Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/15/304

Shri Balkrushna Konduji Rewatkar - Complainant(s)

Versus

South East Central Railway through D R M Shaheb & Other - Opp.Party(s)

Self

05 Jan 2016

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/15/304
 
1. Shri Balkrushna Konduji Rewatkar
Milan Chouk behind Yadav Niwas'Mangalwari Peth Umred Tah Umred
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. South East Central Railway through D R M Shaheb & Other
South East Central Railway Kings Way Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Inspection Officer & Commercial Inspector South East Central Railway Nagpur
Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Station Master Bhivapur South East Central Railway
Bhivapur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

      ( आदेश पारित व्दारा –श्री शेखर पी मुळे,  मा.अध्‍यक्ष )

    - आदेश -

(पारित दिनांक05 जानेवारी 16)

 

  1. ही तक्रार दाखल करण्‍याचे मुद्दयावर निकाली काढण्‍यात येते.
  2. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असुन ती दक्षिण पूर्व मध्‍य रेल्वेच्या 3 अधिका-यांविरुध्‍द, 1. डी आर एम, 2.जॉच अधिकारी व वाणिज्य निरिक्षक, द.पू.म.रेल्वे, नागपूर3.स्‍टेशन मास्‍टर भिवापूर, द.पू.म.रेल्वे,भिवापूर दाखल केली आहे.
  3. तक्रारीतील विषय असा आहे की तक्रारकर्ता हा द.पू.म.रेल्वे,चा उमरेड ते भुयार या मार्गाचा नियमित प्रवासी आहे. दिनांक 22/4/2014 ला तो गाडी क्रमांक 58848 याने प्रवास करित असतांना भिवापूर स्‍टेशनला सांयकाळी रेल्वे प्रशासनाचे सेवेतील कमतरतेमुळे काही घटना घडली होती. त्यांने विरुध्‍द पक्षाकडे इंजिन ड्राईव्हर व रेल्वे कॅन्‍टीन मधे काम करीत असलेल्या एका व्यक्ती विरुध्‍द तक्रार दिली होती त्या तक्रारीवर काही कारवाई झाली नाही. त्यानंतर दिनांक 30/5/2014 ला भिवापूर रेल्वे स्‍टेशनवर त्याला ज्युनिअर पोटर फिरोज खान व इतर काही व्यक्तींनी मारहाण केली. त्या मारहाणी विरुध्‍द त्यांनी रेल्वेच्या अधिका-यांकडे अणि  रेल्वे पोलीसांकडे तक्रार दिली, परंतु त्याला उपचाराकरिता दवाखान्यात पाठविण्‍यात आले नाही, तेव्हा तो स्वखर्चाने उमरेड येथे उपचाराकरिता गेला. त्या मारहाणीत त्याला इजा झाली होती. रेल्वेप्रशासनाच्या या सेवेतील कमतरतेमुळे त्याला आर्थिक नुकसान झाले व म्‍हणुन त्यांनी नुकसान भरपाईकरिता ही तक्रार दाखल केली आहे.
  4. तक्रारीतील मजकूर वाचल्यावर असे दिसुन येते की, तक्रार ही संदिग्ध स्वरुपात आहे कारण दिनांक 30/4/2014 ला काय घटना घडली व त्यामुळे तक्रारकर्त्याला कोणते नुकसान झाले या बद्दल स्पष्‍टपणे तक्रारीत लिहिलेले नाही. असे दिसुन येते की, तक्रारकर्त्याला रेल्वेच्या काही कर्मचा-यांनी मारहाण केली होती. कारण त्यांनी रेल्वेच्या इंजिन ड्रायव्हर विरुध्‍द तक्रार नोंदविली होती. तक्रार नोंदविल्यावरही त्याला उपचाराकरिता दवाखान्यात पाठविण्‍यात आले नव्हते आणि म्‍हणुन त्याला उपचाराकरिता स्वतःचे पैसे खर्च झाले असे या तक्रारीत दिसुन येते. तक्रारीचे हे स्वरुप पाहता ही तक्रार ग्राहक तक्रार म्‍हणुन ग्राहक सरंक्षण कायद्याखाली येऊ शकते या बद्दल आम्ही सहमत नाही. तक्रारीतील मजकूर पाहता ही एक फौजदारी स्वरुपाची तक्रार आहे. रेल्वेच्या कर्मचा-यांनी मारहाण केली म्हणुन रेल्वे प्रशासनाच्या सेवेत कमतरता आहे म्‍हणुन ही तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याअंतर्गत येऊ शकते असे आम्हास वाटत नाही.
  5. याशिवाय ही तक्रार रेल्वेच्या अधिका-यांविरुध्‍द आहे परंतु तक्रारीत भारत सरकारला पक्षकार केलेले नाही.
  6. वरील सर्व गोष्‍टीवरुन ही तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 अंतर्गत येत नाही व ही तक्रार ग्राहक तक्रार होऊ शकत नाही असे मंचाचे मत आहे सबब ही तक्रार दाखल करण्‍याचे टप्प्यावर खारीज करण्‍यात येते.

                

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.