निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 30/04/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 04/05/2011 तक्रार निकाल दिनांकः- 03/01/2012 कालावधी 08 महिने. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. शेख अजीस पि.शेख वहाब. अर्जदार वय 26 वर्ष.धंदा.- फळ विक्रेता. अड.अजय.जी.व्यास. रा.जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी. विरुध्द स्टेट ऑफ इंडीया,शाखा जिंतूर. गैरअर्जदार. तर्फे शाखा अधिकारी, शाखा जिंतूर. अड.डि.एन.देशपांडे. ता.जिंतूर जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराच्या खात्यातून विनाकारण पैसे वजा करुन गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीची सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा बागवान असून त्याचे गैरअर्जदाराकडे बचत खाते क्रमांक 30288283429 आहे.व त्याचा ए.टी.एम. कार्ड नं. 6220180342300019391 आहे.दिनांक 01/07/2010 रोजी अर्जदार व्यापारा निमित्त परवाडा जि.चितूर येथे गेला होता व खात्यातून त्याने तीन वेळेस रु.10,000/- असे एकुण रु.30,000/- ए.टी.एम. व्दारे काढले.दिनांक 23/07/2010 रोजी गैरअर्जदाराने रु.10,000/- अर्जदाराच्या खात्यातून वजा केले.अर्जदाराने चौकशी केली असता त्याने खात्यातून रु.40,000/- काढले होते जेव्हा त्याच्या खात्यात रु.30,000/- च होते असे गैरअर्जदाराने उत्तर दिले म्हणून अर्जदाराने रु. 10,000/- परत मिळावेत, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व खर्चापोटी रु.1,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, खाते उतारा, गैरअर्जदाराशी केलेला पत्रव्यवहार पोस्टाच्या पावत्या इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने दिनांक 01/07/2010 रोजी रु.40,000/- काढले व त्याच्या खात्यात त्यावेळी रु.30,935/- होते.म्हणून जेव्हा अर्जदाराने रु.25,000/- खात्यात जमा केले तेव्हा बँकेने दिनांक 23/07/2010 रोजी रु.10,000/- परस्पर वळते करुन घेतले ए.टी.एम. मशीन कधी कधी ग्राहकांच्या खात्यात पैसे नसले तरी ग्राहकाला पैसे देते अर्जदाराला ही माहिती गैरअर्जदाराने दिली तरीही त्याने विनाकारण बँकेच्या विरुध्द तक्रार दिली आहे.त्यामुळे सदरील तक्रार रु.10,000/- च्या नुकसान भरपाईसह फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, ट्रांन्झॅक्शन इन्क्वायरी, कॉम्प्युटर स्टेटमेंट इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकीलांच्या युक्तीवादावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराचे गैरअर्जदाराच्या जिंतूर शाखेत बचत खाते क्रमांक 30288283429 ज्याचा ए.टी.एम.कार्ड नं. 6220180342300019391 आहे ही बाब सर्वमान्य आहे.दिनांक 01/07/2010 रोजी अर्जदाराने ए.टी.एम. कार्ड वापरुन रु.10,000/- एकुण तीन वेळेस काढलेले त्याच्या खाते उता-यातून सिध्द होते.(नि.4/1 वरुन) दिनांक 01/07/2010 रोजी त्याच्या खात्यात रु.30,935/- एवढी रक्कम होती. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराने दिनांक 01/07/2010 रोजी एकुण रु.40,000/- काढले, परंतु त्याच्या खात्यात रु.30,935/- एवढीच रक्कम जमा असल्यामुळे बँकेने बँकेच्या 985810342034 या खात्यातून ते पैसे दिले व अर्जदाराचे खाते होल्ड केले व दिनांक 02/07/2010 रोजी जेव्हा अर्जदाराच्या खात्यात रु.25,000/- जमा झाले तेव्हा बँकेने अर्जदाराच्या खात्यातून रु.10,000/- परस्पर वळते करुन घेतले गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार खात्यात शिल्लक रक्कम नसली तरी ए.टी.एम. मशीन ग्राहकाला पैसे देते जी रक्कम खाते नंबर 985010342034 च्या नावे पडते गैरअर्जदाराने त्याचे म्हणणे सिध्द करण्यासाठी कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. नि.16/4 व 16/5, 16/6 वर दाखल केलेल्या कॉम्प्युटर स्टेटमेंट वरुन खात्यासंदर्भात कोणताही खुलासा होत नाही. गैरअर्जदाराच्या मता नुसार अर्जदाराने 01/07/2010 रोजी रु.40,000/- त्याच्या ए.टी.एम. कार्डाव्दारे काढले आहेत, परंतु दिनांक 01/07/2010 रोजी रु.10,000/- फक्त 3 वेळाच काढल्याची नोंद नि.4/1 वरील खाते उता-यात आहे.अर्जदाराने दिनांक 01/07/2010 नंतर दिनांक 02/07/2010 रोजी रु.25,000/- दिनांक 06/07/2010 रोजी रु.35,000/- दिनांक 07/07/2010 रोजी रु.20,000/- भरलेले दिसतात त्यानंतर दिनांक 27/07/2010 रोजी रु.25,000/- भरलेले आहेत. व 27/07/2010 रोजी ATM entry Dt 01/07/2010 रु.10,000/- व त्यानंतर दिनांक 30/07/2010 रोजी Delete hold = 10,000/- ही entry नि.4/1 वरील खाते उता-यात आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या नोटीसीला दिलेल्या उत्तरात (नि.4/9 ) अर्जदाराला रु.10,000/- हे A/C No. 98581034234 ईंडीयन बँक ATM ID No.SAIK0091 TXT No 6942 नुसार दिलेले आहेत.असे म्हंटले आहे,परंतु गैरअर्जदाराच्या जिंतूर शाखेच्या अर्जदाराच्या खाते उता-यात या नोंदी दिसून येत नसल्यामुळे अर्जदाराने एकुण रु.40,000/- काढले हे मानता येणार नाही. अर्जदाराच्या खात्यातून रु. 10,000/- काढून घेवुन गैरअर्जदाराने त्याला त्रुटीची सेवा दिलेली आहे.असे आमचे मत आहे.म्हणून खालील आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 अर्जदारास गैरअर्जदाराने रु.10,000/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने दिनांक 27/07/2010 पासून संपूर्ण रक्कम देय होईपर्यंत निकाल समजल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत. 3 अर्जदारास गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 1,000/- आदेश मुदतीत द्यावेत. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |