Maharashtra

Kolhapur

CC/16/272

Jayant Shivpal Banchode - Complainant(s)

Versus

Sri Basveshwar Co.Op.Credit Soc.Ltd.Kolhapur Through Chairman Pandurang Shakarrao Vadgaonkar - Opp.Party(s)

B.S.Patil

25 Jul 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/16/272
( Date of Filing : 02 Sep 2016 )
 
1. Jayant Shivpal Banchode
Shahupuri,Vyapar Peth,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Sri Basveshwar Co.Op.Credit Soc.Ltd.Kolhapur Through Chairman Pandurang Shakarrao Vadgaonkar
Basav Bhavan,1069,D ward,Teli Galli,Shukrwar Peth,
Kolhapur
2. Pandurang shankarrao Vadgaonkar
2132,Manglwar Peth,B,front of Sainath Mandir,
Kolhapur
3. Srikant Dattatra Banchode
1938,D,Gavali Galli,Shanivar Peth,
Kolhapur
4. Sunil Dattatray Savrdekar
1938,E ward,Rajarampuri,5th Lane,
Kolhapur
5. Anant Chandrakant Sagaonkar
804,D Ward,Bazar Peth,
Kolhapur
6. Bhupal Mallappa Ranjmale
2523,C Ward,Shanivar Peth,
Kolhapur
7. Mohan Shankarrao Falle
1947,B Ward,Manglwar Peth,Near Shahu Bank,
Kolhapur
8. Chandrakant Shivrudra Swami
1974,D Ward,Nashte Galli,Shanivar Peth,
Kolhapur
9. Rajendra Kashinath Patne
Subhash Road,Gadhinglas,
Kolhapur
10. Dilip Vishnupant Gavali
1946,D Ward,Gavali Galli,Shanivar Peth,
Kolhapur
11. Kalpana Krushnat Vadgaonkar
1999,B Ward,Mangalwar Peth,front of Sai Mandir,
Kolhapur
12. Rajesh Sambhaji Gavali
1034,D Ward,Gavali Galli,Shanivar Peth,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 25 Jul 2018
Final Order / Judgement

- नि का ल प त्र -

 

व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

    यातील वि.प.क्र.1 ही महाराष्‍ट्र सहकारी कायद्याखाली नोंद असलेली संस्‍था असून वि.प.क्र.2 हे सदर संस्‍थेचे चेअरमन तर वि.प.क्र.3 ते 11 हे संचालक आहेत व वि.प. क्र.12 हे मॅनेजर आहेत.  वि.प. संस्‍थेच्‍या चेअरमन व संचालक यांच्‍या विनंतीनुसार तक्रारदारांनी त्‍यांची रक्‍कम रु.9,00,000/- ही रक्‍कम दि.31/3/16 रोजी द.सा.द.शे.15 टक्‍के दराने कॉल डिपॉझिट म्‍हणून वि.प. क्र.1 संस्‍थेत ठेवली.  सदर रकमेची मागणी तक्रारदारांनी केली असता त्‍यांना वि.प. संस्‍थेने दि.4/4/16 रोजी रक्‍कम रु. 10 लाख रकमेचा चेक क्र. 110741 हा दिला, परंतु सदरचा चेक वटला नाही.  अशा प्रकारे वि.प. यानी त्‍यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी केली असून अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केलेला आहे.  सबब, ठेवीची रक्‍कम रु.9 लाख, त्‍यावर ऑगस्‍ट 2016 अखेर होणारे व्‍याज रु. 56,250/-, मानसिक त्रासापोटी रु.2 लाख व टायपिंग झेरॉक्‍स इ. खर्चाची रक्‍कम रु.2,750/-, तक्रारीचा खर्च रु.25,000/-  वि.प.कडून मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत ठेव पावतीची प्रत व वि.प. यांना दिलेले पत्र अशी दोन कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच ता. 25/6/18 रोजी तक्रारदार यांनी स.क्रि.केस नं.2196/16 चे निकालपत्र, सदर केसमधील प्रकाश जंगम यांचे सरतपासाचे शपथपत्र व उलटतपास, वि.प. संस्‍थेने माहिती अधिकारात दिलेली तक्रारदारांची माहिती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.

 

