सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.26/2007
सौ.रुक्मिणी कृष्णा सावंत
वय सु.46 वर्षे, धंदा- घरकाम,
रा.ओंकार नगर, दोडामार्ग,
ता.दोडामार्ग, जिल्हा - सिंधुदुर्ग ... तक्रारदार/अर्जदार.
विरुध्द
श्रीमती मनिषा सुभाष चव्हाण
वय सु.40 वर्षे, धंदा- बांधकाम,
चव्हाण अँड कंपनी
बिल्डर्स अँड डेव्हलपर्स,
दोडामार्ग, सुरुचीवाडी
दोडामार्ग तहसीलदार कार्यालयानजिक,
ता.दोडामार्ग, जिल्हा – सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः- 1) श्री. कमलाकांत ध.कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्य.
तक्रारदारतर्फे – श्री आर.एस. गव्हाणकर.
विरुद्ध पक्षातर्फे – श्री. बी. एम. दळवी.
आदेश नि.1 वर
(दि.24/04/2015)
द्वारा : मा. सौ. वफा जमशीद खान, सदस्या
1) प्रस्तुत प्रकरणात मुळ तक्रार अर्ज क्र.36/2006 मधील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी केली नसल्याने ग्राहक संरक्षण कायदा कलम 25(3) प्रमाणे अर्ज दाखल करणेत आला होता. दरम्यान सदर आदेशावर अपिल दाखल असल्याने प्रकरण स्थगित होते. त्यानंतर उभय पक्षकारांमध्ये तडजोड होऊन त्यांनी तडजोडनामा दाखल केला तो नि.क्र.48 वर आहे. तडजोडनामा उभय पक्षकारांवर बंधनकारक आहे. उभय पक्षकारांनी तडजोडनाम्याला अनुसरुन प्रकरण निकाली काढण्यात यावे अशी विनंती केली आहे.
2) विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर दुय्यम निबंधक, दोडामार्ग दस्त क्र.250/2015 ची झेरॉक्स प्रत हजर केली ती नि.क्र.49 वर आहे.
3) नि.क्र.48 मधील तडजोडनाम्यातील तरतुदीप्रमाणे विरुध्द पक्ष यांचे ताब्यात तक्रार क्र.36/2006 मधील डी.डी.क्र.047914 ते 047918 दि.16/05/2006 प्रत्येकी रक्कम रु.35,500/- चे पाच डिमांड ड्राफ्ट देणेत आले.
4) सबब नि.क्र.48 ला अनुलक्षून दरखास्त प्रकरण तडजोडीने निकाली करणेत येते.
5) खर्चाबाबत आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 24/04/2015
(के. डी. कुबल) (व्ही.जे. खान)
प्रभारी अध्यक्ष सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग