Maharashtra

Kolhapur

CC/16/239

Dnyandev Dhondiba Kamble - Complainant(s)

Versus

Sriram Transport Finance Co.Ltd. - Opp.Party(s)

V.B.Sarnaik

23 Dec 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/16/239
( Date of Filing : 08 Aug 2016 )
 
1. Dnyandev Dhondiba Kamble
Shahuwadi,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Sriram Transport Finance Co.Ltd.
2nd floor,Devendra Bhavan,Uma Theator,Station Road,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 23 Dec 2022
Final Order / Judgement

आदेश दि.23.12.2022    द्वारा:- मा. अध्‍यक्षा –सौ. सविता पी.भोसले.

 

निशाणी क्र.1 खालील आदेश               

            

      उभय पक्षकार व तर्फे वकील हजर. यातील तक्रारदार यांनी प्रस्‍तुतचे काम क्रम सोडून बोर्डावर घेणेचा अर्ज दिला. अर्ज मंजूर. उभय पक्षांतर्फे तडजोड पुरसिस दाखल केली की, तक्रारदार व वि प यांचेमध्‍ये तडजोड झाली असून तक्रारदार यांचे मालकीचे वाहन क्र.MH-43-E-5220 उभयतांच्‍या सहमतीने विक्री करुन त्‍यातून येणारी रक्‍कम व तक्रारदाराने अंतीम तडजोडीची रक्‍कम रु.50,000/- वि प कंपनीस कर्जापोटी देणेचे आहे. सदर रक्‍कमेतून तक्रारदाराचे कर्जखाते क्र.KLPRO301050005 हे पूर्ण फेड करुन घेऊन वि प यांनी तक्रारदारास ना हरकत दाखला देणेचा आहे. तक्रारदार यांनी तडजोडीची ठरलेली रक्‍कम रु.50,000/- पैकी रक्‍कम रु.40,000/- स्‍टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर जि.कोल्‍हापूर यांचा डी डी क्र.088115 दि.20/12/2022 व रक्‍कम रु.10,000/- स्‍टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर जि.कोल्‍हापूर यांचेकडील धनादेश क्र.459659 दि.23/12/2022 अन्‍वये  वि प कंपनीस आदा केलेली आहे. वादातील वाहनाचा प्रादेशिक परिवहन खाते कोल्‍हापूर यांचेकडील आजपर्यंतचे सर्व कर भरणेची जबाबदारी तक्रारदाराची राहणार आहे. तदनंतर वाहनाचे सर्व प्रकारची जबाबदारी ही नियोजित वाहन खरेदीदार यांची राहील. तक्रारदार यांची सदर तडजोडीनंतर वि प यांचेविरुध्‍द कोणतीही तक्रार राहिलेली नाही. सबब प्रस्‍तुतची तक्रार निकाली काढण्‍यात यावी. सदर पुरसिसवर तक्रारदार व त्‍यांचे वकील व वि प व तर्फे वकील यांच्‍या सहया आहेत. सदर पुरसिसप्रमाणे प्रस्‍तुत प्रकरणामधील वादविषय संपुष्‍टात आलेने सदरचा तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. आजरोजी तक्रारदार यांना तोंडी विचारले असता, तक्रारदारांनी वरीलप्रमाणे मान्यता व कबुली दिली. सबब, प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. प्रकरण नस्‍तीबंद करुन दप्‍तरी दाखल.

 

                      - आ दे श –

 

1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली काढणेत येतो.

 

2. सदर तक्रार अर्जामध्‍ये उभय पक्षांनी दाखल केलेली आजरोजीची पुरसिस या आदेशाचा एक भाग आहे.

 

3. सदर आदेशाच्‍या सही शिक्‍याच्‍या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.