(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
- आदेश -
(पारित दि. 23 जानेवारी, 2015)
विरूध्द पक्ष सेंट्रल रेल्वे यांनी Train departure बद्दल चुकीची वेळ सांगितल्यामुळे तक्रारकर्त्याला त्याचे confirmed ticket रद्द करावे लागल्यामुळे तसेच reserved ticket केलेल्या train द्वारे प्रवास करता न आल्यामुळे झालेली नुकसानभरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण मंचासमक्ष दाखल केले आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा गोंदीया येथील रहिवासी असून तो पुणे येथे शिक्षणानिमित्त राहतो. विरूध्द पक्ष 1 हे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे स्टेशन मास्टर असून विरूध्द पक्ष 2 मध्य रेल्वे ही केंद्र शासनाची Public Ltd. कंपनी आहे व ती रेल्वे प्रवाशांना प्रवासी सुविधा देण्याचे काम करते.
3. तक्रारकर्त्याचे वडील श्री. सुधीर हिम्मतलालजी राठोड हे Special Power of attorney holder असून त्यांनी तक्रारकर्ता प्रतीक राठोड व याच्या मित्रांचे दिनांक 04/11/2010 रोजीचे पुणे ते गोंदीया या प्रवासाचे रेल्वे गाडी क्रमांक 2129 आझाद हिंद एक्सप्रेस PNR No. 834-5914003 या क्रमांकाचे Three Tier A/C तिकीट आरक्षित केले होते. प्रवासाच्या तारखेला म्हणजेच दनांक 04/11/2010 रोजी तक्रारकर्त्याने दूरध्वनी क्रमांक 139 वर सदरहू ट्रेन सुटण्याची चौकशी सायंकाळी 6.19 वाजता, 7.00 वाजता तसेच 7.25 वाजता केली होती. विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याची ट्रेन ही 8 तास उशीरा म्हणजेच पहाटे 2.25 वाजता सुटेल असे सांगितले. विरूध्द पक्ष 2 यांच्या सांगण्यावरून तक्रारकर्ता रेल्वे स्टेशनवर न येता घरीच थांबला. नंतर रात्री 11.30 वाजता चौकशी केला असता तक्रारकर्त्याला असे सांगण्यात आले की, तक्रारकर्त्याची ट्रेन दिनांक 04/11/2010 रोजी रात्री 21.00 वाजता म्हणजेच रात्री 9.10 वाजताच पुणे येथून सुटली. दिवाळीचा सण असल्यामुळे व तक्रारकर्त्याला गोंदीया येथे येणे आवश्यक असल्याने तक्रारकर्त्याला नाईलाजास्तव जेट एअरवेज या विमानाचे रू. 5,182/- चे तिकीट काढून गोंदीया येथे यावे लागले. गोंदीया येथे आल्यानंतर तक्रारकर्त्याने दुस-या दिवशी दिनांक 05/11/2010 रोजी सुटलेल्या गाडीचे reserved ticket रद्द केले.
4. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे दिनांक 08/11/2010 रोजी लेखी तक्रार केली. तक्रारकर्त्याने माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागविली. त्यानुसार विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची ट्रेन 21.10 वाजता म्हणजेच रात्री 09.10 वाजता न जाता ती दिनांक 05/11/2010 रोजी पहाटे 2.55 वाजता गेल्याची माहिती तक्रारकर्त्याला पुरविली. विरूध्द पक्ष 2 यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे तक्रारकर्त्याला त्याचा Schedule Journey रद्द करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. करिता विरूध्द पक्ष 2 यांची सेवेमध्ये त्रुटी झाल्यामुळे विरूध्द पक्ष 2 हे तक्रारकर्त्याला नुकसानभरपाई देण्यास जबाबदार असून विरूध्द पक्ष 1 सुध्दा नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत.
5. तक्रारकर्त्याला सदरहू तक्रार दाखल करण्यासाठीची Cause of action दिनांक 04/11/2010 रोजी जेव्हा विरूध्द पक्ष 2 यांनी रेल्वे गाडी सुटण्याबाबत चुकीची माहिती दिली तेव्हा निर्माण झाली. त्यामुळे सदरहू तक्रार मुदतीत, अधिकारक्षेत्रात असून तक्रारकर्त्याने विमानाच्या तिकीटापोटी खर्च झालेली रक्कम रू. 6,703/- मिळण्यासाठी तसेच मानसिक त्रासापोटी रू. 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू. 10,000/- मिळण्यासाठी सदरहू तक्रार न्याय मंचासमक्ष दाखल केली आहे.
6. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 19/11/2012 रोजी मंचात दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत दिनांक 20/11/2012 रोजी नोटीसेस बजावण्यात आल्या.
7. विरूध्द पक्ष 1, 2 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दिनांक 28/05/2013 रोजी दाखल केला.
8. विरूध्द पक्ष 1, 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून विरूध्द पक्ष 1, 2 यांनी तक्रारकर्त्याच्या वडिलांनी दिनांक 04/11/2010 रोजीचे रेल्वे गाडी क्रमांक 2129 आझाद हिंद एक्सप्रेस चे PNR No. 834-5914003 या क्रमांकाचे Three Tier A/C तिकीट आरक्षित केले होते हे म्हणणे कबूल केले आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी लेखी जबाबाच्या परिच्छेद क्रमांक 6 मध्ये असे म्हटले आहे की, “That the departure time of train No. 1229 Azad Hind Express from Pune was re-scheduled from 18.25 Hours to 2.45 Hours due to discontinuation of night service between Kharagpur and Tata Station during the period 28.05.2010 to 14.01.2012 and such information was published in leading news papers from time to time. The basic duties of Section Controllers is to plan for punctual and efficient running of trains and accordingly they have to feed the Train timing in COA (Control Office Application) and Chart the Path of each train running in their section CRIS (Center for Railway Information System) is an Umbrella Organization of Railway of Railway for all computer activities through out the Indian Railways along with other systems implemented in Railway with its associated communication infrastructure. That the Zonal Railway or Divisions are not proficient with the various software systems implemented by CRIS. Hence division is not aware about the interlinking of COA with NTES or CRIS. It is further submitted that on 04.11.2010 O.P.No. 2 Shri Vinod Nair was working as Section Controller on Lonavala-Daund board for 18.00 to 24.00 Hours shift during his duty while departing Train No. 12149 Express he accidentally clicked Train No. 12129 Exp. He realized his mistake and immediately rectified it on COA. The division is not aware how departure of Train No. 12129 Express got relayed of IVRS. It is submitted that it is an unintentional human error which has been rectified immediately. That the opposite party no. 2 or the railways always remain cautions regarding displaying the changes of several train numbers and its departure and arrival timings during day and night which always changes many times in a single minute, The O.P. No. 2 and Railways always maintain accuracy in displaying train numbers and its timings as accurate as possible to facilitate the latest information of timings to passengers by providing latest information of timings so as to enable the passengers to chalk out their journey and station visiting programmes. It is humbly submitted that the matter in question is a result of unknown act in fraction of second and without any intention to harm or to put the complainant in troubles and hardship. It is submitted that the above stated happenings as narrated in complaint needs to be considered sympathetically being computer aided infrastructure”.
तसेच परिच्छेद 11 मध्ये असे म्हटले आहे की, “That for the relief’s asked for by the complainant, the Railway Claim Tribunal has jurisdiction to take cognizance under section 13 of the Railway Claims Tribunal Act 1987. Further there is bar of jurisdiction provided in section 15 of the said act that no court or authority shall have or be entitled to exercise any jurisdiction relating to matters restricted to in sub-section (1) of the said act. So also the O. P. No. 1 and 2 has been protected for their any action taken in good faith or intended to be done in pursuance of the Indian Railway Act vide section 186. That on these counts also the complaint needs to be dismissed with costs”.
9. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत रिझर्व्हेशन फॉर्मची प्रत पृष्ठ क्र. 8 वर दाखल केली असून आरक्षित तिकीटाची प्रत पृष्ठ क्र. 9 वर दाखल केली आहे. तसेच रद्द केलेल्या आरक्षित तिकीटाची प्रत पृष्ठ क्र. 10 वर, जेट एअरवेजच्या तिकीटाची प्रत पृष्ठ क्र. 11 वर, नागपूर ते गोंदीया प्रवासाच्या तिकीटाची प्रत पृष्ठ क्र. 12 वर, विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे केलेल्या तक्रारीची प्रत पृष्ठ क्र. 13 वर, विरूध्द पक्ष यांच्या दिनांक 09/11/2010 रोजीच्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 15 वर, विरूध्द पक्ष 2 यांच्या दिनांक 23/11/2010 रोजीच्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 16 वर, विरूध्द पक्ष 2 यांच्या दिनांक 29/11/2010 रोजीच्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 17 वर, विरूध्द पक्ष 2 यांच्या दिनांक 10/01/2011 रोजीच्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 18 वर, विरूध्द पक्ष 2 यांच्या दिनांक 14/02/2011 रोजीच्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 19 वर, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 2 यांना माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळण्यासाठी पाठविलेल्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 20 वर, आम मुखत्यार पत्राची प्रत पृष्ठ क्र. 21 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
10. तक्रारकर्त्याचे वडील विशेष मुखत्यार पत्र धारक श्री. सुधीर राठोड यांनी शपथपत्र दाखल केले असून तक्रार व शपथपत्र यांनाच लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दिली. विशेष मुखत्यार पत्र धारक श्री. सुधीर राठोड यांनी तक्रारकर्त्यातर्फे असा युक्तिवाद केला की, त्यांनी तक्रारकर्त्याचे दिनांक 04/11/2010 रोजीचे रेल्वे गाडी क्रमांक 2129 आझाद हिंद एक्सप्रेसचे तिकीट गोंदीया येथून आरक्षित केले होते. तक्रारकर्त्याने दूरध्वनी क्रमांक 139 वर वेळोवेळी चौकशी करून सुध्दा विरूध्द पक्ष 2 यांनी गाडी सुटण्याबद्दलची चुकीची माहिती दिली. तक्रारकर्त्याला गाडी 8 तास उशीरा जाईल असे दूरध्वनी क्र. 139 वर सांगण्यात आले. नंतर तक्रारकर्त्याने दिनांक 04/11/2010 रोजी रात्री 11.30 वाजता विचारणा केली असता तक्रारकर्त्याची गाडी दिनांक 04/11/2010 रोजी रात्री 21.00 वाजता म्हणजेच रात्री 9.10 वाजताच गेल्याचे तक्रारकर्त्यास सांगण्यात आले. म्हणून तक्रारकर्ता दिवाळीसाठी गोंदीया येथे जेट एअरवेजच्या विमानाने आला व दिनांक 05/11/2010 रोजी पूर्वी आरक्षित केलेले confirmed तिकीट रद्द केले. तक्रारकर्त्याने दिनांक 08/11/2010 रोजी विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे लेखी तक्रार दिली. विरूध्द पक्ष 2 यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत तक्रारकर्त्यास माहिती दिली की, तक्रारकर्त्याची गाडी दिनांक 04/11/2010 रोजी 21.10 वाजता म्हणजेच 9.10 वाजता न जाता दिनांक 05/11/2010 रोजी 2.55 वाजता पुणे येथून सुटली. सदरहू माहिती तक्रारकर्त्याने प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेली आहे. विरूध्द पक्ष 2 यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे तक्रारकर्त्याला आरक्षित कन्फर्म तिकीटावर प्रवास करता आला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. करिता तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी.
11. विरूध्द पक्षाचे वकील ऍड. डी. जी. वडेकर यांनी असा युक्तिवाद केला की, विरूध्द पक्ष 2 सेक्शन कन्ट्रोलर श्री. विनोद नायर यांनी गाडी सुटण्याबाबत चुकीची माहिती feeding केल्यामुळे प्रवाशांना 23 Hours to 12 Hours IVR 139 दूरध्वनीद्वारे तक्रारकर्त्याची गाडी 21.10 वाजता गेल्याचे सांगण्यात आले. रेल्वे गाड्यांच्या departure संबंधी यामध्ये ब-याच रेल्वे एजन्सी काम करीत आहेत तसेच जे संबंधित जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्याविरूध्द विरूध्द पक्ष 2 यांनी योग्य ती समज दिलेली आहे. विरूध्द पक्ष 2 यांच्याकडून झालेली चूक ही Human error (मानवी चूक) असून विरूध्द पक्ष 2 यांची कृती ही Unintentional असल्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या सेवेत कुठलीही त्रुटी नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द सदरहू प्रकरण खारीज करण्यात यावे.
12. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र तसेच विशेष मुखत्यार पत्र धारक व विरूध्द पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्त्याने दिनांक 04/11/2010 रोजी रेल्वे गाडी क्रमांक 12129 आझाद हिंद एक्सप्रेस या गाडीचे PNR No. 834-5914003 या क्रमांकाचे Three Tier A/C तिकीट आरक्षित केले होते ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या रेल्वेचे तिकीट, रेल्वे रिझर्व्हेशन फॉर्म यावरून सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याने तिकीट आरक्षित केल्याची बाब विरूध्द पक्ष यांनी जबाबात कबूल केली असल्यामुळे तक्रारकर्त्याने गोंदीया रेल्वे स्टेशन येथून दिनांक 06/08/2010 रोजी पुणे ते गोंदीया प्रवासाचे तिकीट आरक्षित केले होते हे सिध्द होते. त्यामुळे तक्रार न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात Part of cause of action गोंदीया येथे झाल्यामुळे दाखल केलेली तक्रार योग्य आहे.
14. तक्रारकर्त्याने माहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत विरूध्द पक्ष 2 यांच्याकडे दिनांक 04/11/2010 रोजी पुणे येथून गाडी सुटण्याबद्दल रेल्वे Inquiry No. 139 द्वारे मागितलेल्या माहितीबद्दल विरूध्द पक्ष 2 यांनी दाखल केलेले माहिती अधिकाराखाली दिनांक 29/11/2010 रोजी दिलेले उत्तर जे पत्र क्रमांक PA/Optg/VII/RTI/57 मध्ये असे म्हटले आहे की, 23.00 Hrs to 00.00 Hrs या कालावधीमध्ये तक्रारकर्त्याची गाडी ही 21.10 वाजताच सुटली ही माहिती Railway Inquiry No. 139 नुसार देण्यात आली होती. तसेच सदरहू माहिती ही ट्रेनच्या Timing बद्दल चुकीची फिडींग झाल्यामुळे देण्यात आली होती. त्याचप्रमाणे दिनांक 04/01/2011 रोजी तक्रारकर्त्याने माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने विरूध्द पक्ष 2 यांच्याद्वारे माहितीच्या अधिकाराखाली दिलेल्या दिनांक 10/01/2011 रोजीच्या पत्र क्रमांक PA/Optg/VII/RTI/57 मध्ये असे उत्तर देण्यात आले की, विरूध्द पक्ष 2 यांचे सेक्शन कन्ट्रोलर श्री. विनोद कुमार नायर यांनी गाडीच्या departure बद्दल ची माहिती चुकीने feeding केल्यामुळे दिली होती.
सदरहू पत्र प्रस्तुत प्रकरणात पृष्ठ क्र. 18 वर दाखल केलेले आहे. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला Azad Hind Express च्या departure बद्दल चुकीची माहिती म्हणजे Train वस्तुतः पुणे येथून departure झाली नसतांना पुणे station वरून departure झाल्याची माहिती रेल्वे स्टेशनवरील Electronic display तथा Railway Inquire No. 139 द्वारे पुणे रेल्वे स्टेशनवर दिनांक 04/11/2010 ला 21.00 Hrs to 00.00 Hrs म्हणजेच रात्री 11 ते 12 चे दरम्यान देण्यात आल्याचे सिध्द झाल्यामुळे तक्रारकर्त्याला Jet Airways ने दिनांक 05/11/2010 रोजी दुपारी 11.00 वाजता पुणे ते नागपूर विमानाचे रू. 5,182/- चे तिकीट घेऊन यावे लागले. परंतु गोंदीया येथे गाडीचे departure बद्दल चौकशी केली असता Azad Hind Express दिनांक 04/11/2010 रोजी न सुटता ती दिनांक 05/11/2010 रोजी सकाळी 2.45 वाजता पुणे येथून departure झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या गाडीसंबंधी चुकीची माहिती दिली होती हे म्हणणे सिध्द होते. विरूध्द पक्ष 2 यांची ही कृती निश्चितच सेवेतील त्रुटी आहे. विरूध्द पक्ष 2 यांच्या चुकीमुळे तक्रारकर्त्याला तसेच इतर प्रवाशांना सुध्दा आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. दिवाळीच्या कालावधीमध्ये रेल्वेगाड्यांमध्ये जेव्हा प्रवाशांची अतिशय गर्दी असते अशा वेळेस तक्रारकर्त्यास दुसरी उपाययोजना करून विमानाचे तिकीट काढून गोंदीया येथे येणे भाग पडले. तक्रारकर्त्याने जेट एअरवेजच्या विमानाचे पुणे ते नागपूर प्रवासाचे रू. 5,182/- चे तिकीट पृष्ठ क्रमांक 11 वर दाखल केले आहे. रेल्वेगाड्यांच्या departure संबंधीची माहिती display करण्याकरिता किंवा ती पुरविण्याकरिता विरूध्द पक्ष यांचे बहुसंख्य अधिकारी तसेच एजन्सी या कार्यामध्ये सहभागी असतात. त्यामुळे सदरहू घटनेकरिता विरूध्द पक्ष 2 यांचे बरेच अधिकारी जबाबदार आहेत. परंतु ती जबाबदारी कोणत्या व्यक्तीची अथवा अधिका-याची आहे हे व्यक्तिशः सिध्द होऊ न शकल्यामुळे विरूध्द पक्ष 2 मध्य रेल्वे हे त्यांच्या कर्मचा-याच्या चुकीसाठी vicariously जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे.
15. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 हा कायदा Parallel Legislation असून तो Special Act आहे व तो ग्राहक या नात्याने सेवेतील त्रुटीसाठी Consumer Protection Act नुसार In addition to other legislation असल्यामुळे तसेच सदरहू कायद्यात Concurrent Jurisdiction असल्यामुळे Railway Act संबंधी ग्राहक या नात्याने प्रकरण चालविण्याचा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याद्वारे न्यायमंचाला आहे. तसेच तक्रारकर्त्याला त्याची दाद मागण्याकरिता Choice of Forum चे discretion असल्यामुळे तक्रारकर्त्याने न्याय मंचात दाखल केलेली ही योग्य तक्रार आहे असे मंचाचे मत आहे.
16. As per argument advanced by learned advocate for the O. P. 1 & 2 as per section 186 of the Railway Act 1989, “No suit, prosecution or other legal proceeding shall lie against the Central Government, any railway administration, a railway servant or any other person for anything which is in good faith done or intended to be done in pursuance of this act or any rules or orders made there under”. The act is itself is not miscellaneous mistake. It is a serious mistake. It can’t be bonafide mistake. It is a non application of average skill & reasonable care. It is not a bonafide mistake but it is a gross negligence on the part of O. P. No. 2. In case of gross negligence the intention of defaulter can’t be measured on the other hand there is no parameter to measure the intention at the time of act. It affects adversely to a passenger who has valid tickets.
17. As per Railway Act section 137 “if any person fraudulently traveling or attempting to travel without proper pass or ticket in contra of section 22 he shall be punishable with imprisonment for a term which may extend to 6 months or with fine which may extend to Rs. 1,000/- or with both & also liable to pay to excess charges in addition to ordinary single fare for the distance which he has traveled”. Therefore admitted that the complainant could not be able to travel without reservation in other train and in diwali season the reserved ticket can’t be easily available. Hence it definitely creates inconvenience & unbearable trouble to passengers for the erroneous act committed by the opposite party. The act itself is a very serious act & it itself amounts to deficiency of service. The act itself proves to be serious act. Therefore the defense of opposite party for unintentional act or bonafide mistake is definitely not available to opposite party. The opposite parties have not granted any compensation or benefit for the negligent act. Therefore the complainant is entitled to recover damages or compensation for loss and deficiency of service against O. P. No. 2.
18. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांना दिनांक 08/11/2010 रोजी तक्रारकर्त्याच्या चुकलेल्या गाडीसंबंधी तक्रार केली ती योग्य असून त्यामध्ये गाडी सुटण्याबद्दलची माहिती मिळाल्यावर दाखल केलेली तक्रार उशीराने दाखल केलेली तक्रार नसून ती योग्य आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्यातर्फे तक्रारकर्त्याचे वडीलांनी Special Power of Attorney च्या माध्यमातून दाखल केलेली आहे व त्यासंबंधी Power of Attorney पृष्ठ क्र. 21 वर दाखल केलेली आहे. त्यामुळे सदरहू तक्रार ही विशेष मुखत्यार पत्र धारक यांच्यामार्फत दाखल केलेली असल्यामुळे ती दाखल करण्याचा अधिकार सुध्दा तक्रारकर्त्यास आहे.
17. विरूध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्यास चुकीची माहिती दिल्याबद्दल व सदरहू घटना ही विरूध्द पक्ष 2 यांच्या अधिकारक्षेत्रात घडल्यामुळे फक्त विरूध्द पक्ष 2 हे सदरहू घटनेकरिता जबाबदार आहेत. तसेच विरूध्द पक्ष 1 यांचा सदरहू घटनाक्रमामध्ये कुठलाही सहभाग नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द तक्रारीमध्ये कुठलाही आदेश पारित करण्यात येत नाही. तक्रारकर्त्याला पुरविण्यात आलेल्या सेवेमध्ये विरूध्द पक्ष 2 यांच्याकडून झालेली चूक ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून त्यामुळे तक्रारकर्त्याला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्यामुळे तक्रारकर्ता खालीलप्रमाणे नुकसानभरपाई मिळण्यास पात्र
आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला सहन कराव्या लागलेल्या मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई म्हणून रू. 20,000/- द्यावे. सदर रकमेवर तक्रार दाखल झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 19/11/2012 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्याच्या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारीच्या खर्चापोटी तक्रारकर्त्याला रू. 10,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांच्या विरूध्द कुठलाही आदेश नाही.