तक्रारदार : स्वतः हजर. सामनेवाले क्र.2 : गैरहजर. सामनेवाले क्र.1 व 3 : एकतर्फा. *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* न्यायनिर्णय 1. तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे. 2. सा.वाले क्र.1 हे भ्रमणध्वनी संच निर्माते असून सा.वाले क्र.2 हे विक्रेते आहेत. सा.वाले क्र.3 हे सा.वाले क्र.1 चे अधिकृत सेवा केंद्र आहे. तक्रारदार यांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून दिनांक 29.3.2009 रोजी सोनी W 580 I Black -353736021020831 या बनावटीचा भ्रमणध्वनी संच विकत घेतला. त्यास एक वर्षाची वॉरंटी होती. 3. तक्रारदारांचे अशी तक्रार आहे की, भ्रमणध्वनीसंच विकत घेतल्यानंतर वॉरंटीच्या कालावधीत सात महिन्याचे आतच भ्रमणध्वनीसंचामध्ये दोष आढळून आले. त्यानंतर सा.वाले क्र.3 यांचेकडून प्रथम दुरुस्त करुन घेतला. दुरुस्त करुन घेतल्यानंतर लगेचच थोडया दिवसांनी त्यात पुन्हा तेच दोष आढळून आले. अशा प्रकारे भ्रमणध्वनीसंचात पुन्हा पुन्हा त्याच तक्रारीसाठी तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचेकडून चार वेळा भ्रमणध्वनीसंच दुरुस्तीसाठी दिला. परंतू तरीही त्यातील दोष काढले गेले नाहीत. म्हणून तक्रारदारांनी वारंवार सा.वाले क्र.3 यांनी भ्रमणध्वनीसंच दूरुस्त करुन द्यावा व त्यातील दोष काढावेत. परंतू सा.वाले क्र.3 यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.म्हणून तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 ते 3 यांना नोटीस पाठविली. नोटीस पाठवताच क्र.3 यांनी तक्रारदारांशी संपर्क साधला व भ्रमणध्वनीसंच सा.वाले क्र.1 यांचेकडून बदलून देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, जेव्हा तक्रारादारांनी त्यांचा भ्रमणध्वनीसंच बदलून देणेसाठी सा.वाले क्र.3 यांचेकडे सुपुर्द केला त्यावेळेस सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारांचा भ्रमणध्वनीसंचामधील मदर बोर्ड बदलून दिला. व त्यानंतर पुन्हा अशी तक्रार दिसून येणार नाही असे सांगीतले. परंतु लगेचच दोन तासांनी पुन्हा तोंच दोष आढळून आला. म्हणून तक्रारदारांनी पुन्हा सा.वाले क्र.1 ते 3 यांना नोटीस पाठवून सात दिवसाचे आत योग्य ती सेवा पुरवावी असे कळविले. परंतू त्यानंतर सा.वाले क्र.1 ते 3 यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणून अंतीमतः तक्रारदारांनी सदर मंचापुढे तक्रार अर्ज दाखल करुन खालील मागण्या केल्या. 1) सा.वाले क्र.1 ते 3 यांनी सयुक्तीकरित्या किंवा वैयक्तिकरित्या भ्रमणध्वनीसंचाची किंमत, नविन पर्यायी फोनची किंमत व तसेच धंद्यातील नुकसान भरपाईबद्दल रु.1,21,229/- येवढी रक्कम तक्रारदारांना द्यावी. 2) सा.वाले यांनी रु.50,000/-झालेल्या मानसिक त्रासाबद्दल तक्रारदारांना द्यावेत. 4. तक्रार अर्ज, शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रासह दाखल केले आहेत. सा.वाले यांना हजर राहून तक्रार अर्जास उत्तर दाखल करावे अशी नोटीस मंचाकडून सा.वाले यांना पाठविण्यात आली. नोटीस सा.वाले क्र.1ते 3 याना मिळाल्याची पोच पावती अभिलेखावर दाखल आहे.नोटीस मिळूनही सा.वाले क्र.1 व 3 गैरहजर राहीलेत. म्हणून तक्रार अर्ज सा.वाले क्र. 1 व 3 यांचे विरुध्द एकतर्फा निकाली काढयातयावा असा आदेश पारीत करण्यात आला. सा.वाले क्र.2 यांनी हजर राहून नोटीसीस उत्तर दाखल केले. 5. सा.वाले क्र.2 यांचे असे म्हणणे आहे की, सदर तक्रार अर्ज खोटा, बिनबुडाचा आहे व केवळ सा.वाले यांना त्रास देण्याच्या हेतुने दाखल केलेला आहे. सा.वाले क्र.2 यांचे असे म्हणणे आहे की, ते फक्त भ्रमणध्वनी संचाचे विक्रेते आहेत. भ्रमणध्वनीसंचाची वॉरंटी ही निर्मातेकडून मिळते. व त्या संबंधी पाचपावती वरती नमुद केलेले आहे. सा.वाले क्र.2 यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. म्हणून तक्रार अर्ज सा.वाले क्र.2 यांचे विरुध्द रद्द करण्यात यावा. 6. तक्रार अर्ज, शपथपत्रे, कागदपत्रे, व सा.वाले क्र.2 यांची कैफीयत यांची पडताळणी करुन पाहीले असता निकालासाठी पुढील प्रमाणे मुद्दे उपस्थित होतात. क्र.. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदार सा.