Maharashtra

Nagpur

MA/13/45

Madhukar S/O Nanji Moon, - Complainant(s)

Versus

Spanco Discom Limited - Opp.Party(s)

Udya Dable

04 May 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Miscellaneous Application No. MA/13/45
 
1. Madhukar S/O Nanji Moon,
Resident of 49, Shrikrishna Nagar, Nagpur
Nagpur
Maharastra
...........Appellant(s)
Versus
1. Spanco Discom Limited
Narang Towers Civil Lines, Nagpur
Nagpur
Maharastra
2. 2. Spanco Discom Limited
Narang Towers Civil Lines Nagpur
Nagpur
Maharastra
3. 3.Nodal Officer Msedcl
Prakash Bhavan Nagpur
Nagpur
Maharastra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. AMOGH KALOTI PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
PRESENT:
 
Adv. M.S.Wakil
Adv. Rahate
 
ORDER

(पारित दिनांक - 04.05.2013)

श्री. प्रदीप पाटील, सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये

1. अर्जदाराने सदर किरकोळ अर्ज हा त.क्र.228/13 मध्‍ये अंतरीम आदेश मिळण्‍याकरीता दाखल केलेला आहे. अर्जदाराचे कथनानुसार तो  गैरअर्जदाराकडून विज पुरवठा ग्राहक क्र. 410014983205BU4686DC8 द्वारे घेत आहे. दि.09.04.2013 रोजी गैरअर्जदाराचे कर्मचा-यांनी अर्जदाराचे घरी भेट देऊन मिटर तपासणी केली असता त्‍यांना विज चोरी होत असल्‍याचे आढळून आले. त्‍यांनी मिटर काढून नेले.  गैरअर्जदाराने मार्च 2011 ते फेब्रुवारी 2013 या कालावधीचे रु.1,67,892/- चे देयक अर्जदारावर बजावले व इलेक्‍ट्रीसीटी एक्‍टचे कलम 135 व 138 नुसार नोटीसद्वारे सुचित केले. अर्जदाराचे म्‍हणण्‍यानुसार सन 2001 पासून गैरअर्जदाराचे कर्मचारी विज मिटर तपासणीकरीता येतात, मिटरचे फोटो काढतात व विज देयक आकारतात, त्‍यावेळी त्‍यांनी कधीही मिटरमधून विज चोरी होत असल्‍याचे सांगितले नाही. नियमितपणे देयके दिली व त्‍याचा भरणा अर्जदाराने नियमितपणे केलेला आहे. अर्जदाराकडे विज देयकाची कुठलीही थकबाकी नव्‍हती.  गैरअर्जदाराचे सदर कृतीमुळे अर्जदाराला अंधारात राहावे लागत आहे.

2. सदर अर्जाची नोटीस गैरअर्जदाराला पाठविण्‍यात आली. गैरअर्जदारांनी त्‍यावर आपले म्‍हणणे दाखल केले. गैरअर्जदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांचे कर्मचा-यांनी अर्जदाराचे घरी जाऊन मिटर तपासले असता मिटर हे संथ गतीने फिरत होते व विज चोरी होत होती. त्‍यामुळे मिटरचा पंचनामा करुन पंचासमक्ष मिटर सील करुन, ताब्‍यात घेण्‍यात आले. गैरअर्जदाराचे मते मंचाला सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकार नाही. त्‍यांच्‍या या म्‍हणण्‍यादाखल त्‍यांनी हरयाणा राज्‍य ग्राहक आयोग, पंचकुला यांचा DHBVN & ORS.  Vs.  JAGVEER SINGH IV (2012) CPJ 110 या निवाडयाची प्रत दाखल केलेली आहे. 

3. उभय पक्षांचे म्‍हणणे व दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे मते सदर तक्रार चालविण्‍याचा अधिकार मंचाला आहे किंवा नाही ही बाब अंतिम आदेशाचे वेळेस विचारात घेण्‍यात येईल. तसेच विज चोरी संबंधाची तक्रार ही फौजदारी स्‍वरुपाची असल्‍यामुळे ती विशिष्‍ट न्‍यायालयासमोर चालविल्‍या जावी असा गैरअर्जदाराचा जो आक्षेप आहे, तो अर्जदाराची सद्य परिस्थिती आणि अडचण बघता, अंतिम आदेशाचे वेळेस मुळ तक्रारीमध्‍ये विचारात घेतल्‍या जाईल.  मा. केरळ राज्‍य आयोगाचे K.S.E.B. Vidyut Bhavan & ors. Vs. John Mathew या निवाडयामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे, विवादित देयकाची 25% रक्‍कम गैरअर्जदारास अदा करुन, विज पुरवठा 48 तासाचे आत पूर्ववत करता येतो.  सदर निवाडयाचे अनूषंगाने मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

-आदेश-

1) अर्जदाराचा किरकोळ अर्ज अंशतः मंजूर करुन निकाली काढण्‍यात येत आहे.

2) अर्जदाराने विवादित देयकाची 25% रक्‍कम गैरअर्जदारास अदा करावी व गैरअर्जदाराने सदर रक्‍कम मिळाल्‍यापासून 48 तासाचे आत अर्जदाराचे येथील विज पुरवठा पूर्ववत करुन द्यावा.

3) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत. मुळ तक्रार पुढील कार्यवाहीकरीता दि.                    रोजी ठेवण्‍यात येत आहे याची उभय पक्षांनी नोंद घ्‍यावी.  

 
 
[HON'ABLE MR. AMOGH KALOTI]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.