आदेश नि.1 वर
(दि.09-12-2023)
1) प्रस्तुत प्रकरण दि.09-02-2023 रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. आजरोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये उभय पक्षकारांमध्ये तडजोड झालेली आहे.
2) सामनेवाला तर्फे लोक अदालतीमध्ये तडजोड करण्याचे डॉ.रुपाली थोरात, जनरल मॅनेजर यांचे अधिकारपत्र दाखल करीत असलेची पुरशीस दाखल केली.
3) उभय पक्षकारांत झालेल्या तडजोडीनुसार तडजोडीचा मसुदा खालीलप्रमाणे आहे.
“(1) रक्कम रु.32,000/- फक्त एवढे तक्रारदार यास सामनेवालाकडून आदेश झालेतारखेपासून चार आठवडयात तक्रारदार यांना अदा करणेत येणार आहेत.
(2) तक्रारदार यांनी तक्रारीमधील अन्य सर्व विनंत्या सोडून दिलेल्या आहेत.”
असे तडजोड झालेल्या मसुदयातील अटी-शर्तीमध्ये नमूद आहे.
4) तक्रारदार व तर्फे विधिज्ञ श्री वाळवे हजर तसेच सामनेवाला व तर्फे विधिज्ञ भाटवडेकर हजर. दि.09-12-2023 रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये उभय पक्षकारांमध्ये तडजोड झालेली असून तडजोडीच्या अटी-शर्तींचे आयोगाने अवलोकन केले. नि. 20 कडील दाखल संयुक्त तडजोड मसुदा हा आयोगाने पडताळून पाहून मान्य केला. नि.20 कडील संयुक्त तडजोड मसुदयाच्या अनुषंगाने प्रस्तुत तक्रार अर्ज काढून टाकणे न्यायोचित होईल. सबब, आदेश खालीलप्रमाणे.
-आ दे श-
1) प्रस्तुतचे प्रकरण दि.09-02-2023 रोजीचे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली करणेत येते.
2) तक्रारदार व सामनेवाला यांची दि.09-12-2023 रोजीची नि.20 कडील संयुक्त तडजोड मसुदा
हा या आदेशाचा एक भाग समजणेत यावा.
3) प्रकरण नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते.
4) उभय पक्षकारांना सदरच्या आदेशाची प्रती विनामुल्य दयाव्यात.