Maharashtra

Kolhapur

CC/11/160

Balkrushna Sadashiv Shete - Complainant(s)

Versus

Sr.Manager, Federal Bank - Opp.Party(s)

27 Jul 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/160
1. Balkrushna Sadashiv SheteP.W.D. Co-op Housing Society, Building no.4, Takala, Kolhapur.Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Sr.Manager, Federal BankBranch Rajaram road, Takala,Kolhapur.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
D.A.Patil , Advocate for Opp.Party

Dated : 27 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 
निकालपत्र :- (दि.27/07/2011) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. अंतिम युक्‍तीवादाच्‍या वेळेस तक्रारदार तर्फे अधिकारपत्र धारक श्री देशपांडे व सामनेवाला यांचे वकीलांनी युक्‍तीवाद केला.
 
                        सदरची तक्रार सामनेवाला बँकेने तक्रारदाराचे सेव्‍हींग खातेवर रक्‍कमा बेकायदेशीर नांवे टाकलेचे कारणास्‍तव दाखल करणेत आलेली आहे.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- तक्रारदाराचे सेव्‍हींग खाते क्र.S.B. A/c 3148 गणेश बँक ऑफ कुरुंदवाड लि.शाखा-राजारामपूरी कोल्‍हापूर मध्‍ये होते. सदर बँक सामनेवाला फेडरल बॅंकेमध्‍ये विलीन झालेली आहे. विलीनीकरण झालेनंतर सामनेवाला बँकेने तक्रारदाराकडून खात सुरु ठेवणेसाठी अथवा नवीन खाते उघडणेसाठी कोणत्‍याही प्रकारचा फॉर्म किंवा अॅग्रीमेंट भरुन घेतले नाही. सदर गणेश बँकेच्‍या सेव्‍हींग पासबुकावरच व्‍यवहाराच्‍या नोंदी सुरु ठेवल्‍या. त्‍यामुळे नमुद सामनेवाला बँकेच्‍या नियम अथवा नियमावलीची माहिती तक्रारदारास नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचे सेव्‍हींग खातेवर कमीतकमी बॅलन्‍स चार्जेस नांवे टाकून सेवात्रुटी केलेली आहे. तसेच तक्रारदाराचे नमुद पासबुक फाडून नष्‍ट केले. तसेच निष्‍कारण पोलीसाची धमकी दिली.
 
           सामनेवाला बॅंकेने तक्रारदारास त्‍यांचे बँकेचा सेव्‍हींग खात्‍याचा अकौन्‍ट नंबर बदलून नवीन क्र. 249601031482 असा दिला. माहे मे-08 ते जून-10 अखेर प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळे आणि गरज न भासलेमुळे तक्रारदार बँकेत गेले नाहीत किंवा सदर खातेवर कोणताही व्‍यवहार केलेला नाही. दि.07/06/2010 रोजी पैशाची गरज भासली म्‍हणून रक्‍कम रु.33,168/- च्‍या ठेव पावतीवर रु.20,000/- कर्ज काढणेसाठी सामनेवाला बँकेत गेले असता बँकेच्‍या कौन्‍टरवरील सेवकाने सांगितले की सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर तिमाही सरासरी शिल्‍ल्‍क रु.1,000/- असणे जरुरीचे आहे. व खात्‍यावर शिल्‍लक त्‍यापेक्षा कमी असलेने गरजेपेक्षा रु.3,000/- जास्‍त काढून ते सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर शिल्‍लक ठेवावेत. परंतु त्‍यावेळी AQB (Average Quarterly Balance) कमी असल्‍यास काही दंड किंवा सेवा आकारणी लावला जाईल/जातो याची कल्‍पना बँकेतील कर्मचारी/मॅनेजर यांनी तक्रारदारास दिली नाही. तक्रारदाराने एफ.डी.वर रु.23,000/- कर्ज काढून त्‍यातील रु.3,000/- सेव्‍हींग अकौन्‍टवर शिल्‍लक म्‍हणून ठेवली.
 
