जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/178 प्रकरण दाखल तारीख - 06/07/2010 प्रकरण निकाल तारीख – 29/09/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. डॉ. सौ.शुंभागी भ्र.दिलीप मनाठकर वय 52 वर्षे, धंदा वैद्यकीय अर्जदार रा.चीखलवाडी, नांदेड विरुध्द. 1. दक्षीण मध्य रेल्वे कार्यालय चिफ कमर्शीयल मॅनेजर(रिफन्ड) गैरअर्जदार रेल निलायम, सिकंद्राबाद (आंध्रप्रदेश) तर्फे अधिकृत अधिकारी. 2. श्री.एस.एल.गौंड Comml(0-98) C.T.I.Office N.C.R. Staff No.0355-510096 ग्वालेयर (उत्तरप्रदेश) 3. दक्षीण मध्य रेल्वे, वीभागीय कार्यालय, वीभागीय मॅनेजर, सांगवी (बु.) नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.दिलीप मनाठकर. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार रेल्वे यांच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, अर्जदार त्यांचे कूटूंबिय व कौटूंबिक मिञ परिवार असे एकूण 17 सदस्यांनी दि.17.05.2010 रोजी धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी गाडी नंबर 2715 संचखंड एक्सप्रेस ने जावयाचे होते. त्यासाठी त्यांनी दि.18.03.2010 रोजी नांदेड येथील रेल्वे स्थानकावरुन वातानूकूलीन 3 टायर रिर्झवेशन तिकीट नंबर 18193569 द्वारे रक्कम भरुन घेतले. हया आरक्षणासाठी त्यांनी फॉर्म भरुन दिला त्या फॉर्ममध्ये अर्जदाराचे वय 52वर्ष लिहीण्यात आले होते. संबंधीत संगणक रिर्झवेशन तिकिट अधिका-याच्या चूकीने त्यांनी 52 वर्ष वय लिहीण्याचे ऐवजी 32 वर्ष लिहीले. याप्रमाणे अर्जदारास बोगी नंबर बी-1 मध्ये बर्थ नंबर 18 देण्यात आला. अर्जदार व त्यांचे सहकारी यांनी दि.17.05.2010 रोजीला संचखंड एक्सप्रेसने प्रवास सूरु केला, गाडी दि.18.05.2010 रोजी ग्वालेर स्टेशनवरुन नीघाल्यावर बोगी नंबर बी-1 मध्ये गैरअर्जदार क्र.2 हे तिकीटाची तपासणी करण्या करिता आले. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार व त्यांचे इतर साथीदारांना तिकीटातील प्रत्येक व्यक्तीची फोटो ओळखपञाची मागणी केली तेव्हा अर्जदाराच्या रिर्झवेशन तिकीटामध्ये 52 वर्ष ऐवजी 32 वर्षवय लिहीलेले आढळले. अर्जदाराने स्वतःचे फोटो ओळखपञ दाखवून शहानीशा करण्यास सांगितले व झालेली चूक ही तिकिट देणा-या अधिका-याने केलेली आहे तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांना मोबाईल वर रेल्वे स्थानकात आरक्षण अधिका-यास फोन लाऊन बोलण्याची विनंती केली असता त्यांस ते तयार झाले नाहीत व उलट अर्जदार व त्यांचे सहका-यांना बेकायदेशीर रक्कमेची मागणी केली. तसे करण्यास अर्जदाराने नकार दिला. चूकीचे वय लिहीलेले असल्याकारणाने गैरअर्जदार क्र.2 यांनी रु.2950/- दंड म्हणून जबरदस्तीने अर्जदाराकडून वसूल केले. अर्जदार यांची सोबत जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री.भोसले, सह सरकारी अभिवक्ता श्री. व्ही.एम.पवार, वरिष्ठ अभिवक्ते श्री. शिवाजीराव हाके, व्ही.ए. नांदेडकर व इतर त्यांचे कूटूंबीय सोबत प्रवास करीत होते. यासर्वाचे समोर गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदारास व त्यांचे सोबतचे लोकांना वाईट वागणूक दिली व अर्वाच्य भाषा वापरुन आग्रा येथील रेल्वे पोलिसांना फोन करण्याचे, सदरील प्रवाशांना गाडीमधून सामानासह पोलिसांच्या मदतीने उतरुन लावण्याच्या धमक्या दिल्या.काहीच कारण नसताना गैरअर्जदार क्र.2 यांनी त्यांच्याच चूकीसाठी अर्जदारांना भयनक मानसिक ञास दिला व प्रवासातील आनंद हिरावून घेतला. गैरअर्जदार क्र.2 यांचे गैरहेतूची पूर्तता न झाल्यामूळे दिलेल्या ञासाबददल गैरअर्जदार क्र.2 कडून कमीत कमी रु.25,000/- मागण्यास हक्कार आहे. सदरील गेरअर्जदार क्र.2 चे कृत्य हे त्यांचे नौकरीच्या कर्तव्या विरुध्द आहे. म्हणून गैरअर्जदार क्र.2 कडून बेकायदेशीर कृत्य बददल रु.20,000/- मागण्याचे हक्कदार आहेत. तसेच पावती नंबर बी-105886 याप्रमाणे घेतलेले दंडाची रक्कम रु.2915/- गैरअर्जदार क्र.1 कडून मिळण्यासाठी त्यांना आदेशीत करावे. त्यासांबत दावा खर्च म्हणून रु.5,000/- देण्याचा आदेश करावा म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी वकिलामार्फत आपले एकञित म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे त्यांनी पहिला आक्षेप साऊथ सेंट्रल रेल्वेला पार्टी करावे व सीपीसी कोड 1908 प्रमाणे प्रकरण जनरल मॅनेजर यांचे नांवाने तक्रार दाखल करावी. सेक्शन 15 रेल्वे क्लेमस ट्रीब्यूनल अक्ट 1987 याप्रमाणे या न्याय मंचास कार्यक्षेञ येणार नाही. सेक्शन 13 रेल्वे क्लेमस ट्रीब्यूनल अक्ट 1987 याप्रमणे रक्कम परत रिफंड ही मागता येणार नाही. अशा प्रकारचा क्लेमस सेटल करण्यासाठी केवळ रेल्वे ट्रीब्यूनल यांनाच अधिकार आहेत. अर्जदाराची तक्रार ते अमान्य करतात फक्त मूळ रेल्वे फॉर्म जो नांदेड रेल्वे स्टेशन येथे देण्यात आले त्यात अर्जदाराचे वय हे आरक्षण क्लार्कने 32 याप्रमाणे वाचले व त्याप्रमाणे संगणकीय तिकीट दिले व अशा प्रकारची चूक तिकीटात आढळली तर खिडकी सोडण्याची आधी ती निदर्शनास आणून दयावी असे म्हटले आहे. प्रवासा दरम्यान जेव्हा टी.टी.ने तिकीट तपासले तेवहा त्यांना ही चूक आढळली व तिकीटाचे वय व ओळखपञाचे वय टॅली झाला नाही म्हणून त्यांना एक्सेस फेअर तिकीट नियमाप्रमाणे देण्यात आले व यात त्यांची काहीही चूक नाही. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 हे आकारलेली रक्कम रु.2915/- परत देण्यासाठी जबाबदार नाहीत व तसेच अर्जदार यांना कोणतीही नूकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार नाहीत. गैरअर्जदार क्र.2 यांनी वकिलामार्फत आपले म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांनी देखील गैरअर्जदार क्र.1 ने म्हटल्याप्रमाणे जनरल मॅनेजर साऊथ सेंटल रेल्वे यांचे विरुध्दच प्रकरण सीपीसी 1908 दाखल केले पाहिजे. तसेच सेक्शन 15 रेल्वे क्लेमस ट्रीब्यूनल अक्ट 1987 याप्रमाणे त्यांचशिवाय कोणत्याही कोर्टास कार्यक्षेञ येत नाही. सेक्शन 13 रेल्वे क्लेमस ट्रीब्यूनल अक्ट 1987 रिफंड फेअर याबददलचे प्रकरण चालविण्याचा अधिकार फक्त रेल्वे क्लेमस ट्रीब्यूनल यांनाच आहे. तेव्हा या न्यायमंचास कार्यक्षेञ येणार नाही हा आक्षेप घेतला आहे. मूळ आरक्षण फॉर्म हा नांदेड रेल्वे स्टेशनला दाखल करण्यात आला त्यात अर्जदाराचे वय 32 हे दिसत होते म्हणून आरक्षण तिकीटा मध्ये तशीच वयाची इंन्ट्री करुन आरक्षण तिकीट दिले. यात अर्जदार यांचेही कर्तव्य होते की असे तिकीट खरेदी केल्यानंतर ते तपासून पाहिले पाहिजे व जर काही संगणकीय चूक आढळली तर ,खीडकी सोडण्यापूर्वी आरक्षण क्लार्कच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे. प्रवास करीत असताना टीटी ने अशी चूक आढळल्यास वय टॅली होत नसल्यास त्यांना Fare with Penalty लावण्याची नियमाने तरतूद आहे. या कारणास्तव तिकीट ज्याने इंशू केले तिकीट इंशू अथोरिटी यांची काहीच चूक नाही. याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 हे देखील घेतलेली रक्कम रु.2915/- परतावा करण्यासाठी जबाबदार नाहीत. शिवाय अर्जदाराने मागितलेली कोणतीही नूकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. अर्जदार यांच्या तक्रारीप्रमाणे चिफ तिकीट निरीक्षक हे दि.18.05.2010 रोजी संचखंड एक्सप्रेस ट्रेन नंबर 2715 येथील बोगी नंबर बी-1 यामध्ये तपासणीसाठी गेले त्यांनी अर्जदाराचे तिकीटाची चौकशी केली त्यात त्यांना अर्जदाराचे वय 32 दिसले व 52 वय टॅली होत नव्हते. त्यामूळे Govt. Rule प्रमाणे fare and penalty म्हणून रु.2915/- अर्जदाराकडून घेतले व त्यांचे त्यांनी बिल देखील दिले, mistakeof age is admitted. अर्जदाराने पावती नंबर डी-105886 द्वारे रु.2915/- देऊन पावती घेतली व त्या मागे सही केलेली आहे. त्यावेळी त्यांने कोणताही आक्षेप घेतला नाही. अर्जदार यांनी यानंतर देखील काही असेल तर त्यांनी अशी तक्रार कंडक्टर ऑफ ट्रेन यांचेकडे नोंदविली असती. त्यामूळे गैरअर्जदार यांनी कोणतेही जास्तीची रक्कम घेतली हे नाकारलेले आहे. गैरअर्जदार हे ही नाकारतात की त्यांनी अर्जदारास कोणत्याही प्रकारची धमकी दिली व आग्रा येथील पोलिसां बददलची धमकी दिली. गैरअर्जदार यांनी त्यांना कोणतीही अर्वाच्च भाषा वापरलेली नाही. त्यामूळे अर्जदाराने घेतलेली रक्कम रु.20,000/- देण्यासाठी ते जबाबदार नाहीत. गैरअर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करावा. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. या मंचास हे प्रकरण चालविण्याचे कार्यक्षेञ येते काय ? होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी व अनूचित प्रकार अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 3. अर्जदार किती रक्कम मिळण्यशस पाञ आहेत ? आदेशाप्रमाणे. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- गैरअर्जदारयांनी प्रथम आक्षेप असे घेतले की, हे प्रकरण जनरल मॅनेजर साऊथ सेंट्रल रेल्वे यांचे नांवानेच चालविण्यात यावे कारण तो वीभाग वेगळा आहे. कोणत्याही कोर्टास व सेक्शन 13 रेल्वे क्लेमस ट्रीब्यूनल अक्ट 1987 प्रमाणे रिफंड ऑफ फेअर ची तक्रार चालविण्याचा अधिकार फक्त रेल्वे क्लेमस ट्रीब्यूनला आहे. हा आक्षेप खोडताना पहिली गोष्ट ही की, अर्जदार यांनी नांदेड येथून सूरु होणारी संचखंड एक्सप्रेस गाडी नंबर 2715 यांचे तिकीट घेण्यासाठी जो आरक्षण फॉर्म भरुन दिला तो नांदेड येथील आरक्षण कार्यालय भरुन दिला व अमृतसर येथे जाण्यासाठी तिकीट नंबर 18193869 विकत घेतले. तिकीट हे नांदेड आरक्षण कार्यालयातून देण्यात आले व अमृतसर येथ पर्यतसाठी देण्यात आले. रेल्वेचे प्रशासनासाठी बरेच वीभाग पाडण्यात आलेले आहेत यांचा अर्थ रेल्वे ही प्रत्येक ठिकाणची वेगळी आहे असे नाही शिवाय संचखंड एक्सप्रेस ही रेल्वे नांदेडहून अमृतसर येथे पोहचते नियमाप्रमाणे तर भारतामध्ये रेल्वेने प्रवास करण्यासाठी कूठेही तिकीट काढता येते. अशा प्रकारचा प्रवास तिकीट धारकास कायदेशीर व आरामदायी प्रवास करण्याची हमी सर्व गैरअर्जदाराने घेतलेली आहे. तिकीट नांदेड येथून काढले कॉज ऑफ अक्शन ही नांदेड येथेच झाली. रेल्वे प्रशासन हे एकच आहे. संपूर्ण भारतासाठी रेल्वे मंञी देखील एकच आहे. रेल्वे प्रशासन हे सगळीकडे नांदेडसह एकच आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वरिष्ठ अधिकारी आहेत व गैरअर्जदार क्र.2 यांनी नांदेड येथून नीघालेली संचखंड एक्सप्रेस मध्ये येऊन तिकीटाची तपासणी केलेली आहे. सेक्शन रेल्वे क्लेमस ट्रीब्यूनल अक्ट 1987 याप्रमाणे तेथे तक्रार नोंदविता येत असली तरी उपभोक्ता ग्राहक तक्रार न्याय मंच ही त्यातील अतिरिक्त रिमिडी आहे. उपभोक्ता या न्यायाने या रिमिडीचा उपभोग ग्राहक म्हणून अर्जदार घेऊ शकतात. शिवाय सेक्शन 18 रेल्वे क्लेमस ट्रीब्यूनल अक्ट 1987 नुसार हे रिफंड फेअर प्रकरणात नसून जी रेल्वे अधिका-याने सेवेत ञूटी केली व गैरमार्गाने दंड आकारला त्यासाठीचे हे प्रकरण आहे. तिकीटातील रक्कमेचा परतावा मागण्यासाठी हे प्रकरण दाखल केलेले नाही. त्यामूळे या न्यायमंचास असे प्रकरण चालविण्याचा पूर्ण अधिकार असून वरील चर्चेप्रमाणे या मंचास कार्यक्षेञ येते. म्हणून गैरअर्जदाराचा आक्षेप व प्राथमिक मूददा या द्वारे खारीज करीत आहोत. मूददा क्र.2 ः- अर्जदार हे दि.17.05.2010 रोजी वातानूकूलीत 3-टायर बोगीने नांदेडहून अमृतसर येथे जाण्यासाठी नीघाले. बी-1 मध्ये गैरअर्जदार क्र.2 ने दि.18.05.2010 रोजी ग्वालेर येथे अर्जदाराकडून तिकीट तपासणीसाठी तिकीटाची मागणी केली. त्यांने तिकीटही दाखवीले, यात तिकीटात अर्जदाराचे वय 32 लिहील्या गेले होते. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार व त्यांचे संबंधीत असलेल्या इतर सतरा जणास फोटो ओळखपञाची मागणी केली. त्यात त्यांना अर्जदारावे वय 52 आढळले. म्हणून त्यांनी अर्जदाराशी हूज्जत घातली व तक्रारीप्रमाणे बेकायदेशीर रक्कमेची मागणी केली शिवाय रेल्वे पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली.एक तर अर्जदार हया महिला आहेत, दूसरे त्या सन्मानणीय डॉक्टर आहेत व आरक्षण तिकीट दाखविल्यानंतर यात रेल्वे कडून जे तिकीट काढले जाते व त्यांला फोटो ओळखपञ मागण्याची गरजच नाही. समजा ओळखपञ मागितले व त्यात ओळखपञाप्रमाणे पूर्ण नांव हूददा व पत्ता टॅली होत असेल केवळ 52 चे 32 वर्ष वय झाले म्हणूनदंड आकारणे हा सेवेतील ञूटी तरच सोडाच हा सेवेतील अनूचित प्रकार म्हणावा लागेल.एका महिला प्रवाशाशी गैरवर्तन करणे हा गून्हा ही त्यांचेवर गैरअर्जदार क्र.2 कडून घडला असे म्हणावे लागेल. सोबतचे सर्व प्रवासी हे सांगत असतील तर एवढया छोटयाशा चूकीसाठी एवढा मोठा गोंधळ घालणे योग्य नाही. शेवटी गैरअर्जदार क्र.2 हे रेल्वेत नौकरी करतात. त्यांचा धर्म हा प्रवाशाची सेवा करणे हा असावा, ना की प्रवाशांना ञास देणे हा नसावा. त्यातील महिला प्रवाशाशी मूळीच नाही. टी.टी. कडे तक्रार करणेसाठी ट्रेन कंडक्टर सापडला नाही शिवाय, अशी तक्रार स्टेशन अधिक्षक यांचेकडे करता येते व ट्रेन प्लॅटफॉर्मवर कमी वेळ थांबते शिवाय प्रवाशांना प्रवास करायचा असतो, त्यामूळे जागेवर तक्रार करणे हे शक्य होत नाही. सोबतच्या सर्वाची ओळखपञ व अर्जदाराचे ओळखपञ टॅली होत असेल तर टाईप मिसटेक किंवा संगणकीय चूक होऊ शकते हा काही मोठा गून्हा नाही, जर दूस-यांचे नांवावरती गैर प्रवासी प्रवास करीत असेल तर तो गून्हा होऊ शकतो. त्यात ही त्यांची चूक नाही. कारण गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे आरक्षणासाठी जो फॉर्म दि.18.03.2010 रोजी देण्यात आला तो फॉर्म या प्रकरणात दाखल केलेला आहे आम्ही तो बारकाईने पाहिला असता यात स्पष्टपणे अर्जदाराचे वय 52 लिहीलेले आहे. तेव्हा गैरअर्जदार क्र.3 हे आक्षेप जरी घेत असतील व आम्ही ते वय 32 पाहिले असे म्हणत असतील तर ते चूक आहे. 