Maharashtra

Nagpur

CC/11/271

Shri Mahesh Dadaji Kagadi - Complainant(s)

Versus

Sr. Manager (CRLD) Uninon Bank of India - Opp.Party(s)

Adv. H.S. Kokhurkar

02 Nov 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/271
 
1. Shri Mahesh Dadaji Kagadi
Kesarinanadan Nagar, Urjanagar, Tadoba Road,
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sr. Manager (CRLD) Uninon Bank of India
Office- 34/2, Ashirwad Commercial Complex, Centra Bazar Road, Ramdaspeth,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

सौ. जयश्री येंडे, मा. सदस्‍य यांचे कथनांन्‍वये. 
 
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 02/11/2011)
 
 
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, मा. राज्‍य आयोग, मुंबई यांचे दि. 16.05.2011 चे आदेशांन्‍वये सदर प्रकरण हे नागपूर जिल्‍हा ग्राहक मंचात स्‍थानांतरीत करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याच्‍या  तक्रारीचा आशय असा आहे की, तक्रारकर्ता हा एक छोटा व्‍यवसायी असून त्‍याने मागणी वाहतूक करण्‍याकरीता गैरअर्जदार बँकेच्‍या यवतमाळ शाखेकडून MH 29 C 4623 या क्रमांकाचा ट्रॅक्‍टर लिलावात जास्‍त बोली लावून रु.2,45,000/- एवढया किमतीत दि.09.02.2007 रोजी विकत घेतला व त्‍याचदिवशी तक्रारकर्त्‍याला ट्रॅक्‍टरचा ताबा मिळाला. लिलाव झाल्‍यानंतर व रक्‍कम दिल्‍यानंतर सदर ट्रॅक्‍टर हा बँकेच्‍या नावावर नव्‍हता हे गैरअर्जदार बँकेने तक्रारकर्त्‍यास सांगितले.
 
2.                ब-याच चकरा मारुनही व वारंवार विनंती करुनही गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यास सदर वाहनाची परिवहन कार्यालयाच्‍या नोंदीकरीता आवश्‍यक असलेली कागदपत्रे उदा. आर.सी.बुक, टॅक्‍स बुक,  इंशूरंस इ. दिले नाहीत, त्‍यामुळे तका्ररकर्त्‍याला वाहन वापरता आले नाही व बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तक्रारकतरर्ूाने गैरअर्जदाराचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथेही ब-याच चकरा मारल्‍या व वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. परंतू उपयोग झाला नाही. सरतेशेवटी दि.29.08.2008 रोजी गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्त्‍याच्‍या सदर गाडीचे कागदपत्रे उशिरा दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला वाहन व्‍यवसायाकरीता वापरता आले नाही व त्‍याचे नुकसान झाले. करीता तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार या मंचापुढे दाखल केलेली आहे.
3.                गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी उत्‍तरात व प्रतिज्ञापत्रात, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 2 कडून लिलावामध्‍ये रु.2,45,000/- किमतीमध्‍ये सदर ट्रॅक्‍टर क्र. MH 29 C 4623 विकत घेतला होता हे मान्‍य केले, परंतू इतर आरोपाचे खंडन केले. गैरअर्जदाराचे मते ही तक्रार ग्राहक मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या व्‍यवहार हा गेरअर्जदार क्र. 2 यांचेशी झालेला असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा तक्रारकर्त्‍याशी कुठलाही संदर्भ नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला सदर वाहन स्‍थानांतरीत करण्‍याकरीता संपूर्ण सहकार्य केले. आर.टी.ओ.फॉर्मवर सह्या केल्‍या. तसेच वाहन आर.टी.ओ.मधून स्‍थानांतरीत करण्‍याची जबाबदारी तक्रारकर्त्‍याने घेतली होती. या कारणास्‍तव गैरअर्जदारांनी कुठलीही सेवेतील कमतरता दिलेली नाही व तक्रार खारीज करण्‍याची विनंती गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी केलेली आहे.
 
4.                सदर प्रकरण मंचासमोर युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर मंचाने गैरअर्जदारांचा युक्‍तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
5.                प्रकरणातील दस्‍तऐवजांवरुन असे दिसते की, निर्विवादपणे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 2, यवतमाळ शाखा यांचेकडून MH 29 C 4623 या क्रमांकाचा ट्रॅक्‍टर लिलावात बोली लावून रु.2,45,000/- या किमतीत दि.09.02.2007 रोजी विकत घेतला होता. दस्‍तऐवजावरुन असेही दिसते की, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराकडे वारंवार सदर वाहनाच्‍या हस्‍तांतरणाकरीता आवश्‍यक असलेली कागदपत्रे उदा. आर.सी.बुक, टॅक्‍स बुक,  इंशूरंस इ. ची मागणी केलेली होती. वरील तक्रारकर्त्‍याची तपासणी व साक्षीदार सौ. मंगला महेश कामडी यांचे शपथेवरील सरतपासणीवरुन सिध्‍द होते की, सदर ट्रॅक्‍टर लिलावात विकत घेतल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वारंवार गैरअर्जदाराकडे सदर वाहन त्‍याचे नाव आर.टी.ओ.मधून स्‍थानांतरीत करण्‍याकरीता आवश्‍यक असलेल्‍या कागदपत्राची मागणी केलेली होती. परंतू गैरअर्जदार क्र. 2 ती कागदपत्रे तक्रारकर्त्‍यास सुपूर्द करु शकले नाहीत.
6.                गैरअर्जदाराचे दि.25.03.2008 चे पत्रावरुन असे दिसते की, दि.15.03.2008 रोजी गैरअर्जदार क्र. 2 ने आर.टी.ओ.यवतमाळ येथे रु.200/- भरुन सदरचे वाहन बँकेचे नावे स्‍थानांतरीत करण्‍याची प्रक्रीया सुरु केली. यावरुन असे सिध्‍द होते की, गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदर वाहन बँकेचे नावे स्‍थानांतरीत करण्‍याची प्रक्रीया सुरु केली व गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदर वाहन स्‍थानांतरीत करण्‍यास बराच विलंब लावला.
 
7.                वाहनाची कागदपत्रे न मिळाल्‍याने वाहन तक्रारकर्ता स्‍थानांतरीत करु शकले नाही व योग्‍य कागदपत्रांशिवाय वाहन चालविणे शक्‍य नव्‍हते. वरिल वस्‍तूस्थितीवरुन असे दिसते की, कागदपत्रे देण्‍यास विलंब करुन गैरअर्जदार क्र. 2 यांनी सेवेतील कमतरता दिली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी दिलेल्‍या सेवेत कुठलाही दोष दिसून येत नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या नुकसानाकरीता त्‍यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येत असून गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसान भरपाईदाखल रु.50,000/- द्यावे.
2)    गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारीच्‍या खर्चापोटी तक्रारकर्त्‍याला रु.3,000/- द्यावे.
3)    गैरअर्जदार क्र. 1 व 3 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
4)    उपरोक्‍त आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 2 यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.