:- (दि.23/12/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर
मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, दक्षिण बाजू, बावडा रोड, कोल्हापूर-416 003.
................................................................................................................................
[संयुक्तिक ग्राहक तक्रार क्र.278/2011 व 279/2011, 282/2011 ते 289/2011]
तक्रार क्र.278/2011
दाखल दि.30/09/2011
आदेश दि.21/02/2013
1) श्री.खुशअहमद ईस्माईल शेख,
रा.सर्वेश प्लाझा, असेंब्ली रोड,
शाहुपुरी, ई वॉर्ड, कोल्हापूर.
2) सौ.यास्मिन खुशअहमद शेख,
तर्फे व.मु. श्री.खुशअहमद ईस्माईल शेख,
रा.सर्वेश प्लाझा, असेंब्ली रोड,
शाहुपुरी, ई वॉर्ड, कोल्हापूर. ........तक्रारदार क्र.1 व 2
विरुध्द
1) सौ.सुरेखा कशीनाथ भोगम,
रा.प्लॅट नं.एफ-11, ई वॉर्ड,
रॉयल कोर्टस्, कोल्हापूर.
2) श्री.विनय दत्तात्रय डावजेकर,
रा.2283, डी वॉर्ड, ज्ञानेश्वरी अपार्टमेंट,
शुक्रवार पेठ, कोल्हापूर. ........सामनेवाला क्र.1 व 2
तक्रारदार तर्फे वकील:- श्री.मुल्ला, हजर
सामनेवाले तर्फे वकील:-श्री.वायंगणकर, हजर
गणपूर्ती:- 1. मा. श्री. एस.पी. बोरवाल, अध्यक्ष
2. मा. श्री. डी.एस. गवळी, सदस्य
3. मा. श्रीमती सावनी एस. तायशेटे, सदस्या
आदेश
व्दाराः- मा.श्री.एस.पी.बोरवाल, अध्यक्ष
ग्राहक तक्रार क्र.278/2011 व 279/2011, 282/2011 ते 289/2011
तक्रार अर्जातील दि.21.02.2013 रोजीच्या संयुक्तिक पुरशीसवर आदेश पुढीलप्रमाणेः-
1 ग्राहक तक्रार क्र.278/2011 व 279/2011, 282/2011 ते 289/2011 या एकुण दहा तक्रार अर्जातील तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांच्यामध्ये तडजोड पुढीलप्रमाणे झाली असुन, त्यातील मुद्दे/मसुदा पुढीलप्रमाणे-
“(1) यातील विरुध्द पक्षकार क्र.1 –श्रीमती सुरेखा काशिनाथ भोगम यांनी तक्रारदार यांचे खरेदीपत्र व भोगवटा प्रमाणपत्र याची पुर्तता आज पासुन सहा महिने म्हणजेच दि.21 ऑगस्ट, 2013 पर्यंत करणेची आहे. खरेदीपत्राचा खर्च तक्रारदार यांनी करणेचा आहे, तत्पुर्वी विरुध्द पक्षकार क्र.1 यांनी बी टेन्युअरची परवानगी (दाखला) घेणेचा आहे.
(2) यातील विरुध्द पक्षकार क्र.2 यांनी अपार्टमेंटच्या अंतर्गत कामाची पुर्तता करीत आणली आहे, उर्वरित कामे विरुध्द पक्षकार क्र.2- श्री.विनय दत्तात्रय डावजेकर यांनी दि.30 एप्रिल, 2013 पर्यंत पुर्ण करणेची आहेत, त्याचबरोबर विरुध्द पक्षकार क्र.2 यांनी लिफ्ट दि.30 मे, 2013 पुर्वी बसवणेची आहे व शासकीय परवानगीसह दि.30 जून, 2013 पुर्वी सुरु करुन देणेची आहे.
(3) लिफ्टचा मेंटेनन्स् खर्च व अपार्टमेंट खर्च तक्रारदार यांनी त्यांच्या हिस्यानुसार असोसिएशनकडे देणेचा आहे.”
उक्त उल्लेखलेली पुरसीसमधील मुद्दयांस अनुसरुन, सदरच्या एकुण दहा तक्रारींपुरसीसप्रमाणे निकाली काढणेत येतात.
2 सदर तक्रार अर्जामध्ये दि.21.02.2013 रोजी दाखल केलेली पुरसीस ही या आदेशाचा एक भाग आहे.
3 सदर अर्जाच्या सही शिक्काच्या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्क पुरसीससह देण्यात यावी.
4 खर्चाबाबतचे कोणतेही आदेश नाहीत.
(श्रीमती सावनी एस. तायशेटे) (श्री. डी.एस. गवळी) (श्री. एस.पी. बोरवाल)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर.
vrb
संयुक्त निकालपत्र
(1) प्रस्तुतच्या बारा तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच बारा प्रकरणांमध्ये एकत्रितरित्या निकाल पारीत करीत आहे.
(2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
(3) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार अशी,
जिल्हा व तुकडी कोल्हापूर, पोट तुकडी व तहसील करवीर शहरातील कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ई वॉर्ड, शाहूपुरी येथील सी.सी. नं. 394/1 ते 10 ही मिळकत सामनेवाला यांनी विकसित केली आहे. व सदर मिळकतीमध्ये सामनेवाला यांनी “सर्वेश प्लाझा” अपार्टमेंट टाईप इमारत बांधलेली आहे. व सदरच्या इमारतीमध्ये सदनिका घेतलेल्या आहेत. त्यांचा ग्राहक तक्रार क्रमांकनिहाय तपशिल खालीलप्रमाणे-
1. ग्राहक तक्रार क्रमांक - 277/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फलॅट नं. एस. एफ. 2 याचे क्षेत्र 56.31 चौ.मि. (606 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 14/12/2005 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 5,00,000/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत
2. ग्राहक तक्रार क्रमांक - 278/2011-
(अ) या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फलॅट नं. एस. एफ. 1 याचे क्षेत्र 50.43 चौ.मि. (542.72 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 8/07/2003 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 4,15,200/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
(ब) या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फलॅट नं. एस. एफ. 2 याचे क्षेत्र 100-48 चौ.मि. (1081.21 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 8/07/2003 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 8,27,200/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
(क) या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फलॅट नं. एस. एफ. 3 याचे क्षेत्र 87.47 चौ.मि. (941.26 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 8/07/2003 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 7,20,100/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
3. ग्राहक तक्रार क्रमांक - 279/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील ग्राऊंड फलोअरवरील फलॅट नं. यु.जी.एफ. 2 याचे क्षेत्र 35.87 चौ.मि. (386 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 11/06/2003 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 1,56,000/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
4. ग्राहक तक्रार क्रमांक - 280/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील ऑफीस नं. 1 याचे क्षेत्र 16.26 चौ.मि. (175 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 30/01/2004 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 1,96,000/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत
5. ग्राहक तक्रार क्रमांक - 282/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील ग्राऊंड फलोअरवरील फलॅट नं. यु. जी. एफ.-3 याचे क्षेत्र 48.51 चौ.मि. (522 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 27/05/2003 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 1,40,000/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
6. ग्राहक तक्रार क्रमांक - 283/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील तिस-या मजल्यावरील फलॅट नं. टी.एफ. -1 याचे क्षेत्र 85.00 चौ.मि. खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 13/01/2010 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 14,00,000/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
7. ग्राहक तक्रार क्रमांक - 284/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फलॅट नं. एस .एफ. - 3 याचे क्षेत्र 47.39 चौ.मि. (510 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 25/05/2005 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 4,00,000/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
8. ग्राहक तक्रार क्रमांक - 285/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील बेसमेंट नं. 6 याचे क्षेत्र 13.75 चौ.मि. (148 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 15/07/2005 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 92,500/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
9. ग्राहक तक्रार क्रमांक - 286/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फलॅट नं. एस .एफ. - 4 याचे क्षेत्र 47.39 चौ.मि. (510 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 03/01/2006 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 4,98,000/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
10. ग्राहक तक्रार क्रमांक - 287/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फलॅट नं. एस .एफ. - 1 याचे क्षेत्र 105.85 चौ.मि. (1139 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 26/03/2010 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 10,11,875/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
11. ग्राहक तक्रार क्रमांक - 288/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फलॅट नं. एस .एफ. - 6 याचे क्षेत्र 69.30 चौ.मि. (745 चौ.फुट) आणि लगतचे टेरेस क्षेत्र याचे क्षेत्र 28.25 चौ.मि. (340 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 31/12/2005 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 6,00,000/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
12. ग्राहक तक्रार क्रमांक - 289/2011-
या तक्रारदारांनी सदरच्या “सर्वेश प्लाझा ” टाईप इमारतीमधील तिस-या मजल्यावरील फलॅट नं. टी.एफ. - 4 याचे क्षेत्र 47.39 चौ.मि. (510 चौ.फुट) खरेदी करण्याचे नोंद खरेदीपत्र दि. 06/08/2005 रोजी केलेले आहे. मिळकतीची किंमत रक्कम रु. 4,98,500/- सामनेवाला क्र. 1 यांना अदा केलेले आहेत.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात, उपरोक्त केलेप्रमाणे नोंद खरेदीपत्र झालेले आहे. तसेच सामनवेाला क्र. 1 यांनी मिळकत इमारतीचे पूर्ण बांधकाम करुन भोगवटा प्रमाणपत्र घेणेचे ठरलेले होते. तसेच मिळकतीबाबत खरेदीपत्र करार झाले तारखेपासून एक महिन्याच्या आत पूर्ण करुन घेणेचे ठरले होते. परंतु तक्रारीतील अटी व शर्ती प्रमाणे कोणतीही कृती झालेली नाही. युनिट मिळकत अपूर्ण कामासहीत कब्जा सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारांना यांना दिलेले आहेत. परंतु अद्यापही अपार्टमेंट मिळक्तीचे परिपूर्ती प्रमाणपत्र प्राप्त करुन घोषणापत्र केलेले नाही. तसेच खरेदीपत्र (Deed of Apartment) करुन दिलेले नाही.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी “सर्वेश प्लाझा ” या मिळकतीची उर्वरीत सर्व कामे पूर्ण करण्याबाबत व इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र घेऊन घोष्णापत्र नोंदविणे व फलॅट, बेसमेंट व गाळे धारक यांचे नावे खरेदीपत्र पुर्ण करुन देणेबाबत आपसात करार केलेला आहे. तरी सामनेवाला क्र. 1 व 2 हे मिळकतीची उर्वरीत सर्व कामे करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यावर सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी नेहमी विचारणा व विनंती केलेली आहे. परंतु सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी जाणूनबुजून व हेतूपूर्वक स्वत:च्या आर्थिक लाभ घेण्यासाठी तक्रारदारांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने मिळकतीचे उर्वरीत काम पूर्ण केलेले नाही. व खरेदीपत्र पूर्ण करुन दिलेले नाही. याबाबत वकिलामार्फत नोटीस पाठविली आहे. सामनेवाला यांनी अपूर्ण कामे ठेवलेली आहेत. त्यांचा तपशिल:
1. टेरेस, वॉटर प्रुफींग व त्याची गळती.
2. टेरेसवरील आर.सी.सी. वॉटर टँक पुर्ण बांधकाम, प्लास्टर व वॉटर प्रुफींगची.
3. जिना-फरशी, टप्पे व अंधारी.
4. लिफट व लिफटच्या अनुषंगाने दरवाजे व अन्य सर्व गोष्टी.
5. शेवटच्या मजल्यावरील टेरेससाठी बंदिस्त छत (टोपी)
6. संपुर्ण इमारतीस रंगकाम.
7. पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन व नळ.
8. मालमत्ता पत्रकास नोंद असलेला “ब” सत्ता प्रकार कमी करणे, समाईक वीज कनेक्शन.
9. बेसमेंट व पार्कींगचे पी.सी.सी. सिमेंट कॉंक्रीटीकरण, वाहनतळाची रचना, बेसमेंटचे वॉटर प्रुफींग.
10. ड्रेनेज, पाईपलाईन व पाण्याची पाईपलाईन खराब व निकृष्ट दर्जाची.
11. टेरेसवर बसविलेले मोबाईल टॉवर काढणे त्यासाठी फलॅटधारकांची संमती न घेता बसविलेले अवजड मशिनरी टेरेसवरुन काढून घेणे.
12. याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेच्या मंजूर नकाशाप्रमाणे पार्कींगच्या जागेमध्ये अनाधिकृत व बेकायदेशीर विनापरवाना केलेले गोडावूनचे बांधकाम काढून घेणे. अपार्टमेंटच्या साईड मार्जीनच्या जागेवर कॉंक्रीटीकरण व फरशी बसवणे, अपार्टमेंटच्या मुख्य प्रवेशद्वाराला गेट बसवणे व अन्य बाबी.
सबब, तक्रारीत नमूद केलेल्या त्रुटींचे निराकरण करण्याचा आदेश व मिळकतीचे भोगवटा प्रमाणपत्र, व तक्रारदारांचे नावे खरेदीपत्र करुन देण्याचा आदेश व्हावा. आर्थिक मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तकारीचे खर्चापोटी रु. 15,000/- इत्यादी देणेचा आदेश व्हावा.
(4) तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीसोबत तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेले अग्रीमेंट टू सेल, सर्वेश प्लाझा या इमारतीचे अपु-या कामाचे फोटो, तक्रारदार यांनी इतर फलॅटधारक यांचेबरोबर पाठविलेली नोटीस, तक्रारदार यांनी स्वतंत्रपणे पाठविलेली नोटीस, व त्याचे लखोटे व पोहच पावती व सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेत झालेले करारपत्र व सामनेवाला क्र. 2 यांनी दिलेले उत्तर इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केलेले आहे.
(5) सामनेवाला क्र. 1 यांनी एक्रत्रितपणे म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार व सदर सामनेवाला यांचेमधील ठरलेल्या करारानुसार वाद निर्माण झाल्यास आरबीट्रेटर यांची नेमणुक करण्याची आहे व वाद, तंठा मिठविणेचा आहे. यावरुन सदरची तक्रार ही प्रिमॅच्युअर दाखल केलेली आहे.
सामनेवाला त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेमध्ये दि. 2/12/2008 रोजी नोटराईज्ड एमओयु करारपत्र झालेले आहे. त्याची माहिती तक्रारदारांना आहे. सदरच्या एमओयु करारपत्रानुसार मिळकतीबाबत शिल्लक सर्व कामे सामनेवाला क्र. 2 यांनी करण्याची आहेत. व त्याची जबाबदारी सामनेवाला क्र. 2 यांनी एमओयु करारपत्रानुसार सदर इमारतीतील चार युनिटसची खरेदीपत्रे केलेली आहेत व सर्व रक्कम स्विकारलेली आहे.
सामनेवाला त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत सामनेवाला क्र. 1 यांचे मालकीची आहे. त्यांनी प्रथम स्वत: सदर इमारतीचे बांधकाम करुन विक्री करण्याचे ठरविले होते. तसेच करारात नमूद केलेप्रमाणे तक्रारदारांनी करारात नमूद केलेल्या रक्कमेशिवाय करारपत्राचा व खरेदीपत्राचा येणारा खर्च व लिगल चार्जेस तक्रारदारांनी देणेचे ठरलेले होते. तसेच समाईक विजेचे मिटर डिपॉझिटसह रक्कम तक्रारदारांनी देणेचे ठरलेले होते. तसेच लिफट व जनरेटरचा खर्च सामनेवाला क्र. 1 यांनी देणेचा ठरलेला होता. या खर्चाबाबतची रक्कम तक्रारदारांनी अद्याप दिलेली नाही.
सामनेवाला त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी निवासी गाळयाचा कब्जा दिलेला आहे. शासनाचे नियमात काही बदल झालेले आहेत. बांधकाम करण्यासाठी रिव्हाईज्ड परवानगी मिळविणेस कार्यालयीन कामासाठी विलंब होत आहे. शासनाचे नियमानुसार “ब” सत्ता प्रकारची नोंद कमी करुन देण्यासाठी सदर सामनेवाला प्रयत्नशिल आहेत. सदर नोंद कमी झालेनंतर घोषणापत्र व खरेदीपत्र करुन देण्यास सदर सामनेवाला हे तयार आहेत. सदर सामनेवाला यांनी खरेदीपत्र पूर्ण करुन देण्याचे कधीही नाकारलेले नाही. उर्वरीत बांधकाम करुन देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र. 2 यांची आहे. लिफटची सोय करुन देण्याचे करारात ठरलेले नाही. सामनेवाला जादा सुविधा म्हणून बांधकामाच्या पुढील टप्प्यात करुन देणार आहेत. व त्याचा खर्च तक्रारदारांनी देणेचा आहे. परंतु खरेदीदारांची रक्कम आल्यावर लिफट करुन देण्याचे करारात नमूद आहे. सामनेवाला यांना सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. तसेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेले नाही. पाण्याचे कनेक्शनची सोय केलेली आहे. पाणी कनेक्शन खर्चाची रक्कम तक्रारदारांनी देणेची आहे. बेसमेंटचे पीपीसी करुन देण्याचे ठरलेले नाही. बांधकाम मटेरियल आय.एस. आय. मार्कींगचा वापर केलेला आहे. मोबाईल टॉवर करारात नमूद करुन उभा केलेला आहे. याबाबत तक्रारदारांना तक्रार करता येणार नाही. मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केलेले आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी पुढील बांधकाम करणेचे आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खोटी असल्याने खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
(7) सामनेवाला क्र. 2 यांनी एकत्रीतपणे म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक हे नाते निर्माण होत नाही. तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 यांनी केलेल्या नोंद खरेदी करारपत्राबाबत सदर सामनेवाला यांना माहिती नाही. सदर सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदारांना कोणताही करार लिहून दिलेला नाही. तक्रारीत उल्लेख केलेल्या मिळकतीमध्ये अपूर्ण राहिलेले बांधकाम पूर्ण करुन देणेचे प्रस्तुत सामनेवाला यांना विनंती केली. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी सामनेवाला क्र. 1 यांचेशी चर्चा केलेली होती. परंतु उर्वरीत बांधकामाकरिता रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे सामनेवाला क्र. 2 यांना उर्वरीत बांधकामाची जबाबदारी येत नाही. सामनेवाला क्र. 1 यांनी केलेली विधाने चुकीची व दिशाभूल करणारी आहेत. तक्रारदारांनी नमूद केलेले काम करण्याकरिता रक्मम रु. 5,50,000/- इतकी आवश्यकता असून त्याची पुर्तता सामनेवाला क्र. 1 यांनी केलेली नाही. सामनेवाला क्र. 2 यांची कोणतीही जबाबदारी नसताना प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रक्कम रु. 50,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
(8) तक्रारदाराची तक्रार व सामनेवाला यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रे व दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद इत्यादीचे अवलोकन केले असता प्रस्तुत प्रकरणात पुढीलप्रमाणे मुद्दे निष्कर्षासाठी येत आहेत.
मुद्दे :-
1. तक्रारदार हे सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे
ग्राहक होतात काय ? व प्रस्तुतचा वाद हा ग्राहक
वाद होतो आहे काय ? होय
2. सामनेवाला यांचे सेवेत त्रुटी झाली आहे काय ? होय
3. तक्रारदार हे मानसिक व आर्थिक त्रासापोटी
रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
मुद्दा क्र. 1 -
तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत ही सामनेवाला क्र. 1 मालकीची वाहिवाटीची आहे. सदरची मिळकत विकसित करुन तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे “सर्वेश प्लाझा ” इमारत अपार्टमेंट टाईप इमारत बांधलेली आहे. व सदर इमारतीमध्ये युनिट घेणेकरिता तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 यांचेमध्ये करार झालेले आहेत. करारपत्रात ठरलेप्रमाणे तक्रारदारांनी मिळकतीच्या किंमती अदा केलेल्या आहेत. तक्रारदारांची तक्रार सदर सामनेवाला यांनी बांधकाम पूर्ण न करता त्यामध्ये त्रुटी ठेवलेल्या आहेत. तसेच घोषणापत्र केले नाही. व भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही व नोंद खरेदीपत्र केलेले नाही याबाबतची तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाला क्र. 2 हे बांधकाम व्यावसायिक आहेत. सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेमध्ये मेमोरँडम ऑफ अंडरस्टॅडींग दि. 02/12/2008 रोजी झालेले आहे. त्यानुसार रक्कम रु. 100/- च्या स्टँम्पवर नोटराईज्ड करार झालेला आहे. सदर करारपत्राचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सदर करारपत्रानुसार सामनेवाला क्र.2 यांनी इमारतीचे उर्वरीत काम करण्याचे आहे. तसेच बांधकामातील त्रुटी दुर करुन देणेच्या आहेत. सदर इमारतीतील युनिटस विक्री करणेची आहे. त्यानंतर सामनेवाला क्र. 2 यांनी सदरच्या इमारतीमधील काही युनिटची विक्री केलेली आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आणून दिलेली आहे. तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 यांचेमध्ये निवासी युनिट खरेदी झालेबाबतचा करार तसेच सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेमध्ये झालेले मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडींग व त्यानुसार सामनवेाला क्र. 2 यांनी पुढील बांधकामाचे तसेच युनिटधारकांना पूर्ण करुन द्यावयाच्या कायदेशीर बाबी याबाबतची घेतलेली जबाबदारी इत्यादीचा ग्राहक सरंक्षण कायद्यातील तरतुदीचा विचार करता सामनेवाला क्र. 1 व 2 हे तक्रारदारांचे ग्राहक होत आहेत व सदरचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला क्र. 1 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये करारामध्ये लवाद नेमणेबाबतचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. परंतु ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 3 मधील तरतुदींचा विचार करता सामनेवाला क्र. 1 यांनी लवादाबाबतचा उपस्थित केलेला मुद्दा हे मंच विचारात घेत नाही. सबब, मुद्दा क्र. 1 होकारार्थी आहे.
मुद्दा क्र. 2 व 3 -
सामनेवाला यांनी बांधकामात ठेवलेली त्रुटी व सोयी सुविधा याबाबत सदरची वस्तुस्थिती समोर येण्यासाठी या मंचाने दोन्ही बाजूंच्या संमतीने कोर्ट कमिशनर म्हणून असोशिएशन ऑफ आर्किटेक्ट अन्ड इंजिनिअर्स, कोल्हापूर यांचेकडील तज्ञ अभियंत्यांची नेमणूक करण्याचा आदेश केलेला आहे. सदर तज्ञ अभियंत्याने कोर्ट कमिशनरचे कामकाज करुन त्यांनी त्यांचा अहवाल दि. 15/11/2011 रोजी दाखल केलेला आहे. सदरचा अहवाल हा पुढीलप्रमाणे-
1. टेरेसवर 25 टक्के वॉटरप्रुफींगचे काम केलेले आहे. बाकीचा पूर्ण टेरेस वॉटरप्रूफींग केलेला नाही. त्यामुळे गळती आहे.
2. टेरेसवरील आर.सी.सी. वॉटर टँक अपूरा आहे. त्यांचे कॉलमचे काम पूर्ण केलेले असून आर.सी.सी. भिंतीचे काम अर्धेच झालेले आहे. व त्यामध्ये 500 लिटरची प्लॅस्टीकची पाण्याची टाकी बसविलेली आहे. तसेच टेरेसवर पाण्याच्या प्लॅस्टीकच्या तीन पाण्याच्या टाक्या आहेत.
3. टेरेसवर जाण्यासाठी असलेल्या शेवटच्या हाईटवर फरशी, टप्पे व अंधारी बसवलेली नाही.
4. लिफटच्या तीन आर.सी.सी. भिंती बांधून तयार आहेत. लिफट बसवलेली नाही. कॉमन पॅसेजच्या बाजूला लिफट वेलला भिंत नसलेने अपघात होण्याची शक्यता आहे.
5. टेरेसवर जिना संपतो त्यावर टोपी नाही.
6. इमारतीच्या दर्शनी बाजूस पांढरा एक हात प्रायमर केलेला आहे. बाकी सर्व इमारतीचे रंगकाम झालेले नाही.
7. पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन दिलेले नाही.
8. सदरचा मुद्दा आमच्या अखत्यारीत येत नाही.
9. बेसमेंटमध्ये पाकींगच्या जागेवर एक गोडावून व दुस-या गोडावूनचे अर्धवट बांधकाम झालेले आहे. बेसमेंटमध्ये दक्षिणेकडील रस्त्याच्या बाजूस अर्धवट आर.सी.सी. भिंत असलेने रस्त्यावरील व गटारीतील संपूर्ण पाणी बेसमेंटमध्ये येते व पूर्ण गटारीतील घाण बेसमेंटमध्ये पसरलेली आहे. बेसमेंटच्या पूर्वेकडील व उत्तरेकडील आर.सी. सी. भिंत बांधलेली नाही. बेसमेंटचे पी.सी.सी. झालेले नाही. पार्कींगसाठीचा रॅप खडा आहे. त्यावरुन गाडी येऊ शकत नाही. आज सुध्दा बेसमेंटच्या काही भागात पाणी साठलेले आहे.
10. ड्रेनेज लाईन या चुकीच्या पध्दतीने लावलेल्या आहेत. व त्यांचा दर्जा खराब आहे. पूर्वेकडील फलॅटधारकांच्या बाथरुममधील आऊटलेट हे खालील मजल्याच्या दुकानावरील आर.सी.सी. बोर्डाच्या वरती घेऊन त्या वळविल्या आहेत. व त्या खाली घेतल्या आहेत. दुकानाच्या बोर्डवरती गळती असलेने संडासचा मैला बोर्डावर साठला आहे. तसेच बाथरुममधील आऊटलेट तुंबल्यामुळे पहिल्या मजल्यावरील फलॅटमध्ये बाथरुममधून पाणी सर्व फलॅटमध्ये पसरले आहे.
11. टेरेसवर मोबाईलवर टॉवर उभारलेला आहे. त्याबरोबर त्याचा जरनेटर व एक मशिन केबीनसुध्दा बसविलेली आहे.
12. कोल्हापर महानगरपालिकेच्या मंजूर प्लॅनमध्ये नसलेला ग्राऊंड फलोअरला एक दुकानगाळा पार्कींगच्या गेटमध्ये आहे. पार्कींगच्या बाजूने पी.सी.सी. नाही. संरक्षक भिंत नाही. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला गेट बसविलेले नाही.
उपरोक्त अहवालाचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवाला बांधकाम व्यावसायिकांनी अद्यापपर्यंत बांधकामामध्ये त्रुटी ठेवलेल्या आहेत व तसे करारपत्राप्रमाणे सोयी-सुविधा दिलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. सामनेवाला क्र. 1 यांनी युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदार व त्यांचेमध्ये झालेले करारातील अट क्र. 11 या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. व सदरच्या अटीस अनुसरुन मोबाईल टॉवर्स इमारतीमध्ये ठेवण्यास सामनेवाला क्र. 1 यांनी मोबाईल कंपनीशी करार केलेला आहे. परंतु तक्रारदारांचे वकिलांनी युक्तीवादाच्या वेळेस सदर टॉवर्समुळे मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम व सदर मोबाईल टॉवरमुळे रेडिएशन व त्यामुळे होणारे शारिरीक आजार या मुद्दयांचे अनुषंगे या मंचाचे लक्ष वेधलेले आहे. मोबाईल टॉवरमुळे मानवी जीवनावर कोणतेही घातक परिणाम होत नाहीत याबाबत सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी त्या अनुषंगाने कोणताही तज्ञ मतांचा पुरावा दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी मिळकत विकसित करण्याची होती. परंतु स्वत:साठी सदर इमारतीवरती मोबाईल टॉवर अथवा तदनुषंगिक या बाबींना परवानगी देऊन स्वत:साठी फायदा घेता येणार नाही. विकसकाचे काम हे मिळकत विकसन करण्याचे आहे त्यामुळे तक्रारदारांनी मोबाईल टॉवरच्या अनुषंगे उपस्थित केलेला मुद्दा हे मंच विचारात घेत आहे. सबब, सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी इमारतीवर बसविलेला मोबाईल टॉवर काढून टाकावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांचे वकिलांनी युक्तीवादाच्या वेळेस कराराप्रमाणे लिफटचे पैसे तक्रारदारांनी देणेचे होते व त्याप्रमाणे लिफट बसवून देण्याचे आहे असे प्रतिपादन केले. तक्रारदारांनी लिफटचे पैसे अदा केलेले आहेत याबाबतचा तक्रारदारांकडून कोणताही पुरावा आलेला नाही. सबब, तक्रारदारांनी लिफटचे पैसे सामनेवाला यांना अदा करावे व तदनंतर लिफटची सुविधा करुन द्यावी. कोर्ट कमिशनर यांच्या अहवालाचे अवलोकन केले असता सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी कमिशन अहवालामध्ये नमूद केलेल्या त्रुटी दूर करुन द्याव्यात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(9) तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीमध्ये अद्यापपर्यंत बांधकाम परिपूर्ती दाखला घेऊन नोंद करारपत्र करुन दिलेले नाही असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. सदरची बाब विचारात घेता सामनेवाला यांचे सेवेत गंभीर त्रुटी झाल्याचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सामनेवाला यांनी इमारतीचे बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र घेऊन तक्रारदारांना कराराप्रमाणे नोंद खरेदीपत्र करुन द्यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदार हे आर्थिक, मानसिक त्रासापोटी रक्कम मिळण्यासाठी पात्र आहेत असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे.