52 वय आरक्षण फॉर्मवर असताना क्लार्क यांचे चूकीमूळे ते 32 पडले आता त्यांचे म्हणणे असे आहे की, तिकीट काढणा-याने तिकीट घेतल्यानंतर खिडकी सोडण्यापूर्वी तिकीट तपासून बघीतले पाहिजे पण असे त्यांनी नियम केले असले तरी रेल्वे स्टेशन वरील आरक्षण कार्यालया समोरील गर्दी पाहिली असता लांबच लाब रांगा असतात. यात खिडकीपर्यत यायला चार ते पाच तास लागतात. यात रांगेमध्ये उभे असलेले प्रवासी हे गडबडीत असतात. आरक्षण तिकीटाचे वेळेस गर्दी असते, अशा वेळेस खीडकी सोडण्यापूर्वी तिकीट तपासून पाहणे हे शक्य नाही व अशी मायनर चूक असेल तर तिकीट काढायला गेलेली व्यक्ती हा दूसरा कोणी असतो. ग्रूप मध्ये प्रवास करीत असताना एवढया मायनर चूकीसाठी ती दूरुस्त करण्यासाठी परत खिडकी पर्यत जाऊन रांगेत उभे टाकण्याची परत हींमत होत नाही. तेव्हा अशी चूक दूरुस्त करणे परवडण्यासारखे नाही किंवा सहज शक्य नाही. तिकीटा वरती नांव देखील टाईप केलेले नसते फक्त वय व मेल का फिमेल एवढेच लिहीलेले असते. रेल्वे जो चार्ट लावतात त्यात चार्ट मध्ये नांवे असतात तो चार्ट पाहिला असता रेल्वे प्रशासन हे त्यात अनंत चूका करते. अशा चूकास रेल्वे प्रशासनास जबाबदार धरावे का ? म्हणून गैरअर्जदार यांची कोणतीही चूक चालते पण प्रवाशांनी जर चुक केली तर हे दंड लावतात. रेल्वे तिकीट चेक करणारे तिकीट चेकर हे नेहमी ग्रूप मधील तिकीट तपासून त्यामध्ये काही तरी चूक काढून खिसे भरण्याचा प्रयत्न करत असतात. असे गैर मार्गाने त्यांचे ,खिसा भरला की सर्व गोष्टी नियमात बसतात असे प्रकार दिसून आले आहेत. तेव्हा नियम व त्यांचे प्रकारातील त्यांची अमंलबजावणी यात खूप फरक आहे.गैरअर्जदार क्र.2 यांनी नेमके तेच केलेले दिसते. सर्व प्रवाशांची हाराशमेंट करुन असे काही फार मोठा गून्हा नसताना त्याचेकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केलेला दिसतो व तो हेतू साध्य न झाल्याकारणाने नियमाप्रमाणे त्यांला दंड लावता येत जरी नसला तरी काही तरी नियमात बसवून त्यांनी काही तरी दंड आकारला आहे. यात प्रवास करणा-या व्यक्तीचे नांव जर वेगळे असेल तर अशा प्रकारचा दंड वसूल करता येऊ शकतो. केवळ वयाच्या चूकीमूळे दंड लावता येणार नाही तेव्हा लावलेला दंड हा आम्ही गैरकायदेशीर ठरवीतो. पोलिसाची धमकी दिली यासाठी अर्जदाराच्या सोबत असलेले सहप्रवासी जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री.भोसले, सह सरकारी अभिवक्ता श्री. व्ही.एम.पवार, वरिष्ठ अभिवक्ते श्री. शिवाजीराव हाके, व्ही.ए. नांदेडकर व इतर त्यांचे कूटूंबीय यांची पूरावा म्हणून यांची साक्ष व शपथपञ दाखल केलेले आहे. एवढया जबाबदार लोकांच्या साक्षीच्या आधारे गैरअर्जदार क्र.2 यांनी प्रवाशासोबत गैरवर्तणूक केली व बेकायदेशीर रक्कमेची मागणी केली हे सिध्द होते. तेव्हा गैरअर्जदार क्र.2 यांनी वसूल केलेला दंड हा बेकायदेशीर आहे या निर्णयास आम्ही आलो आहोत. शिवाय या त्यांचे कृतीसाठी रेल्वे प्रशासना सोबत गैरअर्जदार क्र.2 हे वैयक्तीकरित्या जबाबदार आहेत असे आम्ही ठरवित आहोत. शिवाय गैरअर्जदार क्र.3 यांचे चूकीसाठी त्यांचे वरिष्ठ कार्यालय म्हणून गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराला दिलेल्या मानसिक ञासाबददल दोघेही जबाबदार आहेत. शिवाय गैरअर्जदार क्र.2 यांनी प्रवाशांशी जी सौजन्याची वागणूक ठेवायला पाहिजे. यात हेतू फक्त एकच तिकीटावरील तोच प्रवाशी आहे का नाही हे Confirm झाले पाहीजे. एकंदर गैरअर्जदार क्र.2 यांची वागणू ही सौजन्यशिल तर नाहीच पण गैरकायदेशीर आहे.