::: न्यायनिर्णय :::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यास कसुर केल्याने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांनी सामनेवाले क्रमांक २ यांचेकडून गृहकर्ज घेतले होते. सदर गृह कर्जासोबत सामनेवाले क्र. १ यांचे सोबत रक्कम रु. ७७,३३२/- विमा रक्कम अदा करुन दिनांक ०२/०४/२०११ रोजी सामनेवाले क्र. २ यांनी सामनेवाले क्र. १ यांना अदा केली. सदर विमा कराराअन्वये सामनेवाले क्र. २ यांनी अदा केलेले गृह कर्ज सामनेवाले क्र. १ यांनी १००% विमाकृत केले होते. सदर विमा संरक्षण करार दिनांक ३०/०४/२०११ ते दिनांक २९/०४/२०२६ या कालावधीसाठी वैध असुन विमा कालावधीत पॉलीसी सदस्यांचा मृत्यु झाल्यास वारसदारांना रक्कम रु. १५,००,०००/- अदा करण्याची जबाबदारी सामनेवाले क्र. १ यांनी करारात नमुद केली आहे. दुर्देवांने दिनांक १८ जुन २०११ रोजी अलीमुद्दीन सैयद यांची तब्येत बिघडल्याने व रक्तातील क्रिएटीन चे प्रमाण वाढल्याने त्यांना मिडी सिटी हॉस्पीटल, हैद्राबाद येथे उपचाराकरीता नेण्यात आले. परंतु दिनांक ०२/०७/२०११ रोजी त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांचे पत्नीने गैरअर्जदार क्र. २ यांना तात्काळ क्लेम फार्म व इतर कागदपत्रे सादर केली. परंतु सामनेवाले क्र. १ यांनी दिनांक १४/०३/२०१२ रोजी विमा दावा मयतास दिनांक ०२/०४/२०११ रोजी अथवा त्यापुर्वी कोणताही किडनी अथवा इतर आजार नव्हता व त्याकरीता कोणतेही उपचार झाले नव्हते. अशी माहिती तक्रारदारांनी चुकीची दिल्यामुळे विमा दावा नाकारला, सदर पत्रास तक्रारदारांनी दिनांक १६/०४/२०१२ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवुन विमा रक्कमेची मागणी करुनही सामनेवाले क्र. १ यांनी विमा रक्कम अदा न केल्याने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
सामनेवाले क्र .१ यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन मयत अलीमुद्दीन सैयद यांनी त्यांना विमा करार करणेपुर्वी कोणता आजार होता का याबाबत मुद्दा क्र. ४ मध्ये नमुद केलेली माहिती डॉ. अनुराधा मॅडम यांनी दिनांक ०२/०१/२०१२ रोजी दिलेल्या पत्रावरुन असत्य असल्याची बाब सिध्द होते. मयतास दिनांक ३१/०१/२०११ रोजी क्रोनीक किडनी डिसॉडर हा आजार होता व त्या उपचाराकरीता मिडी सिटी हॉस्पीटल, हैद्राबाद येथे दाखल केले होते. हि बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. तक्रारीतील वाद कथने केवळ सामनेवाले क्र. १ यांचेकडुन विमा रक्कम प्राप्त करण्याच्या उद्देशाने दाखल केली असुन तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी अशी विनंती सामनेवाले क्र. १ यांनी केली आहे.
सामनेवाले क्र. २ यांना मंचाची नोटीस प्राप्त होवुन देखील मंचा समक्ष हजर न राहिल्याने एकतर्फा तक्रार पुढे चालण्याचा आदेश दिनांक २७/०९/२०१३ रोजी पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहे.
तक्रारदारांची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवादाबाबत पुरशिस, सामनेवाले क्र. १ यांच लेखी म्हणने, कागदपत्रे व शपथपत्राबाबतची पुरशिस, लेखी व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यावरुन तकार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारास
कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर
केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? नाही
२. सामनेवाले क्र. १ व २ तक्रारदारास
नुकसान भरपाई अदा करण्यास पात्र आहेत काय ? नाही
३. आदेश ? तक्रार अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ :
सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदारांचे पती मयत अलीमुद्दीन शमशुद्दीन सैयद यांचे सोबत केलेल्या विमा करारनाम्यात अट क्र. ४ मध्ये तक्रारदाराच्या मयत पतीने त्यांना किडनी संबंधी कोणताही आजार नाही. ही बाब असत्य नमुद केल्याचे सामनेवाले क्र. १ यांनी डॉ. अनुराधा यांनी दिनांक १४/०९/२०११ रोजी दिलेल्या वैद्यकीय तपासणी अहवालावरुन सिध्द होते. तक्रारदाराचे मयत पती यांना दिनांक २२/०६/२०११ ते ०२/०७/२०११ या कालावधीमध्ये ह्दय विकाराच्या आजारामुळे मिडी सिटी हॉस्पीटल, हैद्राबाद येथे दाखल केले होते तसेच मयत यांनी सामनेवाले क्र. १ यांचे सोबत केलेल्या करारनाम्यामुळे असत्य माहिती मुद्दा क्र. ४ मध्ये नमुद केल्याची बाबही कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. मयताचा मृत्यु ह्दय विकाराच्या आघाताने झाला असुन त्रकारदाराचे तक्रारीतील विनंती मयताने सामनेवाले क्र. १ यांना सत्य माहिती न दिल्याने विमा करार अवैध ठरत असल्याने मान्य करणे न्यायोचीत ठरणार नाही असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी मा. राष्ट्रीय आयोगाने बिर्ला सन लाईट इंसुरन्स कंपनी लि. विरुध्द किरण प्रफुल्ल बहादुरे I (2015) CPJ 473 (NC) या न्यायनिर्णयात तज्ञ डॉक्टरांचे शपथपथ दाखल न केल्याने तक्रार मान्य करावे असे न्यायतत्व विषद केले आहे. परंतु प्रस्तुत तक्रारीमध्ये डॉ. अनुराधा यांचे मयत यांनी उपचार घेतल्याबाबतचे कागदपत्रे मंचात दाखल आहे. सबब सदर न्यायतत्व प्रस्तुत तक्रारीस लागु होत नाही.
मा. राष्ट्रीय आयोगाने न्यु इंडिया शुरन्स कंपनी लि. विरुध्द डि.वाय.श्रीकांता IV (2015) CPJ 380 (NC) या न्यायनिर्णयात विमा कंपनीने पार्कीनसन हा आजार Pre-Existing आजार असल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नसल्यामुळे तक्रार मान्य करण्यात आली आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये सदरील न्यायतत्व लागु होत नाही. कारण डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. राष्ट्रीय आयोगाने बजाज अलांयस लाईफ इंशुरन्स कंपनी विरुध्द के.जयलक्ष्मी III (2015) CPJ 478 (NC) या न्यायनिर्णयात विषद केलेल्या न्यायतत्वानुसार सामनेवाले यांनी तज्ञाचे शपथपत्र दाखल न केल्याने तक्रार मान्य करण्यात आली आहे. परंतु प्रस्तुत तक्रारीमध्ये डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. राष्ट्रीय आयोगाने New India Assurance Co. LTD. विरुध्द राकेश कुमार III (2014) CPJ 340 (NC) या न्यायनिर्णयात सामनेवाले यांनी तक्रारदारास किती कालावधीपासुन मधुमेह व उच्च रक्तदाब आहे ही बाब सिध्द न केल्याने तक्रार मान्य करण्यात आली आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. राष्ट्रीय आयोगाने बजाज अलांयस लाईफ इंशुरन्स कंपनी विरुध्द सौभाग्यलक्ष्मी आणि इतर I (2013) CPJ 58 (NC) या न्यायनिर्णयात सामनेवाले यांनी विषद केलेल्या न्यायतत्वानुसार सामनेवाले यांनी तज्ञ अहवालामध्ये मयतास नक्की
कोणता आजार होता याबाबत माहिती नसल्याने तक्रार मान्य करण्यात आली होती. प्रस्तुत तक्रारीमध्ये डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. गुजरात राज्य आयोगाने कोटक महिंद्रा ओल्ड मॅचुअल लाईफ इंशुरन्स कंपनी लि. विरुध्द चंदर इसरसिंग धनसिंघानी व इतर II (2013) CPJ 103 या न्यायनिर्णयात सामनेवाले यांनी विषद केलेल्या न्यायतत्वानुसार सामनेवाले यांनी तज्ञ अहवालामध्ये मयतास नक्की कोणता आजार होता याबाबत माहिती नसल्याने तक्रार मान्य करण्यात आली होती. प्रस्तुत तक्रारीमध्ये डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. पंजाब राज्य आयोगाने New India Assurance Co. LTD. विरुध्द त्रिभुवन प्रकाश गुप्ता III (2003) CPJ 113 या न्यायनिर्णयात सामनेवाले यांनी विषद केलेल्या न्यायतत्वानुसार सामनेवाले यांनी तज्ञ अहवालासोबत तज्ञांचे शपथपत्र दाखल न केल्याने तक्रार मान्य करण्यात आली होती. परंतु प्रस्तुत तक्रारीमध्ये डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. राष्ट्रीय आयोगाने सुंदरम बि.एन.पी. परीबास होम फाईनान्स लि. विरुध्द कंजुमर गाईडन सोसायटी (2013) NCJ 22 (NC) या न्यायनिर्णयात अटी व शतीच्या अधिन राहुन विमा दावा मंजुर करता येतो असे न्यायतत्व विषद आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे
मा. राष्ट्रीय आयोगाने बिर्ला सन लाईफ इंनशुरन्स कंपनी लि. विरुध्द चारकापु चिनाराव I (2012) CPJ 557 (NC) या न्यायनिर्णयात विषद केलेल्या न्यायतत्वानुसार
कागदोपत्री पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सदर न्यायतत्व प्रस्तुत तक्रारीस लागु होत नाही. डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. राष्ट्रीय आयोगाने एसबीआय लाईफ इंनशुरन्स कंपनी लि. विरुध्द डि.लीलावती व इतर I (2012) CPJ 490 (NC) या न्यायनिर्णयात विषद केलेल्या न्यायतत्वानुसार विमा करारापुर्वी असणा-या आजाराबद्दलची माहिती अचुकपणे देणे करारदारावर बंधनकारक आहे. कागदोपत्री पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सदर न्यायतत्व प्रस्तुत तक्रारीस लागु होत नाही. डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. राष्ट्रीय आयोगाने लाईफ इंनशुरन्स कॉर्पोरेशन आफ इंडिया कंपनी लि. विरुध्द कुलवंत कुमारी (2010) NCJ 249 (NC) या न्यायनिर्णयात विषद केलेल्या न्यायतत्वानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांनी आजारपणाबद्दलची माहिती न दिल्याची बाब सिध्द करण्याची आवश्यक आहे. असे विमा करारापुर्वी असणा-या आजाराबद्दलची माहिती अचुकपणे देणे करारदारावर बंधनकारक आहे. कागदोपत्री पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सदर न्यायतत्व प्रस्तुत तक्रारीस लागु होत नाही. डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. पंजाब राज्य आयोगाने लाईफ इंनशुरन्स कॉर्पोरेशन आफ इंडिया कंपनी लि. विरुध्द चरनजित कौर 2001 (1) CPR 305 या न्यायनिर्णयात विषद केलेल्या न्यायतत्वानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांनी आजारपणाबद्दलची माहिती न दिल्याची बाब सिध्द करण्याची आवश्यक आहे. असे विमा करारापुर्वी असणा-या आजाराबद्दलची माहिती अचुकपणे देणे करारदारावर बंधनकारक आहे. कागदोपत्री पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सदर न्यायतत्व प्रस्तुत तक्रारीस लागु होत नाही. डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. उत्तर प्रदेश राज्य आयोगाने राजेंद्र कुमार शुल्का विरुध्द New India Assurance Co. LTD. 2001 (1) CPR 267 या न्यायनिर्णयात तक्रारदार हे १८ टक्के व्याजासह विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे असे न्यायतत्व विषद केले आहे. परंतु सदर न्यायतत्व प्रस्तुत तक्रारीस लागु होत नाही. डॉ. अनुराधा यांनी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
मा. राष्ट्रीय आयोगाने लाईफ इंनशुरन्स कॉर्पोरेशन आफ इंडिया कंपनी लि. विरुध्द राममुर्ती (2010) NCJ 163 (NC) या न्यायनिर्णयात विमा प्रतिनीधीच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या चुकीबद्दल विमा कंपनीस जवाबदार धरण्यास येते. असे न्यायतत्व विषद केले आहे.परंतु प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीमध्ये अशा प्रकारचा विवाद उत्पन्न केले नसल्याने सदर न्यायतत्व प्रस्तुत तक्रारीस लागु होत नाही.
सामनेवाले क्र. १ यांनी मा. चंदीगड केंद्रशासीत प्रदेश आयोगाने शंकुतला कुमारी सहानी विरुध्द एल आय सी आफ इंडिया व इतर अपील क्र. ६२३/२००३ दिनांक १३/०१/२००४ रोजी पारीत न्यायनिर्णयात विषद केलेल्या न्यायतत्वानुसार तक्रारदारांनी विमा करार करते वेळी अचुकपणे सत्य माहिती सामनेवाले यांना देणे आवश्यक आहे. हे न्यायतत्व विषद केले आहे.सदर न्यायतत्वानुसार प्रस्तुत तक्रारीमध्ये बाब क्र. ४ मध्ये तक्रारदारांनी असत्य माहिती सिध्द झाल्याने सदर न्यायनिर्णय प्रस्तुत तक्रारीत लागु होते.
मा. सर्वोच्च न्यायालयाने मिठ्ठुलाल नायक विरुध्द लाईफ इंनशुरन्स कॉर्पोरेशन आफ इंडिया कंपनी लि. १९६२ एआयआर ८१४ या न्यायनिर्णयात विषद केलेल्या न्यायतत्वानुसार तक्रारदारांनी चुकीची माहिती दिल्यास विमा करार संपुष्टात येतो. सदर न्यायतत्व प्रस्तुत तक्रारीस लागु होते.
तक्रारदारांनी दिनांक ३०/०६/२०१५ रोजी सामनेवाले क्र. २ यांनी तक्रारदारांकडुन गृह कर्जाची थकीत रक्कम मागणी व मिळकतीवर कोणतीही कायदेशिर कार्यवाही करु नये असा अंतरीम आदेश पारीत करुन तक्रार निकाली होई पर्यंत जैसेथे परिस्थीती ठेवावी असा अंतरीम अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर गैरअर्जदार यांनी म्हणने दाखल न केल्याने दिनांक १३/०१/२०१६ रोजी गैरअर्जदाराच्या उत्तराशिवाय सदर अर्जावरील सुनावणी पुढे चालविण्यात येते असे आदेश पारीत करण्यात आले. त्यानंतर दिनांक १७/०२/२०१६ रोजी सदर अर्जावरील आदेश अंतीम आदेशाच्या वेळी पारीत करण्यात येईल. असे आदेश दिनांक १७/०२/२०१६ रोजी पारीत करण्यात आले. सदर अर्जामधिल विनंतीचे स्वरुप पाहता मयत व सामनेवाले क्र. २ यांचेमध्ये झालेल्या करारनाम्या मधिल अटि व शर्ती प्रमाणे न्यायोचीत आदेश पारीत करणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी सदर करारनामा कागदोपत्री दाखल न केल्याने अटि व शर्तीचे अवलोकन शक्य नसल्याने तक्रारदारांचा सदरील अर्ज कागदोपत्री पुराव्या अभावी न्यायोचीत नसल्याने अमान्य करण्यात येत आहे.
वर नमुद निष्कर्षावरुन मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर नकारार्थी देण्यात येते व खालील अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
- ग्राहक तक्रार क्रमांक १४१/२०१२ अमान्य करण्यात येते.
- खर्चाबद्दल आदेश नाही.
- न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षांना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)