मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर दरखास्त अर्ज क्रमांक : 01/2009 (कलम 25) मूळ तक्रार अर्ज क्र.56/2007 दरखास्त अर्ज दाखल झाल्याचा दि.29/06/2009 दरखास्त अर्ज निकाली झाल्याचा दि.18/02/2011 श्री.एम.एम.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.नौशाद हुसेन खान रा.अलरज्जाक कॉम्प्लेक्स, जामा मशिदीसमोर, बाजारपेठ, झारणी रोड, रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द सौ.जुलेखा अ. रज्जाक पावसकर तर्फे मुखत्यार श्री.इक्बाल अहमद फोडकर घर नं.2383, कॉन्व्हेंट स्कूलजवळ, शहर पोलीस स्टेशनमागे, ता.जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.के.जी.आवटे सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.एस.एस.दामुष्टे -: नि.1 वरील आदेश :- 1. मंचाने मूळ तक्रार क्र.56/2007 मध्ये पारीत केलेल्या निकालपत्रातील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षकाराने न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 25 (3) अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे. 2. सदर प्रकरणाची नोटीस विरुध्द पक्षास नि.8 वरील पोचपावतीव्दारे बजावण्यात आली, परंतु विरुध्द पक्षकार या मंचासमोर हजर झाल्या नाहीत, परंतु त्यांचे मुखत्यार मंचासमोर हजर झाले. त्यामुळे मंचाने दि.05/11/2009 ला विरुध्द पक्षातर्फे म्हणणे नसल्याचा आदेश पारीत केला. 3. दरम्यान आज प्रकरण मंचासमोर अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात आले असून आज मंचासमोर तक्रारदाराची मुखत्यार पत्नी व त्यांचे वकिल हजर झाले व त्यांनी मंचासमोर नि.46 वर अर्ज दाखल करुन याकामातील विरुध्द पक्षकार नामे जुलेखा अ. रज्जाक पावसकर हिचे दि.17/02/2011 रोजी निधन झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आपणास सदरचे दरखास्त प्रकरण चालवावयाचे नाही व प्रकरण निकाली करावे अशी विनंती केली. त्यामुळे सदरचे प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश - सदर दरखास्त प्रकरण क्र.01/2009 मध्ये विरुध्द पक्षकार श्रीमती जुलेखा अ.रज्जाक पावसकर हिचे दि.17/02/2011 रोजी निधन झाल्यामुळे तक्रारदाराचे वकिलांनी दाखल केलेल्या नि.46 वरील अर्जाव्दारे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
- खर्चाबद्दल काहीही हुकूम नाही.
- सदरचे दरखास्त प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते.
रत्नागिरी दिनांक : 18/02/2011 (एम.एम.गोस्वामी) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. M. M. Goswami] PRESIDENT | |