त्यामूळे त्यांना वैयक्तीकरित्या दंड केला पाहजे व हा दंड देण्यास गैरअर्जदार क्र.1 व 3 हे जबाबदार राहतील. त्यांना आकारलेला दंड ते भरतील व दिलेला दंड गैरअर्जदार क्र.2 यांचे जे कार्यालय आहे त्यांचे कार्यालयास पञ लिहून त्यांचे पगारातून ही रक्कम कापून घेऊन वसूल करु शकतील. मूददा क्र.3 ः- गैरअर्जदार क्र.2 यांनी दंड म्हणून आकारलेली रक्कम रु.2915/- तसेच गैरअर्जदार क्र.3 यांचे चूकीमूळे त्यांना झालेल्या मानसिक ञासाबददल रु.15,000/- व गैरअर्जदार क्र.2 यांनी दिलेली सेवेची ञूटी व अनूचित प्रकाराबददल त्यांनी वैयक्तीकरित्या रु.10,000/- अशी एकूण रु.27,915/- रक्कम मिळण्यास पाञ आहेत. गैरअर्जदार यांनी काही रेल्वेचे नियम दाखल केले आहेत हे नियम पाहिले असता Cancellation of Ticket/Refund under e-ticket असे आहे, प्रस्तूतचा तक्रार अर्ज या प्रकारात मोडत नाही. यात अर्जदाराने ई तिकीट काढलेले नाही व रेल्वे स्टेशन मधून तिकीट घेतलेले आहे व तिकीट रदद ही केलेले नाही व तिकीटा बददलचा परतावा ही मागितलेला नाही. त्यामूळे ही तक्रार या नियमात बसत नाही. Change in the Name of Passenger holding confirmed Reservation यात अर्जदार जेव्हा प्रवास करीत होता ते स्वतःचे नांवाने असलेल्या तिकीटावर प्रवास करीत होता यात तिकीटातील नांवाच्या बदलाची कोणतीही मागणी करण्यात आलेली नव्हती, नांव अर्जदार यांचे बरोबर आहे फक्त वयातील चूक ती ही गैरअर्जदार क्र.3 याचेमूळे झालेली होती. म्हणून हा ही नियम अर्जदाराच्या तिकीटास लागू होणार नाही. त्यामूळे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी नियमबाहय गैरकायदेशीर कृत्य केले असे म्हणण्यास हरकत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी एकञितरित्या दंडाची रक्कम रु.2915/- व मानसिक ञासाबददल रु.15,000/- असे एकूण रु.17,915/- हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना दयावेत. 3. गैरअर्जदार क्र.2 यांनी सेवेत असताना प्रवाशांशी केलेल्या अनूचित प्रकाराबददल वैयक्तीकरित्या रु.10,000/- दंड म्हणून अर्जदारास दयावेत, गैरअर्जदार क्र.2 यांना लावलेली रक्कम गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचे वतीने अर्जदाराना दयावी व गैरअर्जदार क्र.2 ज्या कार्यालयात आहे त्या कार्यालयातून वैयक्तीक त्यांचे पगारातुन कापुन घेऊन वसुल करावी. 4. दावा खर्च म्हणून रु,2,000/- मंजूर करण्यात येतात. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER | |