तक्रारकर्तातर्फे वकील ः- श्री. व्ही.एन. दसारीया,
विरूध्द पक्ष क्र 1 व 2 तर्फे वकील ः- श्री. एस.बी.राजनकर,
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- कुमारी. सरिता ब. रायपुरे सदस्या, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 27/06/2019 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्ती यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये ही तक्रार या मंचात दाखल केलेली आहे.
तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीचे पती श्री. चैत्रराम पगरवार वार्ड नं. 5, नगारा, ता.जि. गोंदिया येथील रहिवासी आहे. तक्रारकर्तीचे पती हे दि. 25/12/2017 रोजी गोंदिया ते कोपरगांव येथे महाराष्ट्र एक्सप्रेस गाडी नंबर 11040 एकुण 14 + 4 स्लिपर क्लॉसमध्ये रिजर्वेशन करून प्रवास करीत होते त्याचा पी.एन.आर नं 6508820393, 6308820513 आणि 6108820335 असे होते. महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीने गोंदियावरून सकाळी 8.20 मिनीटांनी प्रवास सुरू केला व संध्याकाळी 6.15 मिनीटांनी जळगांव रेल्वे स्टेशनजवळ पोहचत असतांनी तक्रारकर्तीच्या पतीची तब्बेत अचानक बिघडली असता, त्यांच्यासोबत प्रवास करणारे इसम श्री. जयराम चमनलाल गुंडेकर यांनी रेल्वे टि.सी. व आर.पी.एफ यांना सदरची माहिती देऊन मदत मागीतली. तेव्हा त्यांच्यासमोर टि.सी. ने जळगांवला फोन करून उपचाराकरीता त्वरीत मदत उपलब्ध करून देतो असे सांगीतले. परंतू जळगांव स्टेशन आले तरी कुणीही मदतीसाठी आले नाही व सदर गाडी सुरू झाली. तेव्हा गाडी थांबविण्यासाठी टि.सी. ला विनंती केली. परंतू टि.सी. ने गाडी थांबविली नाही व म्हटले की, दवाखान्याची सोय हि फक्त मनमाड रेल्वे स्टेशनला आहे व मनमाड स्टेशनला मी फोन केला आहे. त्यामुळे तुमचा पाचोरा रेल्वे स्टेशनमध्ये उपचार होईल असे म्हणून तिथून निघून गेले. त्यावेळेस तक्रारकर्तीच्या पतीचा त्रास वाढला. परंतू रेल्वेने कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. त्यानंतर संध्याकाळी गाडी 7.30 मिनीटांनी पाचोरा रेल्वे स्टेशन येथे पोहचली. परंतू रेल्वेने कोणत्याही डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिली नाही. रेल्वेमध्ये प्रवास करणारे पॅसेंजर व तक्रारकर्तीचे नातेवाईक यांनी गव्हरमेंट मेडिकल हॉस्पीटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी मृत म्हणून घोषीत केले. श्री. जयराम गुंडेकर यांनी सदर घटनेची माहिती आर.पी.एफ. रेल्वे स्टेशन पाचोरा यांना दिली तेव्हा मर्ग नंबर- 69/2017 दि. 25/12/2017 रोजी नोंदणी करण्यात आली. अशाप्रकारे रेल्वेची गैरवर्तणुक असुविधाच्या अभावामूळे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला. रेल्वे डिपार्टमेंटने एखादया प्रवाशाची प्रवासा दरम्यान अचानक प्रकृती बिघडली असता, त्वरीत मेडिकल सेवा पुरविली पाहिजे. परंतू अशाप्रकारची कोणतीही सुविधा रेल्वे डिपार्टमेंटने पुरविली नाही. त्यामुळेच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला. जर रेल्वे डिपार्टमेंटने त्वरीत मेडिकल सेवा पुरविली तर तक्रारकर्तीच्या पतीला वाचविण्यात आले असते. परंतू रेल्वे डिपार्टमेंटने तशी कोणत्याही प्रकारची सेवा पुरविली नाही. यावरून विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांची सेवा देण्यात त्रृटी दिसून येते. त्याकरीता विरूध्द पक्ष क्र 1 व 2 हे पूर्णतः जबाबदार आहेत तक्रारकर्ते क्र. 1 ते 4 हे पूर्णपणे मयत श्री. चैत्रराम पगारवार यांचेवर अवलंबून होते. परंतू अचानक झालेल्या मृत्युमूळे ते पूर्णतः निराधार झाले. त्यामुळे तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांचेविरूध्द सदरची तक्रार दाखल करून नुकसान भरपाईकरीता रू. 10,00,000/-,12 टक्के व्याजासह दि. 25/12/2017 पासून दयावे अशी मागणी केली. तसेच शारिरिक, मानसिक त्रासाबाबत व तक्रारीच्या खर्चाची मागणी मा. मंचाकडे केली आहे.
4. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी आपला लेखीजबाब दाखल केला त्यात त्यांनी तक्राकर्तीच्या संपूर्ण तक्रारीचे खंडण केले असून त्यांनी त्यांच्या लेखीजबाबामध्ये असे नमूद केले आहे की, विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या पतीला उपचारासाठी त्वरीत सेवा दिली. तसेच पाचोरा शासकीय रूग्णालय येथे त्वरीत भरती करण्यात आले. तर शवविच्छेदन अहवालानूसार तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा acute myocardial infarction यामुळे झाला. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 ने कोणतीही सेवा देण्यात कसुर केला नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. तसेच सदरची तक्रार हि मा. मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही त्यामुळे सदरची तक्रार हि खारीज करण्यात यावी.
5. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचेविरूध्द मा. मंचातर्फे दि. 13/08/2018 रोजी नोटीसेस बजावण्यात आल्या नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपला लेखीजबाब दि. 25/09/2018 रोजी मंचात दाखल केला.
6. तक्रारकर्तीने त्यांच्या तक्रारीसोबत एफ.आय.आरची प्रत, शवविच्छेदन अहवाल, मर्ग खबरी, रेल्वे पोलीस पाचोरा यांना देण्यात आलेले पत्र, मृत्युचे प्रमाणपत्र, रेल्वे तिकीट, आधार कार्ड तक्रारीच्या पृष्ठर्थ आपले पुराव्याचे शपथपत्र व लेखीयुक्तीवाद तसेच विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी आपले पुराव्याचे शपथपत्र तसेच लेखीयुक्तीवाद या मंचात दाखल केले. मंचानी त्यांचे वाचन केले आहे. तक्रारकर्तीतर्फे त्यांचे विद्वान वकील श्री. व्ही.एन. दसारीया व विरूध्द पक्ष क्र 1 व 2 तर्फे वकील श्री. एस.बी.राजनकर यांचा तोंडीयुक्त्ीवाद युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ती ही दाद मिळण्यास पात्र आहे काय? | होय. |
2. | तक्रारकर्ती हि नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय? | होय. |
3 | अंतीम आदेश | अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
6. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 नी आपल्या लेखीजबाबामध्ये प्रार्थना क्लॉजमध्ये आक्षेप घेतला आहे की, सदरची तक्रार मा. मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतू ग्रा. सं. अधिनियम 1986 कलम 11 (सी) नूसार तक्रारकर्तीच्या मयत पतीने 110040 या महाराष्ट्र एक्सप्रेसचे रिजर्व्हेशन गोंदिया ते कोपरगांव दरम्यान गोंदिया रेल्वे स्टेशनवरून केले. यावरून हे सिध्द होते की, घटना हि गोंदिया मंचाच्या अधिकार क्षेत्रात येते. विरूध्द पक्षाने तक्राकरर्तीच्या संपूर्ण तक्रारीचे खंडन केले. तसेच विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीला सेवा देण्यात कोणतीही त्रृटी केली नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष तक्रारकर्तीला नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. असे म्हटले आहे. परंतू तक्रारकर्तीने दाखल केलेली सदरची तक्रार तसेच इतर पुराव्याचे अवलोकन केले असता, असे आढळून आले की, तक्रारकर्तीच्या पतीची महाराष्ट्र एकसप्रेसने गोंदिया ते कोपरगांव प्रवासा दरम्यान जळगांव रेल्वे स्टेशनच्या अगोदर अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांच्यासेाबत प्रवास करणा-या प्रवाशांनी याची तात्काळ माहिती रेल्वे T.T.E आणि R.P.F यांना दिली. परंतू रेल्वे विभागाने कोणत्याही प्रकारचे प्राथमिक उपचार पुरविले नाही. तसेच जळगांव रेल्वे स्टेशनला गाडी न थांबवून विरूध्द पक्षाने सेवा देण्यात कसुर केला हे पूर्णतः सिध्द होते. जळगांव ते पाचोरा रेल्वे स्टेशनचे अंतर 51 कि.मी. आहे आणि ते अंतर पार करण्यास रेल्वेला फक्त 30 मिनीटे लागते. तक्रारकर्तीच्या पतीची तब्बेत हि सायंकाळी 6.15 मिनीटांनी जळगांव रेल्वे स्टेशनच्या आधीच बिघडली आणि विरूध्द पक्षाने मात्र जळगांव हे रेल्वेचे जंक्शन असून ते पाचोरा ग्रामीण रेल्वे स्टेशनच्या पहिले येणारे स्टेशन होते. परंतू जळगांव येथे गाडी न थांबविता पाचोरा येथे 1 तास 15 मिनीट इतक्या उशिराने गाडी पोहचली. यात विरूध्द पक्षाची पूर्णपणे चुक आहे. कारण जळगांव येथे मेडिकलची सेवा पुरविली असती तर, तक्रारकर्तीच्या पतीचा जीव वाचला असता. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु प्रवासा दरम्यान “acute Myocardial Infraction ” या हॉर्ट अॅटक डिसीजमूळे झाला. अशा प्रकारचा त्रास प्रवासा दरम्यान ज्या प्रवाशाला झाला त्याला रेल्वेने तात्काळ प्राथमिक उपचार पुरविली पाहिजे आणि पुढच्या रेल्वे स्टेशनला रेल्वेने इमरजन्सी अॅमबुलन्स + डॉक्टरांची सुविधा पुरविली असती तर, तक्रारकर्तीच्या पतीचा जीव वाचला असता. सदर घटनेची सूचना रेल्वे प्रशासनाला सायकाळी 7.30 मिनीटांनी दिली. यात रेल्वेच्या बेजबबादारपणामूळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा विनाकारण मृत्यु झाला. रेल्वे प्रवासातील इतर प्रवाशांनी T.T.E व R.P.F यांना तात्काळ मेडिकल सुविधा पुरविण्याची विनंती केली. परंतू विरूध्द पक्षाने जबाबदारीने त्याची दखल घेतली नाही. जळगांव रेल्वे स्टेशनला रेल्वे थांबवून तात्काळ सुविधा विरूध्द पक्षाने पुरविली नाही यात विरूध्द पक्षाची सेवा देण्यात त्रृटी, पूर्णपणे मंचाचे निदर्शनास येते. तक्रारकर्तीच्या पतीचे वय शवविच्छेदन अहवालानूसार मृत्युच्या वेळेस 34 वर्षाचे होते आणि ते मजदुर म्हणून काम करीत होते. 2018 (2) T.A.C 376 (SC) Savita & Others V/s Divisional Manager मा. सर्वौच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडयानूसार ‘Notional Income’ of deceased at Ruppes 5,000/- Per Month & 1/3 Deduction towards personal expenses and Adoption of multiplier 16 also Proper
5,000/- Per Month
x 12
__________
60,000/- Per Annum
-20,000/- 1/3 Deducted towards personal expenses
_________
40,000/- P.A
x 16 multiplier as per Second Scheduled
__________
6,40,000/- Just & Proper Compensation
यानूसार रू. 6,40,000/-, नुकसान भरपाई देण्यात येते आहे. रू. 5,000/-, घेतले तरी त्याची कमाई हि दिवसेंदिवस वाढत गेली असती आणि त्यांचावर अवलंबून असणारी त्याची पत्नी, दोन अज्ञान मुले आणि म्हातारी आई हि सर्व व्यक्ती मृतकाच्या कमाईवर अवलंबून होत्या. परंतू रेल्वेच्या दिरंगाईमूळे त्याला जीव गमवावा लागला. हि कधीही भरून न निघणारी उणीव आहे. तसेच तक्रारकर्ती व त्याचे मुलेही अनाथ झाली. यात विरूध्द पक्षाने सेवा देण्यात त्रृटी केली हे सिध्द होते. यावरून मा. मंच तक्रारकर्तीला रू. 6,40,000/-, नुकसान भरपाई दि. 25/12/2017 पासून 6 टक्के व्याजासह तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू. 50,000/-, आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/-, अदा करावे. करीता हा मंच मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहे.
7. वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते त्यांनी तक्रारकर्तीला रू. 6,40,000/-,नुकसान भरपाई दि. 25/12/2017 पासून 6 टक्के व्याजासह अदा करावे.
03. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू. 50,000/-,आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/-, अदा करावे.
4. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे. तसे न केल्यास, वरील नमूद (2) व (3) आदेशाप्रमाणे रकमेवर द.सा.द.शे 9 टक्के व्याज अदा करावे.
5. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्ताला परत करावी.