2. अर्जदार हा वरील ठिकाणी राहात असून आयुध निर्माणी, चांदा येथे नौकरी करतो. अर्जदाराचे गैरअर्जदार बँकेत खाते क्र.110135772119 हे बचत खाते तसेच पी.पी.एफ.खाते आहे. अर्जदाराला दिनांक दि.10.9.2017 रोजी त्याचे खात्यातून SI fail म्हणून रु.287/- ची कपात करण्यांत आल्याचा मोबाईल एस एम एस प्राप्त झाला. याबाबत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार केली असता गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारअर्जावरच, खात्यातून 12 ट्रांझॅक्शन्सची लिमीट असून दोन ट्रांझॅक्शन्स जास्ती झाल्यामुळे त्याचे खात्यातून SI fail म्हणून रु.287/- चार्जेस रुपाने वळते करण्यांत आले, असे कारण लिहून दिले. वस्तविकता: अर्जदाराने 12 ट्रांझॅक्शन्स केले नाहीत आणी SI fail चार्जेस हे कर्जाचे हप्ते भरण्यांस उशीर झल्यांस लागतात. अर्जदाराने गैरअर्जदार ला माहितीच्या अधिकाराखाली मा हिती मागीतली असता वरील माहिती कळली. सबब गैरअर्जदार यांनी रु.287/- ची बेकायदेशीरपणे कपात केलेली आहे. अर्जदार पुढे नमूद करतो की अर्जदाराने गैरअर्जदार बँकेमार्फत अपघात विमा योजने अंतर्गत 2013 ते 2014 या कालावधीकरीता रु.100/- अर्जदाराच्या खात्यातून वळती करुन पॉलिसी काढलेली आहे. सदर पॉलिसी एक वर्षाकरीता होती व त्यानंतर अर्जदाराने पॉलिसीकरीता अर्ज दिलेला नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या बचत खात्यातून दिनांक 17.2.2017 रोजी रु.200/- वळते केले. त्याबददल चौकशी केली असता गैरअर्जदाराने सांगितले की अर्जदाराची सन 2016 ते 17 या कालावधीकरीता अपघात पॉलिसी काढली. अर्जदाराने गैरअर्जदाराला दिनांक 13.2.2017 रोजी तक्रारअर्जात नमूद केले की या पॉलिसी करीता अर्जदाराने कोणताही अर्ज गैरअर्जदाराकडे दिला नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराला पॉलिसी ची झेरॉक्स प्रत व माहिति अधिकारान्वये माहिती देऊन नमूद केले की अर्जदाराने 2013-14 या कालावधीकरीता पॉलिसी करीता दिलेल्या अर्जावरुन पॉलिसी रिन्यू केलेली आहे परंतु सन 2014-15, 2015-16 या कालावधीची पॉलिसी रिन्यू न होता 2016-17 चे पॉलिसी रिन्यू कशी होणार. गैरअर्जदाराने अर्जाची प्रत अर्जदाराला दिली नाही व त्याआधी रु.200/- अर्जदाराच्या खात्यातून वळते केले. त्याबद्रदल तक्रार केल्यावर परत अर्जदाराच्या खात्यात रक्कम परत जमा केली. सबब अर्जदाराच्या खात्यातून SI fail म्हणून रु.287/- गैरअर्जदाराने बेकायदेशीरपणे कपात केलेले आहेत. अर्जदाराने वारंवार गैरअर्जदाराकडे तक्रार करुनसुध्दा त्याबददल गैरअर्जदाराने दखल घेतली नाही. सबब अर्जदाराने गैरअर्जदावि रुध्द न्युनतापूर्ण व्यवहार केल्याबददलची तक्रार मंचासमक्ष दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि गैरअर्जदार यांची सेवा न्युनतापूर्ण असल्याचे घोषीत करावे, अर्जदाराच्या खात्यातून SI fail म्हणून गैरअर्जदाराने बेकायदेशीरपणे कपात केलेले रु.287/- त्यावरील द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह परत करण्यांत यावेत, अपघात पॉलीसीच्या नावाखाली गैरअर्जदाराने कपात केलेली रक्कम रु.200/- त्यावरील द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह परत करण्यांत यावी, शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 30,000/- तसेच तक्रार खर्चापोटी रु. 20,000/- गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली. 3. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करून गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदाराने मंचासमक्ष हजर होवून त्यानी आपले लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन नाकबुल करुन पुढे नमुद केले कि, अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्याच्या खात्यातून SI fail म्हणून रु.287/- व इंश्युरंस पॉलीसीची कपात करण्यांत आली. सदर कपात जर बेकायदेशीर असती तर अर्जदाराने रक्कम परतमिळण्याकरीता पत्र किंवा नोटीस गैरअर्जदाराला पाठविली असती. अर्जदाराच्या बचत खात्यातूनदिनांक 10.1.2016 रोजी SI fail म्हणून रु.287/- ची कपात करण्यांत आली कारण अर्जदाराची SI ही पीपीएफ खात्याकरीता होती, व सदर पीपीएफ खात्यामध्ये वर्षाचे फक्त 12 व्यवहाराची परवानगी आहे व त्यापेक्षा जास्त व्यवहार झाल्यास SI fai म्हणून रु..250/- व त्यावर सर्व्हीस टॅक्स असे एकूण रु.287/-नियमाप्रमाणेच अर्जदाराच्या खात्यातून कपात करण्यांत आले. अर्जदाराने 2016 मध्ये काही वेळा रक्कम व्यक्तीश: भरली तर काही वेळा त्याने ऑनलाईन रक्कम भरली मात्र यात 12 व्यवहारांची मर्यादा ओलांडून 2 व्यवहार जास्त झाले होते त्यामुळे बँकींग नियमानुसार अर्जदारावर SI fail चार्जेस बसविण्यात येऊन त्याच्या बचत खात्यातून ती रक्कम वळती करण्यांत आली. 4. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्याने गैरअर्जदार बँकेमार्फत अपघात विमा योजने अंतर्गत 2013 ते 2014 या कालावधीकरीता रु.100/- अर्जदाराच्या खात्यातून वळती करुन पॉलिसी काढलेली आहे. सदर पॉलिसी एक वर्षाकरीता होती व त्यानंतरनियमाप्रमाणे दरवर्षी पॉलीसी प्रिमियम ऑटोमॅटीक वळते केले जाते. त्यानंतर शासनाच्यानियमाप्रमाणे प्रिमियमची रक्कम रु.200/- करण्यांत आली म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या बचत खात्यातून दिनांक 23.9.2016 व पुन्हा चुकीने 16.10.2016 रोजी प्रत्येकी रु.200/- वळते करण्यांत आले. त्याबद्दल अर्जदाराने तक्रार केल्यावर अर्जदाराच्या खात्यात रक्कम रु..200/- परत जमा करण्यात आली. सदर पॉलीसी चालू ठेवायची नाही याबददल कोणताही अर्ज अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिला नाही. तसेच प्रस्तूत तक्रारअर्ज मुदतबाहय असून अर्जदाराने विलंबमाफीचा कोणताही अर्ज दिलेला नाही. सबब सदर तक्रार खारीज करण्यांत यावी. 5. अर्जदाराची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, लेखी युक्तीवाद तसेच उभय पक्षांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष - गैरअर्जदार यांनी अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिल्याची
बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? नाही 2. आदेश काय ? अंतीम आदशानुसार कारण मिमांसा मुद्दा क्र.1 बाबत :- 6. अर्जदाराचे गैरअर्जदाराच्या बँकेत बचत खाते व पीपीएफ खाते आहे ही बाब विवादीत नसल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदाराच्या कथनानुसारदिनांक 6.1.2017 रोजी SI fail म्हणून रु.287/- ची कपात अर्जदाराच्या बचत खात्यातून करण्यांत आली. त्यावर दिनांक 17.3.2017 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे त्याबाबत लेखी तक्रार केली असता गैरअर्जदाराने अर्जदाराच्याच अर्जावर सदर रक्कम कपातीचे कारण लिहून दिले. सदर दस्तावेज नि.क्र.4 सह दस्त क्र.1 वर दाखल आहे. त्यात, खात्यातून 12 ट्रांझॅक्शन्सची लिमीट पार झाल्यामुळे त्याचे खात्यातून SI fail म्हणून रु.287/- चार्जेस रुपाने वळते करण्यांत आले, असे कारण लिहून दिले. तरीदेखील अर्जदाराने माहितीच्या अधिकाराखाली मा हि ती मागविल्यावर गैरअर्जदाराने दि.23.4.2017 रोजी अर्जदाराला पत्र पाठवून वरीलप्रमाणे माहिती देवून त्यासोबत बँकेच्यानियमाचे दस्तावेज जोडले. सदर दस्तावेज नि.क्र.4 सह दस्त क्र.2 वर दाखल केलेले आहेत. त्यानुसार SI fail चे नियम हे केवळ कर्जवसुली करीताच लागू नसून सर्व व्यवहारांना लागू होतात असे स्पष्ट लिहीलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने नियमानुसार सदर कार्यवाही केल्याचे स्पष्ट होत असून त्यामुळे त्यांनी सेवेत कोणतीही न्युनता केलेली नसल्याचे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क. १ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- 7. मुद्दा क्र. 1 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश |