- आ दे श -
मंचाचे निर्णयान्वये, रोझा फु.खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(पारीत दिनांक : 13.09.2017)
1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्ताचे तक्रारीतील थोडक्यात कथन असे आहे की, तक्रारकर्त्याचा मुद्रांकाचा व्यवसाय असुन तो सन 1982 पासुन दि.31 मार्च-2017 पर्यत नियमीत मुद्रांक विक्रीचा व्यवसाय करीत होता. तक्रारकर्त्याने न्यायीक व न्यायोकत्तर जनरल स्टँम्प व कोर्ट फिस मुद्रांक ख्यारेदी करुन ते तहसिल कार्यालय, चामोर्शीचे आवारात विकुन त्यापासुन होणा-या उत्पन्नातून आपला व आपल्या कुटूंबीयांचा उएदरनिर्वाह करीत असे. तसेच तक्रारकर्त्याला वरील व्यवसाया संदर्भात सन 1982 मध्ये मुद्रांक परवाना क्र.5/82/1157-1171 दि.27.07.1982 रोजी कायम स्वरुपी देण्यांत आलेला आहे.
2. सदरचा परवाना हा मा. जिल्हाधिकारी साहेब, चंद्रपूर ह्यांनी दिल्यामुळे त्यास नुतनीकरणाची गरज नाही व तक्रारकर्ता हा नियमीत मुद्रांक विक्रीचा व्यवसाय करीत आहे, त्यामुळे यापुढे कोणतेच अडथळे येऊ नये असे नमुद केले आहे.
3. तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 विरुध्द खालिल प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
1) विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना तक्रारकर्त्यास नुतणीकरण न करता मुद्रांक देण्याचे निर्देश देण्यांत यावे.
2) मंचास योग्य वाटल्यास विरुध्द पक्षांना तक्रारकर्त्यास मासिक निवृत्ती वेतन देण्याचे आदेश व्हावे.
3) तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.50,00/- व तक्रारीच्या खर्च रु.3,000/- देण्याचे आदेश व्हावे.
4. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत निशाणी क्र.2 नुसार 4 दस्तावेज दाखल केले. तक्रारकर्त्याची तक्रार नोंदणी करुन विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस काढण्यांत आली. विरुध्द पक्ष क्र. 1 ने निशाणी क्र.7 नुसार उत्तर व निशाणी क्र.8 नुसार 12 दस्तावेज दाख्शल केले. विरुध्द पक्ष क्र.2 ने निशाणी क्र.9 नुसार उत्तर व क्र.10 नुसार 2 स्तावेज दाखल केले. विरुध्द पक्ष क्र. 3 ने निशाणी क्र.11 व निशाणी क्र.12 वर 1 दस्तावेज दाखल केले.
5. विरुध्द पक्ष क्र. 1 ने सदर तक्रारीला आपल्या उत्तरात असे म्हटले आहे की, मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, म.रा. पूणे-1 यांनी परिपत्रक क्र.दले/मवि/परवाने/नुतनीकरण/र्कापध्दती/268/2001 दि. 01.02.2001 चे (2) परवान्याचे नुतनीकरण मधील परि.क्र.2 नुसार संबंधीत मुद्रांक विक्रेत्याने परवाना नुतनीकरणाची कार्यपध्दती अवलंबवावी असे नमुद केले आहे. तसेय या कार्यालयाचे पत्र दि.10.04.2001 नुसार श्री. आर.बी. तुरे, मुद्रांक विक्रेता, चामोर्शी यांना दरवर्षी परवाना नुतनीकरण करण्याची गरज नाही असे कळविलेले आहे, हे कथन बरोबर असुन या कार्यालयाचे पत्र जा.क्र.मु.वि.पर.नुत./2011-12/781-84/11 दि.25.04.2011 नुसार श्री. तुरे यांना दर आर्थिक वर्षात मुद्रांक विक्रीचा परवाना नुतनीकरण करण्याकरीता कळविलेले आहे व त्याची एक प्रत उपकोषागार कार्यालय, चामोर्शी यांना दिलेली आहे. तसेच सन 2011-12 या आर्थीक वर्षापासुन श्री.आर.बी. तुरे, यांनी आजतागायत नियमीतपणे मुद्रांक विक्रीचा परवाना नुतनीकरण करुन राहीलेले आहे. म्हणून मुद्दा क्र.2 मधील तक्रारकर्त्याचे
म्हणणे खोटे आहे. तसेच विरुध्द पक्षांनी हे ही म्हटले आहे की, पोलिसांकडून गुन्हा नसल्याबाबतचे प्रमाणपत्राशिवाय मुद्रांक नुतनीकरण करावयाचे नसते. तसेच दि.01.02.2001 चे परिपत्रकानुसार साठा नोंदवही व विक्री नोंदवही अद्यावत करणे व संबंधीत दुय्यम निबंधकाव्दारे दर महिन्याला तशी तपासणी करुन तसे प्रमाणपत्र देणे या कार्यपध्दतीनुसार मुद्रांक विक्री परवान्याचे नुतनीकरण करण्यांत येते.
6. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्द पक्षांचा जबाब, उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? होय.
2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास न्युनतापूर्ण सेवा दिली
आहे काय ? होय.
3) अंतिम आदेश काय ? आदेशाप्रमाणे.
- // कारणमिमांसा // -
7. मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्त्या हा विरुध्द पक्षांकडून नियमीत मुद्रांक खरेदी करुन विकत होता हे दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यांत येते.
8. मुद्दा क्र.2 बाबतः- तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या निशाणी क्र.2 नुसार दस्त क्र.2 मुद्रांक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी दिलेल्या पत्रावरुन असे दिसुन येते की, तक्रारकर्त्यास मुद्रांक विक्रीचा परवाना सन 1982 साली देण्यांत आला होता. त्या पत्राचे अनुषंगाने सदर परवान्याचे दरवर्षी नुतनीकरण करण्याची गरज नाही असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे व तक्रारकर्त्याचे निशाणी क्र.3 , दस्त क्र.1 वर मुद्रांक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी नुतनीकरण केल्याचे प्रमाणपत्रामध्ये स्पष्ट दिसुन येते की, सदर तक्रारीत उल्लेखीत मुद्रांक परवाना हा सन 2017 पर्यंत म्हणजेच दि.01.04.2016 ते 31.03.2017 पर्यंत नुतनीकरण वाढवुन देण्यांत आल्याचे दिसुन येते. यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत जे कथन केले आहे की, त्यास सदर परवान्याचे नुतनीकरण नियमीतपणे व नियमानुसार वारंवार नुतनी करण करण्याची गरज नाही. परंतु विरुध्द पक्षांनी आपल्या लेखी उत्तरात असे म्हटले आहे की, या कार्यालयाचे पत्र जा.क्र./मु.वि.पर.नुत./2011-12/781-84/11, दि.25.04.2011 नुसार तक्रारकर्त्यास दर आर्थीक वर्षात विक्रीचा परवान्याचे नुतनीकरण करण्याकरीता कळविण्यात आलेले आहे व त्याची एक प्रत उपकोषागार कार्यालय, चामोर्शी यांना दिलेली आहे. आणि तक्रारकर्ता या पत्रानुसार नियमीतपणे मुद्रांक विक्रीचा परवान्याचे नुतनीकरण करीत आहे. विरुध्द पक्षांनी दाखल केलेल्या निशाणी क्र.4 वरील दस्त क्र.5 च्या पत्रावरुन, तक्रारकर्त्याचा मुद्रांक विक्रीचा परवाना नुतनीकरण करण्यांत येऊ नये व नुतनीकरण झाल्याशिवाय मुद्रांकाचा पुरवठा करु नये असे स्पष्ट दिसुन येते. तरी तक्रारकर्त्याचा नुतनीकरणाचा परवाना 2017 पर्यंत कसा काय नुतनीकरण करण्यांत आलेला आहे, हे विरुध्द पक्षांनी कुठेही दस्तावेज किंवा पुराव्याव्दारे स्पष्ट केलेले नाही.विरुध्द पक्षांनी आपल्या उत्तरासोबत जे दस्तावेज दाखल केलेले आहेत ते सर्व दस्तावेज 2011-12 आणि 2012-13 चे असल्यामुळे हे स्पष्ट होत नाही की, विरुध्दपक्षांनी तक्रारकत्याचा परवाना 2017 पर्यंत कसा काय आणि कोणत्या आधारावर नुतनीकरण केलेला आहे.
9. वरील विवेचनावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याचा मुद्रांक विक्रीचा परवाना
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या निशाणी क्र.2 च्या दस्त क्र.2 नुसार मा. मुद्रांक
जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या पत्रान्वये तक्रारकर्त्यास कमी स्वरुपात मुद्रांक देण्यांत
आलेले आहे. त्यामुळे त्या परवान्यास दरवर्षी नुतनीकरण करण्याची कधीही गरज नाही.
म्हणून तक्रारकर्त्याचा परवाना 2017 पर्यंत नुतनीकरण करुन देण्यांत आलेला असावा असे
या मंचाचे मत आहे.
10. मुद्दा क्र.3 बाबतः- मुद्दा क्र. 1 व 2 चे विवेचनावरुन खालिलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास सन 2017-18 करीता मुद्रांक द्यावे.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- अदा करावा.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तरित्या आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
5. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.