उपरोक्त विवेचनाचा विचार करता आदेशाची परिपूर्ती करुन देण्यासाठी सामनेवाला क्र. 1 व 2 हे वैयक्तीक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे.
उपरोक्त संपूर्ण विवेचनाचा विचार करता ग्राक तक्रार क्रमांकनिहाय एकत्रितरित्या आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1. तक्रारदारांचे सर्व तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतात.
2. सामनेवाला क्र. 1 व 2 बांधकाम व्यावसायिक यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना बांधकाम परिपूर्ती दाखला घेऊन तक्रारदारांना करारात उल्लेख केलेले युनिटचे नोंद खरेदीपत्र करुन द्यावे.
3. सामनेवाला क्र. 1 व 2 बांधकाम व्यावसायिक यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या कोर्ट कमिशन अहवालामध्ये नमूद केलेली पुढील त्रुटी दुरु करुन द्याव्यात.
1. पूर्ण टेरेसवरील वॉटरप्रुफींगचे काम करुन द्यावे.
2. टेरेसवरील आर.सी.सी. वॉटर टँक अपूरा आहे. त्याचे कॉलमचे काम पूर्ण करुन द्यावे.
3. टेरेसवर जाण्यासाठी असलेल्या शेवटच्या हाईटवर फरशी , टप्पे व अंधारी बसवून द्यावी.
4. लिफटच्या तीन आर.सी.सी. भिंती बांधून लिफट बसवून द्यावी व कॉमन पॅसेजच्या बाजूला लिफट वेलला भिंत बांधून द्यावी.
5. टेरेसवरील जिन्यास त्यावर टोपी करुन द्यावी.
6. इमारतीचे बाकी सर्व रंगकाम करुन द्यावे.
7. पिण्याचे पाण्याचे कनेक्शन द्यावे.
8. बेसमेंटच्या पूर्वेकडील व उत्तरेकडील आर.सी.सी. भिंत बांधून द्यावी. व बेसमेंटचे पी.सी.सी. करुन द्यावे. पार्कींगसाठीचा रॅप खडा असलेमुळे त्यावरुन गाडी येऊ शकत नाही. तो व्यवस्थित करुन द्यावा.
9. ड्रेनेज लाईन व्यवस्थित चांगल्या दर्जाच्या लावून द्यावेत. तसेच पूर्वेकडील फलॅटधारकांचे बाथरुममधील आऊटलेट हे खालील मजल्याच्या दुकानावरील आर.सी.सी. बोर्डाच्या वर वळवून घेतलेमुळे दुकानाच्या बोर्डावर गळती असलेने संडासचा मैला बोर्डवर साठला आहे. बाथरुमचे तुंबलेले आऊटलेट व्यवस्थित करुन द्यावे.
10. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी इमारतीवर बसविलेला मोबाईल टॉवर काढून टाकावा.
11. पार्कींगमध्ये बाजूने पी.सी.सी. करुन सरंक्षक भिंत बांधून द्यावी व इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला गेट बसवून द्यावे.
4. सामनेवाला क्र. 1 व 2 बांधकाम व्यावसायिक यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना शारिरीक, मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) द्यावेत.
5. सामनेवाला क्र. 1 व 2 बांधकाम व्यावसायिक यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.