Maharashtra

Akola

CC/14/132

Ajay Shivshankar Khemaka - Complainant(s)

Versus

Sony India Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Ajay Joshi

14 Jul 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/14/132
 
1. Ajay Shivshankar Khemaka
R/o. Toshniwal Lay out,Ram Nagar, Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sony India Pvt. Ltd.
II nd floor,Krimpej Corporation,MIDC, Andheri(East), Mumbai
Mumbai
Maharashtra
2. Parul Marketing,
Ratanlal Plot Chowk, Akola
Akola
Maharashtra
3. Gajanan Services
Near Hanuman temple, Ratanlal Plot, Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 14/07/2015  )

 

आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार

 

1.        ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे. . .

            तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कंपनीचा एक्सपेरीया झेड हा मोबाईल संच मॉडेल क्र. सी 6602, आयएमईआय क्र. 355666058228403, विरुध्दपक्ष क्र. 2 कडून दि. 11/01/2014 रोजी रु. 32,000/- ला वैयक्तीक वापराकरिता विकत घेतला.  सदर मोबाईल घेते वेळी  विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सांगितले की, सदर मोबाईल मध्ये एक वर्षापर्यंत कोणताही बिघाड होणार नाही व तो जाहीरातीमध्ये दाखविल्या प्रमाणे सर्व प्रकारचे कार्य योग्य रित्या करेल, तसेच मुदतीत काही बिघाड झाल्यास सदरहू संच बदलवून देण्याचे आश्वासन दिले होते.  सदर संच हा जुन 2014 पर्यंत सुरळीतपणे चालला, परंतु नंतर असे लक्षात आले की, सरहू संचाची बॅटरी ही व्यवस्थीतपणे चार्ज होत नाही. तसेच मोबाईल बंद झाल्यानंतर सुरु होत नाही.  या कारणास्तव तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 2 कडे गेला असता, त्यांनी सदर संचास दुरुस्तीची आवश्यकता असल्याने दुरुस्तीकरिता विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे अकोला येथील अधिकृत दुरुस्ती केंद्र विरुध्दपक्ष क्र. 3 कडे सदर संच पाठविला.  विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी थातुरमातुर दुरुस्ती करुन सदरहू संच तक्रारकर्त्यास परत केला.  त्यावेळी विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी त्या संचामध्ये असलेले दोष दुर केले नाहीत,  म्हणून तक्रारकर्त्याने परत विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदर संच नेला असता, विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी सदर संच गॅरंटी मध्ये असतांना सुध्दा व त्यात असलेले दोष पुर्णपणे अवगत असतांना सुध्दा सदरहू संच बदलून न देता, तसाच जुना वापरलेला संच देण्याची तयारी दर्शविली, परंतु तक्रारकर्त्याने त्यास नकार दिला.  या बाबत तक्रारकर्त्याने दि. 18/6/2014 रोजी पत्र पाठवून सदरहू दोषपुर्ण मोबाईल संचाच्या ऐवजी नवीन मोबाईल संचाची मागणी केली किंवा संच खरेदीपोटी दिलेली रक्कम रु. 32,000/- ची मागणी केली.  परंतु सदर पत्र स्विकारण्यास विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी  नकार दिला. म्हणून तक्रारकर्त्याने दि. 19/6/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांना पत्र पाठवून मोबाईल  संच बदलून देण्याची मागणी केली.  तरी सुध्दा विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना दि. 2/6/2014 रोजी मेल मार्फत विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांच्याकडे केलेल्या  पत्र व्यवहाराबाबत व संचातील दोषांबाबत माहिती दिली व सदरहू संच बदलवून देण्याची मागणी केली.  तेव्हा विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी  सुध्दा जुना  मोबाईल संच देण्याची तयारी दर्शविली.  शेवटी दि. 9 जुलै 2014 रोजी  पत्र पाठवून संच बदलवून देण्याची अथवा रक्कम परत करण्याची मागणी केली.  सदर पत्राला कुठलेही उत्तर विरुध्दपक्षांनी दिले नाही व अशा प्रकारे विरुध्दपक्षानी सेवेमध्ये न्युनता दर्शविली.  तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार  मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1,2 व 3 यांनी संयुक्तपणे व वैयक्तीकरित्या मोबाईल संचाची किंमत रु. 32,000/- व्याजासह परत करावी.  तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रार खर्चाचे रु. 10,000/- विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास द्यावे.   

सदर तक्रार शपथेवर दाखल असून  त्यासोबत   एकंदर  13 दस्‍तऐवज पुरावे म्हणून जोडण्‍यात आले आहेत. 

विरुध्‍दपक्ष क्र. 1, 2 व 3  यांचा लेखीजवाब :-

2.        सदर तक्रारीचे अनुषंगाने विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3  यांनी संयुक्त लेखी जवाब इंग्लीशमध्ये दाखल केलेला आहे, त्याचा थोडक्यात आशय येणे प्रमाणे…

     विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील सर्व बाबी नाकारत, प्राथमिक आक्षेप घेतला आहे.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या कंपनीचा मोबाईल, त्याचे संपुर्ण समाधान झाल्यावरच विकत घेतला आहे.  मोबाईल घेतेवेळीच वॉरंटी कालावधीसाठीच्या अटीशर्तीची प्रत तक्रारकर्त्याला दिलेली आहे.  तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर मोबाईलमध्ये निर्मिती दोष असता तर त्यात मोबाईल घेतल्यानंतरच तक्रारी उद्भवल्या असत्या.  परंतु हा मोबाईल तक्रारकर्त्याने सहा महिनेपर्यंत विना तक्रार वापरला आहे.  त्यामुळे तक्रारकर्त्याची मोबाईलमध्ये निर्मिती दोष असल्याची तक्रार ग्राह्य धरता येणार नाही.  तक्रारकर्त्याने स्वत:चे म्हणणे सिध्द करण्याकरिता कुठल्याही तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही.

   या उलट दि. 19/06/2014 रोजी तक्रारकर्ता जेंव्हा प्रथम विरुध्दपक्ष क्र. 3 कडे मोबाईलची ‘No Power’ ची तक्रार घेऊन गेला, त्याचवेळी विरुध्दपक्ष क्र. 3 ने तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा लगेच निपटारा व्हावा, यासाठी त्याला दुसरा Reconditioned handset  देऊ केला.  तेंव्हा तक्रारकर्त्याने त्याचा स्विकार केला.  परंतु या दुस-या मोबाईल मध्ये पुन्हा तक्रार उद्भवल्यानंतर तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 3 कडे गेला व विरुध्दपक्ष क्र. 3 ने त्या मोबाईलचे सॉफ्टवेअर अपग्रेड करुन दिले व तो दुरुस्त झालेला मोबाईल तक्रारकर्त्याने दि. 27/09/2014 रोजी परत नेला व  आता तक्रारकर्ता त्या दुस-या स्विकारलेल्या मोबाईलच्या बदल्यात नवीन मोबाईलची मागणी करीत आहे व ती मागणी विरुध्दपक्षाच्या अटी शर्तीत बसत नसल्याने मान्य करता येत नाही.  स्वत:ची बाजु बळकट करण्यासाठी विरुध्दपक्षाने खालील न्यायनिवाड्यांचा दाखला दिला.

  1. FA No.75/2014 ( SCDRC CHANDIGARH)

Surinderpal Sing  Vs. Sony Indial Pvt Ltd & Ors.

  1. AIR 1996 (SC) 2508

Bharathi Kniting Co. Vs. DHL worldwide Express Courier Division of Air Freight Ltd.

  1. (1992) I CPJ 97 ( SCDRC Kerala)

Sabeena Cycle Emporium Chennakhaada Vs. Thajes Ravi M.R. Pancha Villa Vender Ezkhone P.O.

  1. I (2003) CPJ 244 ( SCDRC West Bangal )

Keshab  Ram Mahto Vs. Hero Honda Motors Limited and another

  1. I (2003) CPJ 298 ( SCDRC Delhi)

S.P.Barthwal Vs. Maruti Udyog Limited & Anr.

   त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांना जाणुनबुजून त्रास देणारी असल्याने व विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी  सेवा देण्यात कुठलीही त्रुटी केलेली नसल्याने खर्चासह खारीज करावी.

3.      त्यानंतर तक्रारकर्ते यांनी प्रतिउत्तर, लेखी युक्तीवाद, व न्यायनिवाडे दाखल केले तसेच, विरुध्दपक्ष यांनी शपथेवर पुरावा दाखल केला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

3.      सदर प्रकरणात उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकून व तक्रारकर्त्याचा लेखी युक्तीवादासह मंचात दाखल असलेल्या दस्तांचे अवलोकन व सखोल अभ्यास करुन काढलेल्या खालील मुद्दयांचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला. तसेच विरुध्दपक्षाच्या पुरसीसनुसार त्यांचा जबाब व पुरावा लेखी युक्तीवाद म्हणून ग्राह्य धरण्यात आला.

  1.   तक्रारकर्त्याने दाखल केलेली, विरुध्दपक्ष क्र. 2 कडून खरेदी केलेला व विरुध्दपक्ष क्र. 1 ने निर्मीत केलेल्या मोबाईलची खरेदी पावती, विरुध्दपक्ष क्र. 3 चे जॉबशिट व तक्रारकर्त्याचा विरुध्दपक्षाशी झालेला पत्रव्यवहार, यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचा ग्राहक असल्याचे दिसून येते.  तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्ते ग्राहक नसल्याबद्दल कुठलाच आक्षेप न घेतल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचा “ग्राहक” असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
  2.    तक्रारकर्त्याने त्यांच्या तक्रारीत असे म्हटले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या कंपनीचा सोनी एक्सपेरिया झेड हा मोबाईल दि. 11/01/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून खरेदी केला,  सदर मोबाईलवर एक वर्षाची वारंटी होती.  परंतु जुन 2014 मध्येच म्हणजे मोबाईल खरेदीनंतर केवळ 6 महिन्यातच सदर मोबाईलची बॅटरी व्यवस्थीत काम करत नसल्याचे लक्षात आल्यावर, विरुध्दपक्ष क्र. 2 च्या सांगण्यावरुन विरुध्दपक्ष  क्र. 3 या विरुध्दपक्ष क्र. 1 च्या अधिकृत दुरुस्ती केंद्राकडे तक्रारकर्त्याने स्वत:चा मोबाईल दुरुस्तीसाठी दिला.  विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी योग्य प्रकारे दुरुस्ती न केल्याने तक्रारकर्त्याने सदर मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 3 यांचेकडे दिला व दोषपूर्ण मोबाईल संचाच्या ऐवजी नवीन मोबाईल संच किंवा मोबाईल खरेदीची रक्कम रु. 32,000/- पत्राद्वारे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना मागीतली असता, आजपावेतो विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी कारवाई केली नाही.  तक्रारकर्त्याच्या मेलला दि. 2/7/2014 रोजी मेलद्वारे उत्तर पाठवून तक्रारकर्त्याच्या मागणीचा विचार करता येणार नाही,  त्या ऐवजी तक्रारकर्त्याच्या मोबाईलच्या  मॉडेलचे Factory reconditioned unit  तक्रारकर्त्याला देण्यास तयार असल्याचे तक्रारकर्त्याला कळवले.  त्यामुळे तक्रारकर्त्याने या मंचात तक्रार दाखल केली आहे.
  3.   यावर विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी एकत्रितपणे इंग्लीशमध्ये जवाब दिला.  विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 चा व विरुध्दपक्ष क्र. 2 कडून घेतलेला मोबाईल जरी वॉरंटी कालावधीत असला तरी मोबाईल घेतेवेळी तक्राकरर्त्याला पुरवलेल्या अटी शर्ती नुसारच तक्रारकर्त्याच्या मागणीचा विचार करण्यात आला.  विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी त्यांनी तक्रारकर्त्याच्या मोबाईलमध्ये “No power” ची तक्रार उद्भवल्याच्याच दिवशी म्हणजे दि. 19/6/2014 रोजी  Reconditioned handset देऊ केला व तक्रारकर्त्याने त्याचा स्विकार केला. पुन्हा या दुस-या मोबाईल मध्ये सुध्दा  Hanging, restarting ची तक्रार उद्भवल्यावर विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी त्या मोबाईलचे सॉफ्टवेअर अपग्रेड करुन दिले व तो  Reconditioned handset तक्रारकर्त्याने दि. 27/09/2014 रोजी नेला.  त्यामुळे त्या Reconditioned handset च्या बदल्यात नवीन पॅक मोबाईल किंवा मोबाईलची किंमत रु. 32000/- विरुध्दपक्ष तक्रारकर्त्याला देऊ शकत नाही.
  4.   तक्रारकर्त्याने त्याच्या प्रतिउत्तरात मोबाईल नेल्याची अथवा विरुध्दपक्षाने देऊ केलेला Reconditioned handset स्विकारल्याची बाब सपशेल नाकारली आहे.  तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर मोबाईल दि. 18/6/2014 पासून विरुध्दपक्षाकडेच नादुरुस्त अवस्थेत पडला आहे.
  5.   उभय पक्षाचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने दाखल दस्तांचे अवलोकन केले.   तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या  Job Sheet  ( दस्त क्र. 13 ) वरील मोबाईलचा  IMEI No.  व तक्रारकर्त्याच्या खरेदी पावतीवरील मोबाईलचा IMEI No.   हा सारखाच आहे (IMEI No. 355666058228403)  त्याच प्रमाणे दस्त क्र. 20 वर विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला पाठवलेला दि. 2/7/2014 चा E-mail आहे.  त्यातही तक्रारकर्त्याच्या मोबाईलचा IMEI No.   पुर्वीचाच आहे.  या ई-मेल मध्ये विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्याच्या मोबाईलच्या बदल्यात  Factory reconditioned unit of the same model देऊ केले होते.  सदर ई-मेल मध्ये 19 जुन 2014 च्या जॉबशिटचा उल्लेख आहे व याच ई-मेल मध्ये विरुध्दपक्ष पुढे असे नमुद करतो की,…