           त्‍यानंतर दिड महिन्‍याने म्‍हणजे दि.22/07/2010 रोजी सदर एफ.डी.ची मुदत संपल्‍यामुळे ती वटविणेसाठी तक्रारदार पुन्‍हा बँकेत गेले व सदर एफ.डी.ची रक्‍कम सेव्‍हींग्‍ज खातेवर जमा करणेस सांगितले. त्‍याप्रमाणे एफ.डी.ची रक्‍कम रु.36,138/- सेव्‍हींग्‍ज खातेवर जमा केली. त्‍यातून रु.28,184/- इतकी रक्‍कम कर्जापोटी परतफेड केली व काही रक्‍कम स्‍वखर्चासाठी उचलली. सदर दिवशी पासबुकाच्‍या नोंदी अदयावत करुन देणेबाबत पासबुक कौन्‍टरवरील सेवीकेकडे दिले. काहीवेळानंतर पासबु‍क मागितले असता सदर पासबुक न देता फेडरल बँकेचे नवीन पासबुक तयार करुन दिले. सदर पासबुकात दि.11/08/2007 पासूनच्‍या नोंदी केलेल्‍या आहेत. जुने पासबुक सन 2001 पासूनच्‍या नोंदीचे होते. सदर पासबुकाची मागणी केली असता ते देण्‍यास नाकारलेने दि.27/07/2010 रोजी लेखी मागणी केली. मात्र सदर पासबुक तक्रारदाराचे संमत्‍तीने नष्‍ट केलेचे कळवले. मात्र सदर पासबुक नष्‍ट करणेस तक्रारदाराने संमत्‍ती दिलेली नव्‍हती. सामनेवाला निखालास खोटे बोलत आहे. सामनेवाला बँकेने दिलेल्‍या खातेउता-यामध्‍ये कमीतकमी बॅलन्‍स चार्ज या नावाने रक्‍कमा नांवे टाकले व त्‍याबरोबर व्‍याजाची आकारणी केलेली आहे व अशाप्रकारे रक्‍कमा नांवे टाकून 4, मार्च,2010 रोजी शिल्‍लक शून्‍य टाकून खाते संपुष्‍टात आणलेले आहे.
 
           सामनेवाला बँकेने 4,मार्च,2010 पासून 7जुन,2010 पर्यंत सदर दिवशी रक्‍कम भरेपर्यत 3 महिने खाते चालू ठेवले. सदर चार्जेस बाबत सामनेवाला बँकेने आधी किंवा नंतर काहीही कळवलेले नाही. गणेश बॅंकेच्‍या पासबुकाप्रमाणे खातेवर रु.10/- किमान‍ शिल्‍लक असने जरुरीचे होते. व सदर रक्‍कम वाढवून दर तिमाही रु.1,000/- इतकी कोणत्‍या तारखेपासून केली याची माहिती तक्रारदारास नाही व ती सामनेवाला बँकेने दिलेली नाही. यात सामनेवालांची सेवात्रुटी आहे. याबाबत तक्रारदाराने बँकेकडे व अन्‍य ऑथॉरिटीकडे तक्रार केलेली आहे. यामध्‍ये बँकींग ओम्‍डस यांनी दिलेला निकाल मला मान्‍य नाही. माझ्या मुलीला फोन करुन बोलवून घेऊन तिच्‍याकरवी पोलीसांना बोलवणेबाबतची धमकी दिलेली आहे. मात्र वय 73 वर्षे आहे. मी एकदा निशस्‍त्र, दु‍बळा, शारिरीक व्‍याधी असणारा आहे. सामनेवाला बँकेच्‍या मॅनेजरने निष्‍कारण धमकी देऊन अतोनात अपमान केला. रिझर्व बँकेच्‍या नियमाप्रमाणे तक्रारदारास न कळवता बेकायदेशीर रक्‍कम नांवे टाकून सेवात्रुटी केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करावी व रक्‍कम रु.2,397/- तक्रारदारास न कळवता परस्‍पर कमीत कमी चार्जेसपोटी नांवे टाकलेली रक्‍कम देणेबाबत हुकूम व्‍हावा. मॅनेजरने धमकी दिलेबाबत लेखी माफी मागावी. जुने पासबुक नष्‍ट केले नसल्‍यास परत मिळावी. रु.2,397/- रक्‍कम मॅनेजरच्‍या स्‍वत:च्‍या पैशातून दयावी. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,500/- सामनेवाला यांनी देणेबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीसोबत दि.06/03/02 ते 25/08/10 अकौन्‍ट तक्‍ता बँकेच्‍या पत्रासह, तक्रारदाराचे सामनेवाला यांना दिलेले पत्र, सामनेवालांचे पासबुकाची प्रत, तक्रारदाराने सामनेवालांचे कार्पोरेट ऑफिसला पाठवलेले पत्र, त्‍यांनी तक्रारदारास पाठवलेले पत्र, ओंम्‍बडसमन व्‍दारा रिझर्व्‍ह बॅंकेला पाठवलेले पत्र, रिझर्व्‍ह बँकेचे बँकींग ओम्‍बडसमन स्‍कीम 2006 चे बुकलेट चाप्‍टर 4, ओम्‍बडसमन यांना तक्रारदार यांनी पाठवलेले पत्र व त्‍यांचे तक्रारदारास आलेले पत्र, इंडियन बँक्‍स असोसिएशन यांना पाठविलेले तक्रारदार यांचे पत्र, सदर असोसिएशन यांनी तक्रारदारास सदर पत्राचे पाठविलेले उत्‍तर, सदर पत्रास फेडरल बँक आलुवा(केरळ) यांनी पाठवलेले पत्र, तक्रारदाराचे गणेश बॅंकेचे पेन्‍शन क्र.34 चे पासबुकाची प्रत, संयुक्‍त अकौन्‍ट क्र.2026 चे गणेश बँकेचे पासबुक प्रत, तक्रारदाराचे अकौन्‍टमधून वसुल केलेले सर्व्‍हीस चार्जेस, परताव्‍यासाठी मागणी केलेल्‍या रक्‍कमेचा तक्‍ता, सामनेवाला बँकेस तक्रारदाराने दि.07/01/2011 रोजी पाठवलेली नोटीस, त्‍यास बॅकेचे आलेले उत्‍तर इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.   
 
(4)        सामनेवालांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार मान्‍य केले कथनाखेरीज तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होत नाही. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केलेली नाही. सेव्‍हीग खातेवर नियमाप्रमाणे किमान शिल्‍लक ठेवणे बँकींग कायदा व रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार आवश्‍यक आहे. तक्रारदार हा निवृत्‍त सरकारी नोकरदार असून ज्‍येष्‍ठ नागरीक आहे. प्रस्‍तुतची तक्रार व्‍देष बुध्‍दीने व खोटेपणाने दाखल केलेली आहे. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदाराने वस्‍तुस्थिती दडवून ठेवलेली आहे. तक्रारदाराने विविध ठिकाणी तक्रारी केलेल्‍या आहेत. रिझर्व्‍ह बँक, बँकीग ओम्‍ब्‍डसमन 2006 नुसार तक्रारदाराची तक्रार नामंजूर केलेली आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार चालणेस पात्र नाही.
           सामनेवाला बँक ही बँकींग रेग्‍युलेशन अॅक्‍ट 1949 चे तरतुदी व रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार चालते. रिझर्व्‍ह बँकेकडून येणा-या विविध परिपत्रकांची अंमलबजावणी केली जाते. नियमाप्रमाणे सेव्‍हींग खातेवर वेळोवेळी निर्धारित केलेल्‍या नियमावलीनुसार किमान शिल्‍लक ठेवणे क्रमप्राप्‍त आहे अन्‍यथा सदर खातेवर सर्व्‍हीस चार्जेस लावता येतात. बराच कालवधीसाठी खात्‍यावर व्‍यवहार झालेनाही व किमान शिल्‍लक नसेल तर चार्जेस लावता येतात. त्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदाराचे सेव्‍हींग खातेवर रक्‍कमा नांवे टाकलेल्‍या आहेत. तक्रारदाराने बँकींग ओम्‍ब्‍डसमनकडे तक्रार दाखल केलेली होती. तशाच प्रकारची तक्रार इंडियन बँकर्स असोसिएशनकडे केलेली होती व पुन्‍हा तक्रारदाराने त्‍या स्‍वरुपाची तक्रार मे. मंचासमोर दाखल केलेली आहे. बँकींग रेग्‍युलेशन अॅक्‍ट सेक्‍शन 54 नुसार बॅंकेच्‍या हिताकरिता चांगल्‍या हेतूने केलेल्‍या कृतीसाठी त्‍यांचे अधिका-यांना जबाबदार धरता येणार नाही. सामनेवालांचे मॅनेजर यांना विनाकारण पक्षकार केलेले आहे. त्‍यांचेविरुध्‍द केलेला आरोपासाठी काटेकोर पुराव्‍याची गरज आहे. तक्रारदारास पोलीसांची धमकी दिलेली नाही. प्रस्‍तुत गणेश बँकेचे फेडरल बँकेत विलीनीकरण झालेले आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचा सेव्‍हींग अकौन्‍ट नं. 249601031482 असा आहे. तक्रारदाराने नियमाप्रमाणे खातेवर किमान शिल्‍लक ठेवलेले नाही. तक्रारदाराने स्‍वत:हून जुने पासबुक जमा केलेले आहे व तयाचे विनंतीवरुन जुने पासबुक नष्‍ट करुन नवीन पासबुक दिलेले आहे. सामनेवाला बँकेने दि.15/01/2011 रोजी त्‍याबाबत पत्र पाठवलेले आहे. सबब सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व कलम 26 प्रमाणे रक्‍कम रु.10,000/- सामनेवालांना देणेबाबत तक्रारदारास हुकूम व्‍हावा अशी विंनती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(5)        सामनेवालांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचा युक्‍तीवाद, सामनेवालांनी दाखल केलेली पुरसीस इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सदरची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे काय ?      --- होय.
2) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                 --- होय.
3) काय आदेश ?                                        --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1:- बॅंकींग सेवा सदर ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कक्षेतील बाब असलेमुळे सदर मंचास प्रस्‍तुत तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र येते. तसेच सामनेवाला यांनी प्रस्‍तुत तक्रारदारांनी याच स्‍वरुपाची तक्रार बँकींग ओम्‍ब्‍डसमन व इंडियन बँकर्स असोसिएशन यांचेकडे दाखल केलेली होती. त्‍यामुळे पुन्‍हा त्‍याच स्‍वरुपाची तक्रार मे. मंचात दाखल करता येणार नाही व सदरची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र नाही असा आक्षेप घेतलेला आहे. सदर बाबींचा विचार करता ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 3-The Provision of this Act shall be in addition to and not in derogation of the provisions of any other law for the time being inforce नुसार सदरची तक्रार या मंचात चालणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2:- तक्रारदाराचे गणेश बॅक ऑफ कुरुंदवाड, शाखा कोल्‍हापूर या बँकेत बचत खाते होते. नमुद बँक ही सामनेवाला बँकेत विलिनीकरन करणेत आली. सदर गणेश बँक ऑफ कुरुंदवाड ही सामनेवाला बँकेत विलीनीकरन झालेमुळे तक्रारदाराचे बचत खातेही नमुद सामनेवाला बॅंकेकडे वर्ग झाले ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराचे जुना बचत खाते नं.3148 असून सामनेवाला बँकेने नवीन सेव्‍हींग अकौन्‍ट नं. 249601031482 असा दिलेला आहे हे सामनेवाला यांनी मान्‍य केलेले आहे. मात्र प्रस्‍तुत कागदपत्रातील खाते उता-याचे अवलोकन केले असता तक्रारदाराचा सेव्‍हींग अकौन्‍ट नं.149601031482 असा दिसून येतो. 
 
           सामनेवाला बॅंकेने विलीनीकरण मान्‍य केलेले आहे. मात्र सदर विलीनीकरण कधी झाले याबाबत मौन बाळगले आहे. तक्रारदाराने त्‍याचे तक्रारीमध्‍ये ऑगस्‍ट ते सप्‍टेंबर-2006 चे दरम्‍यान विलीनीकरण झालेने नमुद केले आहे. सदर विलीनीकरण दरम्‍यान तक्रारदार व त्‍याचे मुलीचे नांवे एकत्रित असणारे सेव्‍हींग खातेचे जुने पासबुकावरच सामनेवाला बँकेने नोंदी केलेल्‍या होत्‍या व तक्रारीदरम्‍यान सामनेवाला बॅकेने जुने पासबुका ऐवजी दि.22/07/2010 रोजी सामनेवाला बँकेने त्‍यांचे नवीन पासबुक तकारदारास दिले. सदर पासबुकावर एंट्री या दि.11/08/2007 पासुनच्‍या दिसून येतात.       
 
           वस्‍तुत: विलीनीकरण झालेनंतर सामनेवालांनी तक्रारदाराकडून नवीन अकौन्‍ट घेताना खाते फॉर्म, नमुना सही कार्ड व अनुषंगीक कागदपत्रे भरुन घ्‍यावयास हवी होती ती भरुन घेतलेची दिसून येत नाही. तसेच सामनेवालांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये याबाबत स्‍पष्‍टपणे उल्‍लेख केलेला नाही. तक्रारदाराचे खाते ज्‍यावेळी गणेश बँकेत चालू होते त्‍यावेळी सेव्‍हींग खातेवर रक्‍कम रु.10/- इतकी दरमहा किमान शिल्‍लक ठेवणे आवश्‍यक होते. मात्र विलीनीकरणानंतर तक्रारदाराच्‍या सदर खातेवर व्‍यवहार झालेले आहेत व सदर व्‍यवहाराच्‍या नोंदी ब-याच कालावधीपर्यंत जुन्‍याच पासबुकावर नोंदी केलेल्‍या आहेत. तक्रारदारास सामनेवाला बँकेचे सेव्‍हींग खातेवरील किमान शिल्‍लकेच्‍या नियमाची माहिती नव्‍हती ही वस्‍तुस्थिती नाकारता येत नाही. केवळ विलीनीकरणामुळे तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक झालेला आहे. याचा अर्थ सामनेवाला बँकेने त्‍यांचे नियम व नियमावलीबाबत तक्रारदारास माहिती असलेबाबत अथवा सदर बाबीची माहि‍ती त्‍यास दिली असलेबाबत कथनाव्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब तकारदार कथन करतात त्‍याप्रमाणे सदर खाते फॉर्म भरुन घेतला असता व त्‍याचवेळी सामनेवाला बँकेचे नवीन पासबुक दिले असते तर तक्रारदारास नियमांची माहिती झाली असती व त्‍याप्रमाणे त्‍याने खातेवर किमान शिल्‍लक ठेवली असती. या तक्रारदाराचे कथनास पुष्‍टी मिळते.
 
     तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीमध्‍ये त्‍याचे प्रकृती अस्‍वास्‍थमुळे तक्रारदाराने मे-08 ते जुन-10 चे दरम्‍यान बॅंकेत गेला नसलेचे प्रामाणिकपणे कथन केलेले आहे. तक्रारदार 07/06/2010 रोजी पैशाची निकड भासलेमुळे सामनेवाला बॅकेत रु. 33168 च्‍या मुदतबंद ठेव पावतीवर रु.20,000/- इतके कर्ज काढणेचे उद्देशाने बँकेत गेले त्‍यावेळी कौन्‍टवरील सेवीकेकडून सेव्‍हींग खातेवर सरासरी शिल्‍लक रु.1,000/- असणे जरुरीचे असलेचे सांगितले व तक्रारदाराचे खातेवर सदर शिल्‍लकीपेक्षा कमी शिल्‍लक असलेने रु.3,000/- सेव्‍हींग खातेवर शिल्‍लक ठेवावेत असे समजूत करुन दिलेने तक्रारदाराने रु.20,000/- ऐवजी रु.23,000/- कर्ज काढून रु.3,000/- सेव्‍हींग खातेवर भरले व रु.20,000/- त्‍यांचे गरजेसाठी घेतले. दि.22/07/2010 रोजी तक्रारदार एफ.डी. वटवून सदर रक्‍कम सेवहींग खातेवर जमा करणेस गेला असता रु.33,138/- इतकी रक्‍कम सेव्‍हींग खातेवर जमा केली व त्‍यातून रु.28,184/- इतकी रक्‍कम कर्जाची परत फेड केली व त्‍याच दिवशी पासबुक अदयावत करुन देणेसाठी कौन्‍टरवर दिले असता सदर पुर्वीचेच पासबुक भरुन न देता नवीन पासबुक दिले. जुन्‍या पासबुकाची मागणी केली असता ते देण्‍यास नकार दिला व तदनंतर ते तक्रारदाराचे संमत्‍तीने नष्‍ट केलेचे सांगितले. सदर बाबीचा विचार करता वसतुत: जुने पासबुक जमा करुन नवीन पासबुक देणेबाबतची प्रक्रिया विलीनीकरणानंतर लगेचच करावयास हवी होती. ती न करता तसेच तदनंतरही तक्रारदाराकडून तसे लेखी न घेता व न कळवता तक्रारदाराचे पूर्वीचे पासबुक तक्रारदारास न देता नष्‍ट केले आहे व सदरचे पासबुक तक्रारदाराचे संमत्‍तीने नष्‍ट केलेबाबतचा कोणताही पुरावा सामनेवाला यांनी दिलेला नाही. वस्‍तुत: सदर पासबुक नष्‍ट करणेची कोणतीही गरज नव्‍हती. सदर पासबुकामध्‍ये असणा-या नोंदी सोडून पुढील नोंदीचे नवीन पासबुक देऊ शकले असते. परंतु तसे न करुन सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           सामनेवाला यांनी खाते फॉर्म व अनुषंगीक कागदपत्रे भरुन घेतलेली नाहीत. तसेच तक्रारदारास त्‍यांचे नियम व नियमावलीची माहिती देऊन ते माहित असलेचे अंडरटेकींग घेतलेले नाही. सबब सामनेवाला यांनी त्‍यांची सदर खातेची नियमावली तक्रारदारास दिलेचे सिध्‍द करु शकले नाहीत. तसेच पासबुकावर नियम छापलेले असता असे नियम त्‍यांचे पासबुकावर छापलेले होते व सदर पासबुक तक्रारदाराकडे होते असे दाखविणारा पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. सबब सामनेवालांचे नियम व नियमावलीची माहिती नसलेने व पूर्वीचे नियमाप्रमाणे रक्‍कम रु.10/- प्रतिमाह शिल्‍लक ठेवणेचे माहितीमुळे तो निर्धास्‍त राहिला. सदर परिस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी सदर खातेवर कमीत कमी चार्जेस नांवे टाकून सेवात्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब सामनेवाला यांनी त्‍यांचे नियम नियमावली तक्रारदारास माहिती न देता केवळ बॅंकेत नियमावलीचे बोर्ड लावलेले आहेत यावर त्‍यांची जबाबदारी झटकता येणार नाही. सामनेवालांचे वकीलांनी युक्‍तीवादाच्‍या वेळेस जुने पासबुक जमा करुन नवीन पासबुक देतेवेळी रु.1,000/-बॅलन्‍स ठेवणेबाबत सुचना दिलेचे कथन केलेले आहे याची न्‍यायीक नोंद हे मंच घेत आहे. तसेच तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीत सदर बाब मान्‍य केलेली आहे. तक्रारदाराने सदर याबाबत इंडियन बँक्‍स असोसिएशन व बँकींग ओम्‍ब्‍डसमन यांचेकडे तक्रार दाखल केली होतीम्‍हणून तक्रारदारास मे. मंचात तक्रार दाखल करता येणार नाही हा आक्षेप विचारात घेता येणार नाही. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारांनी स्‍वत:हून दि.27/06/2010 रोजी पासबुक जमा केले व पासबुक नष्‍ट करणेची संमत्‍ती दिली असे दि.15/01/2011 रोजी कळवलेचे दिसून येते मात्र याचा अर्थ पासबुक हे नोंदी अदयावत करणेसाठी दिलेले होते नाही की ते नष्‍ट करणेसाठी दिले होते हे उपरोक्‍त विवेचनावरुन स्‍पष्‍ट झालेले आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराचे सेव्‍हींग खातेवर कमीत कमी चार्जेस नावाखाली बेकायदेशीरपणे रक्‍कमा नांवे टाकून तसेच तक्रारदाराचे पासबुक नष्‍ट करुन सेवात्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           सामनेवाला बॅकेचे मॅनेजर यांनी तक्रारदारास पोलीसांची धमकी दिली व अपमान केला याबाबत कोणताही पुरावा नसलेने हे मंच सदर तक्रारीतील कथनांचा विचार करत नाही.
 
           दि.22/07/2010रोजी तक्रारदारास रु.1,000/-शिल्‍लक ठेवणेबाबत नियमाची माहिती झालेचे तक्रारदाराने मान्‍य केले आहे. सबब सदर कालावधीपूर्वी सामनेवाला बँकेने किमान शिल्‍लक चार्ज म्‍हणून टाकलेल्‍या रक्‍कमा तक्रारदारास परत कराव्‍यात. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे जुन पासबुक नष्‍ट केलेचे प्रतिपादन केले आहे. सबब सदर पासबुक नष्‍ट केले नसलेस ते परत मिळणेची मागणी मान्‍य करता येणार नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                                आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला यांनी तक्रारदाराचे बचत खाते नं.149601031482 वर दि.22/07/2010 पूर्वी नांवे टाकलेल्‍या किमान शिल्‍लक चार्जेस(Minimum Balance Charges) रक्‍कम तक्रारदारास परत करावी. 
 
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.500/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.500/- अदा करावेत.
 
 
 
                                                          
          
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT