Rangrao Shama Pawar filed a consumer case on 03 Jun 2011 against State Bank of Hydrabad in the Nanded Consumer Court. The case no is CC/11/9 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
प्रकरण क्रमांक:-2011/09
प्रकरण दाखल तारीख- 12/01/2011
प्रकरण निकाल तारीख /span> 03/06/2011
समक्ष /span>मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,-अध्यक्ष
मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.- सदस्या
श्री.रंगराव पि.शामा पवार,
वय वर्षे 50,धंदा नोकरी,
रा. शनी पार्डी ता.अर्धापुर जि.नांदेड.अर्जदार.
विरुध्
1. स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद,
द्वारा- शाखा अधिकारी,
तरोडा नाका,नांदेड.
2. शाखा अधिकारी, गैरअर्जदार
भारतीय स्टेट बँक,
शाखा डोंगरकडा ता.कळमनुरी जि.हिंगोली.
अर्जदारा तर्फे -अड.अ.व्हि.चौधरी.
गैरअर्जदार क्र. 1तर्फे वकील /span>/span>span style='mso-spacerun:yes'> /span>अड. महेश कनकदंडे
गैरअर्जदार क्र. 2-एकतर्फा
/span>/span>निकालपत्र/span>/span>
(द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्या)
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 यांच्या शाखेमध्ये स्वतःच्या नांवे खाते आहे. ज्याचा क्र.52070766883 असा आहे.अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 यांचे अत्यंत जुने ग्राहक आहेत. दि.13/09/2010 रोजी अर्जदार यांना काही कामा निमीत्य पैशाची गरज भासली असता, गैरअर्जदार क्र. 2 यांचे एटीएम बुथ जवळ असल्या कारणाने त्यांनी एटीएम मशीनमधुन त्यांचा एटीएम कार्ड क्र. आयडी एसआयसीसी 00592801 याद्वारे रु.1,000/- उचल करण्यासाठी व काढण्यासाठी वापरले असता त्यामशीनमधुन रु.1,000/- व्यवहार प्रोसेस झाला परंतु त्यामधुन रु.1,000/- अर्जदारास प्राप्त झाले. त्यामुळे अर्जदार हे अत्यंत भयभीत व चिंतीत झाले. परंतु मशीनमध्ये काही बिघाड असेल असे गृहीत धरुन शांत राहीले. परंतु अर्जदार यांनी त्यांच्या खात्यावर बॅलेन्स इन्क्वायरी केली असता त्यांना असेलक्षात आले की, त्यांच्या खात्यामधुन रु.1,000/- ची कपात झाल्याचे दिसले त्यामुळे रक्कम न मिळता कपात कशाबद्यल झाली याबद्यल अर्जदाराची मनाची चिंता लागून राहीली.अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे झालेल्या व्यवहाराबद्यल माहीती देवून सहकार्याची अपेक्षा केली असता, गैरअर्जदार क्र. 2 यांनी झालेल्या व्यवहाराबद्यल व रक्कम न मिळाल्याबद्यल चौकशी केली असता, गैरअर्जदार क्र. 1 यांच्याशी चर्चा करावी व तक्रार द्यावी, आम्ही काही करुन शकत नाही असे उत्तर देवून उडवून लावले. दि.19/09/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे रितसर लेखी तक्रार दिली ज्यमध्ये अर्जदार यांना न मिळालेली रक्कम जी त्यांच्या खात्यामधून कपात झाली याची तसदी घेऊन सहकार्य करावे व पैसे मिळवून द्यज्ञवे अशी विनंती केली. दि.14/09/2010 रोजी एटीएम मशीनमधुन रक्कम रु.1,000/- न मिळालेबद्यल लेखी तक्रार दिली व पैसे मिळावे म्हणून लेखी विनंती केली. अर्जदारहे वारंवार गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडे सहकार्याचे भावनेने व अपेक्षेने चकरा मारीत राहीले त्यांच्याकडुनसहकार्य न मिळाल्यामुळे अर्जदारास मनस्ताप झाला.अर्जदाराने दुस-यांदा दि.15/11/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे लेखी तक्रार दिली व पैसे न मिळाल्यास विद्यमान ग्राहक मंचामध्ये कार्यवाही केली जाईल अशी विनंती केली.