निकालपत्र तक्रारदाखलदिनांकः- 07/07/2010 तक्रारनोदणीदिनांकः- 13/07/2010 तक्रारनिकालदिनांकः- 02/11/2010 कालावधी03 महिने 18 दिवस जिल्हाग्राहकतक्रारनिवारणन्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांतबी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाताजोशीB.Sc.LL.B. सौ.अनिताओस्तवालM.Sc. सुभाष पंडीतराव देशमुख . अर्जदार वय 50 वर्षे.धंदा. शेती. अड.डी.यु.दराडे. रा.वडी ता.पाथरी जि.परभणी. विरुध्द स्टेट बँक ऑफ हैद्राबाद. गैरअर्जदार. व्दारा ब्रँच मॅनेजर, अड.बी.एन.जोशी ब्रँच पाथरी जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाताजोशी. सदस्या. 3) सौ.अनिताओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्रपारितव्दाराश्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. ) शासनाने जाहिर केलेल्या शेती कर्ज थकबाकी सवलतीचा लाभ अर्जदारास देण्याच्या बाबतीत गैरअर्जदार बँकेने केलेल्या सेवात्रुटीची दाद मिळणेसंबंधी प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे. अर्जदार मौजे वडी ता.पाथरी येथील रहिवासी शेतकरी असून गैरअर्जदार बँकेकडून मध्यम मुदतीचे त्याने पिक कर्ज घेतले होते केंद्र शासनाने देशातील शेतक-यांसाठी कर्ज माफीची घोषणा जाहिर करुन सर्व शेतक-यांनी शेती विकासासाठी वित्तीय संस्थाकडून किंवा बँकेकडून कर्ज घेतलतेले असेल आणि ज्या शेतक-यांची जमीन 2 हेक्टर पेक्षा कमी आहे त्यांना 100 % आणि ज्या शेतक-यांची जमीन 2 हेक्टर पेक्षा जास्त आहे त्यांना रुपये 20,000/- किंवा थकबाकीच्या 25 % यापैकी जी जास्त रक्कम असेल त्या रक्कमेची कर्ज माफीची योजना जाहिर केलेली होती. वरील योजने प्रमाणे अर्जदाराच्या मालकीची जमिन 2 हेक्टर पेक्षा जास्त असल्यामुळे गैरअर्जदार बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीमध्ये 25 % कर्जमाफी मिळणेस लाभार्थी व पात्र ठरलेले होता. अर्जदाराने ता. 04/01/2010 रोजी गैरअर्जदारास समक्ष भेटून कर्ज थकबाकीत माफी/सवलत मिळण्यासाठी शिल्लक थकबाकीची चौकशी केली असता त्याचेकडे रुपये 245815/- थकबाकी असल्याचे सांगून त्याला रुपये 81415/- कर्ज माफी मिळाली असल्याचे सांगितले व उरलेली 75 % रक्कम रुपये 164360/- भरणा करण्यास सांगितले त्यानुसार अर्जदाराने ती रक्कम कर्ज खात्यात जमा केली त्यानंतर अर्जदाराचे कर्ज खाते निरंक झाले असल्याचे बॅक व्यवस्थपकाने कळविले त्यानंतर अर्जदार 09.06.2010 रोजी नवीन पिक कर्ज घेण्यासाठी बॅकेत गेला असता पूर्वीच्या कर्जाची त्याच्याकडे रुपये 91308/- थकबाकी असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता जुलै 2007 ते जानेवारी 2010 पर्येंतचे व्याज अधिक माफीच्या रक्कमेवरील व्याज व दिनांक 31.12.2007 रोजी कर्ज खात्याच्या लेजर अकाऊण्ट ला दाखवलेली थकबाकी यामध्ये बरीच तफावत असल्याचे दिसले. गैरअर्जदाराने चुकीचे हिशोब दाखवून रुपये 91308/- ची बेकायदेशीर थकबाकी दाखवलेली आहे. हिशोबानुसार अर्जदार फक्त रुपये 14205/- इतकीच देणे लागतो. व तेवढी रक्कम भरण्यास