::: नि का ल प ञ:::
निशीणी क्र.1 वर आदेश
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 6.11.2015)
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ऑन लाईन शॉपींगवरुन Ab Propel Exerciser किंमत रुपये 5999/- दि.7.9.2015 ला मागविले होते. त्याची किंमत अर्जदाराने डेबीट कार्ड व्दारा दिली. सदर प्रोडक्ट दि.16.9.2015 ला अर्जदाराला मिळाला. अर्जदाराला मिळालेले प्रोडक्ट हे Ab Propel Exerciser नसून त्याचे सारखे दिसणारे ‘Galaxy Fitness Six Pack Ab’ साधारण किंमत रुपये 3200/- आहे. याबाबत, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वारंवार तक्रार केली असून अर्जदाराला समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही म्हणून सदर तक्रार मंचा समक्ष दाखल करण्यात आली आहे.
2. अर्जदार स्वतः हजर होऊन त्याचा प्राथमिक युक्तीवाद ऐकण्यात आला. अर्जदाराची तक्रारीची पडताळणी करतांना व त्याचे युक्तीवादावरुन मंचाचे निर्देशनास आले की, गैरअर्जदाराचे व्यवसायाचा पत्ता नवी दिल्लीचा असून गैरअर्जदार नवी दिल्लीतून त्यांचा व्यवसाय करतात. गैरअर्जदाराचे या जिल्हा मंचाचे अधिकार क्षेञात कोणतेही व्यवसाय कार्यालय नाही.
ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 11(2) प्रमाणे – तक्रार अर्ज अधिकार क्षेञातील संबंधित जिल्हा मंचाकडे दाखल करता येतील ते असे –
ए) विरुध्द पक्षकारांची संख्या एकापेक्षा जास्त असल्यास सर्व विरुध्द पक्षकार, तक्रार अर्ज दाखल करतेवेळी प्रत्यक्षात व स्वेच्छेने सदर मंचाच्या कार्यक्षेञात रहात असतील किंवा धंदा अगर व्यापार करीत असतील किंवा तेथे त्याचे शाखा कार्यालय असल्यास अथवा उपजीविकेसाठी कोणताही धंदा अगर व्यवसाय करीत असतील तर.
बी) जर एकापेक्षा जास्त विरुध्द पक्षकार असतील व तक्रार अर्ज दाखल करतेवेळी त्या भागात कोणीही विरुध्द पक्षकार प्रत्यक्ष व स्वेच्छेने त्या कार्यक्षेञात रहात असेल किंवा उपजिविकेसाठी कोणताही धंदा अगर व्यवसाय करीत असेल किंवा तेथे त्याचे शाखा कार्यालय असेल, तर परंतु अशा प्रकरणात एक तर जिल्हा मंचाची संमती घ्यावी लागेल किंवा जो विरुध्द पक्षकार त्या जिल्हा मंचाच्या कार्यक्षेञात राहात नाही व उपजीविकेसाठी धंदा अगर व्यवसाय करीत नाही किंवा त्याचे शाखा कार्यालय नाही अशा व्यक्तीची संमती असणे आवश्यक आहे.
सदर तक्रार दाखल करण्याचे कारण चंद्रपूर जिल्ह्यात घडले नसून गैरअर्जदाराचे व्यवसायीक कार्यालय नवी दिल्ली येथे आहे वरील नमूद असलेल्या कायद्याच्या अन्वयाने मंचाचे असे मत ठरले आहे की, सदर तक्रार या मंचाचे कार्यक्षेञात बसत नाही. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार अस्विकृत करुन नस्तीबध्द करण्यात येते.
2) अर्जदाराला तक्रारीची मुळ प्रत सोडून उर्वरीत प्रत परत करण्यात यावे.
3) अर्जदाराने आपला तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
4) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
5) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 6/11/2015