Maharashtra

Nagpur

CC/11/27

Shri Subhash Sadashiv Dahate - Complainant(s)

Versus

Sneh Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit Through Manager - Opp.Party(s)

Adv. A.D. Bagade

23 Aug 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/27
 
1. Shri Subhash Sadashiv Dahate
Model Mill Chawl No. 8, Ganeshpeth,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sneh Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit Through Manager
Ambedkar Chowk, Garoba Maidan
Nagpur
Maharashtra
2. Shri Harish Patiramji Khandait, President- Sheh Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit
Ambedkar Chowk, Garoba Maidan
Napgur
Maharashtra
3. Sau. Padma Harish Khandait, Secretary- Sneh Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit
Ambedkar Chowk, Garoba Maidan
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. A.D. Bagade, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक : 23/08/2011)
 
1.          प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 21.01.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
 
2.                     प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यानुसार तो काम करीत असलेली एम्‍प्रेस मिल 2002 मध्‍ये बंद पडल्‍यावर त्‍यातुन मिळालेल्‍या मोबदल्‍यापोटी रक्‍कम रु.50,000/- गैरअर्जदारांचे पत पेढीमध्‍ये 14.50% व्‍याजाप्रमाणे दि.10.07.2004 ते 09.07.2007 या कालावधीकरीता मुदत ठेवीमध्‍ये ठेवली होती. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सदर रक्‍कम सन 2007 मध्‍ये पुन्‍हा 12.50% व्‍याज मिळेल असे सांगितल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरची परिपक्‍व रक्‍कम पुन्‍हा दि.10.07.2007 ते 09.12.2010 या कालावधीकरीता गुंतविली. सदर मुदत संपल्‍यावर परिपक्‍व मुल्‍याची गैरअर्जदारांना वारंवार मागणी करुनही सदरची रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत दिली नाही व त्‍याने दिलेल्‍या नोटीसचे उत्‍तरही दिले नाही, त्‍यामुळे ही गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी असल्‍यामुळे सदर तक्रार मंचात दाखल करुन रु.1,02,393/- द.सा.द.शे.15% व्‍याजासह मिळावे, मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चाचे रु. 1,000/- व इतर खर्च मिळावा अशी मंचास विनंती केलेली आहे.
 
3.          तक्रारकर्त्‍याने आपल्‍या प्रतिउत्‍तरात असे कथन केले की, तो कधीही सदर पत संस्‍थेच्‍या व्‍यवस्‍थापक या पदावर नव्‍हता तर तो तेथे चपराशी या पदावर होता. ग्राहकांकडून रकमा जमा करीत असे व त्‍याचा हिशोब व नोंद घेण्‍याचे काम गैरअर्जदार क्र.2 घेत होते. गैरअर्जदारांनी सदरची तक्रार दाखल केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍या विरुध्‍द पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे व त्‍यावर पोलिसांनी केलेल्‍या चौकशीत त्‍यांचे समाधान झाले नाही.
4.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्‍यात आली असता गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना नोटीस प्राप्‍त होऊन ते मंचात उपस्थित झाले असुन त्‍यांनी आपला जबाब दाखल केला आहे. गैरअर्जदारांचे कथनानुसार सदरची तक्रार दिवाणी न्‍यायालयाचे कार्यक्षेत्रात येते, तसेच गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याचे आरोप अमान्‍य केलेले आहेत. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे कथनानुसार दि.15.04.2005 पासुन तक्रारकर्ता हा व्‍यवस्‍थापक या पदावर कार्यरत होता व सदर पदावर कार्यरत असतांना ग्राहकांकडून पैसे घेणे, त्‍यांच्‍या नोंदी घेणे, दैनंदीन बचत ठेवींचे, आर.डी. चे पासबुक तपासणे, सेव्‍हींग खाते तपासणे, कॅश बुक लिहीणे व संस्‍थेची दैनंदिन जमा खर्चाची जबाबदारी त्‍याचेकडे होती. तसेच गैरअर्जदारांचे संस्‍थेच्‍या कर्मचा-यांशी संगणमत करुन ग्राहकांच्‍या पैशाचा रु.1,24,435/- एवढया रकमेचा अपहार केला व आपला गैरकायदेशिर व्‍यवहार, अपहार केल्‍याच्‍या सर्व बाबीच्‍या बचावाकरीता सदरची तक्रार या मंचात दाखल केलेली आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार दंडासह खारिज करण्‍यांत यावी अशी मंचास विनंती केली आहे.
 
5.                     तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात मुदत ठेव प्रमाणपत्र, नोटीस, पोष्‍टाच्‍या पावत्‍या इत्‍यादींच्‍या छायांकीत प्रती जोडलेल्‍या आहेत.
 
 
6.                     सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्‍तीवादाकरीता दि.09.08.2011 रोजी आली असता दोन्‍ही पक्ष हजर, मंचाने त्‍यांचा युक्तिवाद ऐकूण प्रकरण गुणवत्‍तेवरील निकालाकरीता ठेवण्‍यांत आले. सदर प्रकरणी दाखल तक्रार व दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
                                           -// निष्र्ष //-
 
 
 
7.                     सदर प्रकरणात अगोदरचे व्‍याज पाहता असे दिसुन येते की, गैरअर्जदारांचे पत संस्‍थेमध्‍ये दि.10.04.2004 ते 09.07.2007 या कालावधीकरीता द.सा.द.शे.14.5% या दराने रु.50,000/- एवढी रक्‍कम मुदत ठेव स्‍वरुपात ठेवली होती. सदरची रक्‍कम देय व्‍याजासह वारंवार मागणी करुनही अद्यापही गैरअर्जदारांनी सदरची रक्‍कम परत केली नाही, ही बाब पाहता सदरची तक्रार कालमर्यादेत आहे, तसेच ती चालविण्‍याचा या मंचास अधिकार आहे.
8.          तक्रारकर्त्‍याचे मते सदर मुदत ठेवीच्‍या परिपक्‍वता मुल्‍याची रक्‍कम तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा 12.5% व्‍याजाकरता दि.10.07.2007 ते 09.12.2010 या कालावधीकरता मुदत ठेव स्‍वरुपात ठेवले होते. या मागणी करता तक्रारकर्त्‍याने कुठलाही पुरावा सादर केलेला नाही, त्‍यामुळे सदर मुदत ठेवीची रक्‍कम 12.5% व्‍याजासह पुन्‍हा नुतनीकरण केल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे पुराव्‍या अभावी मंचास मान्‍य करता येणार नाही. परंतु हेही तितकेच खरे आहे की, दि.09.07.2007 रोजी पर्यंतची मुदत ठेवीचा रक्‍कम देय व्‍याजासह तक्रारकर्त्‍यास गैरअर्जदारांनी परत केली नाही ही त्‍यांचे सेवेतील कमतरता आहे. गैरअर्जदारांच्‍या मते तक्रारकर्ता हा सदर पत संस्‍थेत सन 2008 पासुन व्‍यवस्‍थापक या पदावर कार्यरत होता व सदर पदावर असतांना त्‍याने पैशाचा गैरकायदेशिर व्‍यवहार व अपहार केला. त्‍यामुळे बचावासाठी तक्रारकर्त्‍याने सदरची खोटी तक्रार या मंचात दाखल केलेली आहे. या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ गैरअर्जदारांनी कुठलाही पुरावा गैरअर्जदारांनी सादर केलेला नाही, म्‍हणून हे म्‍हणणे मंचास मान्‍य करता येणार नाही.
 
9.          सदर प्रकरणातील वस्‍तुस्थिती पाहता मुदत ठेवीचे व्‍याज दि.10.08.2004 ते 09.07.2007 या कालावधीकरीता ठेवलेल्‍या मुदत ठेवीचे पुन्‍हा नुतणीकरण झालेले नसल्‍यामुळे दि.09.07.2007 रोजी मिळणा-या परिपक्‍वता मुल्‍यावर बँकेचे प्रचलित व्‍याजदराचा विचार करता द.सा.द.शे.8% दराने व्‍याज देणे योग्‍य राहील असे या मंचाचे मत आहे.
 
            वरील सर्व बाबी लक्षात घेता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंति दे //-
 
 
 
1.         तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास मुदत ठेवीची परिपक्‍व रक्‍कम रु.71,744/-      दि.09.07.2007 पासुन रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.8% या दराने व्‍याजासह परत करावी.
3.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.