जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/247 प्रकरण दाखल तारीख - 04/10/2010 प्रकरण निकाल तारीख – 27/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. सौ.वनिता भ्र.मारोतराव इतबारे वय 33 वर्षे, धंदा नौकरी अर्जदार. रा. सोनाई नगर, तरोडा बु. ता. जि. नांदेड. विरुध्द. 1. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मार्फत शाखाधिकारी, शाखा वजिराबाद, नांदेड. गैरअर्जदार 2. डी.सी.बी.बँक, मार्फत शाखाधिकारी, शाखा कलामंदिर, बरारा टॉवर,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.एम.डावरे. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.आर.एम.कनंकदंडे गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. थोडक्यात अर्जदाराची तक्रार अशी की, अर्जदार हे नांदेड येथील रहीवासी असून त्यांचे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे खाते क्र.62124557379 असून सोबत एटीएम ची सेवा उपलब्ध आहे व त्यांचा वापरत त्या करीत आहेत.गैरअर्जदार क्र.1 व 2 हया बँकीग क्षेञातील नामवंत बँका असून त्या ग्राहकाना सेवा पूरवितात.दि.7.7.2010 रोजी अर्जदार हे तरोडा बु. येथील डी.सी.बी. बँकेचे एटीएम सेंटर मधून पैसे काढण्यासाठी गेले असता रु.10,000/- काढण्यासाठी मशीनचा उपयोग केला असता पैसे आले नाही व स्लीप सुध्दा आली नाही. एटीएम वर असलेले सूरक्षा रक्षक श्री.रणजीतसिंघ यांना त्या बाबत माहीती दिली. तसेच स्वतःचे बॅकेत जाऊन पाहिले असता त्यांच्या खात्यावर रु.10,000/- कपात झाले होते. त्यानंतर अर्जदार यांनी दि.8.7.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे तक्रार केली. परत अर्जदार यांनी दि.7.8.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना रक्कम मिळाली नसल्याबददल कळविले. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास कळविले की, अर्जदाराला डी.सी.बी. बँकेमधून केलेला व्यवहार हा वैध आहे व अर्जदाराचा अर्ज हा फेटाळण्यात येतो. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी कळविले की, आर.बी.आय. च्या दिलेल्या सूचनेनुसार सदरील एटीएम मशीनच्या तक्रारी एन.एफ.एस. च्या सॉफटवेअर द्वारे निकाली काढण्यात येतात व त्यामूळे तूमची तक्रार ही ज्या बॅकेचे एटीएम आहे त्या बॅकेत दाखल करावी. अर्जदाराची रक्कम न देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, रु.10,000/- व्याजासह व रु.5,000/- मानसिक शारीरिक ञासाबददल तसेच गैरअर्जदार यांचे कडे जाण्यायेण्यासाठी लागलेला खर्च रु.1500/- व सेवेत ञूटी केल्याबददल रु.5,000/- असे एकूण रु.21,500/- व्याजासह मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांची तक्रार ही एटीएम मधीन बददल आहे त्यामूळे त्या बाबत आम्हाला काहीही माहीती नाही. दि.8.7.2010 रोजी घटनेबददल गैरअर्जदार यांना कूठलीही माहीती नाही. घटना घडल्यानंतर एक महिन्यानंतर अर्ज दिलेला आहे. अर्जदाराचा तक्रार नाकबूल असून तो फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार मजूकर हा कायदयाशी सूसंगत नाही. अर्जदाराने डी.सी.बी. बॅकेचे एटीएम मशीन वापरले आहे , त्यानुसार एक तर त्यांला रक्कम मिळाली आहे किंवा एटीएम मशीन मध्ये रक्कम शिल्लक राहीली आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र.2 यांचा कॅश टॅली रिपोर्ट व जे.पी.लॉग रिपोर्ट दाखल होणे आवश्यक आहे. या रिपोर्टशी गैरअर्जदार क्र.1 यांचा कोणताही संबंध नाही. एटीएम मशीन वापरताना लिंक फेल झाल्यास रक्कम एटीएम मशीन मध्ये शिल्लक राहते. किंवा मशीन खराब असल्यास रक्कम बाहेर पडत नाही. त्यामूळे सदर तक्रारीमध्ये एटीएम बँकेचा काहीही दोष नाही. त्यामूळे त्यांचे सेवेत कोणतीही ञूटी नाही म्हणून अर्जदाराची तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार हे त्यांचे ग्राहक नाही म्हणून तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे.ग्राहकाच्या सेवेसाठी विनाशुल्क ही सेवा सूरु केलेली आहे. अर्जदारास रु.10,000/- मिळाले नाही ही बाब गैरअर्जदार अमान्य करतात. कारण व्यवहार झाल्याबददलचा Transaction successful झाल्याबददलचा कोड 00 देखील मिळाला आहे. कारण अर्जदार यांनी सूरक्षा रक्षक यांना सांगितले व मशीन बरोबर चालत नव्हती हे त्यांना मान्य नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्यांच्या तक्रारीबददल माहीती घेऊन व चौकशी करुन सहकार्य केलेले आहे. कोणतीही सेवेत ञूटी केलेली नसून त्यामूळे अर्जदारास कोणताही मानसिक व शारीरिक ञास झालेला नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या पूराव्या वरुन अर्जदार यांना रक्कम मिळाल्याचे दिसून येते. रक्कम मिळाली नसेल तर OVER DUES दाखवते अन्यथा जर रक्कम मिळाली असेल तर Transaction successful असे दाखवते व ज्यांचा कोड 00 असा दाखवते व हा व्यवहार आर.बी.आय. च्या अखत्यारित चालत असतो. या प्रमाणे अर्जदारा बाबत Transaction successful दाखवते व ज्यांचा कोड 00 असा दाखवते. म्हणजे अर्जदार यांना रक्कम मिळालेली आहे. गैरअर्जदारास ञास देण्याचे उददेशाने व पैसे उकळण्याचे उददेशाने तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदाराच्या सेवेत कोणतीही ञूटी नसून अर्जदाराची तक्रार रु.10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 व 2 ः- अर्जदार यांचे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद नांदेड येथे 62124557379 या क्रमांकाचे खाते आहे. त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. अर्जदार यांच्या तक्रारीप्रमाणे दि.9.7.2010 रोजी तरोडा बुद्रूक येथील डी.सी.बी. बँकेच्या एटीएम सेंटर मधून रु.10,000/- काढण्यासाठी गेले व मशीचा उपयोग रु.10,000/- काढण्यासाठी केला पण पैसेही आले नाही व स्लीपही आली नाही अशा आशयाची तक्रार आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 कडे असलेल्या त्यांच्या स्वतःच्या खात्यावर पाहिले असता रु.10,000/- कपात झालेले होते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज केले पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही असे त्यांचे म्हणणे आहे म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार न्याय मंचात दाखल केली. गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे कागदपञासहीत मांडले त्यांचे मताने ज्यावेळी अर्जदाराने एटीएम मशीनवर पैसे काढण्यासाठी कार्ड टाकले त्यावेळी ते Transaction Successful झाल्याचा कोड 00 आहे तो सदरच्या रिपोटवर असल्यामूळे अर्जदाराने केलेली एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकून पैसे मिळाल्याची कृती पूर्ण झालेली आहे. अर्जदाराच्या खात्यातूनही रु.10,000/- कपात झाले आहेत. त्यामुळे गैरअर्जदार यांचे सेवेत ञूटी नाही. गैरअर्जदार यांनी रिस्पॉन्स कोड व त्यांची माहीती मंचासमोर यादीसहीत दाखल केलेली आहे. ज्यामध्ये 0 या कोडवर Transaction approved आहे. सद्यस्थितीत 0 समोर झालेल्या कागदपञानुसार अर्जदार हीस एटीएम मशीनद्वारे पैसे व स्लीप मिळाली नाही असा सबळ कागदोपञी पूरावा नसल्यामूळे एटीएम मशीनवर यंञावरच विश्वास ठेवावा लागेल. त्यामूळे अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येते आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सहन करावा. 3. उभयपक्षांना नीर्णय कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |