SMT ASHVINI ANIL MANE filed a consumer case on 16 Jan 2016 against SR. DIV. MANAGER ICICIPRUDENSIAL LIF INS in the Satara Consumer Court. The case no is CC/14/94 and the judgment uploaded on 22 Feb 2016.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 94/2014.
तक्रार दाखल ता.13-6-2014.
तक्रार निकाली ता.16-1-2016.
श्रीमती आश्विनी अनिल माने,
रा.मु.पो.कुंभारगाव, मानेची वाडी,
पाटण, ता.पाटण, जि.सातारा. ....तक्रारदार.
विरुध्द
1. सिनियर डिव्हीजनल मॅनेजर,
आय.सी.आय.सी.आय.प्रुडेंशियल लाईफ
इन्शु.कराड शाखा. तळबाग, लाहोटी प्लाझा,
दुसरा मजला, पोपटभाई पेट्रोलपंपाशेजारी,
शनिवार पेठ, कराड, ता.कराड, जि.सातारा.
2. सिनियर डिव्हीजनल मॅनेजर,
आय.सी.आय.सी.आय.प्रुडेंशियल लाईफ
इन्शु. सेक्टर ऑफिस इन्शुरन्स ओंबडसमन
यांचे ऑफिस, तिसरा मजला, जीवनसेवा,
अँनेक्स एस.बी.रोड, सांताक्रुझ-पश्चिम,
मुंबई 400 050. ..... जाबदार.
तक्रारदारतर्फे – अँड.व्ही.पी.जगदाळे
जाबदार 1 व 2 तर्फे- प्रतिनिधी.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यांनी पारित केला.)
1. यातील अर्जदारानी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे यातील जाबदारांनी केलेल्या सेवेतील त्रुटीबाबत दाखल केली आहे.
2. अर्जदारांचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे-
प्रस्तुत तक्रारदार या कुंभारगाव, मानेची वाडी, पाटण, ता.पाटण, जि.सातारा येथील रहिवासी आहेत. जाबदारांचे प्रतिनिधी यांनी या तक्रारदारांचे पतीशी संपर्क साधून त्यांना जाबदारांचे विमा पॉलिसीबाबत माहिती दिली व प्लॅन समजावून सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराचे पती अनिल माने यानी जाबदारांचा गॅरेंटीड सेव्हींग्ज इन्शुरन्स प्लॅन UNI 10SN114V01 या प्रकारची पॉलिसी घेतली. या पॉलिसीचा क्रमांक 15395440 असा असून विमा कालावधी 15 वर्षाचा होता व विमा जबाबदारी दि.19-4-2011 रोजी सुरु होत होती व पॉलिसी नियमाप्रमाणे शेवटचा हप्ता भरणेची मुदत दि.19-4-2017 अशी होती. एकूण 7 वार्षिक हप्ते भरावयाचे व विमा रक्कम रु.1,73,600/- इतकी होती. या पॉलिसीचा प्रिमियम वार्षिक स्वरुपाचा असून सुरुवातीचा प्रिमियम रु.25,055/- प्रमाणे होता. तक्रारदारानी जाबदार क्र.1 कडे एकूण तीन वार्षिक हप्ते भरले. दरम्यानचे काळात पॉलिसीधारक तक्रारदाराचे पती दि.4-2-2014 रोजी ह्दयविकाराने निधन पावले. मृत्यूसमयी त्यांचे वय 32 वर्षे होते. त्यांना एक लहान मूल आहे. पतीचे मृत्यूपश्चात यातील तक्रारदार हिने जाबदाराकडे पॉलिसीचे नियमाप्रमाणे पतीची मृत्यूभरपाई जाबदारानी करावी असा दावा क्लेम फॉर्म भरुन जाबदाराकडे सादर केला. त्याप्रमाणे यातील तक्रारदाराना तिचे पतीचे मृत्यूदावा भरपाईपोटी रु.83,022/-(रु.त्र्याऐंशी हजार बावीस मात्र) अशी रक्कम जाबदारानी अदा केली. परंतु प्रत्यक्षात पॉलिसीच्या अटी व नियमाप्रमाणे यातील जाबदारानी या तक्रारदाराना रक्कम रु.25,055/-ची दहा पट रक्कम रु.2,50,500/- (रु.दोन लाख पन्नास हजार पाचशे मात्र)ची रक्कम तीन वर्षाचा बोनस प्रतिवर्ष रु.7,000/- प्रमाणे रु.21,000/- असे एकूण रु.3,46,665/- त्यावर द.सा.द.शे.5 टक्केप्रमाणे व्याज यातून जाबदारानी तक्रारदाराना अदा केलेली रक्कम रु.83,022/- वजा जाता रु.2,63,643/- मिळणे आवश्यक होते, परंतु सदर जाबदारानी तक्रारदाराना दिलेल्या प्लॅनप्रमाणेच प्लॅन असलेल्या पॉलिसीज अन्य ग्राहकाना विकताना त्यांना वेगळे नियम व या तक्रारदाराना तक्रारदाराचे मृत्यूपश्चात फक्त भरलेले हप्ते व त्यावर द.सा.द.शे.5 टक्के व्याज देणे अशा प्रकारचे नियम वापरले असून जाबदारानी त्यांचे व्यवसायात अनुचित व्यापारी प्रथेचा वापर करुन तक्रारदारांची फसवणूक केली आहे व तक्रारदारास जाणीवपूर्वक तिच्या पतीच्या मृत्यूची मिळणारी भरपाई खोटया नियमांचा व अटींचा कागद पुढे करुन त्यांची कायदेशीर वैध भरपाई देणेचे टाळून तक्रारदार हिस सदोष सेवा दिली असल्याने या तक्रारदार हिने मे.मंचात तक्रार दाखल करणेपूर्वी वकीलांतर्फे दि.10-4-2014 रोजी नोटीस देऊन मयत अनिल माने यांचे मृत्युनुकसानीची वैध मागणी कळवून ती त्वरीत पॉलिसीधारकाची कायदेशीर वारस या नात्याने त्यानी, पॉलिसीमधील लाभ पॉलिसीची धारकाने त्याचे मृत्यूपश्चात ज्या लाभार्थीला रक्कम देणेचे नमूद नाव म्हणजेच तक्रारदार हिचे नाव नोंद असून तिला द्यावेत अशी मागणी केली. परंतु जाबदारानी प्रकरणी नि.5/2 च्या Your Policy Highlights मधील तरतूद (Terms & Conditions) दाखवून त्याप्रमाणे तक्रारदाराना दिलली रक्कम बरोबर असून जाबदारानी तक्रारदाराप्रती कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही, सदोष सेवा दिलेली नाही असे उत्तर जाबदारानी तक्रारदारांचे वकीली नोटीसीला दिलेले आहे, त्यामुळे त्यावर नाराज होऊन प्रस्तुत तक्रारदाराने या जाबदारांनी ग्राहक या नात्याने केलेल्या फसवणुकीविरुध्द व सेवेतील त्रुटीविरुध्द अनुचित व्यापारी प्रथेच्या वापराबाबत मे.मंचात तक्रार दाखल करुन जाबदाराविरुध्द दाद मागितली आहे व प्रस्तुत जाबदाराकडून अद्याप भरपाई करावयाची रक्कम रु.2,63,643/- त्यावर द.सा.द.शे.5 टक्के व्याजाने होणारी संपूर्ण रक्कम व त्या रकमेवर द.सा.द.शे.18 टक्के दराने रक्कम पदरी पडेपर्यंतच्या व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- जाबदाराकडून तक्रारदारास मिळावेत अशी विनंती मे.मंचास केलेली आहे.
3. प्रस्तुत तक्रारदारानी प्रकरणी नि.1 कडे तक्रारअर्ज, त्याचेपृष्टयर्थ नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे तक्रारदार या अँड.विकास जगदाळे या वकीलांतर्फे हजर झाल्या. त्यांचे वकीलपत्र नि.5 सोबत नि.5/1 कडे तक्रारदारांच्या पॉलिसीची पॉलिसी किट कव्हर, नि.5/2 कडे पॉलिसी हायलाईटस- सर्वसाधारण नियम चा दस्तऐवज, नि.5/3 कडे पॉलिसी क्र.15395440 व त्याचेबरोबर पॉलिसीचे नियम व अटींसह पान क्र.20 ते 23, नि.5/4 कडे तक्रारदाराने जाबदाराकडे भरलेला प्रपोजल फॉर्म (पान क्र.24 ते 26)नि.5/5 कडे ग्राहकांचे शंकासमाधान करणेसाठी जाबदारानी तयार केलेली प्रश्नावली, नि.5/5 कडे विमेदार श्री.आबासाहेब विष्णु बोटरे, रा.चिखलवाडी,ता.पाटण, जि.सातारा यानी तक्रारदारानी घेतलेल्या पॉलिसीप्रमाणे घेतलेल्या पॉलिसीचे पॉलिसी किट, नि.5/7 कडे पॉलिसीच्या अटी व शर्ती, नि.5/8 कडे पॉलिसी क्र.16609829 चे पॉलिसी सर्टिफिकेट व त्याचेबरोबर पान क्र.34 ते 36 पॉलिसीच्या नियम व अटी व पैसे भरलेची पावती, नि.5/15 कडे तक्रारदाराचे आय.डी.बी.आय.बँकेकडील बचत खात्याचा उतारा, नि.5/16 कडे विमेदार श्री.अनिल लक्ष्मण माने यांचे मृत्यूचा उतारा, नि.5/17 कडे मयत विमेदार रक्कम रु.1,75,000/-च्या विम्यावर 15 वर्षे मुदतीसाठीच्या पॉलिसीबाबत श्री.माने यांचे सदरच्या स्कीमच्या पॉलिसीबाबत जाबदार त्याना एकूण 15 वर्षे मुदतीत प्रतिवर्ष किती बोनस देईल, मॅच्युरीटी अँडीशन्सपोटी किती रक्कम देईल याचे माहितीपत्रक, नि.5/17 कडे तक्रारदारानी जादबाराना वकीलामार्फत दिलेली नोटीस, सदर नोटीस जाबदाराना मिळालेची पोस्टाची पावती, नि.5/18 कडे, नि.5/20 कडे वरील वकील नोटीसीला जाबदारानी दिलेली उत्तरी नोटीस इ.दस्तऐवज पुराव्यासाठी प्रकरणी दाखल केलेले आहेत.
4. यातील जाबदाराना मे.मंचातर्फे रजि.पोस्टाने नोटीसा पाठवणेत आल्या. सदर नोटीसा जाबदाराना मिळाल्या, त्याप्रमाणे जाबदार क्र.1 व 2 हे त्यांचे वकील अँड. अरुण वाघ हे नि.10 कडे प्रकरणी वकीलपत्र दाखल करुन हजर झाले. त्यांनी त्यांचे म्हणणे नि.12 कडे व त्याचे पृष्टयर्थ नि.12 कडे प्रतिज्ञापत्र, नि.13 कडे मुखत्यारपत्र, नि.15 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.16 कडे युक्तीवाद दाखल केला असून नि.18 ला पुरावा संपलेची पुरसीस, नि.19 कडे लेखी युक्तीवाद इ.कागदप दाखल केले असून त्यांचे तक्रारदारांचे तक्रारीस खालीलप्रमाणे आक्षेप दाखल केले आहेत.
तक्रारदारांचा अर्ज मंजुरीस पात्र नाही, प्रस्तुत जाबदारानी तक्रारदाराना जाबदारानी 5 टक्के व्याजासह नियमाप्रमाणे रिफंड दिलेला आहे. तक्रारदाराचे विषयांकित पॉलिसीच्या अटी व शर्तीच्या कलम 2.4 Guaranteed Maturity benefit (GMS) In the unfortunate event of death of life assured before the date of maturity and while the policy is in force, the company shall pay all premium paid under the policy till the date of death of life assured accumulated at 5% compound interest p.a. The policy shall terminate on the said payment. All rights, benefits and interest under the policy shall stoned extinguished up on this payment. याप्रमाणे तक्रारदाराना रक्कम अदा केली असलेने जाबदार तक्रारदाराना कोणतेही देणे लागत नाहीत व सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब तक्रार खारीज करणेत यावी असे आक्षेप नोंदलेले आहेत.
5. तक्रारदारांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेला पुरावा, वकीलामार्फतची नोटीस व जाबदारांचे तक्रारीस दाखल आक्षेप यांचा विचार करता सदर प्रकरणाचे निराकरणार्थ मे.मंचाने खालील मु्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदारानी एका विषयाच्या एकाच स्वरुपाच्या (प्लॅनच्या)
पॉलिसीबाबत प्रत्यक्ष अटी व शर्ती दडवून ठेवून वेगळयाच
नियम, अटी, शर्ती तक्रारदाराना दाखवून त्यांना त्यांचे पतीचे
मृत्यूपश्चात द्यावयाची कायदेशीर योग्य भरपाई न देऊन
तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 3-
6. यातील जाबदार ही विमा कंपनी असून ते आय.सी.आय.सी.आय.प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्स या नावाने विमा व्यवसाय करतात व संबंधित गरजू लोकांना त्यांचे गरजेनुसार व पसंतीप्रमाणे जाबदारानी बनवलेल्या वेगवेगळया वैशिष्टयांच्या पॉलिसीज त्यांनी त्यांच्या पॉलिसीच्या वैशिष्टयानुसार ठरवलेला प्रिमियम देऊन संबंधिताना विमा पॉलिसीची विक्री करतात. हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यास अनुसरुन प्रस्तुत तक्रारदारांचे मयत पती अनिल माने यांनी या जाबदारांचे अधिकृत प्रतिनिधी (एजंट) यांचेकडून दि.19-4-2011 रोजी Guaranteed sevings Insurance plan UIN 105N114Vo1 पॉलिसी याचा वार्षिक हप्ता रु.24,800/- पॉलिसी मुदत 15 वर्षे व प्रिमियम देणेचा कालावधी 7 वर्ष असा असून तक्रारदारांचा पॉलिसी क्र.15395440 असा असून विषयांकित पॉलिसी ही विनावैद्यकीय तपासणी प्रकारातील होती व अशा प्रकारची जाबदारांची सेवा तक्रारदारानी वार्षिक प्रिमियम भरुन स्विकारली होती. या सर्व बाबी उभय पक्षकाराना मान्य व कबूल आहेत. वरील वस्तुस्थितीवरुन यातील तक्रारदार व जाबदारांमध्ये सेवापुरवठादार व सेवा घेणारा असे नाते अस्तित्वात असलेचे स्पष्ट होते, त्यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते, त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
6.2- प्रस्तुत विमेधारक श्री.अनिल लक्ष्मण माने यानी नियमाप्रमाणे यातील जाबदारांकडे विमा हप्ता भरणे चालू केले, त्याप्रमाणे त्यानी या जाबदाराकडे दि.16-4-11 रोजी सर्व्हीस टॅक्स व वार्षिक हप्ता असे मिळून रक्कम रु.25,055/- असे भरले. त्याची भरणा पावती प्रकरणी नि.5/3 कडे आहे. याप्रमाणे एकूण तीन वार्षिक हप्ते तक्रारदारानी या जाबदारकडे जमा केले ही बाब उभयताना मान्य व कबूल आहे. त्याबाबत तक्रार नाही. तशातच दि.4-2-2014 रोजी यातील तक्रारदाराचे पती अनिल माने यांचे ह्दयविकाराने निधन झाले ही बाब प्रकरणी नि.5/16 चे दस्तऐवजावरुन शाबित होते. मृत्यूसमयी त्यांचे वय 32 वर्षे होते. त्यामुळे यातील तक्रारदार हिने मयत अनिल माने यांचे मृत्यूपश्चात कायदेशीर वारस या नात्याने (भविष्यातील लाभार्थी) म्हणून पतीच्या मृत्यूचा भरपाई विमा क्लेम जाबदाराकडे मागणी केला. मयताची भविष्यातील मिळणा-या लाभाची कायदेशीर वारस या नात्याने प्रस्तुत तक्रारदार ही जाबदारांची ग्राहक आहे ही बाब पूर्णतः शाबित होते व त्यामुळे तसा क्लेम फॉर्म भरुन जाबदाराकडे दाखल केला, त्यावर जाबदारांनी तक्रारदार हिला रक्कम रु.83,022/- (रु.त्र्याऐंशी हजार बावीस मात्र) इतकी पतीचे मृत्यूची नुकसानभरपाई अदा केली. वास्तविक ही भरपाई अत्यंत कमी असून या जाबदारानी त्यांच्याच नियमाला व अटीना बाजूला सारुन त्यांच्या व्यवसायामध्ये अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन मुद्दाम कमी रक्कम दिली आहे असे आक्षेप तक्रारदारांचे वरील भरपाईबाबत आहेत व त्याबाबत जाबदाराकडे तक्रारदार हिने विचारणा केली असता जाबदारानी नि.5/20 कडील पत्र पाठवून तक्रारदारांचे विषयांकित पॉलिसीच्या अटी व शर्तीना अनुसरुन त्यातील कलम 2.4 2 : Benefits payable, 2:4 Guaranteed Death Benefit (GDB)नुसार –
In the unfortunate event of death of the Life Assured before the Date of Maturity and while the policy is inforce. The Company shall pay all the premiums paid under the policy till the date of death of the Life Assured accumulated at 5% compound interest per annum. The policy shall terminate on the said payment. All rights benefits and interest under this policy shall stand extinguished upon this payment.
याप्रमाणे तक्रारदारांचे पतीचे मृत्यूपश्चात जाबदारानी दिलेली विमेदार मृत्यूभरपाई योग्य आहे. प्रस्तुत तक्रारदारांवर पॉलिसीच्या अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे उत्तर दिले आहे, परंतु यातील जाबदार विमा कंपनीचा प्रस्तुत तक्रारदाराला दिलेल्या विषयांकित पॉलिसीच्या नियम व शर्ती नि.5/2 वरील YOUR POLICY HIGHLIGHTS मधील कलम-
Death Benefit- In the event of death of the Life Assured during the term of the policy and subject to the policy being in force, the company shall pay all the premiums paid under the policy till the date of death of the Life Assured accumulated at 5% compound interest per annum.