तो तयार आहे असे त्याचे म्हणणे आहे. गैरअर्जदारानी चुकीची थकबाकी दाखवून मानसिक त्रास दिला व सेवा त्रूटी केली व अनूचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला म्हणून प्रस्तूत तक्रारी व्दारे ग्राहक मंचाकडून कायदेशीर दाद मागितलेली आहे व गैरअर्जदाराकडून बेबाकी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र नि.2 आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत कर्ज खाते उतारा, रक्कम डिपॉझीट केल्याची काउण्टरस्लिप वगैरे 3 कागदपत्रे दाखल केले आहेत. गैरअर्जदारास लेखी म्हणणे सादर करण्यासाठी मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्यानी 01.01.2010 रोजी आपला लेखी जबाब (नि.11) सादर केला. गेरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने खरी वस्तूस्थिती दडवून दिशाभूल करुन त्यांच्याविरुध्द खोटी केस केली आहे. तक्रार अर्जातून त्यांच्या विरुध्द केलेली सर्व विधाने साफ नाकारली आहेत तसेच तक्रारीत म्हटल्याप्रमाणे 25 % सवलतीचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराने एकूण थकबाकी पैकी उरलेली 75 % थकबाकी गैरअर्जदारांच्या सागण्यावरुन .रुपये 164360/- बॅकेत जमा केले होते कर्ज खाते निरंक झाल्याचे बॅक व्यवस्थापकाने कळविले हा तक्रार अर्ज परिच्छेद 4 मधील संपूर्ण मजकूर गैरअर्जदाराने साफ नाकारला आहे. गैरअर्जदाराने याबाबत असा खुलासा केला आहे की, अर्जदाराला दिलेले कर्ज शेती तारण गहाण प्रकारातील होते. कर्ज माफीच्या योजनेप्रमाणे 2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणा-या शेतक-याकडे 31.12.2007 रोजी जेवढी थकबाकी असेल त्याच्या 25-% कर्जमाफी मिळण्यासाठी त्याने उरलेली 75 % थकबाकी भरली तरच अथवा एकरक्कमी भरणे शक्य नसेल तर 3 हप्त्यात माहे जुन 2009 पर्यंत रक्कम डिपॉझीट करण्याबातचे अंडरटेकींग दयावे अशी अट होती. अर्जदाराने त्यापैकी कोणत्याच बाबीची पूर्तता केली नसल्याने कर्ज माफीची सवलत त्याला आता मागता येणार नाही. अर्जदाराकडे 31.12.2007 पर्यंत रुपये 238089/- थकबाकी होती त्याच्या 25 % कर्ज माफीचा लाभ रुपये 58524/- मिळण्यासाठी ‘त्याने रुपये 178360/- भरावयास हवे होते अथवा ती रक्कम 3 हप्त्यात भरण्यासाठी तसे अंडरटेकींग तरी दयावयास हवे होते. मात्र मुदतीत त्याने पूर्ण रककम भरली नाही किंवा अडरटेंकीग देखील दिले नव्हते याची सविस्तर कल्पना अर्जदारास दिली असतानाही त्याने आवश्यक ती पूर्तता केली नाही . थकबाकी देण्याचे टाळण्यासाठी प्रस्तूतची खोटी तक्रार ग्राहक मंचात केलेली आहे. ती रुपये 5000/- च्या कॉपेनसेटीर कॉस्टसह फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र नि. 12 आणि पुराव्यातील कागदपत्रात नि 13 लगत कर्ज प्रकरणाचे गहाण खत, अर्जदारास लागू झालेल्या कर्ज रक्कमेचा चार्ट दाखल केला आहे. अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड. दराडे आणि गैरअर्जदारातर्फे अड बी.एन.जोशी यानी युक्तिवाद केला. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदाराने गैरअर्जदार बँकेकडून शेती व्यवसायासाठी घेतलेल्या कर्ज थकबाकीमध्ये शासनाच्या योजने प्रमाणे 2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राच्या जमिनीच्या मालकांना लागु केलेली कर्ज सवलत देण्याचे बाबतीत गैरअर्जदाराने सेवात्रुटी झालेली आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 केंद्र शासनाच्या कर्जमाफी योजने अंतर्गत सर्वं पात्र खातेदार शेतक-यांनी दिनांक 30 जुन 2008 रोजी शेती व्यवसायासाठी बॅकेकडून अथवा अन्य वित्तीय संस्थाकडून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीत कर्ज माफीची घोषणा जाहीर केल्यावर महाराष्ट्र शासनाने त्याच्या अंमलबजावणीसाठी शासन परिपत्रक क्रमांक सी.सी.आर 1408/प्र.क्र.419/2-स सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय, मुंबई दिनांक 21.05.2008 चे परिपत्रक काढून कोणत्या कर्जदार शेतक-यांना कशा पध्दतीने कर्जमाफीचा / कर्जसवलतीचा लाभ दयावा व त्याची कार्यवाही कशी करावी या संबधीचे मार्गदर्शन माहिती परिपत्रकात दिलेली आहे. सदर योजनेचा थोडक्यात परामर्श असा आहे की, योजनेचा लाभ दि.31/3/2007 पर्यंत वाटप केलेले आणि दि.31/12/2007 रोजी थकीत झालेले व दिनांक 29/2/2008 पर्यंत परतफेड न केलेले कर्जाची 100 % कर्जमाफी ज्या शेतक-यांचे जमिनीचे क्षेत्र 2 हेक्टर पेक्षा कमी आहे त्याला. आणि 2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतक-यांना 25 % किंवा 20,000/- पैकी जी जास्त रक्कम असेल त्या रक्कमे पर्यंत कर्ज माफी देण्यात आलेली आहे शासनाच्या मार्गदर्शन परिपत्रकात शेतक-यांच्या वर्गीकरणाबाबतचा पुढे असा खुलासा दिला आहे की, 1) अत्यल्प शेतकरी – म्हणजे 1 हेक्टर पर्यंत जमिनीची लागवड करणारा शेतकरी 2) अल्प शेतकरी म्हणजे 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंत जमिनीची लागवड करणारा शेतकरी आणि 3) इतर शेतकरी म्हणजे 2 हेक्टर पेक्षा जास्त जमिनीची लागवड करणारा प्रस्तूत प्रकरणातील अर्जदारांच्या मालकीची मौजे वडी ता.पाथरी येथे गट क्रमांक 19 क्षेत्र 8 हेक्टर 31 आर म्हणजे 5 एकरापेक्षा जास्त आहे ही अडमिटेड फॅक्ट आहे. शिवाय पुराव्यात गैरअर्जदारातर्फे नि.13/1 ला दाखल केलेल्या गहाण खतातील पान क्रमांक 6 च्या परिशिष्टामध्येही क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे शासन परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे अर्जदार इतर शेतकरी या वर्गात मोडतो.त्यामुळे शासनाच्या परिपत्रकातील पान क्रमांक 11 कर्जफेड सवलती शिर्षका खालील तपशिल क्रमांक 6.1 मध्ये नमुद केल्याप्रमाणे इतर शेतक-यांसाठी एक वेळ सवलत राबवण्यात येईल व निश्चित केलेल्या रक्कमेच्या 25 टक्के एवढी रक्कम केंद्र शासनाकडून मिळेल तसेच निश्चित रक्कमेच्या 25 टक्के किंवा रु.20,000/- यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रक्कमेची कर्ज माफी संबंधीत शेतक-यांना द्यावी असे नमुद केलेले आहे. परिपत्रकातील तपशिल क्रमांक 7.3 मध्ये असे नमुद केले आहे की,तपशील क्रमांक 7.3 – ज्या शेतक-यांचे वर्गीकरण इतर शेतकरी या प्रवर्गात करण्यात आलेले आहे अशी शेतकरी एकरकमी योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी पात्र आहेत. अशा शेतक-यांकडून त्यानी भरणा करावयाची रक्कम तीन हप्त्यात भरणा करण्याबाबत हमी पत्र त्यांच्याकडून घेण्यात यावे असे हमी पत्र घेत असताना सुरुवातीच्या दोन हप्त्याची रक्कम त्यानी एकूण भरणा करावयाच्या एकूण रक्कमेच्या 1/3 पेक्षा कमी असणार नाही असे हमीपत्र घ्यावे. वरीलप्रमाणे तीन हप्त्याची रक्कम भरण्याच्या अंतीम तारखा 30 संप्टेबर 2008, 31 मार्च 2009 30 जुन 2009 आहे. तपशील क्रमांक 7.5 मध्ये एकरकमी कर्ज फेड योजने अंतर्गत देण्यात येणारी सवलत इतर शेतकरी या प्रवर्गातील त्यानी दयावयाची संपूर्ण रक्कम परत फेड केल्यानंतर सवलतीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येइल असे नमूद केले आहे. . परिपत्रकात वरीलप्रमाणे नमूद केलेल्या खुलाशातून अर्थातच इतर शेतकरी वर्गात मोडलेल्या थकबाकीदार शेतक-यांना कर्ज माफीचा लाभ प्राप्त करुन घ्यावयाचा असेल तर थकबाकीची रक्कम तपशील क्रमांक 7.3 मध्ये दिलेल्या तीन तारखाना तीन हप्त्यात एकरकमी भरणा करणेबाबतचे हमीपत्र देणे अनिवार्य आहे आणि तपशील क्रमांक 7.5 प्रमाणे थकबाकीची संपूर्ण रक्कम परतफेड केल्यानंतरच सवलतीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होउ शकते म्हणजेच इतर शेतकरी वर्गातील शेतक-यांनी त्याच्या एकूण थकबाकी रक्कमेच्या 75 % रक्कम कर्जखाती जमा केली तरच तो कर्ज माफीच पात्र ठरतो. असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्याच अनुषंगाने गैरअर्जदारानी वरील सर्व प्रकरणातील शेतक-याना कर्ज माफी सवलतीचा लाभ का देता आला नाही याबाबतीत लेखी जबाबातील परिच्छेद क्रमांक 6 मध्ये खुलासा केलेप्रमाणे अर्जदाराची कर्जाची थकबाकी रुपये 238089/- दिनांक 31.12.2007 अखेर होती त्याच्या 25 % कर्ज माफी चा लाभ मिळण्यास तो पात्र ठरला होता. परंतू वरील थकबाकी रक्कमेचा 25 % रककम रुपये 58524/- होते ती वजा जाता उरलेली 75 % रककम रुपये 178565/- ची थकबाकी अर्जदाराने मुदती पूर्वी गैरअर्जदार बॅकेत भरणे आवश्यक होते. परंतू प्रत्यक्षात त्याने फक्त रुपये 164360/- एवढीच रक्कम भरणा केली होती पुराव्यात नि. 4/1 ला बॅक डिपॉझीट पे इन स्लिप च्या छायाप्रत दाखल केली आहे. युक्तिवादाच्या वेळी या संदर्भात अर्जदारातर्फे अड दराडे यानी मंचापुढे असे निवेदन केले की, अर्जदाराने 75 % रक्कम जी बॅकेत डिपॉझीट केली होती ती बॅक व्यवस्थपकाच्या सांगण्यावरुन भरलेली होती रक्कम कमी भरली असेल तर त्यामध्ये अर्जदाराचा दोष नाही. अड दराडे यानी केलेला हा युक्तिवाद मुळीच ग्राहय धरण्या जोगा नाही. कारण अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे एकूण थकबाकीचा आकडा त्याला गैरअर्जदाराकडून दिला गेला होता त्याच्या 75 % रक्कम किती होते याचा हिशोब अर्जदारालाही स्वतः करता आला असता व त्या हिशोबाप्रमाणे 75 % ची थकबाकी पूर्ण करणे त्याची जबाबदारी होती. त्यामुळे बॅक व्यवस्थपकाने जी रक्कम सांगितली ती रक्कम भरली त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. याउलट गैरअर्जदारावर्फे नि. 13/2 लगत जो चार्ट दाखल केलेला आहे त्यामध्ये अर्जदाराने तक्रार अर्जात नमूद केलेली थकबाकी व चार्ट मध्ये दिली गेलेली थकबाकी यामध्ये बरीच तफावत दिसून येते. दुसरी गोष्ट अशी की, अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे बॅक व्यवस्थपकाने त्याला 25 % कर्जमाफीच्या लाभाची रक्कम रुपये 81455/- सांगितली होती हे तक्रार अर्जातील कथन ही विश्वासार्ह वाटत नाही कारण थकबाकी रक्कमेच्या 25 % चा हिशोब करता वर नमूद केलेली रक्कम ही निश्चीतपणे 25 % पेक्षा जास्त आहे हे अर्जदारालाही कळायला हवे होते त्यामुळे बॅक व्यवस्थपकाने वरील रक्कमेची कर्ज माफी मिळाल्याचे सांगणे मुळीच शक्य नाही तरी परंतू अर्जदाराने रुपये 164360/- रक्कम डिपॉझीट केल्यावर त्याला मिळणारी 25 % कर्जमाफी थकबाकी मध्ये जमा करता त्याचे कर्जखाते बेबाकी झाल्याचे बॅक व्यवस्थपकाने कळविले होते असे तक्रार अर्जात म्हटलेले आहे परंतू तो पुरावापत्र दाखल केलेले नाही. बॅक अधिका-याने स्लिप भरुन दिली तेवढी रक्कम अर्जदाराने भरली असे युक्तिवादाचे वेळी अड. दराडे यानी निवेदन केले. हे क्षणभर ग्राहय धरले तरी ग्राहक जेवढी रक्कम भरु इच्छीतो त्या प्रमाणेच बॅक व्यवस्थापकाने त्याला स्लिप भरुन दिली असली पाहीजे यापेक्षा वेगळा अर्थ निघु शकत नाही असे आमचे मत आहे. त्यामुळे दिनांक 31.12.2009 रोजी अर्जदाराने थकबाकीच्या 75 % रक्कम रुपये 164360/- भरल्यानंतर गैरअर्जदाराने शासनाच्या कर्जमाफी योजनेप्रमाणे थकबाकीच्या 25 % रककम कर्जखाती जमा करुन अर्जदाराच्या कर्ज खाते बेबाकी केले नाही मात्र पुन्हा थकबाकी दाखवून अर्जदारावर अन्याय केला आहे. व सेवा त्रूटी केली आहे या अर्जदाराच्या आक्षेपास काहीही अर्थ नाही कारण शासनाने कर्ज माफीची योजना जाहीर केल्यानंतर वित्तीय संस्थाना तसे आदेश देवून थकबाकीदारांची यादी नोटीस बोर्डावर प्रसिध्द करावी असे परिपत्रकात ही नमूद केले आहे गैरअर्जदाराने देखील तशी यादी प्रसिध्द केली होती हे युक्तिवादाचे वेळी गैरअर्जदारातर्फे अड बी. एन. जोशी यानीही मंचापुढे सांगितले होते त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही त्यामुळे यादीत नमूद केलेप्रमाणे थकबाकीच्या 25 % रक्कम भरण्याची अर्जदाराने काळजी घेणे ही त्याची जबाबदारी होती. रक्कम कमी भरली हा त्याचा वैयक्तिक दोष आहे त्याचा ठपका गैरअर्जदारावर ठेवता येणार नाही. वरील सर्व बाबी विचारात घेता आणि पुराव्यातील वस्तूस्थिती वरुन गैरअर्जदारावर केलेले आरोप चुकीचे असून बॅकेकडून याबाबतीत कोणतीही सेवा त्रूटी झालेली नाही या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. आदेश 1 तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 आपला खर्च आपण स्वतः सोसावा. 3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरविण्यात याव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |