अर्जदार स्वतः गैर अर्जदार क्र.1 साठी प्रतिनिधी श्री.मोरे गैर अर्जदार क्र.2 एकतर्फा. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्रारदाराने दिनांक 7.12.2008 रोजी सा.वाले क्र.2 कडून सोनी इरीक्सन सेल W 760 i हा मोबाईल हॅन्डसेट रु.15139/- ला विकत घेतला. परंतु तो सदोष होता व त्यात खोलील प्रमाणे दोष होते. अशी तक्रारदारची तक्रार आहे. 1) युएसबी, चार्जर व हेडसेट बरोबर कनेक्ट होत नव्हते. 2) मोबाईल मध्येच बंद होत होता. 3) आवाज कमी येत होता. 4) कधी कधी अचानक चालु बंद होत होता. म्हणून तक्रारदार दि.12.5.2009 रोजी सा.वाले क्र.1 यांचेकडे तो हॅन्डसेट घेऊन गेला. सा.वाले क्र.1 यांनी त्याचा मदरबोर्ड बदलून दि.26.6.2006 रोजी म्हणजेच जवळ जवळ दिड महिन्यांनी तक्रारदाराला हॅन्डसेट दिला. परंतु 20 दिवसानंतर पुन्हा हॅन्डसेट बंद झाला. त्याची बटण बरोबर काम करीत नव्हती. Mp3 चे कार्य बरोबर होत नव्हते. मेमरी कार्ड दाखवले जात नव्हते. म्हणून 16.7.2009 रोजी तक्रारदाराने सा.वाले क्र.1 कडे पुन्हा तो हॅन्डसेट नेवून दिला. व त्यांनी दि.27.7.2007 रोजी परत केला. त्यानंतर 9 महीन्यांनी पुन्हा हॅन्डसेटमध्ये त्याच समस्या निर्माण झाल्या. म्हणून तक्रारदाराने दि.3.10.2009 रोजी सा.वाले क्र.1 कडे तो हॅन्डसेट दिला. त्यानंतर 10 दिवसांनी त्यांनी सोनी इरीक्सन कॉन्टॅक्ट सेन्ट्रलची श्रीमती रिचा गुप्ता हिला हॅन्डसेटच्या समस्येबद्दल मेल पाठविला, स्मरणपत्र पाठविले, तिने सांगीतले की, त्याच्या हॅन्डसेटची समस्या प्राधान्य देवून दूर केली जाईल. त्यानंतर तक्रारदाराने सा.वाले क्र.1 यांना 4 5 वेळा इ-मेल केले. दि.28.10.2009 रोजी त्यानी त्याला वापरण्यासाठी दुसरा हॅन्डसेट W 595 हा दिला. ज्यावेळी तक्रारदार सा.वाले क्र.1 कडे त्याच्या पहिल्या हॅन्डसेटसाठी गेले त्यावेळी त्यांनी बदलून दिलेला हॅन्डसेट परत द्यावा व त्यानंतर 10 दिवसानी त्यांचा हॅन्डसेट त्याला परत मिळेल असे सांगीतले. परंतु तक्रारदाराला वापरण्यासाठी मोबाईल नसल्यामुळे त्याने तो परत केला नाही. 2. तक्रारदाराची तक्रार आहे की, बदलून दिलेला हॅन्डसेटही बरोबर चालत नाही. तसेच त्याच्या हॅन्डसेटच्या व नविन दिलेल्या हॅन्डसेटच्या किंमतीमध्ये 63 ते 70 डॉलरचा फरक आहे. तसेच G.P.S.,RSSReader, AAC Player, Push to talk, Sensor motion game, हया सुविधा ज्या त्याच्या मोबाईलमध्ये आहेत त्या बदलून दिलेल्या मोबाईलमध्ये नाहीत. त्यांने सा.वाले क्र.1 यांना बरेच इ-मेल केले. परंतु त्यांनी लक्ष दिले नाही.म्हणून त्याने मुंबई ग्राहक पंचायत यांचेकडे तक्रार केली. त्यांनीही सा.वाले क्र.1 यांना नोटीस पाठविली. परंतु काही उपयोग झाला नाही. त्याचा हॅन्डसेट अजुनही सा.वाले क्र.1 यांचेकडे आहे. म्हणून त्याने सदरची तक्रार केली आहे. तक्रारदाराने त्याच्या मोबाईलची किंमत परत मागीतली आहे तसेच रु.25,000/- नुकसान भरपाई, हया तक्रारीचा खर्च, व इतर खर्चाची मागणी केली आहे. 3. सा.वाले क्र.1 व 2 यांनी या तक्रारीला उत्तर दाखल केले नाही. तोंडी युक्तीवादाचे वेळेही ते गैर हजर राहीले. तक्रारदाराने त्याचे शपथपत्र व खालील कागदपत्र दाखल केली आहेत. अ) टॅक्स इनव्हाईसची पावती. ब) दि.12.5.2009 च्या डिलेव्हरी चालनची कॉपी. क) दि.16.7.2009 च्या डिलेव्हरी चालनची कॉपी. ड) दि.3.10.2009 च्या डिलेव्हरी चालनची कॉपी. इ) सा.वाले क्र.1 व त्यांचेमध्ये झालेला पत्रव्यवहार. हे मुंबई ग्राहक पंचायत यांनी सा.वाले क्र.1 यांना दि.14.12.2009 रोजी पाठविलेल्या नोटीसची कॉपी व त्याच्या पोचपावत्याच्या कॉपी. 4. आम्ही तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकला. व कागदपत्रं वाचली. त्यावरुन हे दिसून येते की, तक्रारदाराने सा.वाले क्र.2 कडून दि.7.12.2008 रोजी रु.15,139/- ला SEW 560 i मोबाईल घेतला होता. त्यानंतर तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे तिन वेळा तो सा.वाले क्र.1 कडे दुरुस्तीला न्यावा लागला. कारण त्यांत वर प्रमाणे तक्रारीत नमूद केलेल्या समस्या उदभवलेल्या होत्या. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदाराला तात्पुरता वापरण्यासाठी हॅन्डसेट दिला आहे. म्हणजेच त्याचा हॅन्डसेट ते दुरुस्त करु शकले नाही/लौकर दुरुस्त करु शकले नाही. आजपावेतो सदरचा हॅन्डसेट(अक्सेसरीज वगळता) सा.वाले क्र.1 कडेच आहे. सा.वाले क्र.1 यांनी तो हॅन्डसेट दुरुस्त केला आहे. व डिलीव्हरी देण्यायोग्य आहे असे तक्रारदाराला कळविले नाही किंवा मंचात येऊन तसे निवेदन केले नाही. तक्रारदाराला बदलून दिलेला हॅन्डसेट कमी किंमतीचा आहे व त्यात त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या सर्व सुविधा या बदलून दिलेल्या मोबाईलमध्ये नाहीत, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. व त्याने ते शपथेवर सांगीतले आहे. सदरची परिस्थिती लक्षात घेता सा.वाले क्र.1 यांचे सेवेत न्यूनता आहे हे सिध्द होते. 5. तक्रारदाराने हॅन्डसेटची पूर्ण किंमत परत मागीतली आहे. परंतु तक्रारदाराने सुरवातीला 5 महिने त्यांचा हॅन्डसेट वापरला. त्यानंतर 28.10.2009 पासुन त्याला बदलून दिलेला हॅन्डसेटचा तो वापर करीत आहे. तोही हॅन्डसेट बरोबर काम देत नाही असा तक्रारदाराचा आरोप आहे परंतु तक्रारदाराने तो हँडसेट सा.वाले क्र.1 कडे दुरुस्तीस नेला नाही या बाबींचा विचार करता मंचाचे असे मत आहे की, तकारदाराला त्याच्या मोबाईलच्या किंमतीपैकी रु.10,000/- परत करणे योग्य आहे. तसेच त्याला जो मानसिक त्रास झाला त्यासाठी नुकसान भरपाई 1000/- व या तक्रारीचा खर्च रु.1000/- मंजूर करणे योग्य वाटते. सा.वाले क्र. 2 यांची सेवेत न्यूनता आहे असे तक्रारदाराने सिध्द केलेले नाही. मंचाचे मते खालील आदेश न्यायाच्या हिताचे दृष्टीने योय आहे. आदेश 1. तक्रार क्र. 155/2011 (जुना क्र.118/2010)अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. सामनेवाले यांनी तक्रारदाराला रु.10,000/- परत करावे व तक्रारदाराने त्याला बदलून दिलेला हॅन्डसेट W 595 व हॅन्डसेट W 760 i च्या सर्व अक्सेसरीज सामनेवाले क्र.1 यांना परत कराव्या. 3. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराला रु.1000/- नुकसान भरपाई द्यावी व रु.1000/- तक्रारीचा खर्च द्यावा. 4. सामनेवाले क्र.2 विरुध्दची सदरची तक्रार रद्द करण्यात येत आहे. 4. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |