Maharashtra

Mumbai(Suburban)

2008/382

DR.UDAY THANAWALA - Complainant(s)

Versus

SPICEJET - Opp.Party(s)

30 Mar 2011

ORDER


CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT.Admn. Bldg., 3rd Floor, Near Chetana College, Govt. Colony, Bandra(East), Mumbai-400 051.
Complaint Case No. 2008/382
1. DR.UDAY THANAWALA 705,BASERA,PLOT NO.11,SECTOR 17,VASHI,NAVI MUMBAI 400 703 ...........Appellant(s)

Versus.
1. SPICEJET DOMESTIC TERMINAL BLDG.MUMBAI AIRPORT,MUMBAI 400 099 2. THE CLAIMS SETTLEMENT OFFICER TATA AIG GENERAL INSURANCE COMPANY LTD.AHURA CENTRE MAHAKALI CAVES RD, MUMBAI 93Mumbai(Suburban)Maharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr. J. L. Deshpande ,PRESIDENTHONABLE MR. MR.V.G.JOSHI ,Member
PRESENT :

Dated : 30 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्रः- श्री.वि.गं.जोशी, सदस्‍य.         ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* 
 
 
 
आदेश
 
           तक्रार अर्जाचे संक्षिप्‍त स्‍वरुप खालीलप्रमाणेः-
1.    सा.वाले क्र.1 हवाई सेवा पुरविणारी कंपनी असून हवाई प्रवाशांना हवाई प्रवासाची व इतर सेवा पुरविते. सा.वाले क्र.2 ही विमा कंपनी आहे.
2.    तक्रारदार यांना हवाई प्रवासकरुन वाराणसी येथे जावयाचे होते. म्‍हणून त्‍यांनी सा.वाले क्र.1 यांची वेबसाईट उघडली तेव्‍हा त्‍यांना सा.वाले क्र.2 यांच्‍याकडून वेगवेगळया परिस्थितीत विम्‍याची सुविधा देणार असल्‍याचे निदर्शनास आले. सा.वाले क्र.2 यांचा प्रस्‍ताव पाहून तक्रारदार यांनी सा.वाले क्र.1 यांची हवाई सेवा घेण्‍याचे ठरविले व त्‍यानुसार त्‍यांनी त्‍यांच्‍यासाठी व त्‍यांची पत्‍नी व मुळे असे एकूण 4 तिकिटांचे मुंबई ते वाराणसी दिनांक 2.12.2007 चे बुकींग केले व तसेच त्‍यांचे व त्‍यांच्‍या पत्‍नीचे परतीचे दोन तिकिटांचे दिल्‍ली ते मुंबई असे दिनांक 6.12.2007 चे बुकींग  केले.  त्‍यानुसार तक्रारदार यांनी सा.वाले क्र.1 यांचेकडे रुपये 22,618/- येवढी रक्‍कम दिली त्‍यामध्‍ये विमा इनश्‍युरन्‍सच्‍या आकारणीही समाविष्‍ट होती.
3.    तक्रारदारांचे असे म्‍हणणे आहे की, र्दुदैवाने दिनांक 12.10.2007 रोजी त्‍यांना अपघात झाला व त्‍यांना सहा आठवडयासाठी बेडरेस्‍ट घ्‍यावे लागणार होते. म्‍हणून ते ठरल्‍याप्रमाणे प्रवास करु शकणार नव्‍हते. म्‍हणून लगेचच त्‍यांनी सा.वाले क्र.1 यांना हवाई प्रवास रद्द करण्‍याबाबत कळविले. तसेच त्‍यांनी प्रस्‍ताव दिल्‍याप्रमाणे सा.वाले क्र.1 यांच्‍याकडे संपूर्ण तिकिटाचे पैसे परत करण्‍याबद्दल मागणी केली.
4.    तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, सा.वाले क्र.1 यानी पैसे परत दिले नाही व विमा सेवेची सुविधाही नाकारली. विमा सुविधाबाबत सा.वाले क्र.2 यांना संपर्क साधण्‍यास सांगीतले.
5.    त्‍यानुसार तक्रारदार यांनी सा.वाले क्र.2 यांचेकडे रु.21,844/- ची मागणी केली. परंतु सा.वाले क्र.2 यांनी त्‍यांची मागणी विमा पॉलीसीच्‍या अटी शर्ती प्रमाणे मिळतील असे सांगीतले.
6.    त्‍यानुसार सा.वाले यांनी दिनांक 18.12.2007 रोजी रु.3000/- चेक व 19.12.2007 रोजी रु.750/- चे दोन चेक अंतीम प्रदानाची रक्‍कम म्‍हणून तक्रारदारांना पाठविले.
7.    सा.वाले यांनी दिलेल्‍या प्रस्‍तावाप्रमाणे ही रक्‍कम पुरेसी नव्‍हती म्‍हणून तक्रारदार यांनी तिनही चेक सा.वाले यांना परत पाठविले व सा.वाले क्र.2 यांचेकडे ऑफरप्रमाणे तिकिटाचे पैसे परत द्यावेत अशी मागणी केली. परंतु ही मागणी सामनेवाले यांनी नाकारल्‍यामुळे तक्रारदार यांनी ग्राहक मंचापुढे तक्रार नोंदवून खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍या.
     सा.वाले क्र.1 व 2 यांनी रु.21,844/- तिकिटांचे पैसे परत
     करावेत. तसेच रु.25,000/- झालेल्‍या मानसिक व शारीरिक              त्रासाबद्दल द्यावेत व रु.10,000/- तक्रार अर्ज खर्च द्यावा.
8.    तक्रार अर्ज, शपथपत्र, व अनुषंगीक कागदपत्रांसह दाखल केलेले आहेत.
9.    सा.वाले क्र. 1 व 2 यांना हजर राहून तक्रार अर्जास उत्‍तर दाखल करावे अशी नोटीस मंचाकडून पाठविण्‍यात आली. नोटीस मिळाल्‍याची पोचपावती अभिलेखात दाखल आहे. नोटीस मिळूनही सा.वाले क्र.1 गैर हजर राहीले. व सा.वाले क्र.2 हे हजर राहून त्‍यांनी आपली कैफीयत दाखल केली. सा.वाले क्र.1 यांचे विरुध्‍द तक्रार अर्ज एकतर्फा निकाली काढण्‍यात यावा असा आदेश मंचाकडून पारीत करण्‍यात आला.
10.   सा.वाले क्र.2 यांचे म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांची मागणी ही पूर्णपणे पॉलीसीच्‍या अटी शर्तीच्‍या विरोधात आहे. तक्रारदारांना पॉलीसीच्‍या अटी शर्ती माहित होत्‍या. त्‍यामुळे तक्रारदारांनी ही तक्रार संपूर्णपणे खोटया स्‍वरुपाची असून सा.वाले क्र.2 यांचेकडून पैसे उकळण्‍याच्‍या उद्देशाने दाखल केलेली आहे.
11.   तक्रार अर्ज, कैफीयत, पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद याची पडताळणी करुन पाहीली असता तक्रारीत निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
 

अ.क्र.
मुद्दे
उत्‍तर
1.
तक्रारदार सा.वाले यांच्‍या सेवेतील कमतरता सिध्‍द करतात काय ?
होय.
2.
तक्रारदार सा.वाले यांचेकडून तिकिटांची रक्‍कम रु.21,844/- मागू शकतात काय ?
होय
3.
तक्रारदार सा.वाले यांचेकडून सेवेतील कमतरतेमुळे झालेल्‍या मानसिक व शाररिक त्रासामुळे नुकसान भरपाई म्‍हणून  रक्‍कम रु.25,000/-मागू शकतात काय ?  
होय. रु.15,000/-
4.
तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रु.10,000/- मागू शकतरत काय ?
होय. फक्‍त रु.5000/-
5.
आदेश ?
आदेशा प्रमाणे.

 
 
कारण मिमांसा   
12.   सा.वाले क्र.1 हे हवाई सेवा कंपनी आहे. सा.वाले क्र.1 च्‍या वेबसाईटवर स्‍पाईस जेटने प्रवास करणा-यांना अनपेक्षित घटनेमध्‍ये जर प्रवास रद्द करावा लागलातर सा.वाले क्र.2 Tata AIG Insurance Company /Domestic Trave Insure ने विमा संरक्षण देण्‍याचा प्रस्‍तावात दिला.  या प्रस्‍तावात Trip Cancellation  .....up to the original cost of the price. असे नमुद केले होते. सा.वाले क्र.2 यांनी सा.वाले क्र.1 च्‍या वेबसाईटवर, दिलेला प्रस्‍ताव, तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत तक्रार अर्जाच्‍या पृष्‍ट क्र.15 वर निशाणी "ए" वर दाखल केले आहे.
13.   हा प्रस्‍ताव पाहुन तक्रारदार यांनी त्‍यांचे व त्‍यांचे पत्‍नीचे व मुलांचे असे एकूण चार तिकिट मुंबई ते वाराणसी दिनांक 2.12.2007 च्‍या प्रवासासाठी आरक्षीत केले व तसेच त्‍यांचे व पत्‍नीचे परतीचे तिकिट दिनांक 6.12.2007 रोजीचे दिल्‍ली ते मुंबई असे दोन तिकीटे साठी आरक्षीत केले. त्‍यासाठी तक्रारदारांनी विमा संरक्षणाची आकारणी धरुन एकूण रु.22,618/- सा.वाले क्र.1 यांना दिले. याबाबत वाद नाही. या बाबत तक्रारदारांनी आरक्षण पावती तक्रार अर्जासोबत पृष्‍ट क्र.16 ते 19 वर दाखल केली आहे.
14.   तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांना दिनांक 12.10.2007 रोजी जॉगिंग करतेवेळी अपघात झाला व त्‍यांना संपुर्णपणे आठ आठवडयांसाठी पूर्णतः विश्रांती घेणे आवश्‍यक होते म्‍हणून तक्रारदार यांना नियोजित वेळेप्रमाणे ट्रीपला जाणे शक्‍य नव्‍हते म्‍हणून तक्रारदार यांनी सा.वाले क्र.1 यांचे संपर्क साधुन त्‍याबाबत कळविले व आरक्षित केलेल्‍या तिकिटांच्‍या परताव्‍याची मागणी केली. परंतु सा.वाले क्र.1 यांनी त्‍यास नकार दिला. तेव्‍हा तक्रारदार यांनी सा.वाले क्र.2 यांचेशी संपर्क साधून विमा संरक्षणाखाली आरक्षित तिकिटांच्‍या परताव्‍याची मागणी केली. तेव्‍हा सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना असे सांगीतले की, पॉलीसी प्रवाशाच्‍या तारखेच्‍या दिवशी अस्‍तीत्‍वात येईल व त्‍यानुसार सा.वाले यांनी तक्रारदारांच्‍या मागणीची पडताळणी करुन व पॉलीसीच्‍या अटी शर्तीनुसार तक्रारदारांना दिनांक 18.12.2007 रोजी रु.3000/- चेक व 19.12.2007 रोजी रु.750/- चे दोन चेक अंतीम प्रदान (Full and final settlement ) म्‍हणून तक्रारदारांना पाठविले. तक्रारदारांना सा.वाले यांनी पाठविलेली रक्‍कम अमान्‍य आहे. म्‍हणून तक्रारदार यांनी सा.वाले यांनी दिलेले चेक सा.वाले यांना परत केले. सा.वाले यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार पॉलीसीच्‍या सेडयुलपमाणे ट्रीप कॅन्‍सलेशनसाठी up to the original cost of the price असे आहे.परतु पॉलीसीचे सेडयुल नेहमी पॉलीसीच्‍या अटी शर्ती प्रमाणे अंमलात आणावे लागतात. पॉलीसीच्‍या अटी शर्ती हया "Part E coverage "  मध्‍ये नमुद केले आहे. त्‍या खालील प्रमाणे.
     " We will pay loss of deposit up to the maximum amount stated
            in the policy Schedule if prior to
            the Contracted Departure Date Your Trip is canceled and you are
            Prevented From Taking the
            Trip due to a Sickness, Injury or death to You , Your Traveling
            Companion, Your Immediate.
            Family Member, or Your Traveling Companions Immediate Family
            Member under the
            Circumstances described in a Hazard during the course of an Insured
            Journey.
            Cancellation
            We will reimburse you for the unused, non-refundable cancellation
            Portion of the hotel cost.
            and/or the common Carrier ticket cancellation charges provided that
            your booked and paid for
            these costs before such Sickness, Injury or death occurred. Benefits are
            subject to the maximum
            shown in the policy Schedule.
            Special Notification of Claim:-
            Your must notify us as soon as reasonably possible in the event of a Trip
            Cancellation. We will not be liable for any additional penalty charges
            incurred that would not have been imposed had you notified us as soon as
            reasonably possible.
पॉलीसीच्‍या या अटी व शर्ती सा.वाले यांनी कैफीयतीसोबत पृष्‍ट क्र.46 वर दाखल केलेल्‍या आहेत.
15.   या पॉलीसीच्‍या अटी शर्तीप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना असलेली रक्‍कम अदा केलेली आहे. म्‍हणून सा.वाले क्र.2 यांच्‍या सेवेत कमतरता नाही.
16.   सा.वाले क्र.2 यांनी सा.वाले क्र.1 च्‍या वेबसाईटवर दिलेला प्रस्‍ताव व पॉलीसीच्‍या अटी व शर्तीचा बारकाईने वाचन केले असता असे निदर्शनास येते की, दिलेला प्रस्‍ताव व पॉलीसीच्‍या अटी शर्ती हया पूर्णपणे विसंगत आहेत.  प्रस्‍तावात स्‍पष्‍टपणे असे म्‍हटले आहे की, - Trip Cancellation –Upto
the Original Cost of Flight या बाबत पॉलीसीच्‍या अटी शर्तीमध्‍ये काहीही नमुद केलेले नाही. यावरुन दिलेला प्रस्‍ताव हा पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. सा.वाले क्र.2 ने दिलेला प्रस्‍ताव पाहून साहाजिकच ग्राहक हे इतर हवाई सेवेने प्रवास करण्‍यापेक्षा स्‍पाईसजेटने प्रवास करणे विमा संरक्षण असल्‍याकारणाने पसंत करतील. म्‍हणून साहाजिकच सा.वाले क्र.1 यांचा या व्‍यवसायात वाढ होईल परंतु प्रत्‍यक्षात मात्र सा.वाले क्र.2  यांनी प्रस्‍तावानुसार अपेक्षीत विमा संरक्षण दिलेले नाही. यावरुन सा.वाले क्र.1 व 2 हे अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करतात हे सिध्‍द होते.
17.   तसेच सा.वाले यांनी प्रस्‍तावाप्रमाणे Trip रद्द झाल्‍यानंतर तिकीट आरक्षणाच्‍या परताव्‍याचे पैसे दिले नाहीत. यात सा.वाले यांच्‍या सेवेतील कमतरता दिसून येते. सा.वाले क्र.1 व 2 हे तक्रारदारांना प्रस्‍तावानुसार विमान तिकिटाच्‍या आरक्षणाचा परतावा देयास जबाबदार राहातील. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी झालेल्‍या नुकसान भरपाईपोटी सा.वाले क्र.1 व 2 हे रु.15,000/- देण्‍यास जबाबदार राहातील. तसेच तक्रार अर्ज खर्च रु.5000/-  देण्‍यास जबाबदार आहेत.
18.   वरील विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्‍यात येतो.
                        आदेश
 
1.    तक्रार क्रमांक 382/2008  अंशतः मान्‍य करण्‍यात येते.
2.    सामनेवाले क्र.1 व 2 यांनी सयुक्‍तीक किंवा वैयक्तिकरित्‍या
तक्रारदारांना तिकिट आरक्षणाची किंमत रु.21,844/- द्यावी.
 
3.    सामनेवाले क्र.1 व 2 यांनी सयुक्‍तीक किंवा वैयक्तिकरित्‍या
     तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून
     रु.15000/- द्यावेत.
 
4.    सामनेवाले क्र.1 व 2 यांनी सयुक्‍तीक किंवा वैयक्तिकरित्‍या
     तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च रु.5,000/- द्यावा.
 
<!--[if !supportLists]-->5.                  <!--[endif]-->सामनेवाले क्र.1 व 2 यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रमाणित
प्रत मिळाल्‍यापासून 6 आठवडयाचे आत करावी. अन्‍यथा विलंबापोटी
दरमहा रु.500/- दंडात्‍मक रक्‍कम तक्रारदारांना द्यावी.
       
 
6.    आदेशाच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात
      याव्‍यात.
 

[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT