अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक :एपीडीएफ/११२/2008
तक्रार अर्ज दाखल दिनांक : २१/०५/२००५
तक्रार निकाल दिनांक :२४/११/२०११
सौ. एस्. पी. ठिगळे, ..)
दिगंबर प्रसाद सोसायटी, ..)
सुखसागरनगर, भाग 1 ..)
हिरामण बनकर शाळेजवळ, ..)
कात्रज, पुणे – ४११ ०१६. ..)...तक्रारदार
विरुध्द
सौ. अंजली जोशी, ..)
अंजलीज क्लासेस, ..)
वसंतबाग, बिबवेवाडी रोड, ..)
पुणे – ४११ ०३७. ..)...जाबदार
********************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूतचे प्रकरण सन 2005 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/146/2005 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/112/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 2008 पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथवा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांना मंचाने नोटीस काढली असता तक्रारदार नोटीस मिळूनही मे. मंचासमोर हजर राहिले नाहीत. सबब सदरहू प्रकरण चालविण्यामध्ये तक्रारदारांना स्वारस्य नाही या निष्कर्षाअंती प्रस्तूतचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –24/11/2011