(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 16 नोव्हेंबर 2016)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रार थोडक्यात स्वरुप अशाप्रकारे आहे की,
1. तक्रारदार हे विरुध्दपक्ष वीज वितरण कंपनी विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचे ग्राहक असून ती तक्रारदाराला राहत्या घरी राहात असून, त्यात विरुध्दपक्ष यांनी विद्युत पुरवठा पुरविण्यास विजेचे मिटर क्रमांक 4100119355145 (नवीन) व जुने 1805711 बसविले आहेत.
2. तक्रारदार पुढे असे नमूद करतात की, ते वयोवृध्द पती-पत्नी असून त्यांचेकडे फक्त 3 ट्युबलाईट, 1 फॅन व एक टेलीवीजन एवढेच उपकरणे वीजेवर चालणारे आहे. तक्रारदाराला मार्च 2012 ते 2013 पर्यंत कोणताही ञास नसून सुरळीत वापराप्रमाणे बिल येत होते. परंतु, तक्रारदाराला धक्का बसला तो म्हणजे एप्रिल 2013 ला 1275 युनीटचे बिल व मे 2013 मध्ये 1104 युनीटचे बिल तक्रारदाराला देण्यात आले. तक्रारदाराने सदरचे अवाढव्य बिल अल्याबाबत सुचना विरुध्दपक्षाला दिली. परंतु, विरुध्दपक्षाने बिलांची रक्कम कमी न करता, उलट तक्रारदाराला धमकी दिली की जर तुम्हीं बिलाचा भरणा केला नाही तर तुमचा विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल. त्यामुळे तक्रारदाराने शेवटी दिनांक 8.8.2013 रोजी विरुध्दपक्षाला कायदेशिर नोटी अधिवक्त्यामार्फत पाठविली व नवीन मिटर देण्याची सुध्दा मागणी केली. परंतु, विरुध्दपक्षाने तक्रारदाराच्या नोटीसाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. सरतेशेवटी तक्रारदाराने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालील मागण्या केल्या.
1) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करावे की, त्यांनी एप्रिल 2013 चे 1275 युनीटचे विजेचे देयक व मे 2013, जुन एकूण रुपये 41,710/- चे रद्दबादल करुन योग्य ती विजेचे बिल तक्रारकर्त्याल्या द्यावी.
2) तसेच, विरुध्दपक्ष यांना आदेशीत करावे की, त्यांनी तक्रारदाराचे विजेचे मिटर बदलवून द्यावे.
3) शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रारखर्च रुपये 10,000/- तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशीत व्हावे.
3. तक्रारकदाराच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. तक्रारदाराच्या तक्रारीला अनुसुरुन विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारीला उत्तर सादर करुन नमूद केले की, तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहकच नाही, त्यामुळे तक्रार मंचात चालु शकत नाही. पुढे त्यांनी सांगितले की, ग्राहक क्रमांका प्रमाणे सी.पी.एल. मध्ये प्रत्येक महिण्याच्या तपशिलाप्रमाणे तक्रारदाराच्या वापरानुसार बिल देण्यात आले. तसेच, तक्रारदाराचे मिटर तपासणी करुन योगय असल्याबाबतचा अहवाल दिला होता व तसेच तक्रारदाराला दिनांक 6.8.2013 रोजी नोटीस देवून 15 दिवसाच्या आत रुपये 32,836.18 पैसे भरावयास सांगितले व तसेच नवीन मिटर क्रमांक 651140082 तक्रारदाराला लावून देण्यात आले व त्याप्रमाणेच जुन 2013 चे 1104 युनीट व जुलै 2012 चे 1049 युनीट व ऑगष्ट 2012 चे 737 युनीटचे बिल दिले आहेत, यावरुन तक्रारदाराचे वापर जास्त आहेत हे सिध्द होते. त्यामुळे तक्रारदाराचे पूर्वीचे मिटर व नवीन मिटर हे दोन्ही योग्य आहेत.
4. तसेच, तक्रारदाराने दिनांक 6.4.2013 पासून ऑगष्ट 2013 पर्यंत बिल भरले नाही, त्यावर रुपये 48,179/- रक्कम थकबाकी आहे. त्यामुळे तक्रारदार त्यासाठी स्वतः जबाबदार आहे. विरुध्दपक्षाने कोणतीही सेवेत ञुटी दिलेली नाही. करीता तक्रारदाराची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. तसेच, तक्रारदाराने पुढे लावलेले आरोप प्रत्यारोप उत्तरात खोडून काढले.
5. तक्रारदाराने सदरच्या प्रकरणात 1 ते 9 दस्ताऐवज दाखल केलेले असून त्यात प्रामुख्याने विजेची देयके, विरुध्दपक्षाला पाठविलेली कायदेशिर नोटीस व पोच पावत्या दाखल केल्या. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी आपल्या उत्तरोबरोबर 1 ते 7 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने विजेचे देयक दिनांक 6.9.2013 ची भरणा केल्याबाबत पावती, पुनःविक्री करण्याची परवानगी पञ, मिटरचे नांव नामांतर करण्याबाबत विरुध्दपक्षाला केलेल्या दिनांक 21.9.2013 चा अर्ज व दिनांक 19.9.2013 चे विरुध्दपक्ष यांना दिलेले तक्रारदाराचे बंधपञ दाखल केले.
6. सदर प्रकरणात दोन्ही पक्षाने आपले लेखी युक्तीवाद मंचासमक्ष दाखल केला, तसेच दोन्ही पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्षाने तक्रारदारास अनुचित व्यापार पध्दती किंवा : नाही
सेवेत ञुटी दिली आहे काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रारदाराची तक्रार ही त्यांना मे, जुन व जुलै 2013 मध्ये विजेचे देयक त्यांच्या वापरापेक्षा जास्त युनीटचे दिलेले आहेत ते रद्द करुन योग्य वापरणीचे युनीटचे देयके द्यावी, अशी आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 ने आपल्या उत्तरात नमूद केले की, आधी श्री विनायक जगन्नाथ ईंचकुलवार हे ग्राहक होते, मिटर सुरळीत चालु होते. परंतु, तक्रारदाराच्या मागणीवरुन व देयकाबद्दल वाद येत असल्यामुळे जुन 2013 मध्ये नवीन मिटर बसविण्यात आले व त्यानंतर त्यांना त्यांच्या वापराप्रमाणे वाढीव युनीटचे बिल आहे, परंतु पूर्वीचे मिटर सुध्दा योग्य होते. विरुध्दपक्षाने दाखल सी.पी.एल. चे वाचन केले असता असे दिसून येते की, नवीन मिटर मार्च – 2013 पासून लागलेले आहे व त्याचा क्रमांक 65/G 1040082 असा आहे व दाखल सी.पी.एल. चे वाचन केले असता, तक्रारदाराच्या मिटरचे वाचन प्रत्येक महिण्यात योग्य प्रमाणे झालेले दिसून येते. त्यामुळे फक्त एप्रिल, मे, जुन, जुलै 2013 याच महिण्यात जास्त युनीटप्रमाणे बिल दिल्याचे दिसून येते. जर का मिटरमध्ये बिघाड असते तर सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2013 व जानेवारी 2014 मध्ये सुध्दा जास्त युनीटचे देयके तक्रारदाराला यायला हवे होते. म्हणजेच तक्रारदाराला योग्य ते वाचन करुन विजेची देयके दिली आहे, असे मंचास वाटते. जर तक्रारदाराने सदरच्या बिलाचा भरणा केला नसेल तर विरुध्दपक्षाने 8 हप्ते पाडून टप्याटप्याने एकूण रक्कम तक्रारदाराकडून घ्यावी व तक्रारदाराने पुढील येणारे मासीक बिल सुरळीतपणे भरत राहावे.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल काही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 16/11/2016