Maharashtra

Nagpur

CC/422/2015

Mukhtar Siddhk Ahmad Khan - Complainant(s)

Versus

SPANCO LTD. (SND LTD.) - Opp.Party(s)

Nilesh R. Pund

18 Jun 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/422/2015
( Date of Filing : 10 Aug 2015 )
 
1. Mukhtar Siddhk Ahmad Khan
R/O. 86, DHARTI MATA NAGAR, LOK KALYAN SOCIETY, NAGPUR
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. SPANCO LTD. (SND LTD.)
D.G.M. COMRCIAL, 33, K.V. UPKENDRA, (MAHAL) SUTGIRNI VIBHAG, UMRED ROAD, NAGPUR
Nagpur
Maharashtra
2. CHIEF EXECUTIVE OFFICER, MSEDCL NAGPUR URBAN ZONECGRF Nagpur
PRAKASH BHAVAN, LINK ROAD, SADAR, NAGPUR
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Nilesh R. Pund , Advocate for the Complainant 1
 
Dated : 18 Jun 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने मा. आयोगाच्‍या आदेशानुसार आवश्‍यक कार्यवाही केली नाही व आयोगासमक्ष सतत अनुपस्थितीत राहिला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 38 (3) (C) प्रमाणे गुणदोषावर निकाली काढण्‍यात येत आहे. तक्रारकर्ता  हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असून त्‍याचा ग्राहक क्रमांक 410015758019 असा आहे. तक्रारकर्त्‍याने माहे मार्च-2013 पर्यंतचे सर्व विद्युत देयके भरलेली आहेत. तक्रारकर्ता माहे मार्च-2013 ला बाहेरगांवी उत्‍तर प्रदेश येथे गेला असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या घरी दि. 16.04.2013 ला भेट दिली व त्‍याच्‍या अनुपस्थितीत त्‍याच्‍या घरातील विद्युत मीटर काढून नेले व कुणीतरी अनोळखी व्‍यक्‍तीच्‍या नांवे चोरीची तक्रार पोलिसांकडे नोंदविली होती.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तो माहे डिसेंबर 2014 ला घरी परत आला त्‍यावेळी शेजारच्‍या लोकांकडून घटनेची माहिती मिळाली. तसेच सदर पोलिस स्‍टेशन नागपूर यांच्‍याकडून तक्रारकर्त्‍याच्‍या विद्युत मीटर संबंधी कुणी श्री. कलिम रजा या अनोळखी व्‍यक्‍तीच्‍या नांवे वीज चोरीची तक्रार पोलिसांकडे नोंदविली आहे व पोलिस त्‍या व्‍यक्‍तीचा तपास घेत आहे असे कळले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे या घटने संबंधीची चौकशी केली असता विरुध्‍द पक्षाकडून उडवाउडवीची उत्‍तरे देण्‍यात आली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याकडून वारंवांर होणा-या विचारणामुळे विरुध्‍द पक्षाच्‍या अधिका-यांनी दि. 16.01.2015 ला तक्रारकर्त्‍याच्‍या घरी भेट दिली व अधिका-यांनी स्‍वतः वायर जोडून त्‍याचे फोटो काढले.
  3.      तक्रारकर्त्‍याचे विद्युत मीटर माहे एप्रिल -2013 मध्‍ये विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या अनुपस्थितीत काढून नेले व जानेवारी -2015 मध्‍ये तक्रारकर्त्‍याला पुन्‍हा विरुध्‍द पक्षाकडून रुपये 1880/- चे देयक देण्‍यात आले व त्‍यामध्‍ये विद्युत मीटर तक्रारकर्त्‍याकडे असल्‍याचे नमूद आहे.  तक्रारकर्त्‍याकडे  विद्युत मीटर नसतांना देखील विरुध्‍द पक्ष विद्युत मीटर असल्‍याचे दाखवून विद्युत देयक देत आहे व विरुध्‍द पक्षाकडून प्राप्‍त झालेली सर्व विद्युत देयके भरुन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने विद्युत मीटर काढून नेले व कुणी तरी अनोळखी व्‍यक्‍तीच्‍या नांवे वीज चोरीची तक्रार पोलिसांकडे नोंदविलेली आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या कुटुंबास त्रास सहन करावा लागत आहे.
  4.      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षा विरुध्‍द यापूर्वी ग्राहक  गा-हाणे  निवारण मंच महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नागपूर यांच्‍याकडे दि. 09.03.2015 ला तक्रार दाखल केली होती. परंतु ग्राहक गा-हाणे मंचाने दि. 27.03.2015 ला ही तक्रार त्‍यांच्‍या अखत्‍यारित येत नाही या कारणाने परत पाठविली. तसेच वीज कार्यालयात संपर्क केला असता तक्रारकर्त्‍याने दि. 16.06.2015 ला विरुध्‍द पक्ष 2 कडे परत लेखी तक्रार दाखल केली होती व त्‍याची विरुध्‍द पक्ष 2 ने दखल घेतली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमक्ष तक्रार दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली की,  विरुध्‍द पक्ष कंपनीने तक्रारकर्त्‍याच्‍या घरी नविन विद्युत मीटर निःशुल्‍क लावून देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच विरुध्‍द पक्ष कंपनीने तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या त्रुटीपूर्ण सेवेकरिता रुपये 10,000/- व तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता  व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा अशी विनंती केलेली आहे.
  5.      विरुध्‍द पक्ष 1 ने आपल्‍या लेखी जबाब नमूद केले की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष 1 चा ग्राहक आहे, परंतु तक्रारकर्त्‍याने एस.एन.डी.एल. ला तक्रारीत पक्षकार केलेले नाही. एस.एन.डी.एल. ही सेवा पुरविणारी कंपनी आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या  तक्रारीत एस.एन.डी.एल. ला आवश्‍यक पक्षकार न केल्‍याच्‍या कारणाने खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  6.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या घरी दि. 16.04.2013 ला भेट दिली असता तक्रारकर्ता बाहेरगावी होता आणि तो उत्‍तर प्रदेशला गेल्‍याचे कथन नाकारण्‍यात येते. तसेच सदरच्‍या वीज चोरी मध्‍ये तक्रारकर्ता व  कलिम रजा हे सोबत सहभागी होते व  तक्रारकर्त्‍याच्‍या घरी स्‍थापित केलेल्‍या मीटर मधून विद्युतचा वापर होत होता. विद्युत कायद्याच्‍या तरतुदीनुसार ते दोघें ही विशेष न्‍यायालयासमोर खटला भरण्‍यास जबाबदार आहेत. तसेच प्रस्‍तुत तक्रारी मधील आरोप तक्रारकर्त्‍याने केलेल्‍या चोरीच्‍या संदर्भात आहे, त्‍यामुळे मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या U.P.Power Vs. Anis Ahmad  या प्रकरणातील न्‍यायनिवाडयानुसार सदरचे प्रकरण या आयोगासमक्ष चालू शकत नाही.  
  7.      तक्रारकर्ता हा माहे डिसेंबर 2014 मध्‍ये परत आला त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला शेजारच्‍या लोकांकडून घटनेची माहिती मिळाली व पोलिस स्‍टेशन सदर नागपूर यांच्‍याकडून तक्रारकर्त्‍याच्‍या विद्युत मीटर संबंधी कुणी श्री. कलिम रजा या अनोळखी व्‍यक्‍तीच्‍या नांवे वीज चोरीची तक्रार पोलिसांकडे नोंदविली व पोलिस त्‍या व्‍यक्‍तीचा तपास करीत असल्‍याचे कथन नाकारलेले आहे. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयात याबाबत चौकशी केल्‍यावर उडवाउडवीचे उत्‍तर दिल्‍याचे कथन ही नाकारण्‍यात आलेले आहे.
  8.      तक्रारकर्ता व इतर आरोपीने सहमतीने आणि पूर्ण कल्‍पना असतांना चोरीचा गुन्‍हा केला आहे आणि तक्रारकर्ता चोरीच्‍या गुन्‍हयात सहभागी आहे अथवा नाही हे विद्युत कायद्या अंतर्गत प्रस्‍तापित विशेष न्‍यायालया समोरील आरोप आणि उलट आरोपातील न्‍यायनिवाडयाचा भाग आहे. तक्रारकर्ता आयोगा समक्ष तक्रार दाखल करुन कोणताही प्रामाणिक हेतू नसतांना फायदा घेण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. विरुध्‍द पक्षाने विद्युत कायद्या अंतर्गत संपूर्ण प्रक्रिया करुन तक्रारकर्त्‍या विरुध्‍द चोरीचा गुन्‍हा सदर पोलिस स्‍टेशन येथे  दाखल केला आहे.  
  9.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविलेले आहे.

 

अ.क्रं. मुद्दे      उत्‍तर

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?होय

  1.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?   नाही.

3. काय आदेश ?अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्ष

मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -    तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 2 वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजावरुन दिसून येते की, तक्रारकर्त्‍याच्‍या घरी विरुध्‍द पक्षाकडून विद्युत पुरवठा करण्‍यात येत होता व तक्रारकर्त्‍याचा ग्राहक क्रमांक 410015758019 असा आहे, यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्षाने नि.क्रं. 21 वर दाखल केलेल्‍या  दि. 16.04.2013 च्‍या दस्‍तावेजावरुन स्‍पष्‍ट होते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या अनुपस्थितीत तक्रारकर्त्‍याच्‍या घरी दि. 16.04.2013 ला ठिक 8.00 वा. भेट दिली असता तक्रारकर्त्‍याच्‍या घरा समोरील  CN/40 या विद्युत खांबावरुन चोरीने वीज पुरवठा होत असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने विद्युत पुरवठा कायद्यामधील तरतुदीनुसार आवश्‍यक कार्यवाही करुन घटनास्‍थळी उपस्थितीत कलिम रजा व तक्रारकर्ता यांच्‍या विरुध्‍द सदर पोलिस स्‍टेशन, नागपूर येथे विद्युत चोरीचा गुन्‍हा दाखल केला. सदरचे प्रकरण हे विद्युत कायद्या अंतर्गत विशेष न्‍यायालयात न्‍यायनिवाडयाकरिता प्रलंबित आहे. त्‍याचप्रमाणे  मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने  U.P.Power Corporation Ltd. & Ors. VS. Anis Ahmad ,  III (2013) CPJ 1 (SC) यात दिलेल्‍या न्‍याय निवाडयानुसार प्रस्‍तुत  तक्रार आयोगाला चालविण्‍याचा अधिकार नसल्‍याने खारीज करण्‍यात येते. तसेच  मा. आयोगासमक्ष प्रकरण सुरु असतांना विरुध्‍द पक्षाने दि. 25.10.2019 ला पुरसीस द्वारे कळविले की, महाराष्‍ट्र राज्‍य मंडळ यांनी SNDL यांचा Distribution Franchisee  agreement दि. 07.09.2019 च्‍या पत्रान्‍वये दि. 09.09.2019 पासून रद्द केलेले आहे. त्‍यावर तक्रारकर्त्‍याने योग्‍य ती कार्यवाही करण्‍याकरिता आयोगाने तक्रारकर्त्‍याला अनेक वेळा संधी देऊन ही तक्रारकर्त्‍याने कोणतीही कार्यवाही न केल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 38 (3) (C) नुसार गुण-दोषावर निकाली काढण्‍यात आली आहे.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                    अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.
  2. उभय पक्षाने खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.
  3. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.