नि. ४९
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १८७५/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ०३/०६/२००९
तक्रार दाखल तारीख : १५/०६/२००९
निकाल तारीख : ०४/०१/२०१२
----------------------------------------------------------------
१. श्री श्रीकांत माधव ठाणेदार
व.व.५६, धंदा – वैद्यकीय
२. सौ विणा श्रीकांत ठाणेदार
व.व.५०, धंदा – वकिल
३. श्री रोहन श्रीकांत ठाणेदार
व.व.२१, धंदा – शिक्षण
४. कु.अमृता श्रीकांत ठाणेदार
व.व.२५, धंदा – नोकरी
सर्व रा.११४३, गांवभाग, जि.सांगली
तक्रारदार नं.१, ३ व ४ तर्फे अधिकारपत्र धारक
सौ विणा श्रीकांत ठाणेदार ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. स्टेट बॅंक ऑफ एम्प्लॉईज श्री गणेश को.ऑप.क्रेडीट
सोसायटी लिमिटेड, जीनेश्वर कृपा अपार्टमेंट,
टिळक मंदिरासमोर, सांगली ४१६ ४१६
२. श्री उदय यशवंतराव देशमुख, चेअरमन
चव्हाणवाडी, २०९, निनाई बंगला, आष्टा,
ता.वाळवा जि. सांगली
३. श्री जे.एम.फार्णे, संचालक
एस.बी.आय. शाखा विटा, ता.खानापुर जि.सांगली
४. श्री एच.डी.पाटील, संचालक
एस.बी.आय. शाखा इस्लामपूर, ता.वाळवा
जि.सांगली
५. श्री एस.एस.पेठकर, संचालक
एस.बी.आय. शाखा इस्लामपूर, ता.वाळवा
जि.सांगली
६. श्री ए.जी.घाडगे, संचालक
रा.एस.बी.आय. मुख्य शाखा सांगली जि.सांगली
७. श्री ए.ए.जमादार, संचालक
रा. एस.बी.आय. शाखा मिरज जि.सांगली
८. श्री आर.व्ही.पाटील, संचालक
रा. एस.बी.आय. शाखा तासगांव जि.सांगली
९. श्री डी.आर.लाकुळे, संचालक
रा. एस.बी.आय. शाखा दक्षिण शिवाजीनगर,
कोटणीस पथ, जि.सांगली
(मंचाचे दि.१२/९/०९ चे आदेशानुसार वगळले.)
१०. श्री आर.बी.वाघमोडे, संचालक
रा. एस.बी.आय. शाखा जत, ता.जत जि.सांगली
११. श्री ए.एम.जावीर, संचालक
रा. एस.बी.आय. शाखा शिरोळ, ता.शिरोळ
जि.कोल्हापूर
१२. सौ एस.एम.फाटक, संचालक
रा.एस.बी.आय. शाखा शिरोळ, ता.शिरोळ
जि.कोल्हापूर
१३. सौ व्ही.एस.कदम, संचालिका
रा.एस.बी.आय. शाखा शिरोळ, ता.शिरोळ
जि.कोल्हापूर
१४. श्री एस.एस.कोळी, संचालक
रा.एस.बी.आय. शाखा तासगांव जि.सांगली
(मंचाचे दि.३१/१२/११ चे आदेशानुसार वगळले.) .....जाबदारúö
तक्रारदारò : स्वत:
जाबदार क्र.३ ते ८ व १० ते १३ तर्फे : +ìb÷. श्री यू.एच.निकम
जाबदार क्र.१ व २ तर्फे : एकतर्फा
जाबदार क्र.९ व १४ : वगळले
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने दामदुप्पट व मुदत ठेवी अन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार स्टेट बॅंक ऑफ एम्प्लॉईज श्री गणेश को.ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड, सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘सोसायटी’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम दामदुप्पट व मुदतठेवी अंतर्गत गुंतविली होती. तक्रारदार यांनी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी रक्कम अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.४ अन्वये एकूण ३१ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. जाबदार क्र.३ ते ७ व १० ते १३ यांनी नि.२४ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्येतक्रारदारांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदारांनी जाबदार सोसायटीमध्ये ठेव ठेवली त्यावेळी सदरचे जाबदार हे जाबदार क्र.१ संस्थेचे संचालक नव्हते. तक्रारदारांनी सदर जाबदारांकडे रकमेची मागणी केलेली नव्हती. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतीत नाही. तक्रारदार यांना जाबदार संस्थेकडून रक्कम रु.२,००,०००/- अनामत म्हणून मिळाली आहे. त्याचा हिशोब प्रस्तुत प्रकरणी विचारात घेणे आवश्यक आहे. सदरचे जाबदार यांनी जाबदार क्र.२ यांना वेळोवेळी विनंती करुनही जाबदार यांनी निनाईदेवी साखर कारखान्याकडून ठेवी परत मिळणेसाठी कायेदशीर मार्ग अवलंबला नाही. संस्थेच्या नाजूक आर्थिक परिस्थितीस जाबदार क्र.२ जबाबदार आहेत. सदरचे जाबदारांनी संस्थेच्या संचालकपदाचे राजीनामेही दिलेले आहेत. सबब तक्रारदारांना तक्रारअर्ज नामंजूर करणेत यावा असे जाबदारांनी कथन केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ नि.२५ ला शपथपत्र दाखल केले आहे. जाबदार क्र.८ यांनी नि.२६ ला पुरसिस दाखल करुन त्यामध्ये जाबदार क्र.३ ते ७ व १० ते १३ यांची कैफियत हीच जाबदार क्र.८ यांची कैफियत समजण्यात यावी असे नमूद केले आहे.
३. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र. १ व २ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
४. जाबदार क्र.क्र.९ व १४ यांना मे.मंचाचे अनुक्रमे दि.१२/१०/०९ व ३१/१२/११ चे आदेशानुसार प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले. तक्रारदारांनी नि.४१ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
५. तक्रारदारांनी त्यांची रक्कम जाबदार पतसंस्थेमध्ये गुंतविल्याबाबतच्या ठेवपावत्यांच्या प्रती नि.४२ चे यादीने दाखल केल्या आहेत. सदर ठेवपावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी जाबदार संस्थेमध्ये दामदुप्पट व मुदत ठेवीअन्वये रकमा गुंतविल्याचे दिसून येते व सदरचे ठेवपावत्यांची मुदत पूर्ण झाल्याचेही दिसून येते. सदर ठेवपावत्यांवर काहीही व्याज मिळाले नाही असे तक्रारदार यांनी त्यांचे नि.४० चे शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांचे ठेवपावत्यांचे पटकन अवलोकन व्हावे म्हणून खालीलप्रमाणे परिशिष्टमध्ये तपशील नमूद करण्यात येत आहे.
