सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.43/2009
शिवराम महादेव तेली
वय 58 वर्षे, व्यवसाय – धंदा,
रा.मु.पो.कासार्डे, ता.कणकवली,
जिल्हा – सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
स्टार असोसिएट्स इंडस्ट्रीजतर्फे
प्रोप्रा. दिलिप असोपा
सी 44, राणी चन्नम्मा नगर, इंडस्ट्रीज एरिया,
बेळगाव – 590 008
कर्नाटका. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री विलास परब
विरुद्ध पक्षातर्फे- विधिज्ञ श्री जी.टी. पडते
- आदेश निशाणी 1 वर –
(दिनांक 29/06/2010)
1) मुळ तक्रार क्रमांक 31/2009 मध्ये मंचाच्या लोकन्यायालय कामकाज समितीसमोर झालेल्या दि.31/07/2009 च्या तडजोड मेमोवरील तडजोडीच्या ठरावानुसार, विरुध्द पक्षाने अंमलबजावणी न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) सदर दरखास्तीचे नोटीस विरुध्द पक्षास बजावण्यात आले; परंतु विरुध्द पक्ष हे मंचासमोर हजर न झाल्यामुळे त्यांचेविरुध्द जमानती वॉरंटची कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार विरुध्द पक्ष हे मंचासमोर हजर झाले व वैयक्तिक जातमुचलका दिल्यामुळे मंचाने त्यांची पर्सनल बॉंडवर मुक्तता केली. दरम्यान पुनःश्च विरुध्द पक्ष गैरहजर राहिल्यामुळे त्यांचेविरुध्द पकड वॉरंटची कार्यवाही करण्यात आली व आज प्रकरण वॉरंटची बजावणी होऊन येणेसाठी ठेवले.
3) दरम्यान आज तक्रारदार व विरुध्द पक्षाचे वकील मंचासमोर हजर झाले व तक्रारदाराने नि.15 वरील पुरसीसनुसार लोकन्यायालय कमिटीने पारीत केलेल्या तडजोडीची पुर्तता झाली असल्यामुळे, दरखास्त अर्ज निकाली काढण्याची विनंती केली. त्यानुसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराने दाखल केलेल्या नि.15 वरील पुरसीसनुसार आदेशाची पुर्तता झाल्यामुळे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) विरुध्द पक्षाचे बेलबॉंड रद्द करण्यात येतात.
3) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 29/06/2010
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-