याप्रमाणे भरपाई मयताचे वारसाना देणेचा नियम जाबदार कंपनीचा असल्याचे प्रस्तुत जाबदार कायदेशीररित्या दाखवतात, मग प्रश्न असा पडतो की मयत विमेदार श्री.अनिल लक्ष्मण माने यानी ज्या पध्दतीची विमा पॉलिसी घेतली त्या प्रकारच्या सर्व पॉलिसीना हाच नियम लागू असणे आवश्यक ठरते. परंतु जाबदार हे खोटारडे व फसवे असून प्रकरणनिहाय ते वेगवेगळे नियम वापरतात व प्रस्तुत तक्रारदाराला यातील जाबदारानी दिलेली विमेदार पतीची नुकसानभरपाई ही कायद्याला व नियमाना धरुन नसल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. याचे कारण यातील तक्रारदारानी त्यांच्या मयत पतीला जाबदारानी जी विमा पॉलिसी विकली होती तशीच व त्याच प्रकारची वैशिष्टये असलेली पॉलिसी या कामी नि.5/8 कडे दाखल केलेली असून ती आबासो. विष्णू बोत्रे , रा.चिखलीवाडी, ता.पाटण, या ग्राहकाची असून ती सुध्दा Guaranteed Savings insurance plan ची असून वार्षिक हप्त्याची असून त्याचा पॉलिसी क्र.16609829 असा असून हप्ता भरणेचा एकूण कालावधी 7 वर्षाचा आहे म्हणजेच सदरची पॉलिसी व तक्रारदाराचे मृत पती अनिल माने यांची पॉलिसी ही एकाच प्रकारची असलेचे स्पष्ट होते. ही बाब यातील जाबदाराना मान्य आहे. या संबंधित पॉलिसीसोबत जाबदारानी या पॉलिसीच्या दिलेल्या अटी व शर्तींचे अवलोकन केले असता आम्हांस असे स्पष्ट दिसून आले की नि.5/7 (Your policy Highlights) मधील नोंदी व नि.5/8 च्या पॉलिसीच्या अटी व शर्ती कलम 2.4 खालीलप्रमाणे नमूद आहे-
कलम 2.4- Guaranteed Death Benefit (GDB)
The death benefit is payable in the unfortunate event of death of the life assured before the date of maturity and while the policy in force. The Guaranteed Death Benefit (GDB) is higher of (a) 10 times of annualized premium and (b) sum of all premiums paid till date compounded at the rate of 5% p.a. The policy shall terminate on the said payment. All rights, benefits and interest under this policy shall stand extinguished upon this payment.
अशी शर्त व अट नमूद असून वरीलप्रमाणे मयत विमेदाराला त्याचा लाभ मिळेल असे आम्हांस स्पष्ट दिसून आले. या श्री.आबाजी बोत्रे याना दिलेली पॉलिसी व यातील तक्रारदारास दिलेली पॉलिसी या एकाच प्रकारच्या असून तक्रारदाराचे पॉलिसीला वेगळी शर्त का लागू केली हे समजून येत नाही व प्रस्तुत तक्रारदाराचे मयत पती याना वरील प्रमाणे समान वैशिष्टयांची पॉलिसी अदा करताना या पॉलिसीचे विमेदाराचे मृत्यूपश्चात द्यावयाचे फायद्याबाबत नियम व अटी एकसारख्याच असणे आवश्यक आहे, परंतु सदर प्रकरणी या जाबदाराने सोयीनुसार श्री.अनिल माने या तक्रारदारास त्याच्या मृत्यू नुकसानीचा क्लेम देत असताना वेगळा निकष लावून
2.4- Guaranteed Death Benefit- (GDB)- In the unfortunate event of death of the life assured before the date of maturity and while the policy is in force. The company shall pay all the premiums paid under the policy till the date of date of the life assured accumulated at 5% compound interest per annum. The policy shall terminate on the said payment. All rights, benefits under the policy shall stand extinguished upon this payment.
असा नियम लावून प्रस्तुत तक्रारदाराचे पतीचा मृत्यूदावा नाकारलेचे पत्र तक्रारदारास पाठवून त्यांची फसवणूक केली आहे व प्रस्तुत जाबदारानी त्यांच्या व्यवसायामध्ये अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन त्यांच्या व्यवसायामध्ये पारदर्शीपणा न ठेवून स्वतःच पॉलिसीच्या मूळ नियम व अटींचा भंग करुन तक्रारदाराचे विमेदार पतीचा योग्य मृत्यू दावा त्यांना तातडीने अदा न करुन प्रस्तुत तक्रारदारास गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिली असल्याचे निर्विवादरित्या तक्रारदार हिने शाबित केले आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो. त्याचप्रमाणे एकाच प्रकारची गुणवैशिष्टये असलेल्या तक्रारदाराचे विषयांकित पॉलिसीचा मृत्यूदावा देय प्रकरणी जाबदारानी त्यांच्या व्यवसायात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन वेगवेगळया अटी व शर्ती जोडून व मूळ अटी व शर्ती बाजूला ठेवून तक्रारदाराना त्यांचा योग्य कायदेशीर विमा दावा दिलेला नाही, त्यांची फसवणूक केली हे निर्विवादरित्या शाबित झालेले आहे व या सर्व गंभीर स्वरुपाच्या सेवेतील त्रुटी असून या जाबदारानी प्रस्तुत तक्रारदारांना दिलेल्या असल्याचे निर्विवादरित्या प्रकरणी नि.5/7 व नि.5-8 च्या उपलब्ध पुराव्यावरुन शाबित झालेले आहे, त्यामुळे प्रस्तुत तक्रार अंशतः मंजुरीस पात्र असून प्रस्तुत तक्रारदार ही या जाबदाराकडून रक्कम रु.24,800/-चे एकूण तीन हप्त्यांची रक्कम रु.74,400/-(रु.चौ-याहत्तर हजार चारशे मात्र) मूळ हप्ता रु.24,800/-च्या दहापट रक्कम रु.2,48,000/-(रु. दोन लाख अठ्ठेचाळीस हजार मात्र) व रक्कम रु.74,400/- वर दि.18-4-2011 पासून दि.4-2-2014 अखेर द.सा.द.शे.5 टक्के होणारे 3 वर्षाचे व्याज रु.11,160/- अशी होणारी एकूण रक्कम रु.3,33,560/-(रु.तीन लाख तेहेतीस हजार पाचशे साठ मात्र) त्यातून प्रस्तुत जाबदारानी या तक्रारदारास दिलेली रक्कम रु.83,020.64 वजा जाता होणारी रक्कम रु.2,50,539.36 (रु.दोन लाख पन्नास हजार पाचशे एकोणचाळीस व पैसे छत्तीस मात्र) त्यावर दि.18-4-2011 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतचे व्याजासह संपूर्ण रक्कम व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत मंच येत आहे.
7. प्रस्तुत जाबदारानी त्यांच्या म्हणण्यातील आक्षेप व नि.5/20 कडील मृत्यूदावा देणेबाबत ज्या नियमांचा अटी, शर्तीचा (क.2.4) त्या शर्तीचे शाबितीकरण व तक्रारदारांची विषयांकित विशिष्ट गुणवैशिष्टये असलेली पॉलिसीबाबत दिलेली अट व शर्त, ते बरोबर असलेचे जाबदार ठोस पुराव्यानिशी शाबित करु शकलेले नाहीत व नि.5/7, नि.5/8 कडील प्रकरणी दाखल असलेल्या समान गुणवैशिष्टये असलेल्या एकाच प्रकारच्या पॉलिसीबाबत त्यानी कोणताही खुलासा वा स्पष्टीकरण मंचासमोर केलेले नाही किंवा तो तक्रारदारातर्फे सादर पुरावा जाबदारानी नाकारलेला नाही हे याठिकाणी सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे.
8. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन याना अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. जाबदारानी एका विषयाच्या एकाच स्वरुपाच्या (प्लॅनच्या) पॉलिसीबाबत प्रत्यक्ष अटी व शर्ती दडवून ठेवून वेगळयाच नियम, अटी, शर्ती तक्रारदाराना दाखवून त्यांना त्यांचे पतीचे मृत्यूपश्चात द्यावयाची कायदेशीर योग्य भरपाई न देऊन तक्रारदाराना सदोष सेवा दिली असलेचे घोषित करणेत येते.
3. यातील जाबदारानी तक्रारदाराना त्यांच्या विम्याच्या मृत्युनुकसानीपोटी रक्कम रु.2,50,539/- (रु.दोन लाख पन्नास हजार पाचशे एकोणचाळीस मात्र) व त्यावर दि.4-2-2014 पासून द.सा.द.शे.9 टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतच्या होणा-या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
4. यातील जाबदाराना प्रस्तुत तक्रारदाराना मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्ककम रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 16-01-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.