3.    वि.प. क्र. 1, 2, 3, 6, 7, 8, 10 व 11 यांनी याकामी हजर होवून दि.27/10/16 रोजी लेखी म्‍हणणे दाखल केले.  सदरचे वि.प. यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये, तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण कथने नाकारली आहेत.  वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदार हे वि.प. संस्‍थेचे ग्राहक नाहीत.  तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबिय हे वि.प. क्र.1 संस्‍थेचे कर्जदार होते.  त्‍यांची कर्जे थकबाकीत होती.  त्‍याबाबत वि.प. क्र.1 संस्‍थेने त्‍यांचेविरुध्‍द कायदेशीर कारवाई वसुलीसाठी सुरु केली होती.  यातील तक्रारदार यांनी संस्‍थेचे कर्ज एकरकमेने फेडणेचे मान्‍य केले व कर्जापोटी काही रक्‍कम जमा केली.  मात्र सदर भरलेल्‍या रकमेबाबत रु.42,00,000/- ची तफावत निघाली.  त्‍याबाबत संस्‍थेच्‍या ऑडीटमध्‍ये शेरा निघाला.  ऑडीटर व संस्‍थेने सदरची रक्‍कम कर्जदार यांना भरणेस सांगितली.  त्‍यास अनुसरुन तक्रारदार यांनी सुरुवातीस रक्‍कम रु. 23,00,000/- जमा केले व नंतरची रक्‍कम रु.19,00,000/- जमा करताना सदर कर्जदार म्‍हणजेच प्रस्‍तुत तक्रारदार व त्‍यांचे संबंधीत संचालक वि.प.क्र.5 व त्‍यांचे सहकारी यांनी संस्‍थेच्‍या मॅनेजरवर दबाव आणून वर नमूद रक्‍कम ही कर्ज रक्‍कम फरकापोटी भरलेबाबत दाखवले नाही.  खोटी व बनावट विसंगत कागदपत्रे तयार करुन मॅनेजर यांचेवर दबाव आणून खोटे चेक घेतले व ठेवीचा व्‍यवहार आहे असे खोटेपणाने दाखवले.  मात्र तक्रारदार यांनी तक्रारअर्जात नमूद केलेला कोणताही ठेवीचा व्‍यवहार वि.प. क्र.1 संस्‍थेत केलेला नाही.  तक्रारदार यांनी वर नमूद चेक न वटलेबाबत प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी कोल्‍हापूर यांचे कोर्टात केस दाखल केलेली आहे.  सदरची बाब ही न्‍यायप्रविष्‍ट आहे. सबब, तक्रारदार यांना प्रस्‍तुत तक्रार दाखल करणेचा अधिकार नाही.  तक्रारदार यांना तथाकथित ठेवीबाबत कोणतीही ठेवपावती वि.प. संस्‍थेने दिलेली नाही. वैकल्पिकरित्‍या वि.प. असे म्‍हणणे आहे की, मे. उच्‍च न्‍यायालय, मुंबई यांचे निकालाप्रमाणे सदरकामी फक्‍त वि.प. संस्‍थेस जबाबदार धरता येईल, संचालकांना जबाबदार धरता येणार नाही.  सबब, तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी अशी विनंती वि.प. यांनी केली आहे. 

     

4.         वि.प.क्र.5 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी वि.प.क्र.1 संस्‍थेमध्‍ये रक्‍कम रु.9 लाख इतकी कॉल डिपॉझिट ठेवलेली आहे असे संस्‍थेच्‍या रेकॉर्डवरुन दिसून येते. सदर ठेवीच्‍या परतफेडीसाठी दिलेला धनादेश वटलेला नाही.  सदर संस्‍थेचे खाते बँक ऑफ महाराष्‍ट्रमध्‍ये असून त्‍यामध्‍ये चेक वटण्‍याइतकी रक्‍कम शिल्‍लक होती तथापि चेअरमन व मॅनेजर यांनी दिलेल्‍या चुकीच्‍या माहितीमुळे सदर बँकेवरील चेक दिला गेला नाही.  सदरची बाब वि.प. क्र.5 चे लक्षात आलेनंतर त्‍यांनी ताबडतोब चेअरमन व मॅनेजर यांना स्‍पष्‍ट लेखी सूचना देवून बँक ऑफ महाराष्‍ट्रमधील रक्‍कम उपरोक्‍त कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक, लक्ष्मीपुरी शाखेमध्‍ये जमा करण्‍यास सांगितले होते.  तथापि त्‍यांनी तसे न केलेनेच प्रस्‍तुतची परिस्थिती ओढवली आहे त्‍यास सर्वस्‍वी तेच जबाबदार आहेत.  सदर बँक ऑफ महाराष्‍ट्र मधील संस्‍थेच्या खातेतून तक्रारदारांची रक्‍कम या मंचामध्‍ये त्‍वरित मागवून घ्‍यावी अन्‍यथा चेअरमन व मॅनेजर सदरची रक्‍कम परस्‍पर इतरांना देवून टाकतील.  सबब, वि.प. क्र.5 यांचेवर वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी निश्चित करण्‍यात येवू नये अशी विनंती वि.प. क्र.5 यांनी केली आहे.

 

5.    वि.प. क्र.12 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये असे कथन केले आहे की, तक्रारदार हा मुळातच वि.प. क्र.1 संस्‍थेचा अत्‍यंत त्रासदायक व संस्‍थेस अडचणीत आणणारा कर्जदार आहे.  तक्रारदाराने स्‍वतःचे नावावर, तसेच भाऊ जयंत बनछोडे यांचे नावे, वडील, आई, पत्‍नी तसेच स्‍वतःचा व्‍यवसाय जगदीश ऑईल मिल या सर्वांवर मिळून वि.प. क्र.1 संस्‍थेकडून रक्‍कम रु.1,94,00,000/- इतके कर्ज निरनिराळया स्‍वरुपात सन 1998 ते 1999 साली उचल केले होते.  सदरचे कर्ज मुदतीत न फेडल्‍याने ते थकबाकीत गेले.  वि.प. क्र.1 संस्‍थेचे सन 2000 सालापासून व तक्रारदार व त्‍यांच्‍या कुटुंबियांविरुध्‍द वसुलीची कारवाई सुरु केली.  परंतु तक्रारदाराने त्‍यामध्‍ये अडथळे निर्माण करण्‍याचे हेतूने सहकार न्‍यायालय, सहकार खाते, ना. हायकोर्ट येथे वेगवेगळे दावे दाखल केले.  परंतु सदरचे सर्व दावे फेटाळणेत येवून मा. उच्‍च न्‍यायालयाने देखील तक्रारदारास डिफॉल्‍टर ठरविलेले आहे.  सरतेशवेटी तक्रारदारांनी सन 2013 मध्‍ये शासनमान्‍य योजनेचा लाभ उठवणेच्‍या हेतूने विभागीय सहनिबंधक, कोल्‍हापूर यांच्‍या कोर्टान अर्ज दाखल करुन सेटलमेंटने कर्ज भरणेची तयारी दर्शविली. प्रस्‍ततु वि.प. संस्‍था ही तक्रारदाराचे रु. 5 कोटीचे थकीबाकीमुळे आर्थिक अडचणीत आलेली होती.  याकरिता वि.प. संस्‍थेने नाईलाजास्‍तव शासनमान्‍य योजनेनुसार तक्रारदारांची देय रक्‍कम भागवून घेण्‍याची तयारी दर्शविली.  संस्‍थेचे दोन संचालक विलास गाताडे व अनंत सांगावकर हे तक्रारदाराचे घनिष्‍ठ नातेसंबंध असलेले संचालक होते. त्‍यांनी पुढाकार घेवून तक्रारदार हा कर्जाची रक्‍कम भरणेपूर्वी संस्‍थेला कर्जाचे परतफेडीपोटी दिलेली रक्‍कम बँक ऑफ महाराष्‍ट खातेवर जमा करेल व सदर रक्‍कम जमा झालेवर तिच रक्‍कम त्‍याने बेअरर चेकने वि.प. संस्‍थेने रोखीने परत करावयाची व त्‍या बदल्‍यात सदर कर्जदार ठेवीदारांच्‍या ठेवपावत्‍या संस्‍थेत आणून जमा करेल.  सदर ठेवीदारांचे पैसे तक्रारदार स्‍वतः भागवेल व त्‍यानंतर सदर ठेवीदारांच्‍या ठेव पावत्‍यांच्‍या रकमा तक्रारदारांचे कर्ज खातेवर जमा कराव्‍यात अशा स्‍वरुपाचा व्‍यवहार ठरविला होता.  तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबियांनी आर.टी.जी.एस.ने कर्ज रकमेच्‍या फक्‍त व्यवहारापेाटी उघडलेले बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा गंगावेश या संस्‍थेच्‍या खात्यावर भरणा झालेले पैसे रक्‍कम रु.47,00,000/- तीन वेळा बेअरर चेकने वि.प. संस्‍थेकडून काढून घेतले.  सदरची रक्‍कम रोखीने उचलताना तक्रारदार अगर त्‍यांच्‍या नातेवाईकांच्या सहया चेकवर न करता त्‍यांच्‍या फर्मचे कर्मचारी यांनी सहया करुन पैसे बँकेतून उचलले आहेत.  तदनंतर पुन्‍हा दोन वेळा एकूण रक्‍कम रु.42,00,000/- तक्रारदारांचे नोकर हेमंत पाटील व भगवान पाटील यांचे चेकवर सहया करुन उचलले आहेत.  उपरोक्‍त रकमेच्‍या बदल्‍यात ठेवीदारांच्‍या ठेवी भागवून ठेवपावत्‍या दि. 24/3/14 रोजी देणेचे तक्रारदाराने मान्‍य करुनही तक्रारदाराने काहीएक रक्‍कम संस्‍थेत भरणा केली नाही.  त्‍याबाबत तगादा लावलेनंतर तक्रारदारांनी दि. 18/12/15 रोजी रक्‍कम रु.23,00,000/- वि.प. यांचेकडे जमा केले.  तदनंतर चेअरमन व वि.प. क्र.12 यांनी उर्वरीत रक्‍कम रु.19,00,000/- भरणा करणेबाबत तगादा लावला असता दि. 31/3/16 रोजी सदरची रक्‍कम रोखीने जमा केली.  सदरची रक्‍कम कर्ज खातेवर न भरता जबरदस्‍तीने कॉल डिपॉझिट म्‍हणून ठेवण्‍याच्‍या अटीवर ठेव म्‍हणून ठेवून घेतली.  ठेवपावत्‍या आणून देतो व मग या रकमा घेवून जातो असे संस्‍थेस त्‍यांनी सांगितले परंतू तसे त्‍यांनी केलेले नाही.  सदर रक्‍कम रु.19 लाखाचे रकमेपोटी तक्रारदार व त्‍यांचे भाऊ यांनी वि.प. संस्‍थेकडून दोन चेक घेतले आहेत.  तदनंतर दि. 4/4/16 रोजी रक्‍कम रु.9,50,000/- इतकी रक्‍कम तक्रारदाराचे नोकराकडे सुपूर्त करण्‍यात आली.  परंतु त्‍या बदल्‍यात ठेव पावत्‍या व व्‍हाऊचर पैसे मिळाल्‍याच्‍या सहया मागितल्‍या असता हुज्‍जत घालण्‍यास सुरुवात केली.  तदनंतर आजअखेर तक्रारदारांनी दिलेला चेक व उचल रकमेचे व्‍हाऊचर आणून दिलेले नाही.  त्‍याबाबत रितसर दि. 3/5/16 रोजी तक्रार दाखल केली आहे.  त्‍याची चौकशी सुरु आहे.  सदर प्रकरणात सर्व व्‍यवहारांचे साक्षी पुरावे तपासणे आवश्‍यक आहे.  त्यासाठी केस समरी पध्‍दतीने निर्णीत न होता ती सखोल पुरावे तपासून निर्णीत करणे गरजेचे आहे.  त्‍यामुळे सदरची तक्रार या मंचामध्‍ये चालणेस पात्र नाही.  तक्रारदार हा स्‍वच्‍छ हाताने या मंचासमोर आलेला नाही.  वि.प.क्र.12 हे संस्‍थेचे कर्मचारी आहेत. त्‍यांनी कोणतेही बंधपत्र स्‍वीकारलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये व तक्रारदारामध्‍ये विक्रेता व ग्राहक असे नाते निर्माण होत नाही.  सबब, तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावी व तक्रारदारावर रु. 50,000/- चा दंड ठोठावणेत यावा अशी विनंती वि.प.क्र.12 ने केली आहे. 

 

6.    वि.प. क्र. 3, 8, 11, 12 यांनी तक्रारदार यांचा प्रथम न्‍यायदंडाधिकारी सो यांचे कोर्टातील वि.प.तर्फे घेण्‍यात आलेला उलटतपास, वि.प. यांचा कलम 88 प्रमाणे चौकशीचा अहवाल, वि.प.क्र.12 यांनी तक्रारदार यांनी कलम 138 अन्‍वये दाखल केलेली फिर्याद, वि.प. यांनी मा. विभागीय सह.संस्‍था, यांचेकडे तक्रारदार यांचेविरुध्‍द केलेल्‍या तक्रारीची प्रत इ. कागदपत्रे दाखल केले आहेत.  तसेच वि.प. यांनी याकामी म्‍हणण्‍याचे पुष्‍ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. तसेच लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.

 

7.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प.  यांचे ग्राहक आहेत काय ?

होय

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय

3

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय

4

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1 व 2

 

8.    प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.1 ही महाराष्‍ट्र सहकारी कायद्याखाली नोंद संस्‍था आहे.  तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे ता. 31/3/16 रोजी रक्‍कम रु.9,00,000/- इतकी रक्‍कम द.सा.द.शे.15 टक्‍के दराने कॉल डिपॉझिट म्‍हणून ठेवली होती.  सदरचे कॉल डिपॉझिट रक्‍कम काही दिवसांकरिता असलेचे वि.प. संस्‍थेचे चेअरमन, संचालक व मॅनेजर यांनी तक्रारदारांना आश्‍वासित केले होते.  वि.प. यांचे शब्‍दावर विश्‍वास ठेवून त्‍यांनी दिलेल्‍या हमी व वचनावर विसंबून राहून रक्‍कम रु.9 लाख वि.प. संस्‍थेत काही दिवसांकरिता गुंतवलेचे तक्रारदारांनी पुराव्‍याचे शपथपत्रमध्‍ये कथन केले आहे.  तथापि वि.प. क्र. 3, 8, 11, व 12 यांनी ता. 28/7/17 रोजी तक्रारदार यांनी दावेमध्‍ये मागणी केलेले रकमेबाबत सदर तक्रारदार यांनी मा. प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांचेकडे निगोशिएबल इन्‍स्‍ट्रूमेंट अॅक्‍ट कलम 138 प्रमाणे दावा दाखल केला असून सदर दावा प्रलंबित आहे. तसेच तक्रारदार हे विद्यमान संचालक म्‍हणून कार्यरत आहत.  त्‍याकारणाने तक्रारदार हे वि.प. संस्‍थेचे ग्राहक नाहीत असे कथन केलेले आहे.  सबब, तक्रारदार हे वि.प. संस्‍थेचे ग्राहक आहेत का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  त्‍याअनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता अ.क्र.1 ला दि.31/3/16 रोजीची कॉल डिपॉझिट भरलेच्‍या रकमेची पावती दाखल आहे.  सदरचे पावतीचे अवलोकन केले असता, सदर पावतीवर वि.प. पतसंस्‍थेचे नाव नमूद आहे. खात्‍याचा प्रकार ठेवी, खातेदार जयंत बनछोडे यांचे नाव नमूद असून वि.प. बँकेचा शिक्‍का आहे.  सदर शिक्‍क्‍यावर Received cash नमूद आहे. अ.क्र.2 ला वि.प. यांचे ता. 31/3/16 चे पत्र दाखल आहे.  सदर पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी ता. 31/3/16 रोजी ठेवीपोटी रक्‍कम रु.9 लाख पोटी कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँक लि.यांचा चेक क्र. 110741 ता. 4/4/16 रक्‍कम रु. 9 लाखचा धनादेश देत आहे असे नमूद असून त्‍यावर वि.प. तर्फे मॅनेजर यांची सही आहे.  सदरची सही वि.प. यांनी नाकारलेली नाही. वि.प. यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, समरी फौजदारी खटला क्र. 21196/16 चे कामी उलटतपासामध्‍ये तक्रारदारांनी सदर संस्‍थेकडे कॉल डिपॉझिट म्‍हणून सदरची रक्‍कम ठेवली होती व ती 45 दिवसानंतर देय होती.  सदरचे उलटतपासाचे सहीशिक्‍क्‍याच्‍या नकला प्रस्‍तुतकामी दाखल आहेत.  प्रस्‍ततुतकामी तक्रारदार यांनी जरी मा. प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी यांचेकडे निगोशिएबल इन्‍स्‍ट्रूमेंट अॅक्‍ट कलम 138 नुसार दावा दाखल केलेला असला तरी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 3 प्रमाणे Act is not in derogation of any other law.  The provision of this Act shall be in additional to and not in derogation of the provision of any other law for the time being in force.  त्‍याकारणाने वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार यांनी वि.प. संस्‍थेत ठेव रकमेचे स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रकमांचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी दत आहे.

