(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदाराची सामनेवाले नं. 1 यांचेकडुन सामनेवाले नं. 2 यांनी उत्पादीत केलेला “SAMSUNG LED TV” रक्कम रु. 42,700/- एवढया किमतीचा ता. 18/9/015 रोजी विकत घेतला.
2. तक्रारदारांचा टी.व्हीचे installation करत असता टिव्हीचे केबल सॉकेट तुटलेले असल्याचे आठवले. तक्रारदारांनी टीव्हीच्या उत्पादनाची तारीखेचा शोध घेतला असता सदर टीव्ही सन 2013 मध्ये उत्पादित झाल्याचे दिसुन आले.
3. सामनेवाले नं. 1 यांनी तक्रारदारांना दोन वर्षापुर्वीचे जुने मॉडेल टीव्हीची विक्री करुन त्रृटीची सेवा दिल्याचे कारणास्तव तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली आहे.
4. सामनेवाले 1 व 2 यांना मंचाची नोटिस प्राप्त होवुनही गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालविण्याबाबतचा आदेश ता. 25/4/016 रोजी पारित करण्यात आला.
5. तक्रारदारांनी पुरावाशपथपत्रा व लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. सामनेवाले तर्फे आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे.
6. तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांचेकडुन रक्कम रु. 44,077/- चा “SAMSUNG LED 40” ता. 18/09/2015 रोजी विकत घेतल्याच्या “Retail invoice” ची प्रत मंचात दाखल आहे.
7. तक्रारदारांना टीव्हीचे installation करत असतांना टीव्हीचे मॉडेलचे केबल सॉकेट ब्रोकन अवस्थेत आढळले तसेच टी.व्ही मॉडेल सन 2012 चे असल्याबाबत तक्रारदारांनी सामनेवाले नं. 1 यांच्या प्रत्यक्ष दुकानात जावून या संदर्भात माहीती दिली तसेच ता. 03/10/2015 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली तथापी सामनेवाले यांच्यातर्फे प्रतिसाद मिळाला नाही. सामनेवाले प्रस्तुत प्रकरणातही हजर नाहीत. तक्रारदारांनी टीव्हीचे फोटोची प्रत मंचात दाखल केली आहे.
8. सामनेवाले यांनी तक्रारदारांना जुना व सॉकेट ब्रोकन असल्याच्या अवस्थेत असलेल्या टीव्हीची विक्री करुन सदोष सेवा ल्यिाचे यावरुन स्पष्ट होते.
9. तक्रारदारांच्या टीव्हीला विकत घेतल्यापासून एक वर्षाच्या मुदतीचा कालावधी दिलेली आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी तक्रादरांना नवीन टी.व्ही बदलून देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
10. तक्रारदारांनी टीव्ही खरेदी पोटी सामनेवाले नं. 1 यांचेकडे रक्कम रु. 44,077/- अदा करुनही सदर टीव्हीचा वापर त्यांना होवु शकला नाही. त्यामुळे निश्चितच मानसिक त्रास झाला व सदरची तक्रार दाखल करावी लागली आहे.
11. उपरोक्त चर्चेवरून तसेच निष्कर्षानुसार, खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 1084/2015 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी तक्रारदारांना जुन्या मॉडेलची टीव्हीची विक्री करुन सदोष सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येतो.
3) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना जुना दोषयुक्त टीव्ही बदलुन नवीन सिलबंद टीव्ही “SAMSUNG LED TV 21” नवीन वॉरंटी सहीत ता. 30/08/2016 पर्यंत द्यावा.
अथवा
3) सामनेवाले यांनी तक्रारदारांना टीव्हीची किंमत रु. 42,700/-(रु. चव्वेचाळीस हजार सतशे फक्त) ता.18/09/2015 पासुन ता. 30/08/2016 पर्यंत 6% व्याजदराने द्यावी. तसे न केल्यास ता.18/09/2015 पासुन आदेशाच्या पुर्ततेपर्यंत 9% व्याजदराने द्यावी.
4) तक्रारदारांना आदेश ठेवणत येतो की, सामनेवाले यांचे कडुन नविन टीव्ही अथवा टीव्हीची रक्कम रु. 42,700/- (रु. बेचाळीस हजार सातशे फक्त) प्राप्त झाल्यानंतर जूना टीव्ही सामनेवाले यांना आदेशपुर्तीनंतर 30 दिवसात परत द्यावा.
5) सामनेवाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्क्म रु. 2,500/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 2,500/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) ता. 30/08/2016 पर्यंत द्यावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास ता. 01/09/2016 पासून सदर रकमा 9% व्याजदरासहीत द्याव्यात.
6) आदेशाच्या प्रती उभय पक्षकाराना विनाविलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.
7) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.
ठिकाण – ठाणे.
दिनांक - 27/06/2016