अ.क्र. | पावती क्र. | नाव | ठेव रक्कम | ठेव ठेवल्याचा दिनांक | व्याज दर | मुदत पूर्ण होण्याचा दिनांक | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
१ | २२० | अमृता श्रीकांत ठाणेदार, श्रीकांत माधव ठाणेदार | २८,५०० | २४/११/२००० | दाम-दुप्पट | २४/५/०६ | ५७,००० |
२ | २२२ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ३२,४९० | २६/११/२०११ | दाम-दुप्पट | २६/५/०६ | ६४,९८० |
३ | २२८ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | २८,५०० | २९/१२/२००० | दाम-दुप्पट | २९/६/०६ | ५७,००० |
४ | २४६ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ३३,५६२ | ३/१/२००१ | दाम-दुप्पट | ३/७/०६ | ६७,१२४ |
५ | २५३ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | २५,००० | २०/१/२००१ | दाम-दुप्पट | २०/७/०६ | ५०,००० |
६ | २५४ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | २५,००० | २०/१/२००१ | दाम-दुप्पट | २०/७/०६ | ५०,००० |
७ | २५५ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | २५,००० | २०/१/२००१ | दाम-दुप्पट | २०/७/०६ | ५०,००० |
८ | ३७६ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ५०,००० | ८/११/२००१ | दाम-दुप्पट | ८/११/०७ | १,००,००० |
९ | ३७८ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ५०,००० | ८/११/२००१ | दाम-दुप्पट | ८/११/०७ | १,००,००० |
१० | ३७९ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ५०,००० | ८/११/२००१ | दाम-दुप्पट | ८/११/०७ | १,००,००० |
११ | ३८० | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ५०,००० | ८/११/२००१ | दाम-दुप्पट | ८/११/०७ | १,००,००० |
१२ | ३८१ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ५०,००० | ८/११/२००१ | दाम-दुप्पट | ८/११/०७ | १,००,००० |
१३ | ३८२ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ५०,००० | ८/११/२००१ | दाम-दुप्पट | ८/११/०७ | १,००,००० |
१४ | ४३३ | श्रीकांत माधव ठाणेदार | २५,००० | ५/१२/२००१ | दाम-दुप्पट | ५/१२/०७ | ५०,००० |
१५ | ४३४ | श्रीकांत माधव ठाणेदार | २५,००० | ५/१२/२००१ | दाम-दुप्पट | ५/१२/०७ | ५०,००० |
१६ | ४३७ | रोहन श्रीकांत ठाणेदार | २५,००० | ५/१२/२००१ | दाम-दुप्पट | ५/१२/०७ | ५०,००० |
१७ | ४३८ | अमृता श्रीकांत ठाणेदार | २५,००० | ५/१२/२००१ | दाम-दुप्पट | ५/१२/०७ | ५०,००० |
१८ | ४३९ | अमृता श्रीकांत ठाणेदार | २५,००० | ५/१२/२००१ | दाम-दुप्पट | ५/१२/०७ | ५०,००० |
१९ | ४४० | अमृता श्रीकांत ठाणेदार | २५,००० | ५/१२/२००१ | दाम-दुप्पट | ५/१२/०७ | ५०,००० |
२० | ६२०५ | अमृता श्रीकांत ठाणेदार, श्री श्रीकांत माधव ठाणेदार | ३६,९९१ | ३/६/२००३ | ११ टक्के | ३/६/०६ | - |
२१ | ६२०६ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ४०,४७० | ३/६/२००३ | ११ टक्के | ३/६/०६ | - |
२२ | ६२०८ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ४५,३२६ | १५/६/२००३ | ११ टक्के | १५/६/०६ | - |
२३ | ६२०९ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ३५,५०० | २७/६/२००३ | ११ टक्के | २७/६/०६ | - |
२४ | ६२११ | अमृता श्रीकांत ठाणेदार, श्री श्रीकांत माधव ठाणेदार | ३५,५०० | २७/६/२००३ | ११ टक्के | २७/६/०६ | - |
२५ | ६२१२ | रोहन श्रीकांत ठाणेदार, श्री श्रीकांत माधव ठाणेदार | ३५,५०० | २७/६/२००३ | ११ टक्के | २७/६/०६ | - |
२६ | ६२६५ | श्रीकांत माधव ठाणेदार, सौ विणा श्रीकांत ठाणेदार | ३४,७५० | २१/८/२००३ | ११ टक्के | २१/८/०६ | - |
वरीलप्रमाणे रक्कम तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे गुंतविली आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत दिलेल्या सूचीमध्ये पावती क्र.२२६ चा उल्लेख केला आहे. तथापि दाखल केलेल्या पावत्यांमध्ये पावती क्र.२२६ ची प्रत आढळून येत नाही. तसेच सोबत दाखल केलेल्या पावत्यांमध्ये पावती क्र.२२७ दाखल आहे. परंतु सदर पावतीचा उल्लेख तक्रारअर्जासोबत असलेल्या सूचीमध्ये नमूद नाही त्यामुळे सदर दोन्ही पावत्यांबाबत कोणताही निर्णय देण्यात येत नाही. तक्रारदार यांनी पावती क्र.