 

9.    प्रस्‍तुत कामी तक्रारदारांनी सदरचे कॉल डिपॉझिटची रकमेची मागणी वि.प. यांचेकडे केली असता, वि.प. संस्‍थेने ता.4/4/16 रोजीचा रक्‍कम रु.9 लाख रकमेचा चेक क्र. 110741 तक्रारदारांचे नावे दिलेला होता.  सदरचा चेक भरलेस तो वटेल याची खात्री तक्रारदारास दिली होती तथापि सदरचा चेक वटला नाही. त्‍या कारणाने सदर वि.प. संस्‍थेने तक्रारदारांना सदरची रक्‍कम रु.9 लाखची कॉल डिपॉझिट स्‍वरुपात गुंतविलेली रक्‍कम परत न देवून तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प. क्र.1, 2, 3, 6, 7, 8, 9, 10 व 11 यांचे म्‍हणणेचे अवलोकन केले असता तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबिय हे वि.प. क्र.1 संस्‍थेचे कर्जदार होते.  त्‍यांची कर्जे थकीत होती. यातील तक्रारदार यांनी संस्‍थेचे कर्ज एकरकमेने फेडणेचे मान्‍य केले व कर्जापोटी काही रक्‍कम जमा केली.  मात्र सदर भरलेल्‍या रकमेबाबत रु.42,00,000/- ची तफावत निघाली.  त्‍याबाबत संस्‍थेच्‍या ऑडीटमध्‍ये शेरा निघाला.  ऑडीटर व संस्‍थेने सदरची रक्‍कम कर्जदार यांना भरणेस सांगितली.  त्‍यास अनुसरुन तक्रारदार यांनी सुरुवातीस रक्‍कम रु. 23,00,000/- जमा केले व नंतरची रक्‍कम रु.19,00,000/- जमा करताना सदर कर्जदार म्‍हणजेच प्रस्‍तुत तक्रारदार व त्‍यांचे संबंधीत संचालक वि.प.क्र.5 व त्‍यांचे सहकारी यांनी संस्‍थेच्‍या मॅनेजरवर दबाव आणून वर नमूद रक्‍कम ही कर्ज रक्‍कम फरकापोटी भरलेबाबत दाखवले नाही.  खोटी व बनावट विसंगत कागदपत्रे तयार करुन मॅनेजर यांचेवर दबाव आणून खोटे चेक घेतले व ठेवीचा व्‍यवहार आहे असे खोटेपणाने दाखवले.  मात्र तक्रारदार यांनी तक्रारअर्जात नमूद केलेला कोणताही ठेवीचा व्‍यवहार वि.प. क्र.1 संस्‍थेत केलेला नाही असे म्‍हणणे दाखल केले आहे. त्‍या अनुषंगाने तक्रारदार यांनी ता. 25/6/18 रोजी दाखल केलेल्‍या स.क्रि.केस नं. 2196/2016 चे दि.9/3/18 रोजीचे प्रकाश जंगम यांचे अॅफिडेव्‍हीट व उलटतपासाचे अवलोकन केले असता, सदरची रु.9 लाख कॉल डिपॉझिट जमा झालेची नोंद मी केली आहे, सदरचे अकाऊंट स्‍टेटमेंट मधील सर्व नोंदी ख-या व बरोबर असून सदरचे नोंदीचा उतारा मी संस्‍थेच्‍या सुव्‍यवस्थित प्रिंटरवरुन काढला आहे असा सदर प्रकाश जंगम यांनी दाखला दिलेला आहे. सदरचे कागदपत्रे वि.प. यांनी पुराव्‍यामध्‍ये नाकारलेली नाहीत.  तसेच ता. 8/4/17 रोजी वि.प. संस्‍थेने माहिती अधिकारात दिलेली  तक्रारदारांची माहिती तक्रारदारांनी दाखल केली आहे.  सदर माहितीमध्‍ये तक्रारदारांचे संस्‍थेकडे असणा-या ठेवीबाबतची माहिती दाखल केलली असून त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे नाव नमूद आहे.  तक्रारदारांची संस्‍थेकडे असणारी एकूण ठेव रक्‍कम रु.9,00,000/- संस्‍थेकडे थकबाकी आहे किंवा नाही - नाही, थकबाकी असल्‍यास तपशील - लागू नाही, असे नमूद असून त्‍यावर संस्‍थेचा शिक्‍का आहे.  सदरची कागदपत्रे वि.प. यांनी पुराव्‍यात नाकारलेली नाहीत. सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदाराची वि.प. संस्‍थेकडे थकबाकी आहे हे स्‍पष्‍टपणे दिसून येत नाही. दाखल कागदपत्रांवरुन वि.प. यांनी तक्रारदारांची सदरचे कॉल डिपॉझिटचे रक्‍कम मान्‍य केलेली आहे.

 

10.   वि.प. क्र.5 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणेमध्‍ये संस्‍थेचे रेकॉर्डवरुन तक्रारदारांनी वि.प. क्र.1 संस्‍थमध्‍ये रक्‍कम रु.9,00,000/- इतकी कॉल डिपॉझिट ठेवलेचे मान्‍य व कबुल केलेले आहे.    वि.प. क्र.12 यांनी ता. 3/11/16 रोजी म्‍हणणे दाखल केलेले असून वि.प. क्र.1 संस्‍थेचे सन 2000 सालापासून व तक्रारदार व त्‍यांच्‍या कुटुंबियांविरुध्‍द वसुलीची कारवाई सुरु केली.  परंतु तक्रारदाराने त्‍यामध्‍ये अडथळे निर्माण करण्‍याचे हेतूने सहकार न्‍यायालय, सहकार खाते, ना. हायकोर्ट येथे वेगवेगळे दावे दाखल केले.  परंतु सदरचे सर्व दावे फेटाळणेत येवून मा. उच्‍च न्‍यायालयाने देखील तक्रारदारास डिफॉल्‍टर ठरविलेले आहे.  सरतेशवेटी तक्रारदारांनी सन 2013 मध्‍ये शासनमान्‍य योजनेचा लाभ उठवणेच्‍या हेतूने विभागीय सहनिबंधक, कोल्‍हापूर यांच्‍या कोर्टान अर्ज दाखल करुन सेटलमेंटने कर्ज भरणेची तयारी दर्शविली. प्रस्‍ततु वि.प. संस्‍था ही तक्रारदाराचे रु. 5 कोटीचे थकीबाकीमुळे आर्थिक अडचणीत आलेली होती.  याकरिता वि.प. संस्‍थेने नाईलाजास्‍तव शासनमान्‍य योजनेनुसार तक्रारदारांची देय रक्‍कम भागवून घेण्‍याची तयारी दर्शविली.  संस्‍थेचे दोन संचालक विलास गाताडे व अनंत सांगावकर हे तक्रारदाराचे घनिष्‍ठ नातेसंबंध असलेले संचालक होते. त्‍यांनी पुढाकार घेवून तक्रारदार हा कर्जाची रक्‍कम भरणेपूर्वी संस्‍थेला कर्जाचे परतफेडीपोटी दिलेली रक्‍कम बँक ऑफ महाराष्‍ट खातेवर जमा करेल व सदर रक्‍कम जमा झालेवर तिच रक्‍कम त्‍याने बेअरर चेकने वि.प. संस्‍थेने रोखीने परत करावयाची व त्‍या बदल्‍यात सदर कर्जदार ठेवीदारांच्‍या ठेवपावत्‍या संस्‍थेत आणून जमा करेल.  सदर ठेवीदारांचे पैसे तक्रारदार स्‍वतः भागवेल व त्‍यानंतर सदर ठेवीदारांच्‍या ठेव पावत्‍यांच्‍या रकमा तक्रारदारांचे कर्ज खातेवर जमा कराव्‍यात अशा स्‍वरुपाचा व्‍यवहार ठरविला होता.  तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबियांनी आर.टी.जी.एस.ने कर्ज रकमेच्‍या फक्‍त व्यवहारापेाटी उघडलेले बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा गंगावेश या संस्‍थेच्‍या खात्यावर भरणा झालेले पैसे रक्‍कम रु.47,00,000/- तीन वेळा बेअरर चेकने वि.प. संस्‍थेकडून काढून घेतले.  सदरची रक्‍कम रोखीने उचलताना तक्रारदार अगर त्‍यांच्‍या नातेवाईकांच्या सहया चेकवर न करता त्‍यांच्‍या फर्मचे कर्मचारी यांनी सहया करुन पैसे बँकेतून उचलले आहेत.  तदनंतर पुन्‍हा दोन वेळा एकूण रक्‍कम रु.42,00,000/- तक्रारदारांचे नोकर हेमंत पाटील व भगवान पाटील यांचे चेकवर सहया करुन उचलले आहेत, असे कथन केलेले आहे.  सदरचे कथनाचे अनुषंगाने वि.प. क्र.12 यांनी पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.  तथापि सदचे कथनाचे अनुषंगाने वि.प. क्र.12 यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा अथवा परिस्थितीजन्‍य पुरावा दाखल केलेला नाही.  तसेच प्रस्‍तुत कामी कथन केलेल्‍या इसमांचे पुराव्‍याचे शपथपत्र अथवा तत्‍सम पुरावा वि.प. क्र.12 यांनी दाखल केलेला नाही.  सदरची रक्‍कम कर्ज खातेवर न भरता दंडुकशाहीने व संचालकांचे जवळचे नातेवाईक असलेने त्‍यांचे माध्‍यमातून सदरची रक्‍कम रु.9,00,000/- कॉल डिपॉझिट म्‍हणून ठेवण्‍याचे अखेर जबरदस्‍तीने ठेव करुन घेतली.  विशेष लेखा परिक्षकांनी संस्‍थेचे संचालकांविरुध्‍द फौजदारी केस दाखल केलेली आहे असे वि.प. क्र.12 यांनी कथन केले आहे.  तथापि त्‍याअनुषंगाने कोणताही सबळ कागदोपत्री पुरावा दाखल नाही.  प्रस्‍तुतकामी वि.प. क्र.12 यांनी मा. विभागीय सहनिबंधक सह. संस्‍था कोल्‍हापूर यांचेकडे ता. 3/5/16 रोजी लेखी तक्रार दाखल केलेली आहे.  सदरचे तक्रारीची प्रत वि.प. यांनी मा. मंचात दाखल केलेली आहे.  तथापि, दाखल कागदपत्रांवरुन ता. 31/3/16 रोजी वि.प.क्र.12 यांनी तक्रारदारांचे सदरचे ठेवीपोटी रक्‍कम कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँक लि,. जमा केलेली असून त्‍यानंतर तक्रारादारांना धनादेश दिलेला आहे.  तशी वि.प.क्र.12 यांची सदरचे कागदपत्रांवर सही असून सदरची सही वि.प. क्र.12 यांनी नाकारलेली नाही.