‘we would request you to collect your Xperia Z from our Authorized service centre M/s Shree Gajanan Services’

यावरुन तक्रारकर्त्याचा मोबाईल  विरुध्दपक्षाकडे आहे व विरुध्दपक्षाने दुसरा कुठलाही Reconditioned handset तक्रारकर्त्याला दिला नव्हता, या तक्रारकर्त्याच्या विधानात मंचाला तथ्य आढळते.

  1.   विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात, तक्रारकर्ता हा Reconditioned handset घेऊन परत विरुध्दपक्ष क्र. 3 कडे गेला व विरुध्दपक्ष क्र. 3 ने तो दुरुस्त करुन दिल्यावर दि. 27/9/2014 ला तक्रारकर्त्याने परत नेला, असे म्हटले आहे.  परंतु   स्वत:चे हे म्हणणे सिध्द करण्यासाठी विरुध्दपक्षाने कुठलेही दस्त मंचासमोर दाखल केले नाहीत.  तक्रारकर्त्याने ही तक्रार दि. 12/9/2014 रोजी मंचात दाखल केली आहे.  त्यामुळे  विरुध्दपक्षाचे विधान मंचाला विश्वासार्ह वाटत नाही,  हाच मुद्दा तक्रारकर्त्याने युक्तीवादात उपस्थित  केल्यावर विरुध्दपक्षाच्या वकीलांनी विरुध्दपक्षाशी संपर्क करुन योग्य तो खुलासा करण्याचे तोंडी आश्वासन मंचासमोर दिले.  परंतु आजपावेतो या मुद्दयावर विरुध्दपक्षाचा खुलासा मंचासमोर आलेला नसल्याने तक्रारकर्त्याने कुठलाही दुसरा मोबाईल स्विकारला नसल्याचे व तक्रारकर्त्याचा वादातील मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 3 कडेच असल्याचे, हे मंच ग्राह्य धरत आहे.   विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात तक्रारकर्त्याने सदर मोबाईल मध्ये बिघाड होता, हे तज्ञाच्या अहवालासह सिध्द करायला हवे होते, असे म्हटले असून, त्या संबंधीत मा. वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले आहे.  परंतु सदर मोबाईल विरुध्दपक्षाच्याच ताब्यात असल्याने, पुरावा म्हणून कुठल्याही तज्ञाचा अहवाल सादर केला नाही, हे तक्रारकर्त्याचे म्हणणेही मंच ग्राह्य ध्रत असल्याने विरुध्दपक्षाने दाखल केलेले न्यायनिवाडे विचारात घेतले नाही.
  2. विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात तक्रारकर्त्याचा मोबाईल जरी वॉरंटी कालावधीत बिघडला असला तरी त्याला विरुध्दपक्षाच्या अटी शर्ती नुसारच मोबाईल बदलून अथवा मोबाईलची किंमत दिली जाईल अथवा नाही., असे नमुद केले आहे.  त्यावर तक्रारकर्त्याने त्यांच्या लेखी युक्तीवादात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी जरी त्यांच्या अटी शर्तीचा हवाला दिलेला आहे,  तरी त्यांनी तक्रारकर्त्याची मागणी कोणत्या अटी शर्तीमुळे मान्य करता येत नाही, याचा कुठेही उल्लेख केलेला नाही.

     मंचाने दस्त क्र. 13 वरील जॉबशिटचे बारकाईने अवलोकन केले असता, खालील बाबी मंचाच्या निदर्शनास आल्यात.

Warranty Category    - In warranty

Condition of Set       - good, Scrates on backside

Customer Complaint   - No power, No power on

Unit Dead            - Yes

   यावरुन तक्रारकर्त्याच्या मोबाईलची बाह्य स्थिती चांगली होती, परंतु  सदर मोबाईल मध्ये No Power, No power on चा प्राब्लेम असल्याने सदर मोबाईल डेड होता.

    तसेच याच Jobsheet मधील  Important notes  मधील क्र. 4 वरील सुचनेनुसार सदर मोबाईल मध्ये जर अंतर्गत बिघाड असेल, जो नुसत्या डोळयांना दिसणे शक्य नाही,  त्याबद्दल ग्राहकाला सुचीत करण्यात येईल, असे आहे.  तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी   No Power on या बिघाडाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही बिघाड असल्याचे तक्रारकर्त्याला सुचीत केले नाही.

  1. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने सदर मोबाईल सहा महिने वापरल्याने त्यात निर्मिती दोष नाही.   यावर तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, इतर कंपन्यांच्या मोंबाईल मध्ये सुध्दा विरुध्दपक्ष क्र. 1 च्या या मॉडलच्या मोबाईलमध्ये असलेल्या सुविधा असतांना व ते स्वस्त असतांनाही केवळ विरुध्दपक्ष क्र. 1 ही नामांकीत कंपनी असल्याने, जास्त किंमत देऊन वादातील मोबाईल खरेदी केला.  त्यावर विरुध्दपक्ष क्र. 1 ने एक वर्षाचा वॉरंटी दिली असतांना सदर मोबाईल मध्ये  कमीतकमी एक वर्ष तरी काही बिघाड यायला नको होता परंत त्यात फक्त सहा महन्यात बिघाड झाला व आलेला बिघाड तक्रारकर्त्याच्या चुकीच्या वापर पध्दतीने झाल्याचे विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचे कुठेच म्हणणे नसल्याने सदर मोबाईल मध्ये निर्मीती दोष असून, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाकडून मोबाईलची संपुर्ण किंमत मिळण्यास पात्र आहे. 

   या मुद्याचा विचार करतांना मंचाने विरुध्दपक्षाने पुरवलेल्या विरुध्दपक्ष क्र. 1 च्या माहीती पुस्तीकेचे ( दस्त क्र. 41 ते 57 ) चे अवलोकन केले.  त्यातील दस्त क्र. 52 वरील  Our Warranty या सदरात  What we will do या शिर्षकांतर्गत असे नमुद केले की,

“If, during the warranty period, this Product fails to operate under normal use and service, due to defects in design, materials or workmanship. Sony authorized distributors or service partners, in country/ region where you purchased the Product, will, at their option, either repair, replace or refund the purchase price of the Product in accordance with the term and conditions stipulated herein.

   Sony and its service partners reserve the right to charge a handling fee if a returned Product is found not to be under warranty according to the conditions below.”

   त्याच प्रमाणे विरुध्दपक्षाने त्याच्या अटी शर्ती नुसारच तक्रारकर्त्याची मागणी विचारात घेतली होती.  या सर्व अटी शर्ती संपुर्णत: तक्रारकर्त्यावर लादता येणार नसल्याचे मंचाचे मत आहे, कारण या अटी शर्ती विरुध्दपक्षाचा मोबाईल विकत घेतल्यानंतरच तक्रारकर्त्याला पुरवण्यात आल्यात.  त्यामुळे तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यात ग्राहक-विक्रेता संबंध स्थापीत झाल्यानंतर विरुध्दपक्षाच्या अटी शर्ती तक्रारकर्त्याला माहीत झाल्याने सदर अटी शर्ती एकतर्फी असल्याने तक्रारकर्त्यावर लादता येणार नसल्याचे मंचाचे मत आहे.  तसेच मोबाईल मध्ये बिघाड झाल्यास परिस्थितीनुसार मोबाईल दुरुस्त करुन देण्याचे किंवा नवीन मोबाईल देण्याचे किंवा मोबाईलची पुर्ण रक्कम देण्याचे आश्वासन देऊनही ( दस्त क्र. 52 ) विरुध्दपक्ष तक्रारकर्त्याची मागणी नाकारुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करीत असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचेकडून व्याजासहीत मोबाईलची रक्कम व नुकसान भरपाईसह प्ररकणाचा खर्च मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.

    तसेच   विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 विरुध्द एकतर्फीचा आदेश झाल्याने व त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 ला अधिकारपत्र दिले नसल्याने दाखल जबाब फक्त विरुध्दपक्ष क्र. 1 चाच गृहीत धरुन विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 विरुध्द एकतर्फी निर्णय देण्याची विनंती तक्रारकर्त्याने  केली आहे.  परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 च्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 2 हा विरुध्दपक्ष क्र. 1 चा अधिकृत विक्रेता व विरुध्दपक्ष क्र. 3 हा अधिकृत दुरुस्ती केंद्र असल्याने त्यांच्या वतीने जबाब देण्याचा अधिकार विरुध्दपक्ष क्र. 1 ला आहे.  विरुध्दपक्ष क्र.1 चे सदर म्हणणे मंचाने ग्राह्य धरुन दाखल जबाब विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचा असल्याचे मान्य केले आहे.

      तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या न्यायनिवाड्यातील सगळी तथ्ये तंतोतंत लागु होत नसल्याने ती संपुर्णत: मान्य न करता प्रकरणाशी संबंधीत असलेलीच तथ्ये अंतीम आदेशाच्या वेळी ग्राह्य धरण्यात आली.

    सबब वरील सर्व मुद्दयांचा विचार करुन खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात आला.

 

                                   ::: अं ति म  आ दे श  :::

1)  तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.

2)  विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तपणे  तक्रारकर्त्याला त्याच्या मोबाईल संचाची पुर्ण किंमत रु. 32,000/-  ( रुपये बत्तीस हजार ) प्रकरण दाखल दि. 12/09/2014 पासून देय तारखेपर्यंत दरसाल दरशेकडा 8 टक्के व्याजासह परत करावे.

 

3)  विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी  तक्रारकर्त्याला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न करता तक्रारकर्त्याला Reconditioned handset देऊ करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयकतीक व संयुक्तीकपणे तक्रारकर्त्याला शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. 5,000/- ( रुपये पाच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3,000/- ( रुपये तिन हजार ) द्यावे.

4)  सदर आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे,  

5)       सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍या. 

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.