कच्चे रजि.नं.151/2008 ग्राहक तक्रार क्रमांकः-451 /2008 तक्रार दाखल दिनांकः-09/09/2008 (अडमशिन स्टेज) निकाल तारीखः-24/10/2008 कालावधीः-0वर्ष01महिना15दिवस
समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे. श्री.काशिनाथ तुकाराम पाटील डोंगस्ते गाव, पो.कुडुस ता.वाडा, जि.ठाणे ....तक्रारकर्ता विरुध्द सक्षम प्राधिकारी यांचे कार्यालय, रिलायन्स गॅस पाईप लाईन कंपनी लि. हरी नारायण कॉम्प्लेक्स, जुना डालडा रस्ता, शिवाजी चौक, उल्हासनगर नं.3, जिल्हा ठाणे. ....विरुध्दपक्ष गणपुर्तीः-1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य 3.सौ.भावना पिसाळ,मा.सदस्या निकालपत्र (पारित दिनांकः-24/10/2008) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेव्दारे आदेशः- सदर तक्रार तक्रारदार यांनी कलम 2(फ),2(ग) नुसार सदोष व अपुर्णं सेवा पुरविल्यामुळे सदर तक्रार दाखल केलेली असून विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांचे ताब्यातील व वहीवाटीमधील जमीन (अर्जात नमूद केल्या प्रमाणे) म्हणजे 4 2/- महिन्यापूर्वी खोदकाम करुन गॅस पाईपलाईन टाकली व काम पुर्ण करुन झालेनंतर खड्डे व्यवस्थित न भरताच मोठमोठे खड्डे विखुरलेल्या अवस्थेत टाकून निघून गेले. त्यामुळे जमीनीवरील असलेली पिके व झाडे यांचा नाश झाला व काम करण्यापुर्वी तक्रारदार यांची परवानगी घेतली नाही. जमीन नापीक केल्याने अन्याय झाला. कलम 2(फ) नुसार सेवा पुरविली होती. म्हणून नुकसान भरपाई मिळावी म्हणून सदर तक्रार दाखल करुन विनंती मागणी केली आहे.1)1,00,000/- रुपये शेत जमीन विरुध्दपक्षकार यांनी त्यांचे कामाकरीता वापरली म्हणून रक्कम द्यावी.2)गैर मार्गाने शेत जमीनीचा वापर केल्याने रु.10,000/- द्यावेत. 3)गैर मार्गाने जमीनीचा वापर करुन ती नापीक केली त्यामुळे 1,00,000/- मिळावे.4) शेत जमीनीचा वापरासाठी तक्रारकर्ता यांची परवानगी घेतली नाही म्हणून त्यासाठी रुपये 10,000/- मिळावे. 5)सेवा पुरवली नाही म्हणून रुपये 10,000/-मिळावे.6)तक्रारदाराचे शेतजमीनीवरील झाडे व पिके नष्ट केली म्हणून रुपये 10,000/- मिळावेत.7)तक्रारदार यांना मानसिक शारिरीक त्रास झाला म्हणून रुपये 10,000/- मिळावेत.8)तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावेत.9)इतर अनुषंगीक दाद मिळावी अशी मागणी केली आहे. 2)सदर तक्रारीमध्ये दि.9/9/2008 रोजी सदर तक्रार मंचात चालण्यास पात्र नाही, म्हणून मुळ वादाकरीता प्राथमिक आक्षेप काढण्यात आले होते, त्या आक्षेपाप्रमाणे तक्रारदार यांनी मंचात पुढे दि.07/10/2008 रोजी अडमशिन स्टेजवर युक्तीवाद केल्याने सदर प्रकरण अंतीम आदेशासाठी 24/10/2008 रोजी ठेवण्यात आले. 3/- आदेश 1)तक्रारदार यांची तक्रार मंचापुढे चालण्यास पात्र नसल्याने व अधिकार क्षेत्रात नसल्याने सदरची तक्रार प्राथमिक मुद्दयावरच अडमिशन स्टेजला दाखल करुन घेण्यास नामंजूर केली आहे. 2)तक्रारकर्ता यांनी तक्रार दाखल करतेवेळी तक्रारीसोबत मंचाचे नियमानुसार डी.डी.व्दारे भरणा केलेले शुल्क हे शासनाकडे जमा करण्यात येत आहे. 3)सदर आदेशाची प्रत तक्रारदार यांना निःशुल्क देण्यात यावी. 4)तक्रारदार यांनी मा.सदस्य तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात. दिनांकः-24/10/2008 ठिकाणः-ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे. |