अर्जदार यांन कंटाळून दि.24/10/2010 रोजी लोकमत हेल्प लाईन यांच्याकडे कार्यालयात झालेल्या व्यवहाराबद्यल लेखी माहीती देवून सहकार्य करण्याची अपेक्षा केली. परंतु गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या चुकीमुळे अर्जदारास कुठेलच सहकार्य केले नाही.गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या चुकीचे सेवेमुळे व निष्काळजीपणामुळे अर्जदारास शारीरिक व मानसिक त्रास व आर्थीक त्रास झाला आहे त्यासाठी जास्तीत जहास्त दंड ठोठावून दावा खर्चासह अर्जदाराची तक्रार मंजुर करावी तसेचपैसे न मिळाल्याबद्यल प्रती दिवस रु.100/- चा दंड ठोठवण्यात यावा. तसेच अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराचे खाते क्र.520707766883 मधून वजा केलेले रु.1,000/- दि.13/109/2010 पासुन 18 टक्के व्याजाने देण्याचे आदेश करावेत तसेच मानसिकव शारिरीक त्रासापोटी रु.25,000/- देण्याची आदेश करावेत व दावा खर्च रु.5,000/- देण्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्र. 1 हे हजर झालेगैरअर्जदारासहे म्हणणे मान्य आहे की, अर्जदारास एटीएम कार्ड वापरुन रु.1,000/- मिळाले. दि.19/09/2010 रोजी अशा प्रकारची कुठलीही तक्रार बँकेस प्राप्त नाही. सदर प्रकरणामध्ये अर्जदाराने एस.बी.आय.बँकेचे एटीएम मशनी वापरले आहे,त्यामुळे त्याला एकतर रक्कम मिळलेली आहे किंवा एटीएम मशीन मध्ये रक्कम शिल्लक राहीली आहे. त्यासाठी गैरअर्जदार क्र. 2 यांना कॅश टॅली रिपोर्ट व जे.पी.लॉग रिपोर्ट दोन्ही दाखल होणे आवश्यक आहे, त्यातून पैसे अर्जदारास मिल्याचा किंवा न मिळाल्याचा स्पष्ट बोध होतो व त्यात गैरअर्जदार क्र. 1 यांचा कुठेही संबंध नाही. एटीएम लिंक फेल झाल्यास सदरील रक्कम एटीएमध्यमे जमा राहते, किंवा मशीन खराब असल्यामुळे/असल्यास रक्कम बाहेर पडत नाही, त्यामुळे प्रस्तुत प्रकरणांमध्ये एस.बी.एच.बँकेचा काहीही दोष नसुन अर्जदार व एस.बी.आय. बँक यांचाच आपसातील वाद आहे. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांनी सदरील प्रकरणामध्ये अर्जदारास पैसे मिळाले की नाहीत यासाठी एटीएम स्विच सेंटर येथे ताबडतोब तक्रार दाखल केली, त्यावर सखोल चौकशी होऊन प्रस्तुत प्रकरणांमध्ये अर्जदारास पैसे मिळाल्याचे सिध्द झाल्यामुळे एटीएम स्विच सेंटर यांनी सदरील तक्रार रद्य केली व त्यापुष्टयार्थ त्यांनी Report of Claims status wise ची प्रत सोबत पाठविलेली आहे. त्यामध्ये Transaction-CD.00 म्हणजेच Successful transaction असे दाखल आहे, त्याची प्रत कोर्टात दाखल केलेल्या आहेत, यावरुन असे सिध्द होते की, अर्जदारास रक्कम मिळालेली आहे व याची माहीती बँकेने अर्जदारास लेखी पत्र देऊन कळवली आहे व त्याची प्रत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरण गैरअर्जदार क्र. 1 यांचे विरुध्द खारीज/डिसमीस करुन झालेल्य मानसिक त्रासासाठी व कायदेशिर खर्चासाठी रु.5,000/- अर्जदाराने बँकेस देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांना या मंचाची नोटीस प्राप्त होऊन देखील ते या मंचासमोर हजर न राहील्यामुळे प्रकरणांत एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले.
अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2/span>यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात.
मुद्ये. उत्तरे
1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय? होय.
2.गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे काय?
गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे.
3.अर्जदार गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मागु शकतात काय?
गैरअर्जदार क्र.2 यांचेकडुन अर्जदार नुकसान भरपाई मागु शकतात.
4.आदेश काय? /span>अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणे.
मुद्या क्र. 1 ते 4
अर्जदार यांनी तक्रारीसोबत जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत त्यात गैरअर्जदार क्र. 1 याचेकडे असलेले बचत खाते याचा खाते क्रमांक 52070766883 ची प्रत दाखल केली आहे.गैरअर्जदार क्र. 1 यांनी स्वतःचे लेखी म्हणणे दाखल केले आहे त्यात त्यांनी अर्जदार हे त्यांचे ग्राहक नाही असे कुठेही म्हटलेले नाही. यावरुन अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहे हे सिध्द होते.
अर्जदार यांनी तक्रारीसोबत गैरअर्जदार क्र. 2 यांना दि.14/09/2010 रोजी एक अर्ज देऊन दि.13/09/2010 रोजी त्यांचे एटीएम सेंटरमधन रु.1,000/- काढले असता पैसे मिळाले नाही परंतु माझे खात्यातून पैसे वजा झाले अशी तक्रार केली ती तक्रार मिळाल्याची पोहच दि.14/09/2010 रोजी दिली. दि.19/09/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांना सुध्द सदर व्यवहाराबद्यल तक्रार दिली. त्याची पोहच त्यांनी दिली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यात त्यांनी अर्जदारांनी एबीआय एटीएम मशनीमधून कार्ड वापरले त्यांची तात्काळ माहीती एसबीआय कार्ड सेंटरला मिळाली तेथून त्यांनी एटीएम हब जे की, संपुर्ण बॅकाचे कॉमन सेंटर असते त्यांना कळवले त्यानंतर एटीएम हब सेटरने ते कार्ड एसबीएच चे असल्यामुळे त्याची माहीती एसबीएच कार्ड सेंटर/हब ला कळवले. यामध्ये लिंक फेल झाल्यास रक्कम एटीएममध्ये जमा राहते किंवा मशीन खराब असल्यास रक्कम बाहेर पडत नाही. यामध्ये त्यांचा दोष नसुन अर्जदार व एसबीएच यांचाच आपसातील वाद आहे.
/span> गैरअर्जदार क्र. 2 यांना मंचाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही. म्हणुन त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. सदर तक्रारीमध्ये गैरअर्जदार क्र. 1 आपले म्हणणे मांडलेले आहे पण गैरअर्जदार क्र. 2 यांनी हजर न होऊन आपले म्हणणे मांडले नाही व अर्जदाराची तक्रार खोडलेली नाही.म्हणजे त्यांना अर्जदाराची तक्रार कबुल आहे असा त्याचा अर्थ होतो. असे करुन गैरअर्जदार क्र. 2 यांनी सेवेत त्रुटी केली आहे, हे सिध्द होते. पैसे न मिळाल्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झालेले आहे तसेच त्याला दोन्ही बॅकेमध्ये जाऊन अर्ज देण्यास भाग पाडलेले आहे तरी देखील त्याची तक्रारीचे निवारण करण्यात आलेले नाही त्यामुळे त्यास ग्राहकमंचात तक्रार दाखल करावी लागली त्यासाठी त्याला खर्च आला असणार.
वरील सर्व़ बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
/span>आदेश.
1. अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्यात येतो.
2.हा निकाल कळाल्यापासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार क्र. 2 मॅनेजर यांनी वैयक्तिकरित्या अर्जदारास एटीएममधून न मिळालेली रक्कम रु.1,000/- द्यावेत.
3.हा निकाल कळाल्यापासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार क्र. 2 मॅनेजर यांनी वैयक्तिकरित्या अर्जदारास मानसिक त्रासाबद्यल रु.1,000/- दावा खर्च म्हणुन रु.500/- द्यावेत.
4.संबंधीतांना आदेश कळविण्यात यावा.
श्री.बी.टी.नरवाडे पाटीलश्रीमती सुवर्णा देशमूख
अध्यक्ष /span>सदस्या
गो.प.निलमवार.लघुलेखक
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.