 

11.   प्रस्‍तुतकामी वि.प. क्र.13 ते 16 यांनी त्‍यांचे म्‍हणणेमध्‍ये पैशाची मागणी केलेली आहे.  सदरची मागणी प्रस्‍तुतचे तक्रारीचा विषय नाही.  वि.प. क्र.13 ते 16 हे सदरचे वि.प. संस्‍थेचे संचालक नाहीत.  तक्रारदारांनी तक्रारीस वि.प. नं.13 ते 16 यांचेविरुध्‍द कोणतीही दाद मागितली नसेलेने त्‍यांचेविरुध्‍द हे मंच कोणतेही भाष्‍य करीत नाही. 

 

12.   प्रस्‍तुतकामी तक्रारदारांनी वि.प. यांना संयुक्तिक व वैयक्तिक जबाबदार धरावे अशी मंचास विनंती केलेली आहे.  वि.प.क्र.3 ,8 11 यांनी त्‍यांचे म्‍हणणेमध्‍ये मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई यांचे निकालपत्राप्रमाणे सदरचे कामी वि.प. संस्‍थेच जबाबदार धरता येईल असे कथन केले आहे.  सदर वि.प. यांनी Minister of State For Cooperation, Marketing Textile and De-addiction activities, Govt. Of Maharashtra. Mumbai यांचेकडे दाखल केलेल्‍या अपिलाची कागदपत्रे दाखल केलेल आहेत. सदरचे अपिलाचे अवलोकन केले असता वि.प. क्र. 2, 3, 4, 7, 8 यांनी प्रस्‍तुतचे अपिल दाखल केलेचे दिसून येते.  सदरचे अपिलामध्‍ये In view of this factual aspect, it cannot be  said that amount shown losses in the impugned report u/s 88 are irrecoverable and therefore, the appellant cannot be held responsible for these amounts. 

Order - The impugned order /report dated 13/3/2008 passed by Respondent No.1 Authorised officer, Mr. C.G.Pawar u/s 88 of said Act is hereby quashed and set aside as against the appellants.

 

मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे अपिलाचे आदेशाचा विचार करता, वि.प. क्र.2, 3, 4, 7, 8 हे संयुक्तिक व वैयक्तिक जबाबदार नाहीत असे या मंचाचे मत आह.  तसेच वि.प. क्र.12 हे सदर वि.प. क्र.1 संस्‍थेवर मॅनेजर/कर्मचारी आहेत. वि.प. क्र.12 यांनी वि.प. संस्‍थेचे बंधपत्र स्‍वीकारलेले नाही.  त्‍या कारणाने वि.प. क्र.12 यांना हे मंच जबाबदार धरत नाही. 

 

13.   सबब, वरील सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदारांनी तक्रारीसोबत ठेव रक्‍कम भरलेची पावती दाखल केलेली आहे. सदरचे ठेवरकमेपोटी चेक जमा करुन त्‍याची पोहोच वि.प.नं.12 मॅनेजर यांचे सहीने ता. 31/3/16 रोजी दिलेली आहे.   वि.प. क्र.12 यांनी त्‍यांचे म्‍हणणेतील कथने पुराव्‍यानिशी शाबीत केलेली नाही.  सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून ठेवस्‍वरुपात रक्‍कम स्‍वीकारुन सदरची ठेवरक्‍कम व्‍याजासह तक्रारदार यांना आजतागायत परत न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

14.   मा. उच्‍च न्‍यायालयाचे दंडकांचा विचार करता, पतसंस्‍थेकडे जमा असणा-या ठेव रकमेची मुदतीत देय असणा-या रकमा देणेची प्राथमिक जबाबदारी पतसंस्‍थेवर असते.  पतसंस्‍थेचे संचालक ती रक्‍कम परत करण्‍यास वैयक्तिक व संयुक्तिक, अपवादात्‍मक परिस्थितीत सोडल्‍यास, जबाबदार असतात.  त्‍या अनुषंगाने हे मंच वरिष्‍ठ न्‍यायालयांचे खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेत आहे. 

            [1]       Supreme Court, in Special Leave Petition No.14085/2013,

dated, 17.04.2013

(Deposit Insurance & Credit Gaur.Corpn. Verus Rajendra Madhukar Deval & ors.)  It was observed by their Lordships of the Apex Court that’

“That present matter are concerning the liability of the Director and the State Consumer Disputes Redressal Commission and the National Commission have rightly held that the Directors themselves are not personally liable.  Hence, we do not see any reason to interfere and Special Leave Petition accordingly dismissed.”

            [2]       First Appeal No.16/1070, State Commission Mumbai

                        Manager Yashodhara Co-op. Credit Soc.Ltd. Sangli & ors.

                   Versus

         Bhavana Bhosale

In the observation of Hon’ble Apex Court the Director can’t be held personally liable.

 

प्रस्‍तुतकामी मा.उच्‍च न्‍यायालयाचे निवाडयाचे विचार करता वि.प. क्र.5, 6, 9, 10 याचेवर वैयक्तिक (Personal) जबाबदारी निश्चित करता येणार नाही.  तथापि वि.प.नं.1 संस्‍था ही सहकार कायद्यान्‍वये नोंदणीकृत संस्‍था असून कायदेशीर अस्तित्‍व असलेली व्‍यक्‍ती असलेने प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.1 पतसंस्‍थेस हे मंच वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार धरणेचे निष्‍कर्षाप्रत येत आहे.  सदरचे संस्‍थेचा कारभार हा संचालकांमार्फत चालतो.  त्‍या कारणाने महाराष्‍ट्र सहकारी कायद्याचे कलम 73 नुसार संस्‍थेवरील सचांलक संयुक्तिकरित्‍या जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे.  सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता वि.प. क्र.1 पतसंस्‍था यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या, वि.प. क्र.5, 6, 9, 10, व 11 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांचे सदरचे कॉल डिपॉझिट रक्‍कम व्‍याजासह अदा न करुन तक्रारदारास द्यावयाचे सेवे त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

 

 

 

मुद्दा क्र.3 व 4

  

15.   उपरोक्‍त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प.क्र.1 संस्‍था यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तसेच वि.प.क्र. 5, 6, 9, 10 व 11 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांची कॉल डिपॉझिट रक्‍कम रु.9,00,000/- अदा करावी तसेच सदरचे रकमेवर सदरचे कॉल डिपॉझिट वि.प. संस्‍थेत ठेवलेल्‍या तारखेपासून ते तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे, तसेच तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासाची रक्‍कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 3,000/- मिळणेस पात्र आहेत.

 

मुद्दा क्र.4 - सबब आदेश.

 

 
 

आ दे श

 

1)     तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

2)     वि.प.क्र.1 पतसंस्‍था यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तसेच वि.प.क्र. 5, 6, 9, 10 व 11 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना कॉल डिपॉझिट रक्‍कम रु.9,00,000/- अदा करावी तसेच सदरचे रकमेवर सदरचे कॉल डिपॉझिट वि.प. संस्‍थेत ठेवलेल्‍या तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम तक्रारदारांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे,

 

3)    वि.प.क्र.1 पतसंस्‍था यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तसेच वि.प.क्र. 5, 6, 9, 10 व 11 यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- (रक्‍कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावी. 

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.क्र.1 संस्‍था यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तसेच वि.प.क्र. 5, 6, 9, 10 व 11 यांनी संयुक्तिकरित्‍या आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.   

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

  

 

 
 
 
 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.