापत्रावरुन सिध्द होत आहे म्हणजेच तक्रारदाराना द्यावयाच्या सेवेत जाबदारांनी त्रुटी/कमतरता केली असल्याचे निर्विवाद सत्य आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण प्रस्तुत तक्रारअर्जातील तक्रारदाराचे कोणतेही कथन जाबदारानी खोडून काढलेले नाही किंवा मंचात हजर होऊन म्हणणे/कैफियत दाखल केलेली नाही किंवा कोणताही पुरावा मंचात जाबदाराने दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या ठेवपावत्यावरील नमूद केल्याप्रमाणे ठेवपावत्यांच्या पाठीमागे (नि.5/2)तारणकर्ज रु.1000/- व त्याखाली कर्ज खाते बंद दि.9-3-06 म्हणून उल्लेख ठेवपावतीवर पाठीमागील बाजूस दिसून येतो. तसेच नि.5/3 चे पाठीमागे कर्जतारण रु.20,000/- व कर्जखाते बंद तारीख दि.7-1-06 असा मजकूर तसेच नि.5/5 चे पाठीमागे दि.16-7-05 तारण कर्ज रु.20,000/-, कर्ज खाते बंद दि.7-1-06 असा मजकूर नमूद असून तक्रारदारांची सही आहे, परंतु कर्जखात्यास जमा केल्याची कोणतीही बाब नमूद नाही. तसेच प्रस्तुत जाबदारांनी मंचात हजर राहून कोणतेही म्हणणे/कैफियत दिलेले नाही किंवा तक्रारीतील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही म्हणजेच प्रस्तुत तक्रारदारांनी तक्रारअर्ज व ठेवपावत्यांवरील रक्कम दामदुप्पट रक्कम त्यावर होणा-या नियमाप्रमाणे व्याजासह तक्रारदारांना देणे कायद्याने न्यायोचित होणार आहे व तक्रारदार प्रस्तुत दामदुप्पट रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत मंच येत आहे, त्यामुळे lifting up co-operative corporate veil चा विचार करुन सदर सर्व ठेवपावत्यांची दामदुप्पट रक्कम आदेश पारित तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हातील पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याजदराने तक्रारदाराना देणेस सर्व जाबदारांना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरणे न्यायोचित होईल् या निष्कर्षाप्रत मंच येत आहे.
9. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो-
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदारांना त्यांचे वर नमूद पॅरा.1 मध्ये वर्णन केलेल्या ठेवपावत्यांवरील सर्व दामदुप्पट रक्कम नियमाप्रमाणे होणा-या व्याजासह अदा करणेस जाबदार क्र.1 ते 15 यांना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरण्यात येते.
अ.क्र. | ठेवीदाराचे नांव | ठेवपावती खाते क्र. | ठेवीची रक्कम रु. | ठेवीची तारीख | ठेव मुदत संपलेची तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु. |
1 | श्री.भिमराव दत्तू निकम | 5/112 | 50,000/- | 20-2-04 | 20-2-10 | 1,00,000/- |
2. | सौ.छायादेवी भिमराव निकम | 5/112 | 40,000/- | 20-2-04 | 20-2-10 | 80,000/- |
3. | श्री.प्रशांत भिमराव निकम | 5/112 | 50,000/- | 20-2-04 | 20-2-10 | 1,00,000/- |
4. | श्री.प्रदीप भिमराव निकम | 5/112 | 50,000/- | 20-2-14 | 20-2-04 | 1,00,000/- |
3. जाबदार क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदारांच्या वर नमूद पॅरा.1 मधील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे ठेवीची दामदुप्पट रक्कम आदेश पारित तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने तक्रारदारांना अदा करावी.
4. तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबाबत तसेच अर्जाचा खर्च म्हणून रु.5000/- सर्व जाबदारांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना अदा करावी.
5. वर नमूद सर्व रक्कम आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत तक्रारदारांना अदा करावी.
6. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकारांना विनामूल्य पाठवण्यात याव्यात.
ठिकाण- सांगली.
दि.23-1-2014.
(श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्य अध्यक्षा
अति.सांगली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली.