// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 285/2014
दाखल दिनांक : 18/12/2014
निर्णय दिनांक : 10/02/2015
प्रदीप गोपाळराव चिद्दरवार
वय 54 वर्षे, धंदा – व्यापार
रा. ‘श्री बालाजी ट्रेडर्स,
अजमेरा डेकोरेटर जवळ, गांधी चौक,
अंबादेवी देऊळ अमरावती
ता.जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
SNAPDEAL-FCVOI Through Authorized Officer
खसरा नं. 1097(3-3) गल्ली नं. 8
मेन फीरनी रोड, Village Kapashera,
Near Flad Nala
दिल्ली सिटी / स्टेट दिल्ली 110 037 : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. मराठे
विरुध्दपक्षा तर्फे ः एकतर्फा
ग्राहक तक्रार क्रमांकः 285/2014
..2..
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 10/02/2015 )
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याला Sandwich Maker घ्यावयाचे होते व विरुध्दपक्षाच्या वेबसाईटवर ते उपलब्ध असल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडे Sandwich Maker ची ऑर्डर दिली त्यानंतर तक्रारदारास विरुध्दपक्षाकडून दि. ८.५.२०१४ रोजी इन्व्हाईस प्राप्त झाले. विरुध्दपक्षाने Prestige Jumbo Sandwich Maker तक्रारदारास ब्ल्यु डार्ट कुरीअर मार्फत पाठविले त्याची किंमत रु. २,४५०/- होती. ही रक्कम तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना दिली.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे सदरचा Sandwich Maker हा योग्य रित्या चालत नसल्याने त्याबद्दल त्याने विरुध्दपक्षाकडे ईमेल व्दारे तक्रार नोंदविली असता त्यास 2-3 दिवसात कुरीअरवाले येऊन ते Sandwich Maker परत घेवून जाईल असे सूचविले. त्यानंतर दि. १९.६.२०१४ रोजी Fexex कुरीअर कडे तक्रारदाराने हे Sandwich Maker विरुध्दपक्ष यांना पाठविण्यासाठी सुपुर्द केले. विरुध्दपक्षाने Sandwich Maker हे योग्य रित्या
ग्राहक तक्रार क्रमांकः 285/2014
..3..
काम करीत नसेल व त्याच्या गुणवत्तेबद्दल तक्रार असल्यास त्याची किंमत परत करण्याचे आश्वासन तक्रारदाराला दिले होते. याबद्दलचा ईमेल विरुध्दपक्षाकडून तक्रारदाराला प्राप्त झाला होता. Sandwich Maker विरुध्दपक्ष यांना पाठविल्यानंतर सुध्दा त्यांनी तक्रारदारास त्याची किंमत परत न पाठविल्याने शेवटी विरुध्दपक्ष यांना वकीला मार्फत दि. २७.१०.२०१४ रोजी नोटीस पाठविण्यात आली असता विरुध्दपक्षाने ती नोटीस घेण्यास नाकारले.
4. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्षाने तक्रारदारास विकलेला Sandwich Maker याच्या गुणवत्तेबद्दल तक्रार असल्याने व तो योग्यरित्या चालत नसल्याने विरुध्दपक्षाने कबुल केल्याप्रमाणे त्याची किंमत तक्रारदाराला परत करावयाची असतांना सुध्दा ती केली नाही व अशा त-हेने सेवेत त्रुटी केली होती. त्यामुळे त्यास मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. योग्य प्रकारचे उपकरण देण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची असतांना त्याने ती पुर्ण केली नाही म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी हा अर्ज करण्यात आला.
5. विरुध्दपक्ष यांना पाठविलेली नोटीस निशाणी 7 ही घेण्यास त्यांनी नाकारले व त्यामुळे दि. २९.१.२०१५ च्या आदेशा
ग्राहक तक्रार क्रमांकः 285/2014
..4..
प्रमाणे विरुध्दपक्षा विरुध्द हा तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात आला.
6. तक्रारदारातर्फे अॅड. श्री. मराठे यांचा युक्तीवाद ऐकला. युक्तीवाद दरम्यान त्यांनी तक्रारदाराने निशाणी 2 सोबत दाखल केलेल्या दस्तांचा आधार घेतला व असे कथन केले की, विरुध्दपक्षाने तक्रारदारास जो Prestige Jumbo Sandwich Maker रु. २,४५०/- दिला होता तो योग्य चालत नव्हता व त्याच्या गुणवत्तेत दोष होता. तक्रारदार यांना विरुध्दपक्षाने 100 टक्के मॅनीबॅक ग्यारंटी दिली असतांना सुध्दा व उपकरण विरुध्दपक्षाला पाठविले असतांना सुध्दा त्यांनी ही रक्कम परत केली नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केलेली असून तक्रारदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा अशी विनंती केली. तसेच तक्रारदाराने जरी मानसिक व शारिरीक त्रासासाठी रु. ५०,०००/- नुकसान भरपाई मागितले असले तरी त्याबद्दल योग्य तो निर्णय मंचाने घ्यावा असा युक्तीवाद केला.
7. तक्रारदाराने तक्रार अर्जात विरुध्दपक्षा विरुध्द केलेले कथन हे विरुध्दपक्षाने नाकारले नाही. त्यामुळे ते न स्विकारण्याचे कारण नाही. ते कथन तक्रारदाराने निशाणी 2 सोबत दाखल केलेले दस्तावरुन शाबीत होते. निशाणी 2/9 ला
ग्राहक तक्रार क्रमांकः 285/2014
..5..
विरुध्दपक्षाने जो ईमेल तक्रारदाराला पाठविला होता त्यामध्ये त्यांनी उपकरणामध्ये गुणवत्ते बाबत दोष असल्याने ग्राहकाचे समाधान होत नसल्यास तर उपकरणाची पुर्ण किंमत परत करण्यात येईल असे नमूद केले होते. तक्रारदाराने दाखल केलेल्या दस्तावरुन ही बाब शाबीत होते की, विरुध्दपक्षाने तक्रारदाराला विकलेला Sandwich Maker याच्या गुणवत्तेत दोष होता व त्यामुळे ते विरुध्दपक्षाला परत पाठविले होते. अशा परिस्थितीत विरुध्दपक्षाने तक्रारदारास त्या उपकरणाची किंमत ही परत करावयास पाहिजे होती, जी त्याने परत न केल्याने विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढण्यात येतो.
8. तक्रारदाराने जरी रु. ५०,०००/- मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली असली तरी प्राप्त परिस्थितीत ती न्याय पुर्ण दिसत नाही. परंतु विरुध्दपक्षाच्या सेवेतील त्रुटीमुळे तसेच गुणवत्तेमध्ये दोष असलेले उपकरण विरुध्दपक्षाने तक्रारदाराला पाठविल्यामुळे त्यास जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल विरुध्दपक्ष हे तक्रारदारास रु. ५,०००/- नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत.
ग्राहक तक्रार क्रमांकः 285/2014
..6..
9. वरील विवेचनावरुन तसेच दाखल दस्त, अॅड. श्री. मराठे यांचा युक्तीवाद स्विकारुन तक्रार अर्ज खालील आदेशा प्रमाणे मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्षाने तक्रारदारास रु. २,४५०/- या आदेशाची प्रत मिळाल्या पासुन 30 दिवसाचे आत त्यावर दि. १९.६.२०१४ पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने परत करावे.
- विरुध्दपक्षाने तक्रारदारास मानसिक त्रासाबद्दल रु. ५,०००/- व या तक्रारीचा खर्च रु. २,०००/- द्यावे.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 10/02/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष