Maharashtra

Ratnagiri

cc/09/149

Digambar Kashinaath Raut. - Complainant(s)

Versus

Sri anis IsmailKazi. For Vaastu Rachna Construction. - Opp.Party(s)

D. A. Athavle.

14 Jul 2010

ORDER


DISTRICT CONSUMER FORUM RATNAGIRIDCF, Collectorate Campus, Ratnagiri
CONSUMER CASE NO. 09 of 149
1. Digambar Kashinaath Raut.Flat No 101. Golden Park, C-Wing Maal naka Ratnagiri. ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 14 Jul 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मे.जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,रत्‍नागिरी यांचेसमोर
श्री.अनिल गोडसे, अध्‍यक्ष
श्रीमती स्मिता देसाई, सदस्‍या
 
                                     तक्रार अर्ज क्र.129, 149, 150/2009
                                                     
                                       तक्रार क्रमांक : 129/2009,    (नि.69)
तक्रार अर्ज दाखल झाल्‍याचा दि.     20/08/2009 
तक्रार अर्ज निकाली झाल्‍याचा दि.   14/07/2010
श्रीमती शशिकला आत्‍माराम आळवाणी
रा.ए-01, तळमजला, गोल्‍डन पार्क,
माळनाका, ता.रत्‍ना‍गिरी.                                        ... तक्रारदार
तक्रार क्रमांक : 149/2009,    (नि.71)
तक्रार अर्ज दाखल झाल्‍याचा दि.     21/11/2009 
तक्रार अर्ज निकाली झाल्‍याचा दि.   14/07/2010
श्री.दिगंबर काशिनाथ राऊत
रा.फलॅट नं.101, गोल्‍डन पार्क, सी विंग,
अल्‍पबचत क्रिडा सांस्‍कृतिक केंद्राजवळ,
माळनाका, मु.पो.ता.रत्‍नागिरी.                                    ... तक्रारदार
तक्रार क्रमांक : 150/2009,    (नि.72)
तक्रार अर्ज दाखल झाल्‍याचा दि.     21/11/2009 
तक्रार अर्ज निकाली झाल्‍याचा दि.   14/07/2010
1. श्री.सुनिल लक्ष्‍मण पेढांमकर
2. सौ.स्‍नेहल सुनिल पेढांमकर
दोन्‍ही रा.ए-102, पहिलामजला,
गोल्‍डन पार्क, माळनाका,
ता.जि.रत्‍नागिरी.                                               ... तक्रारदार
 
            विरुध्‍द
 
1. वास्‍तुरचना कन्‍स्‍ट्रक्‍शन करिता
प्रोप्रा.आनिस इस्‍माईल काझी
रा.784/आय, राजापूरकर कॉलनी,
मुस्लिम होस्‍टेल जवळ, उद्यमनगर,
ता.जि.रत्‍नागिरी.                                       
2. सौ.आल्‍बी इब्राहिम कुमनदान
रा.मु.नायरी, ता.संगमेश्‍वर,
जि.रत्‍नागिरी करिता मुखत्‍यार नं.1                                ... सामनेवाला
 
 
            तक्रारदारतर्फे   : विधिज्ञ श्री.आठवले
            सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.आंबुलकर
-: नि का ल प त्र :-
द्वारा : मा. अध्‍यक्ष, श्री.अनिल गोडसे.
1.     तक्रारदार यांनी सदरचे तक्रार अर्ज त्‍यांच्‍या सदनिकेबाबतच्‍या सदोष सेवेबाबत तसेच इतर अन्‍य मागण्‍यांबाबत दाखल केले आहेत. 
2.    तक्रारदार यांच्‍या तक्रार अर्जांचा थोडक्‍यात तपशिल खालीलप्रमाणे-
      तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून सामनेवाला यांनी रत्‍नागिरी येथे बांधलेल्‍या गोल्‍डन पार्क या इमारतीमधील सदनिका खरेदी केल्‍या. सदर सदनिकेचा ताबा घेतल्‍यानंतर तक्रारदार यांनी क्षेत्रफळाबाबत शंका आल्‍याने सदरच्‍या सदनिकेचे रमेश आवळकर या आर्किटेक्‍टकडून मोजणी करुन घेतली. त्‍यावेळेस तक्रारदार यांना सामनेवाला यांनी क्षेत्रफळ कमी दिल्‍याचे दिसून आले. त्‍यामुळे तक्रारदार यांनी क्षेत्रफळानुसार सामनेवाला यांनी जादा घेतलेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यासाठी तसेच सदनिकेमध्‍ये सामनेवाला यांनी ज्‍या त्रुटी ठेवल्‍या आहेत त्‍या त्रुटी दूर करुन देण्‍यासाठी तसेच व्‍हॉल्‍युमॅट्रीक लॉस म्‍हणून रक्‍कम मिळण्‍यासाठी तसेच सामनेवाला यांनी अद्याप सदनिकाधारकांची सोसायटी स्‍थापन केली नाही त्‍यामुळे सोसायटी स्‍थापन करुन मिळण्‍यासाठी व शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा म्‍हणून सदरचे तक्रार अर्ज दाखल केले आहेत. 
      तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जासोबत नि.2 ला शपथपत्रे व नि.5 चे यादीने कागदपत्रे दाखल केली आहेत. 
3.    सामनेवाला क्र.1 यांनी सदर तक्रार अर्जाचेकामी हजर होवून तक्रार अर्ज क्र.129/2009 मध्‍ये नि.23 म्‍हणणे व नि.24 ला शपथपत्र व नि.25 च्‍या यादीने एकूण पाच कागद दाखल केले आहेत. तक्रार अर्ज क्र.149/2009 व तक्रार अर्ज क्र.150/2009 मध्‍ये नि.16 येथे आपले म्‍हणणे व नि.17 ला शपथपत्र व नि.18 च्‍या यादीने एकूण सहा कागद दाखल केले आहेत. 
4.    सामनेवाला यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराच्‍या तक्रार अर्जातील मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांचे तक्रार अर्ज मुदतीत नाहीत असे नमूद केले आहे. तसेच तक्रारदारांना सदनिका ही प्रति चौरस फूट अशा दराने न देता लमसम किंमत ठरवून दिलेली आहे. तक्रारदार यांनी खरेदीखत करताना कोणतीही तक्रार नसल्‍याने सदरचे खरेदीखते स्‍वेच्‍छेने सामनेवालांच्‍याकडून करुन घेतलेली आहेत. सामनेवाला यांनी सोसायटी स्‍थापनेसाठी कधीही टाळाटाळ केलेली नाही त्‍याबाबत तक्रारदार यांना पत्रही पाठविलेले आहे. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी कोणतेही कमी क्षेत्र दिलेले नाही. तसेच तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही असे आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये नमूद केले आहे. तसेच प्रत्‍येक तक्रारदार यांनी केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍याबाबतचे स्‍पष्‍टीकरण सामनेवाला यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये दिलेले आहे व शेवटी तक्रारदारांचे तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावे अशी विनंती केलेली आहे. 
5.    सामनेवाला क्र.2 यांना रजिस्‍टर पोष्‍टाने नोटीस पाठविण्‍यात आली होती. परंतु तक्रार अर्ज क्र.129/2009 मध्‍ये सामनेवाला हे हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.1 वर करण्‍यात आला. तक्रार अर्ज क्र.149/2009 व तक्रार अर्ज क्र.150/2009 मध्‍ये सामनेवाला क्र.2 हे त्‍यांचे मुखत्‍यार सामनेवाला क्र.1 मार्फत हजर होवून सामनेवाला क्र.1 यांनी दिलेले म्‍हणणे प्रमाणेच त्‍यांचे म्‍हणणे असल्‍याबाबतची पुरशीस त्‍या त्‍या तक्रार अर्जामध्‍ये अनुक्रमे नि.23 व नि.24 वर दाखल करण्‍यात आली आहे. 
6.    तक्रारदार यांनी सामनेवाला यांनी दिलेल्‍या म्‍हणण्‍याबाबत आपले प्रतिउत्‍तर तक्रार अर्ज क्र.129/2009 मध्‍ये नि.52 ला, तक्रार अर्ज क्र.149/2009 मध्‍ये नि.45 ला व तक्रार अर्ज क्र.150/2009 मध्‍ये नि.46 ला दाखल केले आहे. तक्रारदार यांनी आपल्‍या प्रतिउत्‍तरामध्‍ये सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍यातील मजकूर नाकारलेला आहे. 
7.    तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या सदनिकेचे कोर्ट कमिशन व्‍हावे म्‍हणून अर्ज सादर केला होता त्‍याप्रमाणे उप-‍अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची कोर्ट कमिशनर म्‍हणून नेमणूक करण्‍यात आली. त्‍यांनी आपला कमिशन अहवाल तक्रार अर्ज क्र.129/2009 मध्‍ये नि.43 ला दाखल केला आहे. तसेच तक्रार अर्ज क्र.149/2009 व तक्रार अर्ज क्र.150/2009 मध्‍ये कमिशन अहवाल नि.48 व नि.49 ला दाखल केला आहे. कोर्ट कमिशनर यांनी नि.48 व नि.49 वर दाखल केलेल्‍या अहवालामध्‍ये इतर केसमधील मजकूर नमूद केल्‍याने तक्रारदार व सामनेवाला यांनी संयुक्‍त अर्ज सादर केल्‍याने त्‍यावर कमिशनर यांचे म्‍हणणे घेवून कमिशनर यांनीही अहवालामध्‍ये टंकलेखनामध्‍ये त्रुटी असल्‍याचे नमूद केल्‍याने कमिशनर यांना फेर अहवाल सादर करण्‍याचे आदेश करण्‍यात आले. त्‍याप्रमाणे कमिशनर यांनी फेर अहवाल सादर केला. तो दोन्‍ही तक्रार अर्जांमध्‍ये अनुक्रमे नि.63 व नि.64 ला दाखल आहे. तक्रार अर्ज क्र.129/2009 मध्‍ये तक्रारदार यांनी नि.61 ला तर सामनेवाला यांनी नि.62 ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रार अर्ज क्र.149/2009 मध्‍ये तक्रारदार यांनी नि.58 ला तर सामनेवाला यांनी नि.60 ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.   तक्रार अर्ज क्र.150/2009 मध्‍ये तक्रारदार यांनी नि.59 ला तर सामनेवाला यांनी नि.61 ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.  
8.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिउत्‍तर, सामनेवाला यांनी दिलेले म्‍हणणे, दोन्‍ही बाजूंनी दाखल करण्‍यात आलेली कागदपत्रे, दोन्‍ही बाजूंचा लेखी युक्तिवाद व ऐकण्‍यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या निष्‍कर्षासाठी उपस्थित होतात. 
 