वाले क्र.1 ते 3 यांचे सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | होय. | 2 | तक्रारदार तक्रार अर्जात नमुद केलेल्या मागणी नुसार मागणी करण्यास हक्कदार आहेत काय ? | होय. अंशतः | 3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. तक्रारदार यांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून भ्रमणध्वनी संच विकत घेतला याबद्दल वाद नाही. तक्रारदारांनी भ्रमणध्वनी संच विकत घेतल्यानंतर 7 महिन्यातच भ्रमणध्वनी संचामध्ये दोष आढळून आले. हे तक्रारदारांचे म्हणणे सा.वाले 1 व 3 यांनी हजर राहून खोडले नाही. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या जॅाबसिटस वरुन तक्रारदारांच्या म्हणण्यास पुष्टी मिळते. यावरुन भ्रमणध्वनी संचामध्ये वॉरंटीच्या कालावधीमध्ये दोष असल्याचे स्पष्ट होते. 8. सा.वाले क्र.3 यांनी दोन ते तिन वेळा भ्रमणध्वनी संचाची दुरुस्ती केली. परंतू संपूर्णपणे त्यातील दोष ते काढू शकले नाहीत. हे ही म्हणणे सा.वाले क्र.1 ते 3 यांनी खोडले नाही. यामध्ये सा.वाले यांच्या सेवेतील कमतरता स्पष्ट होते. 9. सा.वाले क्र.2 यांचे असे म्हणणे आहे की, मालासंबंधीची वॉरंटी ही निर्मात्याकडून मिळते, म्हणून सा.वाले क्र.2 हे भ्रमणध्वनी संचातील दोषाबद्दल जबाबदार नाहीत. परंतु भ्रमणध्वनी संचा बद्दलचा मोबदला सा.वाले क्र.2 यांनी स्विकारला आहे. तसेच सा.वाले क्र.3 हे सा.वाले क्र.1 यांचे अधिकृत विक्रेते आहेत. म्हणून सा.वाले क्र.1 ते 3 हे सुयुक्तीकरित्या किंवा वैयक्तिकरीत्या भ्रमणध्वनी संचातील दोष दूर करण्यास जबाबदार आहेत. भ्रमणध्वनी संचातील दोष तीन ते चार वेळा दुरुस्त करुनही दूर झाले नाहीत. येवढेच नव्हेतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 ते 3 यांना पाठविलेल्या नोटीसीस सा.वाले यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यावरुन सा.वाले क्र. 1 ते 3 यांच्या सेवेतील कमतरता सिध्द होते. 10. म्हणून सा.वाले क्र.1 ते 3 संयुक्तीकरीत्या किंवा वैयक्तिकरीत्या भ्रमणध्वनी संचातील दूर करण्यास जबाबदार आहेत. जर दोष दूर होत नसेल तर भ्रमणध्वनी संच बदलून देण्यास जबाबदार आहेत. जर त्याच बनावटीचा व त्याच किंमतीचा भ्रमणध्वनी संच जर उपलब्ध नसेल तर सा.वाले क्र.1 ते 3 हे त्या भ्रमणध्वनी संचाची किंमत परत देण्यास जबाबदार आहेत. 11. तक्रारदार यांना बदली भ्रमणध्वनी संच घ्यावा लागला याबद्दल नविन भ्रमणध्वनी संच्याच्या किंमतीची मागणी केलेली आहे. परंतु नविन भ्रमणध्वनी संच घेतल्यापासून आतापर्यत त्याचा वापर केला आहे. म्हणून त्याच्या किंमतीची भरपाई देणे योग्य वाटत नाही. 12. तसेच तक्रारदारांनी त्यांच्या धंद्यामध्ये झालेल्या नुकसानी बद्दल भरपाई मागीतली आहे. परंतु तक्रारदार कोणत्या स्वरुपाचा धंदा करतात व त्याचे एकंदर किती व कशा प्रकारे नुकसान झाले याचा कोणताही पुरावा दाखल केला नाही. म्हणून या संदर्भात त्यांना कोणतीही धंद्यातील नुकसान भरपाई देता येणार नाही. 13. तक्रारदार यांना भ्रमणध्वनी संच विकत घेतल्यानंतर वॉरंटी कालावधीतच त्यामध्ये दोष निर्माण झाले व तो वारंवार दुरुस्त करुनही दोष दूर झाला नाही. याचा मानसीक त्रास झाला नाही असे म्हणता येणार नाही. म्हणून मानसीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.5000/- द्यावे असा आदेश देणे मंचास योग्य व न्याय वाटते. तसेच तक्रारदार तक्रारअर्ज खर्च मागण्यास हक्कदार आहेत. 14. वरील विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 58/2010 अंशतः करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिरीत्या किंवा संयुक्तीकरीत्या तक्रारदारांचा भ्रमणध्वनी संच सोनी W 580 I Black -353736021020831 हा तक्रारदारांचे समाधान होईपर्यत दुरुस्त करुन द्यावा. जर दुरुस्त होत नसेल तर त्याच बनावटीचा दुसरा भ्रमणध्वनीसंच बदलून द्यावा. 3. जर त्या बनावटीचा भ्रमणध्वनीसंच उपलब्ध नसेल तर त्याची किंमत तक्रारदारांना परत करावी. 4. तक्रारदारांना मानसीक त्रासापोटी रु.5000/-व तक्रार अर्ज खर्च रुपये 1000/- द्यावेत. 6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |