विरूध्द पक्ष क्रमांक 1, 2 व 4 च्या अधिवक्त्यांनी Ticket Deposit Receipt (TDR) Rules and Procedure ची प्रत युक्तिवादाचे वेळी मंचास सादर केली ती अभिलेखावर आहे. त्यांत खालीलप्रमाणे नियम आहे.
1) E-ticket refund request (after chart preparation) can be filed online.
2) The customers are requested to use the online TDR Filing & Status tracking service provided by IRCTC. Select the “File TDR” Link in the left panel under the “My Transactions” menu for filing TDR online IRCTC will forward the claim to Concerned Railways to process the refund and money of refund amount will be credited back to same account through which payment was made after receiving the same from the concerned Railways. In case of e-ticket the refund is processed by the Refund Office of the Zonal Railways in whose jurisdiction the destination station of the train falls.
म्हणजेच TDR प्रोसेसिंग व मंजुरीची जबाबदारी विरूध्द पक्ष क्रमांक 3 चीफ कमर्शियल मॅनेजर, सेंट्रल वेस्टर्न रेल्वे, चर्चगेट, मुंबई यांचीच असून त्यांच्याकडून रिफंड मंजूर होऊन आल्यावरच तो विरूध्द पक्ष क्रमांक 4 ने E-ticket खरेदीदाराच्या खात्यात जमा करावयाचा आहे. सदर TDR मंजुरीबाबत विरूध्द पक्ष क्रमांक 1, 2 आणि 4 ची कोणतीही जबाबदारी नाही व ती विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने त्यांची जबाबदारी नाकारलेली नाही.
गोंदीया येथून गाडी क्रमांक 12843 पुरी-अहमदाबाद हिची सुटण्याची वेळ 12.37 वाजता आहे. चार्ट 2 तासापूर्वी म्हणजे 10.37 वाजता तयार होतो. त्यावेळी तक्रारकर्त्याच्या कुटुंबातील चारही व्यक्तींना सदर गाडीत आरक्षण मिळाले नाही हे कळल्यावर गोंदीया येथून त्याच दिवशी 16.48 वाजता सुटणा-या आणि नागपूर येथे 19.00 वाजता पोहोचणा-या व कुटुंबातील चारही व्यक्तींसाठी वातानुकुलीत द्वितीय श्रेणीच्या एकाच डब्यात कन्फर्म रिझर्वेशन मिळालेल्या गाडी क्रमांक 12834 हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस मधून नागपूर ते अहमदाबाद हा लांब पल्ल्याचा प्रवास करण्याचा पर्याय निवडून गाडी क्रमांक 12843 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसचे आरक्षण गाडी सुटण्यापूर्वी रद्द करण्याचा तक्रारकर्त्याचा निर्णय अत्यंत व्यवहार्य आणि कोणत्याही विवेकशील व्यक्तीला पटेल असाच आहे. जर तक्रारकर्त्याने गोंदीया येथून 16.48 वाजता आणि नागपूर येथून 19.00 वाजता सुटणा-या गाडी क्रमांक 12834 मधून नागपूर येथून असलेल्या आरक्षणाप्रमाणे प्रवास केला हे विरूध्द पक्ष 1, 2 व 4 यांनी मान्य केले आहे तर तक्रारकर्ता त्याच दिवशी गोंदीया येथून 12.37 वाजता सुटणा-या गाडी क्रमांक 12843 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसने प्रवास करणे कदापि शक्य नाही व म्हणून गाडी क्रमांक 12843 सुटण्यापूर्वी तक्रारकर्त्याने रद्द केलेले आरक्षण लक्षात घेता तक्रारकर्त्याने सादर केलेला TDR विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने “As per chart passenger has traveled” असे खोटे कारण देऊन नामंजूर करण्याची ही खोटेपणाची परिसीमा आहे.
तक्रारकर्त्याने कुटुंबियांसह खरोखर गाडी क्रमांक 12843 मधून प्रवास केला परंतु खोटा TDR सादर करून परतावा मागितला असे सिध्द करण्याची जबाबदारी विरूध्द पक्ष क्रमांक 3 ची असून त्यासाठी त्यांनी संबंधित कोच कंडक्टरची आणि टीटीई ची शपथपत्रावर साक्ष देणे आवश्यक होते. परंतु विरूध्द पक्ष क्रमांक 3 ला अशी संधी देऊनही त्यांनी तक्रारकर्त्याचे शपथपत्रावरील कथन नाकबूल केले नाही किंवा ते खोटे असल्याचे सिध्द करणारा कोणताही पुरावा दिला नाही. म्हणून तक्रारकर्त्याची नियमानुसार देय तिकीट परताव्याची (TDR) मागणी खोटे कारण देऊन नामंजुरीची विरूध्द पक्ष क्रमांक 3 ची कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब असल्याने मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
10. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- तक्रारकर्त्याने गाडी क्रमांक 12843 च्या तिकीटांचे आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर म्हणजे जास्तीतजास्त गाडी सुटण्याच्या 2 तास आधी रद्द केले आहे. त्यामुळे त्याला मिळणारा परतावा हा रद्द केलेल्या तिकीटांच्या पूर्ण रकमेचा मिळणार नसून Railway Ticket Refund Rules प्रमाणे जी रक्कम अनुज्ञेय आहे तेवढीच मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे PNR No. 6112160705 च्या वातानुकुलीत द्वितीय श्रेणीच्या 3 तिकीटांपैकी (पूर्वीच 1 रद्द केल्यामुळे) काही तिकीट (Partially) कन्फर्म झाल्या होत्या. नक्की किती ते नमूद केले नाही आणि तिन्ही तिकीटांच्या रकमेचा परतावा रू.4,545/- मागणी केला आहे. PNR No. 6605337087 च्या वातानुकुलीत तृतीय श्रेणीच्या दोन्ही तिकीटा कन्फर्म होत्या आणि त्यापैकी तक्रारकर्त्याने पत्नीची एक तिकीट रद्द केली होती व त्याचा परतावाही घेतला होता. शिल्लक एका कन्फर्म तिकीटचा परतावा रू.988/- तक्रारकर्त्याने मागणी केला आहे. PNR No. 6312157785 प्रमाणे वातानुकुलीत तृतीय श्रेणीच्या 2 तिकीटांपैकी केवळ 1 तिकीट कन्फर्म झाली होती. त्यांच्या रद्दीकरणाबाबत दोन्ही तिकीटांचा पूर्ण परतावा रू.1,976/- मागणी केला आहे.
तक्रारकर्त्याने चार्ट तयार झाल्यानंतर म्हणजे 2 तासापूर्वी वातानुकुलीत द्वितीय व तृतीय श्रेणीच्या खालीलप्रमाणे तिकीटा रद्द केल्या आहेत.
कन्फर्म झालेल्या कन्फर्म न झालेल्या
PNR No. 6112160705 3 पैकी 2 तिकीटा 1
(नक्की संख्या दिली नसल्याने 3 पैकी 2 गृहित धरण्यांत आल्या)
PNR No. 6605337087 1 पैकी 1 तिकीट 0
PNR No. 6312157785 2 पैकी 1 तिकीट 1
4 2
Refund Rules for cancellation of Booked Tickets through IRCTC or Rail Counter मध्ये रद्दीकरण परताव्याचे दर खालीलप्रमाणे आहेत
1. Cancellation Charges for Confirmed Tickets:-
(1AC) (2AC) (3AC)
48 hrs before departure of 240 200 180
train, deduction per passenger
12 to 48 hrs before departure 25% of fare deducted
of train
Within 12 hrs before departure 50% of fare deducted
and 4 hrs before departure of train
Within 4 hrs before departure No Refund
of train
RAC or W/L General or Tatkal Ticket
Before 30 min. departure of 240 200 180
train, deduction per passenger
Within 30 min hrs before No Refund
departure of train
वर दिलेल्या परताव्याच्या नियमाप्रमाणे तक्रारकर्ता कन्फर्म झालेल्या व रद्द केलेल्या 4 तिकीटाबाबत कोणताही परतावा मिळण्यास पात्र नाही. मात्र रद्द केलेल्या उर्वरित वातानुकुलीत तृतीय श्रेणीच्या दोन RAC किंवा W/L तिकीटाबाबत त्या गाडी सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी रद्द केल्याने प्रति तिकीट रू.180/- रद्दीकरण आकार वजा करून उर्वरित रकमेचा परतावा एकूण रू.1,976 – 360 = रू.1,616/- दिनांक 22.12.2012 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 12% व्याजासह विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडून मिळण्यास पात्र आहे. याशिवाय विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने “As per chart passenger has traveled” असे खोटे कारण दाखवून तक्रारकर्त्यास तिकीट रद्दीकरण परतावा नाकारल्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडून शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.3,000/- आणि तक्रारखर्च रू.2,000/- मिळण्यास देखील तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेली तक्रार विरूध्द पक्ष क्रमांक 3 विरूध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. विरुध्द पक्ष क्रमांक 3 ला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला वातानुकुलीत तृतीय श्रेणीच्या RAC किंवा W/L तिकीटाबाबत त्या गाडी सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी रद्द केल्याने प्रति तिकीट रू.180/- रद्दीकरण आकार वजा करून उर्वरित रकमेचा परतावा एकूण रू.1,976 – 360 = रू.1,616/- दिनांक 22.12.2012 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 12% व्याजासह द्यावा.
2. विरुध्द पक्ष क्रमांक 3 ला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.2,000/- द्यावा.
3. विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.
4. विरूध्द पक्ष 1, 2 व 4 विरूध्द तक्रारकर्त्याची सदर तक्रार खारीज करण्यांत येते.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.