Maharashtra

Raigad

CC/08/9

Neelema Pandharinath Kasar - Complainant(s)

Versus

Sr.Divisional Manager,L.I.C.of India,Mahad Branch - Opp.Party(s)

Adv.V.D.Kalke

26 May 2008

ORDER


District Forum Raigad, Alibag
District Consumer Disputes Redressal Forum, Block No 6 and 8,Patil Sadan,New by pass road,Chendhare, Alibag
consumer case(CC) No. CC/08/9

Neelema Pandharinath Kasar
...........Appellant(s)

Vs.

Sr.Divisional Manager,L.I.C.of India,Mahad Branch
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.

                                          तक्रार क्र. 9/2008.                                                           तक्रार दाखल दि.28-2-2008.                                                   तक्रार निकाली दि.24-6-2008.

 

श्रीमती निलीमा पंढरीनाथ कासार,

रा.चरई, कासारवाडी, पो.पोलादपूर,

जि. रायगड.                                 ...  तक्रारदार.

     विरुध्‍द

सिनियर डिव्‍हीजनल मॅनेजर,

भारतीय विमा जीवन निगम

(भारतीय आयुर्विमा महामंडळ),

कार्यालय-लक्ष्‍मी निवास, शिवाजी चौक,

मु.पो.तालुका महाड, जि. रायगड.                          ...  विरुध्‍द पक्षकार.

                           उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्‍हेत्रस, अध्‍यक्ष.

                                मा.सौ.ज्‍योती अभय मांधळे,सदस्‍या.

                       तक्रारदारातर्फे- अड.श्री.व्‍ही.डी.कळके.

                       सामनेवालेंतर्फे अड. श्री.आर.व्‍ही.ओक.

                              -निकालपत्र -

द्वारा- मा.अध्‍यक्ष, श्री.आर.डी.म्‍हेत्रस.  

 

1.           तक्रारदाराने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या तरतुदीअन्‍वये दाखल केली असून ती खालीलप्रमाणे आहे-

      तक्रारदार ही मयत पंढरीनाथ सिधू कासार याची पत्‍नी असून तो दि.16-7-05 रोजी नैसर्गिकरित्‍या मृत्‍यू पावला आहे.  मयत पंढरीनाथ याने त्‍याच्‍या हयातीत रक्‍कम रु.30,000/-चा विमा सामनेवाले कंपनीकडून उतरविला होता.  ती त्‍याची विमा पॉलिसी जनरक्षा नावाची आहे.  त्‍याची जन्‍मतारीख दि.12-4-79 आहे.  हा विमा दि.10-10-04 रोजी उतरविला असून पॉलिसी क्र.923158322 असा आहे.  विमा हप्‍ता हा सहामाही रु.618/- असून विमा पॉलिसीची मुदत 25 वर्षाची आहे.  विम्‍याची मुदत संपण्‍यापूर्वी मृत्‍यू झाल्‍यास विमाधारकाच्‍या वारसांना विमारक्‍कम व बोनस देण्‍यासंदर्भात ठरले आहे.  विम्‍याचे प्रमाणपत्र क्र.एल-0132213 असा आहे.  त्‍याने पॉलिसी उतरवल्‍यानंतर दि.14-12-04 पासून दि.14-6-05 अखेर दोन वेळचे विमा हप्‍ते भरलेले आहेत. 

 

2.          विमाधारक पंढरीनाथ कासार हा दि.16-7-05 रोजी मयत झाला आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवालेकडे विमा रकमेची मागणी केली.  विम्‍याचे प्रपोजल देतेवेळी विमाधारकाच्‍या प्रकृतीची तपासणी सामनेवालेंच्‍या डॉक्‍टरांनी केलेली असून प्रकृती चांगली असल्‍याची खात्री त्‍यांनी सामनेवालेना दिली.  वास्‍तविकतः ज्‍या विमाधारकाच्‍या प्रकृतीबाबत शंका असेल त्‍याचीच तपासणी केली जाते.  एरवी तपासणीची आवश्‍यकता नाही.  जनरक्षा विमा पॉलिसीला मेडिकल  तपासणीची आवश्‍यकता नसल्‍याचे सामनेवालेनी सांगितले होते.  मयत पंढरीनाथचा प्रपोजल फॉर्म सामनेवालेनी स्विकारुन त्‍याची मेडिकल तपासणी केल्‍यावर त्‍यांस कोणत्‍याही प्रकारचा जुनाट आजार नसल्‍याची खात्री पटल्‍यानंतरच त्‍याचा विमा उतरविला आहे.  तसेच त्‍याने वेळेचेवेळी हप्‍तेही भरले असल्‍यामुळे विमा कराराप्रमाणे त्‍याचा नैसर्गिक मृत्‍यू झाल्‍यामुळे तसेच त्‍यास कोणताही जुनाट आजार नसल्‍याने त्‍यानी कोणत्‍याही डॉक्‍टरांकडे तसा वैद्यकीय उपचार घेतलेला नाही.  

 

3.          मयत पंढरीनाथ यांस जुलै 2005 मध्‍ये वालावलकर हॉस्पिटलमध्‍ये पोटदुखीच्‍या आजारासाठी दाखल केले होते, त्‍यापूर्वी त्‍यास तसा कोणताही आजार नव्‍हता.  त्‍याला दारुचे किंवा अन्‍य व्‍यसन नव्‍हते.  या सर्व बाबी त्‍याने प्रपोजल फॉर्ममध्‍ये लिहून दिल्‍या आहेतच.  या हॉस्पिटलमध्‍येच त्‍याचे निधन झाले असून त्‍याचा मृत्‍यू नैसर्गिक आहे.  सामनेवाले हे विमारक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करीत आहेत, ते मयत पंढरीनाथ यांस जुनाट आजार होता असे कारण देत आहेत.  विमा उतरविताना त्‍यांनी तक्रारदारांस काही अडचण आल्‍यास ते त्‍यांची सर्व जबाबदारी घेणार आहेत व त्‍याचा त्रास त्‍यांना होणार नाही अशा भूलथापा देतात त्‍याप्रमाणे सामनेवालेंनीही दिल्‍या मात्र पॉलिसीची रक्‍कम देताना ते वेगळा पवित्रा घेत आहेत.   मयत पंढरीनाथ याच्‍या विम्‍याची रक्‍कम तो ज्‍या आजारामुळे गेला त्‍या कारणासाठी देण्‍यास ते नकार देत आहेत.  परंतु तक्रारदाराच्‍या मते सामनेवाले म्‍हणतात त्‍याप्रमाणे पंढरीनाथ याचा मृत्‍यू किडनी किंवा लिव्‍हर फेल्‍युअरमुळे झालेला नाही  असा निष्‍कर्ष काढता येणार नाही.  सामनेवाले रुग्‍णालयाचे कागदपत्राचे आधारे पंढरीनाथ याने त्‍यास पूर्वीपासूनच किडनीचा व आतडयाचा त्रास होता ही बाब त्‍याने कंपनीपासून लपवून ठेवली आहे.  हे लपवून त्‍यानी प्रपोजल फॉर्ममध्‍ये दडवून ठेवून विमा उतरवून घेतला आहे, त्‍यामुळे त्‍यांचा क्‍लेम त्‍यांनी मंजूर करण्‍याचे नाकारले आहे. 

 

4.          तक्रारदाराचे मते पंढरीनाथ हा प्रथमच जुलै 05 मध्‍ये पोटाच्‍या विकारासाठी डेरवणच्‍या हॉस्पिटलमध्‍ये दाखल झाला.  त्‍याने कोणत्‍याही प्रकारची माहिती जाणीपूर्वक प्रपोजलमध्‍ये दडवलेली नाही.  तक्रारदाराचा मृत्‍यू नैसर्गिक कारणाने झाला असल्‍याने त्‍याच्‍या वारसांना विमा पॉलिसीची रक्‍कम मिळणे आवश्‍यक आहे.  सामनेवालेंनी मयत पंढरीनाथाच्‍या पोटाचे कारण दाखवून व त्‍यांने कंपनीपासून माहिती दडवून पॉलिसी उतरवण्‍याचे खोटे कारण देऊन विमा रक्‍कम देण्‍याची टाळाटाळ केली आहे.  त्‍यांचे हे वर्तन म्‍हणजे सेवेतील त्रुटी असल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे आहे.  वास्‍तविकतः त्‍यांनी मयताची पॉलिसी सर्व खात्री करुनच दिली आहे.  आता रक्‍कम देण्‍याची वेळ आली तेव्‍हा सबबी पुढे करुन विमा रक्‍कम देण्‍याचे टाळीत आहेत व विमाधारक व त्‍यांचेदरम्‍यान झालेल्‍या कराराप्रमाणे ते वागत नसल्‍याने सामनेवालेकडून मयत पंढरीनाथ याच्‍या विमापॉलिसीची उतरविलेली रक्‍कम त्‍यांना बोनससह मिळावी, तसेच सामनेवालेंच्‍या या कृत्‍यामुळे त्‍यांना जो शारिरीक, मानसिक त्रास होऊन मनस्‍ताप सोसावा लागला व रक्‍कम मिळण्‍यासाठी ही तक्रार दाखल करावी लागली त्‍यासाठी त्‍यांनी रक्‍कम रु.10,000/-ची मिळण्‍याची जादा मागणी विमाकंपनीविरुध्‍द केली आहे.  तक्रारदारानी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत नि.4 अन्‍वये एकूण 4 कागद दाखल केले असून त्‍यात जनरक्षा पॉलिसीची प्रत, विमाहप्‍ता रक्‍कम भरल्‍याच्‍या पावत्‍या, सामनेवालेंनी तक्रारदारांस दि.23-2-06 रोजी विम्‍यासंबंधी दिलेले पत्र व सामनेवालेंनी तक्रारदारांना दि.31-3-06 व दि.7-4-06 रोजी दिलेली विम्‍यासंदर्भातील पत्रे, तसेच तक्रारदाराने त्‍यांच्‍या तक्रारीपृष्‍टयर्थ नि.5 अन्‍वये पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्रही दिले आहे. 

 

5.          तक्रार दाखल झाल्‍यावर नि.6 अन्‍वये सामनेवालेना नोटीस काढण्‍यात आली.  नोटीस मिळाल्‍यावर सामनेवाले हजर होऊन त्‍यांनी त्‍यांचे सविस्‍तर म्‍हणणे दिले, तसेच पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्रही नि.17 अन्‍वये दाखल केले आहे.  नि.16 अन्‍वये एकूण 1 ते 8 कागद दाखल केले असून त्‍यात प्रामुख्‍याने विमा प्रस्‍ताव, विमा पॉलिसी अटी व शर्ती, तसेच वालावलकर हॉस्पिटल यांचेकडे घेतलेल्‍या औषधोपचाराची कागदपत्रे, डॉ.पुजारी यांनी दिलेले प्रमाणपत्र, सिटीस्‍कॅन अहवाल इ.कागदांचा समावेश आहे. 

 

6.          सामनेवालेनी तक्रारदारांची तक्रार नाकारली असून मयताच्‍या नावाचा विमा होता ही बाब त्‍यांनी नाकारली नाही,परंतु त्‍यांनी सेवा देण्‍यात कोणत्‍याही प्रकारची न्‍यूनता दाखवली नाही, त्‍यामुळे तक्रारदारावर अन्‍याय होण्‍याचे कारण नाही, तसेच ते नुकसानीची कोणतीही रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाहीत.  तक्रारदारांचे सर्व आरोप त्‍यांनी अमान्‍य केले आहेत.  त्‍यांचे मते विमा कायदा कलम 45 अन्‍वये तक्रारदारांस ते रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाहीत.  मयत पंढरीनाथ याने विमा उतरवताना विमा प्रस्‍तावातील प्रश्‍नांना विशेषतः प्रश्‍न क्र.6 (1, 2, 3, 4) ला नकारात्‍मक उत्‍तरे दिली असून प्रश्‍न क्र.6/5चे उत्‍तर देताना सध्‍या प्रकृती चांगली असल्‍याचे म्‍हटले आहे व उत्‍तरे लिहीताना कोणतीही माहिती तक्रारदारानी दडवलेली नाही  या विश्‍वासावर विसंबून राहून त्‍यांचा विमा प्रस्‍ताव स्विकारलेला आहे.  परंतु सामनेवालेंना त्‍याची ही माहिती खोटी असल्‍याचे त्‍यांच्‍या तपासणीत आढळले आहे व ते पूर्वी याच रोगासाठी दोन वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्‍ये दाखल झाले होते ही बाब त्‍यानी लपवून ठेवल्‍याचे त्‍यांचे निदर्शनास आले आहे.  वालावलकर हॉस्पिटलच्‍या दि.11-7-05 च्‍या हिस्‍टरी शीटमध्‍ये मयत हा गेल्‍या पाच वर्षापासून अर्धी बाटली दारु घेतो असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे, तर विमा प्रस्‍तावात मयताने आपण दारु पीत नाही असे म्‍हटले आहे व हे विधान त्‍याने खोटे केल्‍याचे दिसते.  त्‍यांच्‍या या दारु पिण्‍याच्‍या सवयीमुळेच त्‍याला हा पोटाचा जुनाट विकार झाला होता.  त्‍यांचे मते दारुच्‍या सेवनाने किडनी व लिव्‍हर फेल्‍युअरसारखे रोग होतात तरी मयतास क्रॉनिक आजार नव्‍हता हे त्‍याचे कथन खोटे आहे.  त्‍याने उपचार हे त्‍यास झालेल्‍या तीव्र आजारापोटीच घेतले आहेत.  या एकाच बाबीवरुन त्‍याने सत्‍य लपवून विमा उतरवला आहे असे दिसते त्‍यामुळे तक्रारदार हिला विमा रक्‍कम देण्‍याचे सामनेवालेनी नाकारले आहे.  सामनेवाले कधीही भूलथापा करत नाहीत.  तक्रारदारांची तक्रार ही योग्‍य नाही तरी ती खर्चासह निकाली करण्‍यात यावी असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.   

 

7.                                          या कामी उभय पक्षकारांचे युक्‍तीवाद ऐकले, त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले.  त्‍यावरुन सदर तक्रारीच्‍या निराकरणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

मुद्दा क्र. 1 -   तक्रारदारांना सामनेवालेकडून सेवा देण्‍यात कमतरता झाली आहे काय?

उत्‍तर     -   होय.      

 

मुद्दा क्र.2  -   तक्रारदारांचा अर्ज त्‍यांच्‍या मागणीप्रमाणे मंजूर करता येईल काय?

उत्‍तर     -   अंतिम आदेशात नमूद केल्‍याप्रमाणे.

विवेचन मुद्दा क्र.1

8.          या कामी सामनेवालेंनी तक्रारदारांनी विमा पॉलिसी उतरवली होती किंवा त्‍यांचा मृत्‍यू झालेला नाही, तसेच त्‍यांनी विमा हप्‍त्‍यापोटी रकमा भरलेल्‍या नाहीत या गोष्‍टी नाकारलेल्‍या नाहीत.  त्‍यांनी तक्रारदारांचा अर्ज दि.30-3-06 व दि.7-4-06 च्‍या पत्राच्‍या उत्‍तराने नाकारला आहे.   त्‍यांनी त्‍यात असे कथन केले आहे की, मयताने ज्‍यावेळी विमा पॉलिसी घेतली त्‍यावेळी त्‍याने जो प्रपोजल फॉर्म दि.14-12-04 रोजी भरुन दिला होता त्‍यामध्‍ये त्‍यानी त्‍यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे नकारात्‍मक दिलेली असून त्‍यांनी त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत केलेल्‍या प्रश्‍नावलीची उत्‍तरे नकारात्‍मक दिली असून त्‍यांची सध्‍याची प्रकृती चांगल्‍या स्थितीत असल्‍याचे नमूद केले आहे.  परंतु त्‍यांना त्‍यांच्‍या तपासात असे आढळले की, त्‍यांनी दिलेली उत्‍तरे खोटी असून त्‍यांना गेल्‍या पाच वर्षापासून दारुची सवय आहे.  तसेच ते वर्षापूर्वी वालावलकर हॉस्पिटल यांचेकडे एका दिवसासाठी आंतररुग्‍ण म्‍हणून दाखल होते व तेथे त्‍यांनी उपचार घेतले आहेत.  त्‍यांनी महत्‍वाच्‍या बाबी त्‍यांच्‍यापासून लपवून ठेवल्‍यामुळे ते त्‍यांच्‍या वारसांना विम्‍याचे पैसे देऊ शकत नाहीत.  त्‍या पत्रासोबत त्‍यांनी अजून कागद जोडून पाठवून दिला होता असे त्‍यावरुन दिसते.  परंतु तो कागद तक्रारदारांनी यासोबत जोडलेला नाही. 

            केवळ या कारणासाठी त्‍यांनी क्‍लेम नाकारणे म्‍हणजे सेवेत कमतरता दाखवली आहे काय? याबाबत मंचाने विचार करता व कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे मत असे आहे की, मयताने वर्षापूर्वी एक दिवसासाठी हॉस्पिटलमध्‍ये आंतररुग्‍ण म्‍हणून औषधोपचार घेतले ही बाब जरी खरी असली तरी केवळ त्‍यांनी ही बाब लपवली म्‍हणून त्‍यांचा क्‍लेम नाकारता येईल काय?  त्‍यावेळी तो ज्‍या कारणासाठी हॉस्पिटलमध्‍ये दाखल झाला होता, त्‍यावेळी त्‍यांच्‍या रोगाचे निदान पुढीलप्रमाणे म्‍हणजे A Typical  Seizure हे होते व ते दि.11-7-04 रोजीचे आहे.  त्‍यानंतर तो मयत दि.11-7-05 रोजी म्‍हणजे सुमारे एका वर्षाने दाखल झाला.  त्‍यावेळचे कारण त्‍याच्‍या पोटात दुखत होते, उलटया होत होत्‍या, शिसारी येत होती असे कारण हिस्‍ट्री शीटमध्‍ये नमूद असून त्‍यावेळच्‍या त्‍याच्‍या हॉस्पिटलतर्फे केलेल्‍या सिटीस्‍कॅन तपासणीमध्‍ये त्‍यांस Acute Pancreatitis  झाला असे आहे.  त्‍याची ही तपासणी दि.12-7-05 रोजी सिटीस्‍कॅनद्वारे करण्‍यात आली आहे.  त्‍याचा मृत्‍यू दि.16-7-05 रोजी झाला आहे.  या कामी त्‍याचा मृत्‍यू नक्‍की कोणत्‍या आजाराने झाला आहे हे तक्रारदार व सामनेवाले या दोघांनीही दाखवून दिलेले नाही. परंतु ज्‍यावेळी सामनेवाले त्‍यांचा क्‍लेम नाकारतात व ते पोटाचे विकाराने पूर्वीपासूनच आजारी असल्‍याची वस्‍तुस्थिती होती ती त्‍याने प्रपोजलच्‍या वेळी लपवून ठेवली आहे.   त्‍यामुळे त्‍यांचा क्‍लेम नाकारण्‍यात आल्‍याचा युक्‍तीवाद सामनेवालेकडून  करण्‍यात आला.  त्‍यांनी युक्‍तीवादात ते सुमारे वर्षापूर्वी पोटदुखीसंदर्भात आजारी असलेल्‍या कारणामुळेच हॉस्पिटलमध्‍ये होता, तसेच त्‍यांस दारुची सवय होती व त्‍यांच्‍या या सवयीमुळेच त्‍यांना पुन्‍हा Acute Pancreatitis म्‍हणजे दारुच्‍या सवयीमुळे निर्माण झालेल्‍या रोगाच्‍या उपचारासाठी हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले व त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला आहे.  त्‍यामुळे त्‍यांची क्‍लेम नाकारण्‍याची कृती योग्‍य आहे, तसेच त्‍यांना तक्रारदाराच्‍या मयत पतीचा मृत्‍यू हॉस्पिटलमध्‍ये कोणत्‍या कारणाने झाला याबाबत वेगळे प्रमाणपत्र देण्‍याचे कारण नाही अथवा त्‍यांचेवर ती देण्‍याची जबाबदारी कायदयाने येत नाही असा युक्‍तीवाद त्‍यांनी केला.

            मंचाचे मते या तक्रारीत तक्रारदाराच्‍या पतीचा मृत्‍यू नक्‍की कोणत्‍या कारणाने झाला हे मंचापुढे येणे आवश्‍यक आहे, मंचाचे मते हे कारण दाखवण्‍याची जबाबदारी सामनेवालेंवर आहे कारण त्‍यांनी मयताने महत्‍वाच्‍या बाबी लपवून विमा उतरवून घेतला आहे.  त्‍यामुळे त्‍यांचा क्‍लेम नाकारण्‍याचा युक्‍तीवाद त्‍यांनी केला आहे.  मयताने महत्‍वाची बाब प्रपोजलमध्‍ये दाखवलेली नाही, हे जरी खरे असले तरी त्‍यासाठी क्‍लेम नाकारणे योग्‍य होणार नसल्‍याचे मंचाचे मत आहे, कारण एकदा प्रपोजल देऊन पॉलिसी इश्‍यू केल्‍यानंतर सामनेवालेंना प्रपोजलचे वेळी खोटी माहिती दिल्‍यामुळे ते क्‍लेम नाकारत आहेत, असे म्‍हणण्‍याचा अधिकार रहाणार नाही असे मंचास वाटते कारण त्‍यांनी पूर्ण खात्री करुनच क्‍लेम उतरवला आहे.  पॉलिसीधारकाने पॉलिसी ही भविष्‍यात आपला मृत्‍यू  झाल्‍यानंतर आपल्‍या वारसांना आपल्‍या नंतर काही रक्‍कम मिळावी या हेतूने पॉलिसी उतरवलेली असते व विशेषतः ही पॉलीसी अवैद्यकीय स्‍वरुपाची आहे.  अशा पॉलिसीत पॉलिसी अस्‍तीत्‍वात असताना पॉलिसीधारकाचा मृत्‍यू नैसर्गिकरित्‍या झाल्‍यास त्‍यांच्‍या वारसांना पॉलिसीची रक्‍कम देण्‍याची कायदेशीर जबाबदारी नियम व अटीनुसार त्‍यांचेवर आहे.  पॉलिसीच्‍या अटीचे व नियमांचे अवलोकन केले असता ज्‍या कारणास्‍तव सामनेवालेनी पॉलिसीची रक्‍कम देण्‍याचे नाकारले आहे, तशा स्‍वरुपाची अट कोठेही आढळून आली नाही त्‍यामुळे एकदा पॉलिसीधारकाचा मृत्‍यू झाल्‍यावर त्‍याच्‍या वारसांना सामनेवालेनी रक्‍कम दिली पाहिजे अशा मताचे मंच आहे.  प्रस्‍तुत प्रकरणी पॉलिसीधारकाचा मृत्‍यू हा पोटदुखीच्‍या आजाराने किंवा त्‍यांस दारुची सवय होती या कारणाने झाला आहे, असे जर सामनेवाले दाखवून देऊ शकले असते तर त्‍यांनी जे कारण दाखवले आहे, ते कारण योग्‍य व मृत्‍यूशी संलग्‍न असल्‍याचे म्‍हणता आले असते परंतु या तक्रारीत असे काही झाल्‍याचे मंचास दिसून आले नाही.  सबब अशा परिस्थितीत पॉलिसीधारकाच्‍या वारसांना सामनेवालेनी ज्‍या कारणास्‍तव क्‍लेम नाकारला आहे ते योग्‍य व समर्पक नाही.  त्‍यांची अशा प्रकारे क्‍लेम नाकारण्‍याची कृती म्‍हणजेच सेवेतील त्रुटी असल्‍याचे मंचाचे मत आहे. 

            या कामी सामनेवालेनी मंचाचे लक्ष मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी तसेच तामिळनाडू राज्‍य आयोग यांनी पुढे नमूद केलेल्‍या निर्णयाकडे वेधले.  

1.         I (2008) CPJ 133 (NC)

            Hon'ble Mr.Justice S.N.Kapoor, Presiding Member & Mr.B.K.Taimni, Member

            SABNAM DEVI & OTHERS    ……..  Petitioners.

                        V/s.

            LIC OF INDIA & ORS.              ……… Respondents.

            Revision Petition No.1878 of 2007- Decided on 31.10.2007.

 

2.         I (2008) CPJ 144

            Hon'ble Thiru Justice K.Sampath, President & Theru Pon.Gunasekaram, Member.

            V.NALINA                                  ………. Appellant.

                        V/s.

            LIC OF INDIA & ANR.              ………  Respondents.

            A.P.No. 12 of 2003 ----      Decided on 3.4.2007.

 

            मंचाचे मते मा.राष्‍ट्रीय आयोगाने वर नमूद केलेल्‍या निर्णयात दिलेले मार्गदर्शक तत्‍व प्रस्‍तुत प्रकरणी लागू होणार नाहीत, तसेच दुस-याही निर्णयातील तत्‍व लागू होणार नसल्‍याचे मंचाचे मत आहे.  मा.राज्‍य आयोग, तामिळनाडू यांनी या प्रकरणाचा निर्णय देतेवेळी ब-याच निर्णयांचा आधार घेऊन निर्णय दिला आहे व त्‍यात त्‍यांनी पॅरा.14 मध्‍ये पुढीलप्रमाणे नमूद केले आहे.-  The decisions are either way. Each case must depend on the facts and circumstances in that particular case. असे नमूद करुन त्‍यांनी त्‍या निर्णयाचा निकाल दिला आहे.  मंच या निर्णयातील वरील तत्‍वाचा आधार घेत आहे.

      मंचाचे मते या तक्रारीच्‍या निर्णयासाठी सामनेवालेंनी क‍थित करुन ते ज्‍या कारणास्‍तव तक्रारदारांचा क्‍लेम नाकारत आहेत ते विचारात घेणे आवश्‍यक आहे.  मंचाचे मते तक्रारीच्‍या निर्णयासाठी सामनेवालेनी जे कारण कथित केले आहे त्‍या कारणामुळे मृत्‍यू झाला आहे असे दिसले तर क्‍लेम नाकारणे योग्‍य होईल.    परंतु या कामी मयताचा मृत्‍यू कशाने झाला याचे कारण सामनेवालेनी पुढे आणलेले नाही.   सामनेवालेंची पॉलिसी देण्‍याची किंवा मंजूर करण्‍याची पध्‍दत जरी Utmost good faith वर जरी अवलंबून असली तरी प्रत्‍येक प्रकरणातील हकीगत ही वेगवेगळी असते.  मंच या कामी पुढील निर्णयाचा आधार घेत आहे-

 I (2005) CPJ 781 – UNION TERRITORY CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, CHANDIGARH.

            Hon'ble Mr.Justice K.K. Srivastava, President, Maj.Gen. S.P.Kapoor & Mrs.Devinderjit Dhatt, Members.      

            LIFE  INSURANC E CORPORATION OF INDIA      …. Appellant.

                                    V/s.

            JASBIR  KAUR                                                              ….. Respondent.

            Appeal No. 41 of 2005- Decided on 25-2-2005.

 

            वरील निकालपत्रात पुढे दिल्‍याप्रमाणे नमूद केले आहे-        

 

The District Forum held that the repudiation of the claim solely on the basis of the history  recorded on the hospital record is arbitrary  and  illegal  and thus  non-settlement of claim on that account amounts to deficiency in rendering service.  It  was held that the O.P's  neither produced any affidavit on record from the doctor who recorded the history nor the said doctor was examined, thus it was further held that the assertion was purely based on the history, which was unsupported by the statement of witnesses and this in no way challenged legally the averments made in the affidavit of the respondent / complainant.  या कामी सुध्‍दा यात नमूद केल्‍याप्रमाणेच झाले आहे. 

            तसेच मंच खालील निर्णयांचा आधार घेत आहे.

 

1.         I (2007) CPJ 225 (NC)

            NATIONAL CONSUMER DISPUTE S REDRESSAL COMMISSION, NEW DELHI.

            Hon'ble Mr.Justice K.S.Gupta, Presiding Member & Dr.P.D.Shenoy, Member.

            INDRADO SAW                    … Petitioner.

                        V/s.

            R.P. PATNAYAK                   … Respondent.

            Revision Petition No.3216 of 2006- Decided on 15-1-2007.

 

2.         I (2007) CPJ 275 (NC)

            NATIONAL CONSUMER  DISPUTES  REDRESSAL COMMISSION, NEW DELHI

            Mrs. Rajyalakshmi Rao, Presiding Member.

            L.I.C. OF INDIA                       …. Petitioner.

                        V/s.

            TEJALBEN  KANANBHAI  PATEL ….  Respondent.

            Revision Petition No. 3751 of 2006 – Decided on 19-12-2006.

      पैकी निर्णय क्र.1 मध्‍ये पुढील मार्गदर्शक तत्‍व दिले आहे-

      No nexus between cause of death and aliments -  o.p. liable.

            दुस-या निर्णयामध्‍ये Cold- fever- not relevant – insurer  liable.  म्‍हणजेच किरकोळ बाबी लपवून ठेवल्‍या म्‍हणजे Material fact  लपविली असा त्‍याचा अर्थ होत नाही.

      या सर्व बाबींवरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवालेकडून तक्रारदारांना सेवा  देण्‍यात त्रुटी झाली आहे.  त्‍यांनी महत्‍वाची बाब लपवून तक्रारदारांची मागणी नाकारली हे कृत्‍य म्‍हणजे सेवतील त्रुटी असल्‍याचे मंचाचे मत आहे, म्‍हणून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होय असे आहे. 

 

विवेचन मुद्दा क्र.2.

9.          जर सेवा देण्‍यात त्रुटी असल्‍याचे आढळले तर तक्रारदारांचा अर्ज मंजूर करता येईल.  प्रस्‍तुत प्रकरणी सामनेवालेकडून सेवा देण्‍यात त्रुटी झाली असल्‍याचे मंचाचे मत आहे.  सामनेवालेनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारण्‍यास दिलेले कारण मंचास योग्‍य व समर्थनीय वाटत नाही.  तक्रारदार ही मयताची पत्‍नी आहे.  तिने सामनेवालेकडून पॉलिसीची होणारी सर्व रक्‍कम बोनससह मिळण्‍याची विनंती केली आहे, तसेच तिला जो शारिरीक मानसिक मनस्‍ताप सामनेवालेंच्‍या कृत्‍यामुळे झाला त्‍यापोटी तिने रु.10,000/-ची मागणी केली असून इतर योग्‍य ते आदेश होण्‍याची विनंती केली आहे.  मंचाचे मते तिची ही मागणी अमान्‍य करण्‍यास काही कारण नाही.  वास्‍तविकतः त्‍यांनी ज्‍या कारणास्‍तव क्‍लेम नाकारला आहे ते कारण मंचास योग्‍य वाटत नसल्‍याने तिचा अर्ज मंजूर करावा व सामनेवालेंनी तिला पॉलिसीची रक्‍कम रु.30,000/-बोनससह दयावी, तसेच त्‍यांनी वेळेत रक्‍कम न दिल्‍याने तक्रारदार हिने त्‍यांचेकडे मागणी केल्‍या तारखेपासूनच्‍या म्‍हणजेच दि.23-2-06 पासून ते रक्‍कम पूर्ण देईपर्यंत द.सा.द.शे 8%प्रमाणे व्‍याज दयावे तसेच तिला सामनेवालेंकडून तिला झालेल्‍या मनस्‍ताप व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- दयावेत व अर्जाचा खर्च म्‍हणून तिला रु.2,000/-दयावेत या निष्‍कर्षाप्रत मंच आले आहे. 

            सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येतो-

                              -ःअंतिम आदेश ः-

      सामनेवालेंनी खालील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे-

अ)   सामनेवालेनी तक्रारदार हिला तिच्‍या मयत पतीने उतरविलेल्‍या पॉलीसी क्र.923158322 चे पोटी रक्‍कम रु.30,000/- (रु.तीस हजार मात्र)  बोनससह दयावेत.

ब)   वरील सर्व रकमेवर सामनेवालेनी तक्रारदार हिला द.सा.द.शे. 8 %प्रमाणे नुकसानीदाखल व्‍याज दि.23-6-08 पासून ते सर्व रक्‍कम अदा करेपर्यंत दयावे.

क)   सामनेवालेनी तक्रारदार हिला तिला झालेल्‍या शारिरीक मानसिक त्रासापोटी रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) दयावेत.

ड)   सामनेवालेनी तक्रारदार हिस न्‍यायिक खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) दयावेत.

इ)   वर कलम क मधील रक्‍कम आदेशाप्रमाणे न दिल्‍यास ती सामनेवालेकडून द.सा.द.शे. 8% दराने वसूल करण्‍याचा अधिकार तक्रारदार हिला राहील.

फ)   सामनेवालेनी स्‍वतःचा खर्च स्‍वतः सोसावा.

ग)   सदर आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना पाठविण्‍यात याव्‍यात.

ठिकाण- रायगड-अलिबाग.

दिनांक- 24-6-2008.

                   (आर.डी.म्‍हेत्रस)          (ज्‍योती अभय मांधळे)

                  अध्‍यक्ष                   सदस्‍या

               रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,अलिबाग.