Maharashtra

Pune

CC/11/320

Kantilal Babulal Mehata - Complainant(s)

Versus

Sou.Impal Nilesh Mehata - Opp.Party(s)

Shrikant S.Gogawale

22 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/320
 
1. Kantilal Babulal Mehata
flat No 6,3rd floor,Damyanty Niwas 822, Guruwar Peth Pune 42
Pune
...........Complainant(s)
Versus
1. Sou.Impal Nilesh Mehata
Paras Entreprises,302,Shukrawar Peth Pune 411 002
Pune
maha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा-  श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्‍यक्ष

 

            :-     तक्रारदारांच्‍या विलंब माफीच्‍या अर्जाखाली आदेश  :-

                          दिनांक 22/मार्च/2012

 

1.           जाबदेणार यांनी ठरल्‍यानुसार सदनिकेच्‍या क्षेत्रफळाचा ताबा दिला नाही. जाबदेणार यांनी अतिरिक्‍त वाढीव क्षेत्रफळ भासवून जादा पैसे वसूल केले आहेत, सोसायटी वा अपार्टमेंट फॉर्मेशनखाली जादा रक्‍कम वसूल केली म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तूतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी सदनिकेचा ताबा दिनांक 29/6/2009 रोजी घेतलेला आहे. त्‍यानंतर त्‍यांच्‍या असे लक्षात आले की सदनिकेचे क्षेत्रफळ 33 चौ.फुटांनी कमी आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रार दाखल करण्‍यास 20 दिवसांचा विलंब झालेला आहे. दिनांक 29/6/2011 अथवा तत्‍पुर्वी तक्रार दाखल करणे आवश्‍यक होते. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांची पत्‍नी मधुमेह व संधिवातामुळे आजारी असते. आजारपणामुळे तक्रार दाखल विलंब झालेला आहे.

2.          जाबदेणार यांनी विलंब माफीसाठी आक्षेप घेतला. जाबदेणार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सन 2009 मध्‍ये सदनिकेचा ताबा देण्‍यात आला होता. तक्रारदार क्र.2 आजारी असल्‍याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करण्‍यात आलेले नाही. म्‍हणून विलंब माफीचा अर्ज नामंजुर करण्‍यात यावा अशी मागणी जाबदेणार करतात.

3.          दोन्‍ही पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार त्‍यांची पत्‍नी संधिवात व मधुमेहामुळे आजारी असल्‍यामुळे तक्रार दाखल करण्‍यास विलंब झाला असे म्‍हणतात. तक्रारदारांना दिनांक 29/6/2009 रोजी सदनिकेचा ताबा मिळालेला असतांनाही दिनांक 26/7/2011 रोजी तक्रार दाखल करण्‍यात आलेली आहे. विलंब माफीच्‍या अर्जासोबत कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करण्‍यात आलेले नाही. योग्‍य ते स्‍पष्‍टीकरण देण्‍यात आलेले नाही. म्‍हणून मंच विलंब माफीचा अर्ज नामंजुर करुन प्रस्‍तूत तक्रार नामंजुर करीत आहे.

            आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.