जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १९५/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ०१/११/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २९/०१/२०१३
१. सौ. सुषमा सुभाष पाटील,
उ.वय वर्षे, धंदा – घरकाम
राहणार – मु.पो. वलवाडी ता.जि. धुळे.
साक्री रोड, ता.जि. धुळे. ............ तक्रारदार
विरुध्द
श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे
(नोटीसची बजावणी चेअरमन यांचेवर व्हावी)
१. कुमुदिनी पंचभाई (चेअरमन)
रा.११९९, समर्थ भवन नगरपटटी, धुळे.
२. सचिन सुरेश कुलकर्णी (मुख्यकार्यकारी अधिकारी)
रा.११९९, समर्थ भवन नगरपटटी, धुळे. ...........विरुध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.वाय. शिंपी)
(विरुध्दपक्ष तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
सौ.एस.एस.जैन, सदस्याः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
पावती नं.. |
ठेव दिनांक |
देय दिनांक |
ठेव रक्कम |
देय रक्कम |
४९५८५ |
१९.११.०४ |
१९.११.१० |
१०,०००/- |
२०,०००/- |
३. तक्रारदार यांनी मुदत ठेव अन्वये गुंतविलेल्या रक्कमेसाठी विरुध्द पक्ष पतसंस्थेकडे वेळोवेळी मागणी केली असता पतसंस्थेने रक्कम दिली नाही अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावतीवरील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रूपये ४,०००/- व अर्जाचा खर्च रूपये १,०००/- मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
४. विरुध्द पक्ष यांना मे. मंचाची नोटीस लागुनही हजर न झाल्याने, विरूध्द पक्ष यांच्याविरूध्द एकतर्फा आदेश करण्यात आला आहे.
५. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच व त्यांच्या वकीलांचा युक्तीवाद याचा विचार होता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतीची प्रत सादर केली आहे. विरुध्द पक्ष यांनी
तक्रारदार यांची मुदत ठेव पावतीची रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावतीवरील रक्कमेचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून
मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती मध्ये रक्कम गुंतवली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावतीत गुंतवलेली रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतीची व्याजासह होणारी रक्कम श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे व विरूध्द पक्ष क्र.१ व २ यांच्याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. परंतु तक्रारदारांची मुदत ठेव पावती अंतर्गत संपुर्ण रक्कम व्याजासह देण्यास विरूध्द पक्ष श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे जबाबदार आहे. असे या न्यायालयाचे मत आहे. या संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of MaharashtraCo-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of co-operation, which is the very foundation of establishment ofthe co-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष क्र.१ व २ यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरुध्द पक्ष श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांच्याकडुन रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
९. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात
नमुद असलेली मुदत ठेव पावती मधील मुदतअंती देय रक्कम ठरलेल्या व्याजदरानुसार व
त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के प्रमाणे व्याज या
आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. मुदत ठेव पावतीचा तपशील खालील
प्रमाणे.
पावती नं.. |
ठेव दिनांक |
देय दिनांक |
ठेव रक्कम |
देय रक्कम |
४९५८५ |
१९.११.०४ |
१९.११.१० |
१०,०००/- |
२०,०००/- |
३. श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्यादीत धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
४. वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.