अ.क्र.
मुद्दे
उत्‍तरे
1.
तक्रारदार यांच्‍या तक्रार अर्जास मुदतीची बाधा येते काय ?
नाही. 
2.
तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्‍यास पात्र आहेत काय ?
अंशतः मंजूर.
3.
काय आदेश ?
अंतिम आदेशाप्रमाणे.

                                                            विवेचन
9.    मुद्दा क्र.1-   सामनेवाला यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदार यांचे तक्रार अर्ज मुदतबाहय झाले आहेत त्‍यामुळे ते फेटाळण्‍यात यावेत असे म्‍हणणे दाखल केले आहे. तक्रारदारांचे खरेदीखत पाहिले असता तक्रारदार आळवाणी यांचे खरेदीखत हे दि.30/12/2008 रोजीचे आहे. तक्रारदार दिगंबर राऊत यांचे खरेदीखत हे दि.05/12/2007 रोजीचे आहे तसेच तक्रारदार पेढांमकर यांचे खरेदीखत हे दि.23/11/2007 रोजीचे आहे. तक्रारदार यांनी खरेदीखत झाल्‍यापासून दोन वर्षांच्‍या आत सदरचे तक्रार अर्ज दाखल केले असल्‍याने तक्रारदार यांच्‍या तक्रार अर्जास मुदतीची बाधा येत नाही व तक्रारदार यांचे तक्रार अर्ज मुदतीत आहेत असे मंचाचे मत आहे. 
10.   मुद्दा क्र.2- तिनही तक्रार अर्जांमध्‍ये तक्रारदार यांनी काही सामाईक मागण्‍या केल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये सामनेवाला यांनी सोसायटी स्‍थापनेसाठी रक्‍कम स्विकारुनही सोसायटी स्‍थापन करुन दिली नाही, सफाईसाठी कामगार नाही व पाण्‍याची अपूरी सोय आहे. याबाबत तक्रार अर्जामध्‍ये तक्रार केली आहे. सामनेवाला यांनी दिलेल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये सोसायटी स्‍थापनेबाबत आपण कधीही टाळाटाळ केली नाही असे नमूद केले आहे. तसेच सफाई कामगारबाबत तक्रारदार यांनी मेंटेनन्‍स चार्जेस दिले नाहीत त्‍यामुळे मेंटेनन्‍सचा व इमारतीचा मासिक खर्चाचा कारभार इमारतीचे स्‍थानिक कमिटीकडे स्‍वाधीन केला आहे असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी अद्यापही तक्रारदार रहात असलेल्‍या सदनिकाधारकांची सोसायटी स्‍थापन करुन दिली नाही ही वस्‍तुस्थिती आहे. सामनेवाला यांनी वेळेत सोसायटी स्‍थापन करुन दिली असती तर इमारतीचे मेंटेनन्‍स व साफसफाईसाठी कामगार नेमणे व त्‍याचा खर्च करणे याबाबत वाद उत्‍पन्‍न झाले नसते. सामनेवाला यांनी इमारतीच्‍या खर्चाचा कारभार कोणत्‍या स्‍थानिक कमिटीकडे सोपविला याबाबत कोणताही स्‍पष्‍ट उल्‍लेख आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये दिलेला नाही. सामनेवाला यांनी सोसायटी स्‍थापनेस केलेला विलंब लक्षात घेता सामनेवाला यांनी सदनिकाधारकांची सोसायटी स्‍थापन करुन देण्‍याबाबत आदेश करणे न्‍यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. तसेच सोसायटी स्‍थापन होईपर्यंत इमारतीच्‍या साफसफाईसाठी स्‍वखर्चाने सफाई कामगार नेमावा याबाबतही आदेश करणे न्‍यायोचित होईल असे मंचाचे मत झाले आहे. 
      तक्रारदार यांनी पाण्‍याच्‍या अपूर्ण सोयीबाबत तक्रार केली आहे. कमिशनर यांनी आपल्‍या अहवालामध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी नळाचे कनेक्‍शन आहे व विहीरीमधून दिड इंची कनेक्‍शन आहे असे नमूद केले आहे. कमिशनर यांनी दिलेल्‍या अहवालाचा विचार करता तक्रारदार यांची सदरची मागणी अमान्‍य करण्‍यात येत आहे. 
11.    सर्व तक्रारदारांनी आपल्‍या तक्रार अर्जामध्‍ये सामनेवाला यांनी कमी क्षेत्रफळ दिले तसेच व्‍हॉल्‍युमॅट्रिक लॉस झाला त्‍याबाबतच्‍या खर्चाची मागणी केली आहे. सदर तिन्‍ही कामी झालेल्‍या कोर्ट कमिशनचे अहवाल विचारात घेता कोर्ट कमिशनर यांनी Carpet Area ची मोजमापे घेवून त्‍यावरुन Built-up Area काढून त्‍यामध्‍ये सामाईक वापराचे क्षेत्रफळ Proportionately पकडून त्‍यानुसार सदनिकाधारकांचे क्षेत्रफळ अहवालामध्‍ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी कमिशनर यांनी दिलेल्‍या अहवालबाबत व घेतलेल्‍या मोजमापाबाबत आक्षेप घेतला आहे. तथापी कमिशनर यांचे अहवालातील निष्‍कर्ष खोडून काढण्‍यासाठी तक्रारदार यांनी इतर अन्‍य कोणताही पुरावा सादर केलेला नाही.  तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या साठेखतामध्‍ये Built-up Area मध्‍ये कोणकोणते क्षेत्र धरावयाचे ही बाब नमूद केलेली आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यांचे साठेखत व कमिशनर यांचा अहवाल विचारात घेता तक्रारदार यांची याबाबतची मागणी अमान्‍य करण्‍यात येत आहे. कमिशनर यांनी आपल्‍या अहवालामध्‍ये व्‍हॉल्‍युमॅट्रिक लॉस दिसून आला नाही असा निष्‍कर्ष नोंदविला आहे. सदर निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदार यांची सदरची मागणीही अमान्‍य करण्‍यात येत आहे. 
12.   तक्रारदार यांनी तिनही तक्रार अर्जांमध्‍ये त्‍यांच्‍या सदनिकेच्‍या अंतर्गत काही त्रुटींबाबत तक्रार केली आहे. त्‍यामधील तक्रार अर्ज क्र.129/2009 मध्‍ये तक्रारदार आळवाणी यांनी Spartex Tiles बसवून दिल्‍या नाहीत, दरवाजाची फ्रेम खराब झाली आहे तसेच भिंतींना ओल निर्माण होते या सर्व त्रुटी दूर करण्‍यासाठी खर्चाच्‍या रकमेची मागणी केली आहे. सामनेवाला यांनी Spartex Tiles केव्‍हाही बसवून देण्‍याचे कबूल केले नव्‍हते Spartec Tiles बसवून देण्‍याचे कबूल केले होते असे आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये नमूद केले आहे. तक्रारदारांनी नि.5/1 वर दाखल केलेल्‍या साठेखताचे अवलोकन केले असता सदर साठेखतामध्‍ये Machine polished spartec tiles असे नमूद आहे. कमिशनर यांनी नि.43 वर दिलेल्‍या अहवालामध्‍ये सिरॅमिक टाईल्‍स बसविल्‍या असल्‍याचे नमूद केले आहे. कमिशनर यांचा अहवाल व साठेखतातील मजकूर विचारात घेता तक्रारदारांची सदरची मागणी अमान्‍य करण्‍यात येत आहे. गॅलरीच्‍या दरवाजाच्‍या फ्रेमबाबत कोर्ट कमिशनर यांनी दरवाजाची फ्रेम सुस्थितीत आहे असे नमूद केले आहे. कमिशनर यांचा निष्‍कर्ष विचारात घेता तक्रारदार यांची सदरची मागणी अमान्‍य करण्‍यात येत आहे. भिंतींना ओल निर्माण होते याबाबत कोर्ट कमिशनर यांनी आपल्‍या अहवालामध्‍ये भिंतींना ओल आल्‍यामुळे रंग खराब झाला असल्‍याचे नमूद केले आहे. परंतू कमिशनर यांनी त्‍याबाबतचा खर्चाचा तपशिल सादर केलेला नाही. तक्रारदार यांनी सदरची त्रुटी दूर करण्‍यासाठी रक्‍कम रु.10,000/- ची मागणी केली आहे. परंतु सदरची मागणी कशाच्‍या आधारे केली याबाबत खर्चाचे कोणतेही अंदाजपत्रक तक्रारदार यांनी सादर केले नाही. तथापी इतर दोन तक्रार अर्जांमध्‍ये अशा प्रकारची तक्रारी दूर करण्‍यास कमिशनर यांनी सुचविलेला खर्च विचारात घेता तक्रारदार यांना रक्‍कम रु.5,000/- देण्‍याबाबत आदेश करणे न्‍यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. 
13.   तक्रार अर्ज क्र.149/2009 मध्‍ये राऊत यांनी टाईल्‍स एकाच स्‍लोपप्रमाणे नाहीत, त्‍याची लेवल करण्‍यासाठी तसेच भिंतींवर ओल येत असल्‍याने वॉटर प्रुफ्रिंगसाठी खर्चाची मागणी केली आहे तसेच गॅलरीच्‍या दरवाज्‍याच्‍या फ्रेमला भेग गेली असल्‍याने व भिंतीला तडे गेल्‍याने त्‍याबाबतच्‍या खर्चाची मागणी केली आहे. कोर्ट कमिशनर यांनी सदर प्रकरणात नि.63 वर दिलेल्‍या अहवालामध्‍ये सदर बाबीसाठी येणारा खर्च रु.5,000/- व रु.1,000/- सुचविला असल्‍याने तक्रारदार यांना सदरचा खर्च देण्‍याबाबत आदेश करणे न्‍यायोचित होईल असे या मंचाचे मत झाले आहे. 
14.   तक्रार अर्ज क्र.150/2009 मध्‍ये तक्रारदार यांनी टाईल्‍स एका स्‍लोपप्रमाणे नाहीत तसेच भिंतींना तडे गेल्‍यामुळे प्‍लॅस्‍टरींगसाठी व वॉटर प्रुफिंगसाठी खर्चाची मागणी केली आहे. कोर्ट कमिशनर यांनी आपल्‍या नि.64 वर दाखल केलेल्‍या अहवालामध्‍ये त्‍याबाबत रक्‍कम रु.3,500/-, रु.4,000/- व रु.3,000/- खर्च सुचविला आहे. तो मंजूर करणे योग्‍य ठरेल असे मंचाचे मत झाले आहे. 
15.   सर्व तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्‍या खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी दिलेल्‍या सदोष सेवा विचारात घेता तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासास सामोरे जावे लागले आहे व सदरचा तक्रार अर्ज या मंचामध्‍ये दाखल करावा लागला त्‍यामुळे तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून प्रत्‍येकी रक्‍कम रु.5,000/- देण्‍याबाबत आदेश करणे योग्‍य होईल असे मंचाचे मत झाले आहे. 
16.   याकामी सामनेवाला क्र.1 यांना सामनेवाला क्र.2 यांनी विकसन करार करुन दिला असल्‍याचे दिसून येते त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या त्रुटींबाबत मंजूर केलेल्‍या मागण्‍या पूर्ण करुन देण्‍याची जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांची असल्‍याने सदरचा आदेश सामनेवाला क्र.1 यांच्‍याविरुध्‍द करण्‍यात येतो. 
17.   वरील सर्व तक्रार अर्जांचे एकत्रित निकालपत्र करणेत येत असलेमुळे त्‍याच्‍या तिन मूळ प्रती काढणेत येवून प्रत्‍येक तक्रार अर्जामध्‍ये निकालपत्र लावणेत येते. 
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. 
                           आदेश
  1. तक्रारदार यांचे तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहेत. 
  2. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार रहात असलेल्‍या इमारतीमधील सदनिका धारकांची नोंदणीकृत सहकारी संस्‍था स्‍थापन करुन द्यावी असा सामनेवाला यांना आदेश करण्‍यात येतो. 
  3. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार रहात असलेल्‍या इमारतीमध्‍ये सहकारी संस्‍था स्‍थापन होईपर्यंत स्‍वखर्चाने तात्‍काळ सफाई कामगार नेमावा असा आदेश करण्‍यात येतो. 
  4. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रार अर्ज क्र.129/2009 मधील तक्रारदार यांना सदनिकेच्‍या त्रुटी दूर करण्‍यासाठी रक्‍कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) तसेच शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) अदा करावेत असा आदेश करण्‍यात येतो. 
  5. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रार अर्ज क्र.149/2009 मधील तक्रारदार यांना सदनिकेच्‍या त्रुटी दूर करण्‍यासाठी रक्‍कम रु.6,000/- (रु.सहा हजार मात्र) तसेच शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) अदा करावेत असा आदेश करण्‍यात येतो. 
  6. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रार अर्ज क्र.150/2009 मधील तक्रारदार यांना सदनिकेच्‍या त्रुटी दूर करण्‍यासाठी रक्‍कम रु.10,500/- (रु.दहा हजार पाचशे मात्र) तसेच शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) अदा करावेत असा आदेश करण्‍यात येतो. 
  7. सामनेवाला क्र.1 यांनी सदर आदेशाची पूर्तता दि.14/08/2010 पर्यंत करणेची आहे. 
  8. सामनेवाला क्र.1 यांनी विहीत मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. 
 
रत्‍नागिरी                                                                                                 
दिनांक : 14/07/2010.                                                     (अनिल गोडसे)
                                                                                                 अध्‍यक्ष,
                                                   ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,
                                                          रत्‍नागिरी जिल्‍हा.
 
 
 
(स्मिता देसाई)
सदस्‍या,
 ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,
      रत्‍नागिरी जिल्‍हा.
 
प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्‍टाने
प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्‍टाने
 
 
 
 

HONABLE MRS. Smita Desai, MEMBERHONABLE MR. Anil Y. Godse, PRESIDENT ,