२१९ दाखल केली आहे परंतु सदर पावतीवर रोशन श्रीकांत ठाणेदार व श्रीकांत माधव ठाणेदार अशी नावे दाखल आहेत. सदर रोशन ठाणेदार हे याकामी सामील नाहीत त्यामुळे सदर पावतीबाबतही कोणताही निर्णय घेता येत नाही त्यामुळे सदरच्या पावत्यांचा उल्लेख वरील परिशिष्टामध्ये करण्यात आलेला नाही. तक्रारदार यांनी काही पावत्या मुदत ठेवी अंतर्गत गुंतविल्या आहेत तर काही पावत्या दामदुप्पट ठेवींअतर्गत गुंतविल्या आहेत. तक्रारदार यांचे पावतीची रक्कम परत न करुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. सबब, दामदुप्पट पावतीची मुदतीनंतर होणारी रक्कम मुदत पूर्ण झाल्या तारखेपासून द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे व मुदत ठेवपावत्यांची रक्कम ठेव ठेवल्या तारखेपासून ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये जाबदार यांनी आपल्याला रक्कम रु.२,००,०००/- अदा केले आहेत असे नमूद केले आहे त्यामुळे सदरची रक्कम देय रकमेतून वजा करण्याची जाबदार यांना मुभा राहील.
६. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार सोसायटीबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
तक्रारदार यांनी त्यांच्या युक्तिवादासोबत सन्मा.उच्च न्यायालयाचा मंदाताई पवार विरुध्द सरकार हा रिट पिटीशन क्र.११७/२०११ मधील दि.३/५/२०११ रोजीचा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयाचे अवलोकन केले असता सदर निवाडयामध्ये सन्मा.उच्च न्यायालयाने पुढीलप्रमाणे निष्कर्ष नोंदविला आहे.
When and how the corporate veil is to be lifted is a matter which would be required to be decided on the facts of each case. Needless to say that the doctrine of lifting the corporate veil would be equally applicable in respect of cooperative society where the members seek a direction or order against the members of the Managing Committee on the ground for or other well recognised grounds, the issue raised in the present petition in the absence of all material facts before us, cannot be decided in a petition under article 227 of the Constitution. We, therefore, do not intend to go into the merits of the contention No.3 raised in all the petitions.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या दोन्ही निवाडयातील निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते ८ व १० ते १३ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. रकमेची मागणी करुनही ती न देवून सोसायटीने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने सोसायटीच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
७. तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्कम मिळण्यासाठी या न्यायमंचात धाव घ्यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्यामुळे सदरची मागणी अंशत: मान्य करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार क्र.१ यांनी तक्रारदारांना वर विवेचनातील परिच्छेद ५ मधील परिशिष्टमध्ये
अनुक्रमांक १ ते १९ मध्ये नमूद असलेली दामदुप्पट ठेवपावतीची मुदतीनंतर होणारी रक्कम
तक्रारदारास अदा करावी तसेच सदर रकमेवर मुदत संपले तारखेचे दुसरे दिवशीपासून
द.सा.द.शे. १०% दराने व्याज अदा करावे असा आदेश करण्यात येतो.
२. यातील जाबदार क्र.१ सोसायटी यांनी तक्रारदारांना वर विवेचनातील परिच्छेद ५ मधील
परिशिष्टमध्ये नमूद अनुक्रमांक २० ते २६ मध्ये असलेली मुदत ठेवपावतीची रक्कम ठेव
ठेवल्या तारखेपासून पावतीमध्ये नमूद द.सा.द.शे.११ टक्के व्याजदराने अदा करावी असा
आदेश करण्यात येतो.
३. यातील जाबदार क्र.१ यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे
खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- अदा करावेत.
४. जाबदार यांनी तक्रारदार यांना अदा केलेली रक्कम रु.२,००,०००/- देय रकमेतून वजा
करण्याची जाबदार यांना मुभा राहील.
५. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार सोसायटीने दि.१९/२/२०११ पर्यंत न केल्यास
तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु
शकतील.
सांगली
दिनांकò: ०४/०१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११