(अॅडमिशन स्टेजवर)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर
मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, दक्षिण बाजू, बावडा रोड, कोल्हापूर-416 003.
...........................................................................................................................
अंमलबजावणी अर्ज क्र.81/2012
दाखल दि.11/04/2012
आदेश दि.13/05/2013
श्री.खुशअहमद ईस्माईल शेख,
रा.सर्वेश प्लाझा, असेंब्ली रोड,
शाहुपूरी, ई वॉर्ड, कोल्हापूर. ........तक्रारदार
विरुध्द
1 सौ.सुरेखा काशीनाथ भोगम,
रा.फ्लॅट नं.एफ-11, ई वॉर्ड,
रॉयल कोर्टस, कोल्हापूर.
2 श्री.विनय दत्तात्रय डावजेकर,
रा.2283, डी वॉर्ड, ज्ञानेश्वरी अपार्टमेंट,
शुक्रवार पेठ, कोल्हापूर. ........सामनेवाले क्र.1 व 2
गणपूर्ती:- 1. मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्यक्ष
2. मा. श्रीमती सावनी एस. तायशेटे, सदस्या
व्दाराः- मा.श्री.एस.पी.बोरवाल, अध्यक्ष
आदेश
निशाणी क्र.1 वर आदेशः-
तक्रारदार यांनी सदर अंमलबजावणी अर्ज क्र.81/2012, दि.11/04/2012 रोजी सामनेवाले- सौ.सुरेखा काशीनाथ भोगम आणि इतर यांचे विरुध्द दाखल केले असून, सदर तक्रार अर्ज अॅडमिशन स्टेजला ठेवले असता तक्रारदार गैरहजर त्यांचे विधिज्ञ गैरहजर असून प्रस्तुत प्रकरणात अॅडमिशन स्टेजला आजपावेतो हजर राहुन युक्तीवाद केलेला नाही. मे. राज्य आयोगाचे सुचनेप्रमाणे अॅडमिशन स्टेजला युक्तीवाद केला नाही. म्हणून सदरचे प्रकरण मंचासमोर चालविण्यास तक्रारदारास स्वारस्य राहिलेले नाही म्हणून सदरचा तक्रार अर्ज प्रलंबित ठेवण्यास काहीही कारण नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीत अॅडमिशन स्टेजला सदरचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे.
यदाकदाचित तक्रारदार यांना सदर तक्रार अर्ज पुन्हा चौकशीस घेण्याचा आहे असे वाटल्यास स्वतंत्र नवीन तक्रार अर्ज दाखल करण्याची मुभा /संधी राखून ठेवण्यात आली आहे.
(श्रीमती सावनी एस. तायशेटे) (श्री. संजय पी. बोरवाल)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर.
vrb