तक्रारदार : वकील श्री. धनंजय भोसले हजर.
सामनेवाले 1 ते 3 : एकतर्फा
सामनेवाले 4 व 5 : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.एस.व्ही. कलाल सदस्य. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. श्रीमती सुनिता दहीया (यापुढे तक्रारदार असा उल्लेख आहे) यांनी स्पाईट जेट एअर लाईन, चेंन्नाई (यापुढे सा.वाले क्र.1 असा उल्लेख आहे), कलानिथीन मारन, चेअरमन, स्पाईट जेट एअर लाईन, चेंन्नाई (यापुढे सा.वाले क्र.2 असा उल्लेख आहे), एस. नटराजन, मॅनेजिंग डायरेक्टर, स्पाईट जेट एअर लाईन, चेन्नाई (यापुढे सा.वाले क्र.,3 असा उल्लेख आहे), ओम ट्रॅव्हर्स, ग्रॅन्ट रोड, मुंबई, (यापुढे सा.वाले क्र.,4 असा उल्लेख आहे), व श्री दुबे, अधिकृत व्यक्ती ओम ट्रॅव्हर्स, (यापुढे सा.वाले क्र.,5 असा उल्लेख आहे), यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केलेली आहे.
2. उपरोक्त तक्रारदार व सा.वाले क्र. 1 ते 5 यांचे पत्ते तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे आहेत.
3. तक्रारीचा संक्षीप्त तपशिल खालील प्रमाणे आहे.
सा.वाले क्र. 1 ते 3 हे विमान सेवा पुरविणारी कंपनी असून सा.वाले क्र. 4 व 5 हे त्यांचे अधिकृत एजंट आहेत. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 23.8.2013 रोजी त्यांनी मुंबई ते दिल्ली व परत दिल्ली ते मुंबई या विमान प्रवासासाठी सा.वाले क्र. 4 व 5 यांचे कडून विमान प्रवासाचे तिकीट खरेदी केले. त्यासाठी तक्रारदाराने सा.वाले क्र. 4 व 5 यांना रु.20,894/- इतकी रक्कम दिली. तक्रारदार यांचा दिनांक 10.9.2013 रोजीचा दिल्ली ते मुंबई नियोजित परतीच्या विमान प्रवासाचे वेळी ते दिल्ली विमानतळावर पोहोचले असता त्यांना सा.वाले क्र. 1 ते 3 या विमान सेवा कंपनीव्दारे नियोजित विमानाचे उड्डान रद्द झाल्याचे सांगण्यात आले. तक्रारदार यांचे म्हणण्यानुसार सा.वाले क्र. 1 ते 3 यांनी या बाबतची सूचना एैन प्रवासाच्या वेळी दिली त्यामुळे तक्रारदाराला अतिशय त्रास सहन करावा लागला. तसेच तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 1 ते 3 यांना वारंवार विनंती करुन देखील त्यांनी त्यांच्या परतीच्या प्रवासाची पर्यायी व्यवस्था केली नाही व तक्रारदारास तिकीटाची रक्कमही परत केली नाही. त्यामुळे तक्रारदाराला दुस-या विमान कंपनीचे तिकीट खरेदी करुन ज्यादा पैसे मोजावे लागले. सा.वाले क्र. 1 ते 5 यांनी तक्रारदारास सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असल्याने तक्रारदाराने सा. वाले क्र.1 व सा.वाले क्र. 4 यांना नोटीस पाठवून त्यांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु सा.वाले क्र.3 यांनी केवळ एक औपचारीक पत्र पाठवून तक्रारदारास झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली व तक्रारदाराचे पैसे प्रवासाच्या दिवशीच म्हणजेच दिनांक 10.9.2013 रोजी सा.वाले क्र. 4 व 5 यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे कळविले.
4. तक्रारदारांनी तक्रारी सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, विमान प्रवासाची तिकीटे, सा.वाले क्र. 1 व 4 यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत व त्यांनी सादर केलेल्या उत्तराची प्रत, इत्यादी कागदपत्रे तक्रारी सोबत जोडली आहे.
5. या उलट सा.वाले 4 व 5 यांनी यांनी आपली कैफीयत सादर केली आहे. सा.वाले क्र. 1 ते 3 यांना मंचाची नोटीस मिळुनसुध्दा ते मंचासमोर गैर हजर राहील्याने त्यांचे विरुध्द प्रकरणात एकतर्फा आदेश दिनांक 27.06.2014 रोजी पारीत करण्यात आला.
6. सा.वाले क्र. 4 व 5 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे त्यांचे जुने व परीचित ग्राहक आहेत. त्याच प्रमाणे सा.वाले क्र 4 व 5 यांचे तक्रारदारासोबत अत्यंत चांगले संबंध आहेत. तक्रारदार यांना झालेल्या त्रासाबद्दल सा.वाले क्र. 4 व 5 यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. सा.वाले पुढे असे कथन करतात की, ते सा.वाले क्र. 1 ते 3 यांचे अधिकृत एजंट असल्यामुळे विमानाचे उड्डान रद्द होणे ही बाब त्यांच्या अखत्यारित व नियंत्रणात नसल्यामुळे सा.वाले क्र. 1 व 3 हे थेट प्रवाशांसी त्यांच्या भ्रमणध्वनीवर थेट संपर्क करुन अशा प्रकारची माहीती प्रवाशांना अवगत करीत असतात. तक्रारदार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक विमानाचे तिकीट खरेदीच्यावेळी नोंदविण्यात आला होता. त्यामुळे सदर प्रकरणी तक्रारदारास झालेल्या त्रासाबद्दल सा.वाले क्र. 4 व 5 हे जबाबदार नाही. त्यामुळे सा.वाले क्र. 4 व 5 यांना तक्रारीतुन वगळयात यावे अशी सा.वाले क्र. 4 व 5 यांची विनंती आहे.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, कागदपत्रे, शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. प्रकरणात तक्रारदारांचा तोंडी युक्तीतवाद एैकण्यात आला. त्यानुसार तक्रारीचे निकालाकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले 1 ते 5 यांनी तक्रारदाराचे दिल्ली ते मुंबई परतीच्या विमान प्रवासाचे संदर्भात तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | होय. अशतः |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार अशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे दिल्ली ते मुंबई परतीच्या विमान प्रवासाचे वेळी सा.वाले क्र. 1 ते 3 यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता एैनवेळी विमान रद्द झाल्याचे तक्रारदास सांगण्यात आले व सा.वाले 1 ते 3 यांनी तक्रारदारास कोणतीही पर्यायी विमान प्रवासाची व्यवस्था करुन दिली नाही. या बाबत सा.वाले क्र. 1 ते 3 यांचे यांनी त्यांचे संदर्भ क्र.CR/266100/2013 परिशिष्ट डी, पान क्र.50 च्या पत्रानुसार तक्रारदारांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे व तक्रारदाराचे पैसे दिनांक 10.9.2013 रोजी त्यांचे एजंट सा.वाले क्र. 4 व 5 यांच्याकडे जमा केल्याचे कळविले आहे. तसेच विमानाचे उड्डान रद्द झाल्याची सूचना त्यांनी दिनांक 10.9.2013 रोजीच्या विमान प्रवासाच्या आरक्षण नोंदी नुसार उपलब्ध असलेल्या प्रवाशांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर दिल्याचे कळविले. एकंदरीत सा.वाले क्र. 1 व 3 यांनी आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तक्रारदार यांनी आरक्षित केलेले विमान प्रवासाचे तिकीट परिशिट “अ” पान क्र. 14 चे अवलोकन केले असता सदर तिकीटावर तक्रारदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक कुठेही नमुद केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जरी तक्रारदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक आरक्षण नोंदीमध्ये उपलब्ध नव्हता तरी देखील सा.वाले क्र. 1 ते 3 यांनी त्यांचे अधिकृत एजंट सा.वाले क्र. 4 व 5 यांना संपर्क करुन व त्यांचे मार्फत तक्रारदारास विमान उड्डान रद्द झाल्या बाबतची माहिती देणे आवश्यक होते. परंतु तसे सा.वाले क्र. 1 ते 3 यांनी केलेले नाही. सदर बाब ही सेवा सुविधा पुरविण्यात कसुर आहे असे मंचाचे मत झाले आहे. तसेच सा.वाले क्र. 1 ते 3 हे मंचासमोर गैरहजर राहील्यामुळे त्यांचे विरुध्द प्रतिकुल निष्कर्ष काढण्याशिवाय इतर कोणताही पर्याय मंचासमोर उपलब्ध नाही.
9. सा.वाले क्र. 4 व 5 यांच्या म्हणण्यानुसार विमान प्रवासाची अद्यावत माहिती सा.वाले क्र. 1 ते 3 यांचे कडून थेट प्रवाशांना देण्यात येत असते व त्यामध्ये सा.वाले क्र. 4 व 5 यांची कोणतीही भुमिका नसते. परंतु सा.वाले क्र. 4 व 5 यांनी कैफीयत सोबत दाखल केलेले (पान क्र. 27) तक्रारदाराचे मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते मुंबई विमान प्रवासाचे दिनांक 23.8.2013 रोजी केलेल्या आरक्षण तिकीटामध्ये तक्रारदाराचा प्रभणध्वनीची नोंद कुठेही केलेली दिसून येत नाही. तसेच अशा प्रकारची नोंद केल्याचे पुरावे देखील सा.वाले क्र. 4 व 5 यांनी सादर केलेले नाही. तिकीट आरक्षणाचे काम हे सा.वाले क्र. 4 व 5 यांनी काळजीपूर्वक व जबाबदारीने करणे आवश्यक होते. तक्रारदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक आरक्षण नोंदीमध्ये नसल्यामुळे तक्रारदारास सा.वाले क्र. 1 ते 3 यांचे कडून दिनांक 10.9.2013 रोजीच्या दिल्ली ते मुंबई हे विमान उड्डान रद्द झाल्याची पूर्वसूचना मिळू शकली नाही व त्यामुळे तक्रारदारास बराच त्रास सहन करावा लागला. म्हणून सा.वाले क्र. 4 व 5 यांनीही सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली आहे असे मंचाचे मत झाले आहे.
10. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 10.9.2013 रोजी त्यांचे दिल्ली ते मुंबर्इ पूर्व नियोजित विमान प्रवास विमान उड्डान रद्द झाल्यामुळे व सा.वाले क्र. 1 ते 3 यांनी कोणत्याही पर्यायी विमान प्रवासाची व्यवस्था न केल्यामुळे व तक्रारदारास पैसे ही परत न केल्यामुळे तक्रारदारास पुन्हा नविन तिकीट खरेदी करावी लागले व सदर तिकीटासाठी तक्रारदारास एकूण रु.18,642/- मोजावे लागले व एकंदरीत या प्रवासासाठी तक्रारदारास एकूण रु.10,000/- इतकी रक्कम ज्यादा द्यावी लागली व त्यामुळे तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे झालेला आर्थिक व मानसिक नुकसानीस सा.वाले क्र. 1 ते 5 जबाबदार आहेत व सदर नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
11. वरील मुद्दा क्र. 8 ते 10 लक्षात घेता सा.वाले क्र. 1 ते 5 यांनी तक्रारदार यांना मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते मुंबई विमान प्रवासासाठी सेवा सुविधा देण्यास कसुर केली आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे.
12. वरील विवेचनावरुन व उपलब्ध कागदपत्रांनुसार मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 130/2013 अंशत मंजूर करण्यात येते.
2. सा.वाले 1 ते 5 यांनी तक्रारदारांना दिल्ली ते मुंबई विमान
प्रवासासाठी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर
करण्यात येते.
3. सा.वाले 1 ते 5 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीरित्या तक्रारदारांना
दिल्ली ते मुंबई या परतीच्या विमान प्रवासाठी खर्च करावी लागलेली
ज्यादा रक्कम रु. 10,000/- /- व मानसिक व शाररिक त्रासापोटी
नुकसान भरपाई म्हणून रु.30,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून
30 दिवसात अदा करावी तसे न केल्यास सदर रक्कम रक्कम वसुल
होईपावेतो 10 टक्के व्याजासह रक्कम अदा करावी असा आदेश मंच
पारीत करीत आहे.
4. सा.वाले 1 ते 5 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीरित्या तक्रारदारांना
तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावी असा आदेश मंच पारीत
करीत आहे.
5 . सा.वाले क्र.1 ते 5 यांनी सदर आदेशाची पुर्तता/नापुर्तता करणेबाबत
शपथपत्र दाखल करणेकामी नेमण्यात येते दिनांक 22.4.2015
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 07/03/2015