Maharashtra

Ahmednagar

CC/16/129

Manisha Babasaheb Nagade - Complainant(s)

Versus

ST. Ann's Hospital,Ghodegaon C/o-Dr.Bhoge Sir - Opp.Party(s)

Deshmukh/Patare

27 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/129
( Date of Filing : 16 Apr 2016 )
 
1. Manisha Babasaheb Nagade
Lohagaon,Tal Newasa,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. ST. Ann's Hospital,Ghodegaon C/o-Dr.Bhoge Sir
Ghodegaon,Tal Newasa,
Ahmednagar
Maharashtra
2. Tanmay Sonography Centre,Dr.Pravin Kshirsagar,
Dhonde Patil Complex,Gokul Colony,College Road,Rahuri,Tal Rahuri,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Deshmukh/Patare, Advocate
For the Opp. Party: M.b.Mungase, Advocate
Dated : 27 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्त्‍यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ती नं.1 व तक्रारकर्ता नं.2 हे पती पत्‍नी आहेत. तक्रारकर्ती नं.1 यांना गर्भधारणा झाल्‍यानंतर सुरुवातीस दोन महिने शनि‍शिंगणापूर ग्रामीण रुग्‍णालय येथे तपासणी केली व त्‍यानंतर सामनेवाला नं.1 यांचेकडे गर्भधारणानंतरचे उपचार व तपासणी सुरु केली. सामनेवाला नं.1 यांचे सूचनेप्रमाणे नित्‍य तपासण्‍या केल्‍या. नित्‍य तपासण्‍याचा एक भाग म्‍हणजे तक्रारकर्ती नं.1 हिचे गर्भधारणेनंतरचे 22 आठवडयानंतरचे सोनोग्राफी सामनेवाले नं.1 यांचे सांगणेवरुन सामनेवाला नं.2 यांचेकडे दिनांक 27.11.2015 रोजी सोनोग्राफी केली व त्‍याची रितसर फी रुपये 750/- सामनेवाले नं.2 यांना दिलेली आहे. सामनेवाले नं.2 यांचेकडे तक्रारकर्ती नं.1 ही दिनांक 27.11.2015 रोजी गर्भधारणेनंतरची सोनोग्राफी रिपोर्ट सामनेवाले नं.1 यांनी पाहून तक्रारकर्तीस सांगितले की, अपत्‍य व्‍यवस्थित आहे व त्‍यास व्‍यंग नाही, त्‍याचे अवयवाची वाढ झालेली आहे. त्‍यानंतर पुन्‍हः तक्रारकर्ती नं.1 हिचे प्रसुतीविषयी मार्गदर्शन करणारे डॉ.खरे हॉस्पिटल, राहुरी यांनी 9 व्‍या महिन्‍यामध्‍ये सामनेवाला नं.2 यांचेकडे सोनोग्राफी करण्‍यास सांगितले. दिनांक 22.03.2016 रोजी तक्रारकर्ती नं.1 हिची सामनेवाला नं.2 यांनी केलेली सोनोग्राफीचा रिपोर्ट तक्रारकर्तीस दिला असून सदरहू रिपोर्टवरुन आपत्‍य यास कुठलेही व्‍यंगाबाबत काहीही नमुद नव्‍हते व नाही. तक्रारकर्ती नं.1 हिची दिनांक 31.03.2016 रोजी डॉ.खरे हॉस्पिटल राहुरी येथे प्रसुती झाली, प्रसूतीनंतर त्‍यांना मुलगी झाली. सदरहू मुलीस डाव्‍या हाताला एकही बोट नसल्‍याचे पाहून तक्रारकर्तीस धक्‍का बसला. वास्‍तविक गर्भधारणामध्‍ये सोनोग्राफी करण्‍याचे कारण असे असते की, होणा-या आपत्‍यास कुठलेही व्‍यंग आहे किंवा नाही याची पाहाणी करणे, सर्वसाधारण गर्भधारणेचे 4 थ्‍या महिन्‍यानंतर गर्भाची वाढ तसेच गर्भाचे वय पाहणे, गर्भ पिशविचे तोंड पाहणे, व्‍यंग पाहणे, बाळा भोवती पाणी पाहणे, नाळ पाहणे, बाळाची स्थिती पाहणे इत्‍यादी बाबी करीता सोनोग्राफी केली जाते. तक्रारकर्ती नं.1 हिची सोनोग्राफी सामनेवाले नं.2 डॉ.प्रविण क्षिरसागर यांचेकडे दिनांक 27.11.2015 व 22.03.2016 अशा प्रकारे दोन वेळेस केलेली असून सोनोग्राफीमध्‍ये आपत्‍य व्‍यंग असल्‍याबाबत काहीही नमुद नाही. यावरुन सामनेवाला नं.2 यांनी तक्रारकर्ती नं.1 हिची सोनोग्रामी व्‍यवस्थित केलेली नाही असे स्‍पष्‍ट होते. अशा प्रकारे सामनेवाला नं.2 यांनी तक्रारकर्त्‍यांस सदोष सेवा दिलेली आहे. व त्‍याकरता तक्रारकर्त्‍यांना मानसिक, शारीरीक त्रासास सामोरे जावे लागले असून तक्रारकर्त्‍यांना सदरहू तक्रार नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेसाठी मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

3. तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, सामनेवाले नं.2 यांनी तक्रारकर्त्‍यांस नुकसान भरपाईची रक्‍कम व्‍याजासह देण्‍याचा हूकूम व्‍हावा अशी मागणी केली आहे.

4.    तक्रारकर्त्‍यांची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला नं.1 व 2 यांना नोटीस काढण्‍यात आली. सदरहू नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाला नं.1 व 2 हे प्रकरणात हजर झाले. व निशाणी क्र.10 वर लेखी उत्‍तर दाखल केले. सामनेवाला नं.1 व 2 यांनी लेखी उत्‍तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्त्‍यांनी तक्रारीत सामनेवाला नं.1 व 2 यांचेविरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवाला नं.1 व 2 यांना नाकबूल आहेत. सामनेवाला नं.1 व 2 यांनी कैफियतीत पुढे असे कथन केलेले आहे की, जन्‍मजात व्‍यंगाच्‍या असामान्‍यपणाचे प्रमाण हे 1600 पैकी एकाला जन्‍माला येतो. त्‍या संदर्भात गर्भधारणामध्‍ये निदान करणे कठीण असते. सोनोग्राफी पाहणीचेवेळी जन्‍मापुर्वी अल्‍ट्रासोनोग्राफी (युएस) दरम्‍यान दुर्लक्ष केले जाते. सुक्ष्‍म बोटांच्या हाताची विसंगतीचे निदान करणे कठीण असते. पाहणीचे वेळी सुक्ष्‍म विकृतींपासून इतर विकार गर्भधारणेवेळी बाळांना होऊ शकते. सिंब्राच्यडॅक्टीली हा हाताचा अविकसीत भाग आहे, अशा स्थितीत जन्मलेल्या बाळांची लहान किंवा गहाळ बोटं असतात. बोटांना किंवा लहान हात किंवा तळवे देखील असू शकतात. मध्‍यम प्रमाणात सिंब्राच्यडॅक्टीली बाळामध्‍ये ब-याचदा किंवा सर्व बोटे हाडे नसतात. त्‍याऐवजी त्‍याची त्‍वचा आणि मऊ कृतीचे छोटे अंदाज असते. परंतू ही क्रमवारी असू शकते. गर्भधारणेसंबंधी तांत्रिक अडचणी, एंजोमोटीव फलीड वॉल्‍युम गर्भाच्‍या हालचाली, हृदयाची टोक टिकेमुळे 1 जन्‍मजात  विसंगती सोनोग्राफीमध्‍ये शोधले जाऊ शकत नाही. प्रत्‍येक सोनोग्राफी घेतल्‍यानंतर त्‍या संदर्भात सामनेवालाकडून सामनेवाला नं.2 यांनी सामनेवाला क्र.1 ला समजावून सांगितले होते. तसेच टर्मिनेशन ऑफ प्रेगनन्‍सीमध्‍ये (अॅबॉर्शन) साधारणतः गर्भधारणा झाल्‍यानंतर तपासणी 20 आठवडयात केली आहे. परंतू तक्रारकर्त्‍यांनी जेव्‍हा सामनेवाला क्र.2 यांचेकडे तपासणी करता आल्‍या असून तेव्‍हा तक्रारकर्ती नं.1 यांस 22 हप्‍त्‍याची गर्भधारणा झालेली होती. दुस-या सोनोग्राफी 27 हप्‍त्‍याची गर्भधारणा झालेली आहे. म्‍हणून गर्भधारणा समजल्‍याचा प्रश्‍न उदभवत येतो. तक्रारकर्ती क्र.1 यांनी दिनांक 14.10.2015 रोजी श्री.शनेश्‍वर ग्रामीण रुग्‍णालय मध्‍ये सोनोग्राफी काढली होती. त्‍यावेळी तक्रारकर्ती नं.1 हिस 16-17 हप्‍त्‍याची गर्भधारणा झालेली आहे. सोनोग्राफी अहवालात असे सुस्‍पष्‍ट नमुद आहे की, बाळाचे संपुर्ण अंगाची तपासणी अल्‍ट्रासोनोग्राफीमध्‍ये होणे आवश्‍यक नाही. म्‍हणून  सामनेवाला क्र.1 व 2 यांनी कोणतीही तक्रारकर्ताप्रति वैद्यकिय निष्‍काळजीपणा दर्शवित नाही. म्‍हणून सदर तक्रार खोटया स्‍वरुपाची असल्‍याने ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

5. तक्रारकर्त्‍यांनी दाखल तक्रार, दस्‍तावेज, सामनेवालाचा दाखल जबाब,  शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद व तोंडी येक्‍तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ते हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे “ग्राहक” आहेत काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय?

 

... होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्ती नं.1 हिची गर्भधारणा झाल्‍यानंतर सामनेवाला क्र.1 कडे तपासणीसाठी गेले व सामनेवाला क्र.1 चे सांगण्‍यावरुन सामनेवाला क्र.2 कडे दिनांक 27.11.2015 व 22.03.2016 रोजी गर्भधारणा नंतरची सोनोग्राफी केली व त्‍याकरता सामनेवालाकडे शुल्‍कही भरलेले आहे ही बाब उभय पक्षकारांना मान्‍य असून तक्रारकर्ते हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे “ग्राहक” आहेत असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2 – सामनेवाला क्र.1 चे सांगण्यावरुन तक्रारकर्ती नं.1 ही गर्भधारणा झाल्‍यानंतर सामेनवाला क्र.2 डॉ.प्रविण क्ष्रिरसागर यांचेकडे दिनांक 27.11.2015, 22.03.2016 रोजी सोनोग्राफी काढली ही बाब उभय पक्षाना मान्‍य आहे. तक्रारकर्तीने निशाणी 14 वर सोनोग्राफी दिनांक 27.11.2015 व 22.03.2016 यांचा अहवाल सादर केलेला. सदर अहवालात असे नमुद करण्‍यात आले आहे की, गर्भधारणाची लांबी पुरेशी आहे व त्‍यात असलेली बाळाची वाढ तसेच त्‍यात आपत्‍य व्‍यवस्थित आहे. सामनेवाला यांनी त्‍यांचे बचाव पक्षात असे नमुद केलेले आहे की, वादातील सोनोग्राफी रिपोर्टमध्‍ये असे नमुद करण्‍यात आले आहे की, सोनोग्राफीच्‍या एका स्‍कॅनमध्‍ये आपत्‍याची विसंगती दिसणे शक्‍य नाही. सामनेवाला क्र.1 हे हॉस्‍पीटल असून त्‍यात सामनेवाला क्र.2 हे सोनोग्राफी घेणारी विशेषज्ञ असून सोनोग्राफी घेताना सामनेवाला क्र.2 यांनी अशी काळजी घ्यायला पाहिजे होती की, गर्भधारणापणात सामनेवालाने आपत्‍याची वाढ पुर्णपणे झालेली आहे किंवा नाही. जरी तक्रारकर्ती नं.1 हिने मुलांची झालेली विसंगती 1600 पैकी एकाला होते. तरीसुध्‍दा सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारकर्ती नं.1 हिची सोनोग्राफी करतेवेळी काळजी घ्‍यावयास पाहिजे होती. परंतू त्‍यांनी त्‍याची शैक्षणिक पात्रता होऊनसुध्‍दा ती काळजी घेतलेली नाही. व त्‍यामुळे तक्रारकर्ती नं.1 हिचे मुलीचे व्‍यंगात विसंगती झालेली नव्‍हती ही बाब योग्‍य वेळी निदान झालेले नाही. तक्रारकर्ती नं.1 हिने जरी सदर सोनोग्राफी गर्भधारणेच्‍या 22 व्‍या हप्‍त्‍यात काढली असून तरी पुढे सामनेवाला क्र.2 चे कर्तव्‍य होते की, त्‍या सोनोग्राफीचे अहवाल योग्‍य व खरा द्यायला पाहिजे होता. मंचासमक्ष तक्रारीत तक्रारकर्तीने गर्भधारणेबाबत कोणताही मुद्दा सादर केलेला नाही. म्‍हणून सामनेवालाने असे कथन करणे व सोनोग्राफी अहवालात एका स्‍कॅनवर आपत्‍याची विसंगती दिसून येते किंवा गर्भपात 22 व्‍या हप्‍त्‍यात करणे शक्‍य नव्‍हते ही बाब ग्राहय धरता येत नाही. मा.राष्‍ट्रीय आयोगाने ग्राहक तक्रार क्र.221/2010 Anil Dutt & Anr v/s. Vishesh Hospital & Ors यात दिलेल्‍या न्‍याय निवाडयात असे नमुद केलेले आहे की.

“ Don’t Shift Responsibility and Blame ” it is the situation frequently come across that, how some people not only refuse to accept responsibility when they’ve made a mistake, but the even shift the blame onto someone else…!! Hippocratic Oath hastens the moral conduct of physicians, assuming the respect for all human life, even the  unborn.

26. We have gone through the text book “Ultrasonography in Obstetrics and Gynecology, by Peter Callen and got the following information;

*    The patient and the referring obstetrician should be made aware that during the standard ultrasound examination, although many abnormalities my be detected fortuitously, more subtle lesions are likely to be detected only when the foetus is known to be risk for a specific malformation. Anatomic malformations are likely to grow during pregnancy just as the foetus does; a defect seen at birth may have been too small to be detected earlier in pregnancy. Finally, it is important for sinologists to know the limits of their expertise. If a malformation is suspected, and the examiner has had little experience with the abnormality in question, the case should be referred to a more experienced examiner. Only in this way all patients be served best.

  • Fetal position is extremely important. The posterior elements of the fetal spine may be clearly imaged with the foetus in a prone or decubitus position but are difficult to image when the foetus is supine. Similarly, the extremities are imaged to excellent advantage when floating freely in the amniotic fluid. The same extremity fucked under the foetus will be quite difficult to image.
  • Despite these potentioal problems, foetal skeletal structures remain the earliest and most readily 

27.  According to Ops, in any case, even if, by some stroke of luck, the anomalies in the foetus has been detected during the routine ultrasound, it would not have made any difference whatsoever to the outcome, as neither the pregnancy could have been lawfully terminated as MTP Act by then nor could any treatment have been given. In the present case, both the scans were done after 20 weeks age and hence the option of elective MTP was not available to the mother. But, We are unable to clap any significance with such frivolous submissions. It should be borne in mind that, termination or continutation of pregnancy is the choice of pregnant women i.e mother. The Ops are trying to find lame excuses on this point. In fact, OP 2 and 3 failed to detect absence of one limb and kidney in the foetus; it was the act of carelessness, and breach in the duty of care. It is a negligence and deficiency on the part of OP2 and 3. It is true, MTP is not permissible in India after 20 weeks of pregnancy, but the wrong diagnosis about well-being of foetus, shattered the dream of parents.” 

35. According to Jacob Mathews case (Supra) This could be termed as breach of duty due to negligent act. Keeping in view and the circumstances, it amounts to medical negligence, hence due to carelessness and deficiency in service. Both OP2 and 3 failed to discharge their duty with care and caution. Without careful examination, they have reported “Foetal Spine, Trunk & Limbs are Normal.”

It’s an unethical and casual approach on both the occasions. It was a short cut and unscientific approach. It gave false hope to the mother and family members that, “ all is well ” , everthing was right with her child. The parents hopes and dreams are so shattered, when they found the anomalous baby delivered which will have serious impact on the mother and the chiled all slong, till they are alive.

36. Hippocratic Oath hastens the moral conduct of physicians, assuming the respect for all human life, even the unborn. Medical profession is one of the oldest professions of the world and is the most humanitarian one. Inherent in the concept of any profession is a code of conduct, containing the basic ethics that underline the moral values that govern professional practice and is aimed at upholding its dignity.

The Ops stated that, General Obstetric scan can be done within 5-10 minutes and costs obout Rs.600/- whereas Focussed or target scan needs a special higher end sonography machine and also special expertise on the part of the examiner, takes 1-2 hours or may need two or more sittings and also costs much higher, about Rs.2000/-, The OP-1 produced hospital brochure and information about hi tech facilities available there. Despite such facilities the Ops were careless. It clearly establishes the commercial motive of the OPS rather than ethical practice. It is well settled that, during Genreal Obstetric Scan, the doctor will look for and take foetal measurements(para 30 supra). Therefore, how can one miss the limbs?.

38.  In fact, Loss of dependency by its very nature is awarded for prospective or future loss. In this context, Lord Atkinson aptly observed in Taff Vale Rly. Co.V. Jenkins MANU/AG/0452/1912 as follows:

In case of the death of an infant, there may have been no actual pecuniary benefit derived by its parents during the chiled’s lifetime. But this will not necessarily bar the parents’ claim and prospective loss will found a valid claim provided that the parents establish that they had a reasonable expectation of pecuniary benefit if the child had lived.

In Spring Meadows Hospital & Anr. V. Harjol Ahluwalia through K.S.Ahluwalia & Anr case

“ Very often in a claim for compensation arising out of medical negligence a plea is taken that it is a case of bona fide mistake which under certain circumstances may be excusable, but a mistake which would tantamount to negligence cannot be pardoned. In the former case a court can accept that ordinary human fallibility precludes the liability while in the latter the conduct of the defendant is considered to have gone beyond the bounds of what is expected of the skill of a reasonably competent doctor.”

8.   सदर प्रकरणात सुध्‍दा सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांचे कर्तव्‍याचे पालन न करता तक्रारकर्ती नं.1 चे आपत्‍याचे व्‍यंग पुर्णपणे विक्षीप्‍त होते किंवा नाही या संदर्भात तपासणी सोनोग्राफीव्‍दारे करण्‍याचा प्रयत्‍न केलेला नाही. व अनुचित व्‍यवहार प्रथेची अवलंबना तक्रारकर्तीप्रति झालेली आहे व अपत्‍य व्‍यवस्थित होते असा अहवाल देऊन निष्‍काळजीपणा सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांचे कर्तव्‍याचे पालन केलेले नाही असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

9.   मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन तसेच मा.राष्‍ट्रीय आयोगाने ग्राहक तक्रार क्र.221/2010 Anil Dutt & Anr v/s. Vishesh Hospital & Ors यात दिलेल्‍या न्‍याय निवाडयाचा हवाला घेऊन तसेच त्‍यातील परिच्‍छेद क्र.38 अन्‍वये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला क्र.1 व 2 यांनी व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीकरित्‍या रक्‍कम रु.9,00,000/- (रक्‍कम रुपये नऊ लाख फक्‍त) तक्रारकर्त्‍यांना द्यावे.

3.   सामनेवाला क्र.1 व 2 यांनी व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्त्‍यांना झालेल्‍या शारीरीक, मानसिक त्रासापोटी प्रत्‍येकी 2,00,000/- (रक्‍कम रुपये दोन लाख फक्‍त) द्यावे.

4.   सामनेवाला क्र.1 व 2 यांनी व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्त्‍यांना तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.10,000/- (रक्‍कम रु.दहा हजार फक्‍त) द्यावे.

5.   सामनेवाला क्र.1 व 2 यांनी व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीकरित्‍या वरील नमुद आदेशाची पुर्तता या आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

6.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

7.   तक्रारकर्त्‍यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.